- वि. भा. देशपांडे
बाई, विजयाबाई ऐंशी पूर्ण करताहेत यावर सहजपणाने विश्वास बसणो कठीण आह़े त्यांना जेव्हा मी पहिल्यांदा पाहिले त्याला आता पन्नास-पंचावन्न वर्षे झालीत़ तेव्हा त्या विजया जयवंत होत्या़ नंतर विजया खोटे झाल्या आणि आता कित्येक वर्षे विजया मेहता या नावाने सुपरिचित आहेत. तेव्हापासून ते आजर्पयत केव्हाही भेटल्या की त्यांचा तोच उत्साह, तेच मनसोक्त हसणो, चष्म्यातून निरखून पाहणो, आहे तसेच आह़े. इतक्या वर्षातले एक साम्य अजूनही टिकून आहे, ते म्हणजे त्या कधी कधी इतक्या औपचारिक वागताना दिसतात, तर कधी कधी (खरं म्हणजे अनेकदा) अनौपचारिक वागतात़ यातले नेमके त्यांचे खरे रूप कोणते याचा अनेकांना संभ्रम वाटत असावा़ तशी बाईंची मी अनेक रूपे पाहिलेली - अनुभवलेली आहेत़ त्या अभिनेत्री, दिग्दर्शिका, संस्थाचालिका, नाटय़प्रशिक्षिका आणखी बरेच काही आहेत़ विलक्षण बुद्धिमान आहेत़ मला नेहमी वाटते की, विजयाबाई सजर्नशील - प्रयोगशील बहुरूपिणी आहेत; कारण त्यांची कामगिरी प्रायोगिक रंगभूमीच्या क्षेत्रत जितकी स्मरणीय आहे, तितकीच व्यावसायिक रंगभूमीवरही तोलामोलाची आहे.
विजयाबाईंना मी प्रथम पाहिले ते पु़ ल़ देशपांडे यांच्या ‘तुङो आहे तुजपाशी’मध्ये उषाच्या भूमिकेत. नंतर ‘सुंदर मी होणार’मध्ये बेबीराजे आणि ‘वा:यावरच्या वरातीत’ त्या व:हाडी मंडळींमध्य़े ज्यांनी तो रंगभूमीचा सोनेरी काळ पाहिला असेल त्यांना या नाटकांचे गारुड काय होते याचा अंदाज येऊ शकेल; पण त्या मोरपंखी वातावरणात विजयाबाईंनी धन्यता न मानता, त्यात गुंतून न पडता एक नवी, वेगळी प्रयोगशील नाटकांची सजर्नाची वाट धरली़ त्या काळात विजय तेंडुलकर लिहिते झाले होत़े त्यांच्या ‘श्रीमंत’ नाटकात मथूची भूमिका करून विजयाबाईंनी लक्ष वेधलेले होतेच; पण ‘चिमणीचं घर’, ‘कावळ्यांची शाळा’सारख्या दर्शनी चमत्कारिक वाटणा:या नाटकांकडे लक्ष वळवल़े याआधी आत्माराम भेंडे, माधव मनोहर, भालबा केळकर, डॉ़ श्रीराम लागू आदि रंगधर्मीनी वेगवेगळे धाडसी नाटय़प्रयोग करून पाहिले होतेच़ त्या मांदियाळीत विजयाबाई आल्या आणि त्यांनी आपल्या लखलखत्या कामगिरीने साठ ते सत्तरचे दशक तेजाळून टाकल़े श्री़ पु़ भागवत, विजय तेंडुलकर यांच्यासारखी प्रतिभावान मंडळी साथीला होती़ अरविंद देशपांडे, माधव वाटवे, अरुण काकडे आदि उत्साही कलाकार येऊन मिळाल़े त्यातून ‘रंगायन’ संस्था उभी राहिली़ ‘रंगायन’ने जी नाटके - एकांकिका सादर केल्या त्यातून प्रायोगिक रंगभूमीची चळवळ आकाराला येत गेली़ एक शून्य बाजीराव, खुच्र्या, मादी, ससा आणि कासव यांसारख्या प्रयोगांनी विजयाबाईंच्या अभिनय - दिग्दर्शन क्षेत्रतील कल्पकतेची सुवर्ण मोहोर उमटवली़ ‘एक शून्य’, ‘खुच्र्या’, ‘मादी’ यातला विजयाबाईंचा अभिनय आव्हानात्मक होता़ ऐन तारुण्यात वृद्ध स्त्रीची भूमिका करणो आव्हान तर होतेच; पण तो एक कल्पक प्रयोगशीलतेचा ध्यासमय आविष्कार होता़ विजय तेंडुलकरांची ‘मादी’ ही तीस मिनिटांची एकांकिका किती विलक्षण नाटय़ानुभव देऊ शकते याचा आनंद विजयाबाई आणि डॉ़ श्रीराम लागू यांच्या अभिनय जुगलबंदीतून मी अनेकदा घेतला आह़े याच काळात माझा आणि विजयाबाईंचा परिचय सहवास वाढत गेला़ तेव्हा म्हणजे 1961 ते 68 या काळात ‘रंगायन’ संस्थेचे पुण्यातले व्यवस्थापनाचे काम माङयाकडे होत़े त्या कामाच्या निमित्ताने भेटणारी माणसे, होणा:या चर्चा यातून माझी नाटय़जाण प्रगल्भ होत गेली़ त्या काळात विजयाबाईंना मी श्रेष्ठ अभिनेत्री आणि सजर्नशील दिग्दर्शक म्हणून जसे अनुभवले, तसेच प्रयोग संपल्यावर आम्ही सारेजण पुण्यातल्या मंडईतल्या खन्नाकडे जाऊन गरम पदार्थ खातानाही अनुभवल़े इतकेच नाही तर चतु:शृंगीतल्या जत्रेत इतरांप्रमाणो मौजमजा करतानाही पाहिल़े नेपीयनसी रोडला राहणारी ही उच्च घरातली - शिक्षित कलावती इतकी अनौपचारिक वागू शकते, हे आता कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही़
बाई इंग्लंडला जाऊन आल्या तेव्हा पुण्या-मुंबईतल्या काही नाटय़संस्थांचे रूपच पालटले होत़े रंगायनमध्ये वादातून ‘आविष्कार’ स्थापन झाली़ पुण्याच्या पीडीएतून थिएटर अॅकॅडमी स्थापन झाली़ प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी यामध्ये प्रचंड मोठी विरोधाची भिंत उभी होती़ ती या काळात हळूहळू कमी झाली आणि प्रायोगिक रंगभूमीवरचे अनेक नामवंत नाटय़व्यवसायात आल़े त्यामध्ये विजयाबाई अग्रभागी होत्या़ हा बदल त्यांना आरंभी काहीसा त्रसदायक गेला; पण नंतर त्या सरावल्या आणि स्थिरावल्याही़ त्यांचे येणो हे व्यावसायिक रंगभूमीला वरदान ठरल़े व्यवसायात येऊनही त्यांनी आपला प्रयोगशीलतेचा, नवतेचा पीळ सोडला नाही़
विजयाबाई यशाच्या एकाच आवर्तात फिरत राहिल्या नाहीत़ नवतेचा शोध घेणो हा त्यांचा स्वभाव आह़े प्रयोगशीलता हा त्यांचा नाटय़स्वभाव आह़े याच सजर्नशील वृत्तीमुळे त्यांनी जयवंत दळवी यांच्यासारख्या कथा-कादंबरीकाराला उत्तमोत्तम नाटके लिहिण्यास भाग पाडल़े त्यातून ‘संध्याछाया,’ ‘बॅरिस्टर,’ ‘महासागर,’ ‘पुरुष’ यांसारखी दज्रेदार नाटके निर्माण झाली़ अभिनय, दिग्दर्शन आणि दळवींचे लेखन यातून मराठी रंगभूमीत नाटय़ाभिरुचीची एक आश्वासक वाट निर्माण झाली. तीही व्यावसायिकतेच्या क्षेत्रत याला विशेष महत्त्व आह़े मराठी रंगभूमीचा हा दुसरा सुवर्णकाळ होता़ तो घडवण्यात ज्या रंगधर्मीचे मोलाचे नाटय़कार्य कारणी ठरले त्यामध्ये विजयाबाईंची कामगिरी सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखी आह़े अभिनय आणि दिग्दर्शन करताकरताच त्यांनी या काळाचे नेतृत्व केले असेच म्हणावे लागेल़
या सा:या नाटय़प्रवासात अगदी वेगळी साथ बाईंना लाभली ती म्हणजे संगीतकार भास्कर चंदावरकरची़ ‘घाशीराम कोतवाल’मुळे हे नाव सर्वपरिचित आहे; पण त्यापेक्षा कितीतरी पटीने सांगीतिक कामगिरी भास्करने बाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांच्या संदर्भात केलेली मी अनुभवलेली आह़े त्या दोघांमधल्या काही चर्चा ऐकण्याचा, स्वतंत्रपणो भास्करकडून भरभरून ऐकण्याचा योग आलेला आह़े भास्करच्या सांगीतिक कामांची नाटके म्हणजे ‘शाकुंतलम्’, ‘मुद्राराक्षस,’ ‘अजब न्याय वतरुळाचा,’ ‘हयवदन,’ ‘हमिदाबाईची कोठी’ इत्यादि़ भास्करच्या सांगीतिक विचारांमुळे, अभ्यासामुळेच ही नाटके करणो बाईंना शक्य झाल़े अर्थात बाई संगीतातल्या नसल्या तरी भास्करकडून ते काम करवून घेण्याची बौद्धिक क्षमता, दूरदृष्टी त्यांना नक्कीच आह़े या सा:या नाटय़प्रवासाचा धांडोळा घेताना ध्यानात येते की, यामध्ये विनोदाचे अंग कमी आह़े यावर एकच उत्तर असते की, एकाच व्यक्तीकडून सर्वच गोष्टींची अपेक्षा करावी का?
गेल्या काही वर्षात बाईंच्या नावामागे एक नवे बिरूद आले आहे, ते म्हणजे त्या आता लेखिका झाल्या आहेत़ आत्मकथनकार झाल्या आहेत़
‘ङिाम्मा’च्या निमित्ताने त्या लिहित्या झाल्या़ ते पुस्तक चांगल्या पद्धतीने व्यक्त झाल़े अनेक नाटय़तपशील जनसामान्यांर्पयत पोहोचल़े ते आत्मकथन हा रंगभूमीमध्ये एक नाटय़ऐवज ठरला आह़े असे जरी असले तरी बाईंकडे आणखी काही सांगायचे राहून गेले आहे असे वाटून जात़े अपेक्षा आहे की ‘ङिाम्मा’चा उत्तरार्ध बाई लवकर हाती घेऊन पूर्ण करतील़ एका अर्थाने माझा भाग्ययोग असा की, विजयाबाईंचा हा प्रदीर्घ नाटय़प्रवासातला बहुतांश भाग मी पाहू शकलो़ मी अनेक नाटय़प्रयोगांच्या - नाटय़चर्चाचा - उपक्रमांचा साक्षी झालो़ काही गोष्टीत सहभागीही झालो़ ज्यावेळी मी माङया एकूणच नाटय़प्रवासाचा आलेख डोळ्यांसमोर आणतो, तेव्हा ध्यानात येते की, या प्रवासात रंगायन संस्था, विजयाबाईंनी अभिनित - दिग्दर्शित केलेली नाटके यांचे महत्त्व अनन्यसाधारण आह़े अशा प्रयोगशील, सजर्नशील बहुरूपिणी कलावतीला मन:पूर्वक सलाम़ त्यांना दीर्घायुष्य लाभो!
(लेखक प्रसिद्ध नाटय़समीक्षक आहेत.)