- अनघा दातार
कार्निव्हल म्हटले की ब्राझीलचे नाव पटकन आठवते, पण ब्राझीलइतकाच प्रसिद्ध आणि जुना असा व्हेनिसचा कार्निव्हल आहे. युरोपच्या या रोमॅण्टिक शहरातला कार्निव्हल म्हणजे मुखवटय़ांचा, आनंदाचा, पाटर्य़ाचा उत्सव.
या कार्निव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे वेगवेगळे मास्क, अगदी 5-1क् युरोपासून ते 3क्क्-4क्क् युरोर्पयत किमतीचे मास्क्स हे इथले मुख्य आकर्षण.
माङया एका इटालियन मैत्रिणीने याबद्दल सांगितले आणि हळूहळू याची तयारी सुरू झाली. बघता बघता दहा जण जमले आणि पुढची तयारी सुरू झाली.
या वर्षीचा व्हेनिस कार्निव्हल 14 फेब्रुवारीच्या वीकेंडला होता. म्हणजे अगदी दुधात साखर वगैरे;
या सुमाराला व्हेनिसमध्ये सगळेच महाग असते. त्यामुळे अगदी विमानाच्या तिकिटांपासून ते राहायच्या जागेर्पयत सगळे अगदी गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरमध्येच बुक केले आणि कार्निव्हलच्या वाटेकडे डोळे लावून बसलो. राहायला एक मस्त फ्लॅट अगदी शहराच्या मध्यभागी ‘एअर बीनएनबी’कडून बुक केला.
सगळी तयारी करून व्हेनिस कार्निव्हलला पोहोचलो. युरोपच्या या रोमॅण्टिक शहरात कार्निव्हल ही खरंच अनुभवायची गोष्ट आहे.
व्हेनिसच्या कार्निव्हलची सुरुवात 15 व्या शतकात झाली. व्हेनिसचा कार्निव्हल ‘अॅश वेन्सडे’च्या आधी 2 शनिवार चालू होतो आणि ‘अॅश वेन्सडे’च्या नंतर एका दिवसानी संपतो. विविध प्रकारच्या मास्कच्या आत गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असे सगळे भेद झाकून सगळ्यांबरोबर मौज, मजा, मस्ती करता येते.
या शहरात पाऊल ठेवलं आणि सगळीकडे निरनिराळ्या मास्कची रंगीबेरंगी दुकाने, राजे राजवाडे, अमीर उमराव असे पोशाख केलेले आणि विविध मास्क घालून फिरणारे लोक. त्यांचे फोटो काढणारे आमच्यासाखे टूरिस्ट असा मस्त नजारा बघायला मिळाला. फ्लॅटवर सामान टाकले आणि सगळे भटकायला बाहेर पडलो. अर्थातच पहिली स्वारी एका मस्त इटालियन कॅफेमध्ये. अप्रतिम कॅपचिनो आणि इटालियन स्वीट्स खाऊन व्हेनिसच्या प्रसिद्ध सॅन मार्को चौकात गेलो. इथे तर चौक नुसता लोकांनी भरलेला होता. जागोजागी सुंदर पोशाख केलेले लोक, त्याला अनुसरून मेकअप, अप्रतिम मास्क घातलेले लोक अतिशय उत्साहात लोकांना फोटोसाठी पोझ देत फिरत होते. हे पोशाख 1क्क् ते 2क्क् युरो इतक्या किमतीचे असतात. काही जण ते विकत घेतात. पण हे पोशाख भाडय़ानेसुद्धा मिळतात. ब:याच फॅमिली काही ठरावीक थीम घेऊन पोशाख घालतात. अर्थातच त्याला साजेसा मास्क, लोकांची क्रिएटिव्हिटी अगदी बघण्यासारखी असते.
याच चौकातले एक प्रसिद्ध आणि जगातील सर्वात जुने कॅफे म्हणजे कॅफे फ्लोरियान. हे कॅफे फ्लोरियान 172क् मध्ये सुरू झाले. या कॅफेमध्ये बरेच लोक असे रंगीबेरंगी पोशाख घालून खाण्याचा आस्वाद घेत असतात आणि टूरिस्ट्स बाहेरून त्यांचे फोटो काढत असतात. कार्निव्हलच्या या काळात व्हेनिसमध्ये विविध पाटर्य़ा, गाला डिनर्स, क्रुझ पार्टीज्, स्ट्रिट फेस्टिव्हल्स, कॉश्च्युम स्पर्धा यांची रेलचेल असते. अगदी 15-2क् युरो एन्ट्री तिकिटांपासून ते 3क्क्-4क्क् युरो तिकीट असलेल्या महाग पार्टीज् पण असतात. आम्ही पण एक मस्त क्रुझ पार्टी बुक केली होती. हे जहाज ‘पायरेट्स ऑफ कॅरिबिअन’मधल्या क्रूजसारखे होते. सगळे जण राजे राजवाडय़ांसारखे पोशाख घालून आले होते. खाणो, पिणो आणि नाचायला लावणारे म्युङिाक असा मस्त माहौल होता. ही पार्टी मस्तच रंगली.
कार्निव्हलचा काळ म्हणजे फक्त मजा, मस्ती, मास्क्स, पायरेट्स आणि खिसा रिकामा करायची हमी.
सकाळी एखाद्या इटालियन कॅफेमध्ये कॅपचिनोबरोबर स्पेशल इटालियन ब्रेकफास्ट करावा, दिवसभर व्हेनिसच्या गल्ली-बोळातून मनसोक्त फिरावे, दुपारी इटालियन विनबरोबर खास इटालियन जेवणाचा आस्वाद घ्यावा, गोंडोला बोटीतून या पाण्यातल्या शहराचे सौंदर्य अनुभवावे आणि रात्री उंची उमराव, राजे असा पोशाख करून मस्त मास्क घालून एखाद्या कासानोव्हा, नाहीतर क्रुझ पार्टीला जावे, असा मस्त कार्निव्हल विकेंड एन्जॉय करावा.
कधीतरी आपला रोजचा मुखवटा दूर करून हा नवीन मुखवटा चेह:यावर घेऊन जुन्या काळातील अमीर उमरावांसारखे पोशाख घालून एका वेगळ्याच डौलात या रोमॅण्टिक शहरात भटकणो ही खरंच अनुभवायची गोष्ट आहे. चला तर मग वाट कसली बघताय?
2क्16च्या व्हेनिस कार्निव्हलच्या तारखा बघा आणि या सुंदर शहरातला हा उत्सव अनुभवायला तयार व्हा.
(लेखिका जर्मनीतील हायडेलबर्ग येथे
सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत.)