शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

सेल्युलॉइड मॅन!

By admin | Published: March 19, 2016 2:41 PM

‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ ही पुण्यातील महत्त्वाची संस्था. पी. के. नायर या माणसाने एकहाती उभी केलेली. या संस्थेने आणि या माणसाने चित्रपट शिकणा-या विद्यार्थ्याची आयुष्येच बदलून टाकली. त्यांनी तिथेच एक चित्रपटगृहही उभारले होते. उत्तमोत्तम जागतिक चित्रपट दाखवण्याचा सिलसिला तिथे अजूनही सुरू आहे. या चित्रपटगृहाचे वैशिष्टय़ म्हणजे आत जाताना चपलाबूट काढून शिरावे लागते.

- सचिन कुंडलकर
 
 
गेल्या आठवडय़ात P.K नायर ह्यांचे निधन झाले, तेव्हा मी एक गोष्ट करण्याचा मोह टाळला ती म्हणजे फेसबुकवर जाऊन त्यांचे निधन झाले आहे हे जगाला पुन्हा सांगणो आणि ते किती महत्त्वाचे होते याची लगेच माहिती देणो. मला त्यांच्या जाण्याने खिन्न व्हायला झाले. आपल्यासाठी अतिशय चांगले महत्त्वाचे आणि आपल्या आयुष्याला नीट आकार देणारे काम करून ठेवलेली व्यक्ती आता या जगातून कायमची नाहीशी झाली. नायर सरांची प्रकृती चांगली नव्हती आणि वयसुद्धा खूप होते. कामातून ते निवृत्त झाले होते, पण अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ते भेटत असत. उत्साहाने नव्या दिग्दर्शकांचे चित्रपट पाहायला येत असत. माङयाप्रमाणोच अनेक चित्रपटकलेच्या विद्याथ्र्याना त्यांच्याविषयी आदर होता. याचे कारण त्यांनी परिश्रमपूर्वक जवळजवळ एकहाती उभी केलेली ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ 
(National Film Archives of India) ही पुण्यातील महत्त्वाची संस्था. या माणसाने आणि पर्यायाने या संस्थेने आमची चित्रपट शिकणा:या विद्याथ्र्याची आयुष्ये बदलून टाकली. आमचीच काय, देशातल्या हजारो लोकांची, ज्यांना चित्रपट बनवायचे होते, त्याचे रसग्रहण करणो शिकायचे होते, जगातल्या उत्तम चित्रपटांचा अभ्यास करायचा होता आणि आस्वाद घ्यायचा होता.
पाठीला किंवा मांडीला खाज आल्यावर खाजवून आनंद होतो तशा प्रकारची सोपी आणि तात्पुरती करमणूक करून घेणो हा भारतीय व्यावसायिक चित्रपटसृष्टीचा आजपर्यंतचा विशेष उपयोग मानायला हवा. आपण एक सततचा दु:खी आणि दुर्दैवी समाज असल्याने वसवसलेली आणि उफाळलेली करमणुकीची भूक अधाश्यासारखी भागवून घेणो असेच आपल्याकडच्या बहुतांशी चित्रपटांचे काम असते. चित्रपटांचा समाजाला एवढाच उपयोग असतो असे आपण मानतो. ही मनोवृत्ती आजही चालू असेल तर नायर सरांनी पूर्वी चित्रपटाच्या मोठय़ा संपन्न वारशाचे जतन आणि संग्रह करणारी संस्था उभारूया अशी कल्पना मांडली असेल तेव्हा किती लोकांनी त्यांना गंभीरपणो घेतले असेल याचा विचारच न केलेला बरा. त्यांनी आपले जवळजवळ सर्व आयुष्य या कामासाठी वापरले. ते केल्याबद्दलचे एक शांत समाधान त्यांच्या चेह:यावर सतत दिसत असे. ते अतिशय संथ आणि सौम्य असे व्यक्तिमत्त्व होते. एक शास्त्रज्ञ, एक खेळकर संग्राहक आणि एक जाणकार इतिहासकार अशी सगळी रूपे तिथे एकवटलेली. 
NFAI ही संस्था पुण्यात आत्ताच्या फिल्म इन्स्टिटय़ूटच्या प्रांगणात एका छोटय़ा बंगलीवजा इमारतीत सुरू झाली आणि कालांतराने त्याची मोठी देखणी वास्तू प्रभात रोडवरील जुन्या बॅरिस्टर  जयकर यांच्या बंगल्यात उभी राहिली. जुन्या भारतीय चित्रपटांच्या प्रिंट्स आणि निगेटिव्हचे काळजीपूर्वक जतन करणो आणि जगभरातील उत्तमोत्तम जुन्या आणि नव्या चित्रपटांच्या प्रिंट्सचा संग्रह करणो, चित्रपटाचा अभ्यास करणा:या संशोधकांना उत्तम ग्रंथालय आणि अभ्यासाची साधने उपलब्ध करून देणो हे या संस्थेच्या स्थापनेमागचे महत्त्वाचे उद्दिष्ट. 
माङया पुण्यातील महाविद्यालयीन काळातील आयुष्याला या संस्थेमुळे फार मोठी कलाटणी मिळाली. या संस्थेचे नायर सरांनी उभारलेले एक देखणो चित्रपटगृह होते, जिथे दर शनिवारी भारतातील आणि संपूर्ण जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट मोठय़ा पडद्यावर दाखवले जात. अजूनही हा शनिवारचा फिल्म क्लब चालू आहे. या चित्रपटगृहाचे एक मोठे अदबशीर वैशिष्टय़ असे की तिथे आत जाताना चपलाबूट बाहेर काढून शिरावे लागते. लाल मखमलीच्या खुच्र्या आणि पायाखाली उबदार गालिचा. समोर पांढरा मोठ्ठा पडदा. तिथे आम्ही लहान वयातच अनेक भारतीय, रशियन, जपानी, इटालियन, फ्रेंच दिग्दर्शकांचे चित्रपट दर शनिवारी जाऊन पाहू शकायचो. आपल्या नाचगाणी आणि दंगेधोपे यांच्या पलीकडे वेगळा चित्रपट आपल्या देशातही आणि बाहेरही बनतो याची जाणीव आम्हाला झाली आणि उत्तम चित्रपट 35 एमएमच्या प्रिंटवर बघण्याचे भाग्य आम्हाला घरबसल्या पुण्यात राहून सहजपणो मिळाले. नायर सर तेव्हा सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. पण ते आवर्जून शनिवारच्या या फिल्म क्लबला येत. सगळ्यांसोबत बसून सिनेमा पाहत आणि नंतर अनोळखी लोकांशी मोकळेपणाने गप्पाही मारत. मी माझी पहिली शॉर्ट फिल्म बनवेपर्यंत कधी त्यांच्याशी जाऊन प्रत्यक्ष बोलण्याचे धाडस केले नव्हते. आपल्यापैकी कुणी ‘सिनेमा पारादिसो’ हा जुना इटालियन सिनेमा पाहिला आहे का? त्या सिनेमातला लहान मुलगा म्हणजे आम्ही सगळे शनिवारचे प्रेक्षक होतो आणि नायर सर हे त्या चित्रपटातले फिल्म प्रोजेक्टर चालवणारे त्या मुलाचे मोठय़ा वयाचे मित्र होते. अशी माणसे गेली की काय करायचे? माणूस जाण्याचे दु:ख होते जेव्हा माणूस काम अर्धवट सोडून जातो किंवा त्याच्या कामाला पूर्णत्व येऊनही न्याय मिळत नाही. नायर सरांच्या कामाला नुसते पूर्णत्व आले असे नाही, तर त्यामुळे भारतात दिग्दर्शक, लेखक आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढय़ा घडल्या. अनेक चित्रपट महोत्सव भरवणो शक्य होऊ लागले. भारतीय चित्रपटांचा अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यास सुरू झाला. अनेक जुन्या- नव्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या प्रिंट्स आज पुण्यात ठऋअक मध्ये काळजीपूर्वक जतन करण्यात आल्या आहेत. पुस्तके आहेत. सिनेमांच्या जुन्या जाहिराती आहेत. रसिकांना आणि अभ्यासकांना मदत करणारी माणसे आहेत. असे असताना नायर सरांच्या शारीरिक मृत्यूचे वाईट मला वाटले नाही. एका संपन्न अवस्थेत त्यांनी आम्हाला कायम ठेवले आणि ते स्वत: शांतपणो प्रसिद्धीचा हव्यास न करता केरळमधील आपल्या गावी आणि मधे मधे पुण्यात असे सतर्कपणो जगले. त्यांनी त्यांचे जगण्याचे कारण संपूर्ण केले होते म्हणून त्यांच्याविषयी कोणताही गळेकाढू शोक मला कधीच करता येणार नाही. एरवी शांत असणा:या नायर सरांचे एक वेगळे रूप मी आयुष्यात एकदाच पाहिले होते. मी त्यांना एकदा आवर्जून माझी एक शॉर्ट फिल्म दाखवली होती. आम्ही नेहमी भेटत असू असेही नाही. 2009 साली केरळमधील त्रिवेन्द्रम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माङया ‘गंध’ या चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स होती. ती सुरू झाल्यावर काही वेळाने शांतपणो नायर सर तिथे येऊन पुढच्या रांगेत बसले. मी त्यांना स्टेजवरून नमस्कार केला. प्रश्नोत्तरांना सुरु वात झाली होती आणि अचानक काहीतरी वेडेवाकडे वातावरण तयार झाले. केरळमध्ये सर्व कलात्मक रसग्रहण हे राजकीय दृष्टिकोनातून होते. आणि तिथले ‘राजकीय’ म्हणजे मार्किस्ट. शब्दाला शब्द वाढत गेले आणि माङया स्वभावानुसार मी भडकलो आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना रागावून उत्तरे देऊ लागलो. नायर सर अचानक उभे राहिले आणि चिडीचूप शातंता झाली. ते मागे वळले आणि त्यांनी प्रेक्षकांना आणि पत्रकारांना फैलावर घेतले. आपल्याकडे वेगळ्या राज्यातून आणि वेगळ्या भाषेत सिनेमा बनवणारा एक दिग्दर्शक आला आहे. त्याचे बोलणो समजून न घेता तो तुमच्या मतांच्या फुटपट्टय़ांमध्ये बसत नाही म्हणून त्याच्याशी सभ्यता सोडून बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? यासाठी आपण हे चित्रपट महोत्सव भरवतोय का? मग खाली बसून त्यांनी मला बोलायला सांगितले आणि पुढची कॉन्फरन्स अतिशय नीट पार पडली. मी खाली उतरलो आणि सरांना थॅँक्स म्हणालो. त्यांना माङया फिल्मच्या शो ला यायचे आमंत्रण दिले. ते मला हसून म्हणाले, अरे मी तुझी फिल्म पाहिली नसती तर तुझी बाजू घेऊन भांडलो कशाला असतो? मला ती फिल्म खूप जास्त आवडली आहे. ती माझी नायर सरांची शेवटची भेट. त्यानंतर ते मला प्रत्यक्षपणो कधीच भेटले नाहीत. 
 नायर सरांसारखी आपले आयुष्य घडवणारी माणसे एकप्रकारे अप्रत्यक्षपणो सतत राहतील, सोबत असतील असे वाटते. पण तसे होत नाही. शरीराचा मृत्यू होतो आणि मग एक खोलवर खिन्नता तयार होते. ती खासगी असते. काही महत्त्वाच्या माणसांचे मोल सगळ्या जगाला असतेच असे नाही. मग आपण कुणाकडे अशी खिन्नता व्यक्त करणार? पी. के. नायर सरांवर 
The Celluloid Man नावाचा अतिशय सुंदर माहितीपट शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांनी 2012 साली बनवला आहे. भारतीय चित्रपटावर प्रेम असणा:या प्रत्येकाने पाहावा असा. त्या माहितीपटाचायू टय़ूबवरट्रेलर आहे. मी खाली त्या ट्रेलरची लिंक देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=mTPcHAKk4bo
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com