- इंद्रजित खांबे
प}ीची गर्भावस्था.
गर्भजल कमी कमी होत जाणं.
वेळेआधीच प्रसूतीची शक्यता.
डॉक्टरांनी दिलेला धोक्याचा इशारा.
महिनाभर हॉस्पिटलातला मुक्काम.
अनेक अगम्य प्रश्नचिन्हांचा आणि
त्यावर उत्तरं शोधू पाहणारा,
शरीर-मनावर अस्वस्थ ताण
आणणारा हा सारा काळ.
त्याच अनुभवांच्या वास्तव कहाणीची
फोटो मालिका आकाराला आली,
त्यामागची गोष्ट!
कणकवलीसारख्या कोकणातल्या छोटय़ा गावाची वेस इंद्रजित खांबेला सहज ओलांडता आली ती केवळ फोटोग्राफीमुळे आणि त्याबद्दलच्या नव्या, रसरशीत जाणिवांमुळे. चौकटी मोडून प्रयोगशीलता स्वीकारल्यामुळे! ‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’सारखी त्याच्या अत्यंत खासगी जगातली गोष्ट ‘फोटोग्राफिक एसे’ पद्धतीनं त्यानं मांडल्यानंतर फोटोग्राफीच्या दुनियेतल्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्याला स्थान मिळालं आणि या जगतातल्या महत्त्वाच्या माणसांची दादही.
त्याच्याशी मारलेल्या या गप्पा..
‘चेसिंग द क्वेश्चन मार्क’. तुङया आणि सिरीजच्याही संदर्भातला काय आहे हा अनुभव?
- माझा पोटापाण्याचा व्यवसाय स्थिर झाल्यावर कॅमेरा माङया हातात आला 2012 साली. 2क्13 ला ब्रॉडबॅण्ड इंटरनेट वापरायला लागलो. त्यावेळी जगभरात फोटोग्राफीविषयी काय काम चाललंय हे वाचायला लागलो. वेडच लागलं.
काम करून पाहण्याचा झपाटा विलक्षण होता. फ्रान्समधल्या मॅगनम एजन्सीचं काम पाहिलं. जगभरातल्या चांगल्या फोटोग्राफर्सना मी माझं काम पाठवलं. त्यांची मतं गांभीर्यानं घेत स्वत:च्या कामात सुधारणा करायचा प्रयत्न करायला लागलो. सोशल साइट्सवरून ज्यांचं काम आवडलंय अशा फोटोग्राफर्सशी संवाद शक्य झाला. स्वत:ला तपासून बघणं, दृष्टी विस्तारणं असं घडत होतं यातून.
गोव्यात सोहराब हुरा या फोटोग्राफरने कार्यशाळा घेतली तेव्हा त्यात देशातले फक्त दहा फोटोग्राफर्स निवडले होते. त्यात मी एक होतो. यातल्या चर्चेतून माझी ‘चौकट’ ब:यापैकी लवचिक झाली. मोकळेपण वाढलं. अनुभवींकडून यातलं ज्ञान घेण्याची भूक वाढतच होती, शोध चालू होता. त्यातून मी बांगलादेशच्या मुनेम वसीफ या जागतिक कीर्ती लाभलेल्या फोटोग्राफरच्या कार्यशाळेसाठी निवडला गेलो.
कार्यशाळा होती कोलकात्याला. मार्च 2क्15 मध्ये. फक्त सहा लोकांसाठी. मी हरखून गेलो होतो. दरम्यान, बायको सीमा दुस:यांदा गरोदर होती. तिची प्रसूतीची ठरलेली तारीख होती एप्रिलमधली. काही अडचणच नव्हती. मात्र अगदी तिस:या- चौथ्या महिन्यापासून तिचं गर्भजल कमी दिसत होतं. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की प्रसूती वेळेआधीच होऊ शकते, मी असायला हवं! मी मुनीम वसेफला नकार कळवला.
फेब्रुवारीत सोनोग्राफी केल्यावर कळलं की गर्भजल धोक्याच्या पातळीपर्यंत खालावलंय. उपाय दोनच. मुदतपूर्व प्रसूती किंवा बाहेरून गर्भात पाणी सोडणं.
गर्भात पाणी सोडण्याचेही धोके होतेच. शिवाय ते एकदाच सोडून भागणार होतं असंही नाही. बाळ गर्भात वाढणं जास्त हिताचं असा विचार करून आम्ही दुसरा पर्याय स्वीकारला.
फेब्रुवारी ते मार्च तीन वेळा ही प्रक्रि या केली. पण पाणी कुठं गायब व्हायचं काही कळायचं नाही. सीमा फार त्रसात होती. आमची तोवर एकुलती एक मुलगी सई पाच वर्षाची, ती सोबत असायची.
प्रसूतीच्या तारखेच्या एक महिना आधी 3 मार्चला सीमानं 24क्क् ग्रॅम वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. या सगळ्या 3क् ते 35 दिवसांच्या हॉस्पिटलमधल्या मुक्कामात मी, सई, सीमा एका वेगळ्या ताणातून जात होतो. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे व ते सांगण्याची, उत्तरं शोधण्याची रीत वेगळी.
सोहराब हुरानं स्किझोफ्रेनियामुळे बंदिस्तपण आलेल्या आईचे फोटो सलग आठ र्वष काढले होते. त्रसातून उत्तर शोधू पाहणारं ते काम मला प्रचंड आवडलं होतं. सीमाला हॉस्पिटलमधे दाखल केलं तेव्हाच ती कल्पना मी तिच्यापुढे मांडली होती. ती तयार झाली. आणि मग त्या 35 दिवसांची गोष्ट सांगणारी फोटो मालिका घडायला सुरु वात झाली.
आपण पोळले जात असताना किती व कशा त:हेचे चटके बसतात हे सांगू शकण्याची स्थिरता मिळवणं कठीण असतं. त्यामुळे प्रश्नचिन्हांचा पाठलाग मी दोन्ही अर्थांनी केला. रूढार्थानं फोटोग्राफर नसताना हा ध्यास घेणं व कौटुंबिक अडचणीत फोटोग्राफीतून दिलासा मिळवणं असा!
स्थिरता मिळवणं कठीण असतं म्हणजे?
- बारा बाय पंधराच्या हॉस्पिटलच्या त्या खोलीत आम्हा तिघांचे जीव टांगणीला. छोटी सई भेदरलेली, पण तिच्यामुळे आमचे ताण सैलावत होते. प्रत्येक जण त्या मर्यादित जागेत एकमेकांना दिलासा देत दुस:या दिवशीसाठी धैर्य कमवत होता, कळत-नकळत. हे माझं अत्यंत खासगी भावविश्व होतं.
गुंतलेलं असतानाही तटस्थ राहून मला आमच्या सुखदु:खाची दैनंदिनी, सई व तिची आई यांच्या नात्यातले कंगोरे, हॉस्पिटलच्या नीरस वाटणा:या विश्वात सापडणारे कोवळे व निबर क्षण आणि प्रत्येकानं नकळत निभावलेल्या स्वत:च्या रोलमधून चल-अचल गोष्टींचं दिसणारं व्यक्तिमत्त्व टिपायचं होतं. तुम्ही एखाद्या क्षणाला किती बांधलेले असता त्यावरून तुमचं व विषय वस्तूचं अंतर ठरत जातं, पण मर्यादित जागेमध्ये हेही आव्हान!
फोटो फ्रेम कशी येते यापेक्षा जे घडतं आहे त्यावर लक्ष केंद्रित करून आपल्या उपस्थितीची जाणीव भवतालातील माणसांना सहज विसरायला लावणं हेही कसब.
सीमाची अवस्था अत्यंत नाजूक. अशावेळी एकदा सईला झोपताना आई हवी होती. सीमानं काळजीपूर्वक सईला जवळ घेतलं. सई झोपली की मी तिला बेडवरून खाली घेणार होतो. थकव्यामुळे तिघंही झोपलो.. मध्यरात्री कधीतरी मी किंचाळत उठलो. हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ गोळा झाला. सीमाला सईच्या धक्क्यानं लागेल किंवा सई चुकून पडते की काय हा धसका घेऊन मी झोपलो होतो. जो स्ट्रेस मला बोलता येत नव्हता तो असा बाहेर आला. सीमानं मला शांत केलं.. आणि अर्थातच या सगळ्या ‘दिव्या’ला फोटोत कैद करून मी मुक्त होत गेलो. आज हे सगळं पाहताना विलक्षण ताकद येते. स्थिरता येते.
तुझं कुटुंब तुङयावर संपूर्ण विश्वास असलेलं, पण तू काही फक्त पर्सनल फोटोग्राफीच करत नाहीस. मग इतरवेळची आव्हानं?
- माङया खासगी जगात प्रवेश करणं व इतरांना ते फोटोतून दाखवून प्रवेश करू देणं यामध्ये एक वेगळा भावनिक संघर्ष होता. आता गेले चार महिने मी तीस र्वष रंगमंचाला समृद्ध करणा:या ओमप्रकाश चव्हाण या अत्यंत गुणी
नटाच्या खासगी आयुष्यावर काम करतो आहे. दशावतारातील स्त्री भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारा ओमप्रकाश, त्याची आजारी आई, बायको, तीन मुलं आणि नाटय़विश्वातल्या महनीय लोकांपासून ते गावातल्या खेडवळ बाईपर्यंत असणारं त्याचं फॅनफॉलोइंग या जगाचे कानेकोपरे धुंडाळत असताना मी ‘पर्सनल फोटोग्राफी’च करतोय, पण हे खासगी जग दुस:याचं आहे. त्यात प्रवेशासाठी अनेक बाजूंनी संकोचाची अवस्था तयार होते. खासगीपणाच्याही कुठल्या रेषेपलीकडे आपण जाऊ नये याचं भान एक सजग माणूस म्हणून ठेवताना एक फोटोग्राफर म्हणून मला एकांताचे व लोकांताचे वेगळे क्षण गमवायचे नसतात.
एक विषय घेऊन काम करताना विविध अंगांनी त्याला भिडावं लागतं, नाहीतर एकसुरीपणा येतो. ओमप्रकाश हा नट एकाच दिवसात पुरु ष व बाई या सीमारेषेवर कसा वावरतो याचा शोध घेणं हे या कामातलं माङयासमोरचं आव्हान! शिवाय कोल्हापुरातली कुस्ती, महाराष्ट्रातला दुष्काळ, कोकणातील भातशेती असे जर्नालिझम किंवा डॉक्युमेंटरी फोटोग्राफीत मोडणारे प्रयोगही मी करतो.
स्ट्रीट फोटोग्राफीतलं आव्हान आणखी निराळं. रस्त्यांवर फिरता फिरता अतिशय सामान्य दिसणा:या गोष्टींमध्ये तुम्हाला सौंदर्य, कथा, कंपोजिशन शोधावी लागतात. तुम्ही काय करताय हे रस्त्यावरील लोकांना कळूही न देता त्यांच्या नैसर्गिक हालचालीतली वेगळी गोष्ट पकडण्यासाठी तुम्हाला सतत पाहत राहावं लागतं. करून पाहिलं की आव्हानं कळत जातात, उत्तरंही! ती पुन्हा ज्याची त्याची वेगळी. थोडक्यात फोटोग्राफीच्या कुठल्याही स्टाईलमध्ये न अडकता वेगवेगळ्या जर्ममध्ये स्वत:ला तपासत राहणं मला आवडतं.
फोटोग्राफीचा ‘उद्या’ कसा आहे, काय सांगशील?
- डिजिटल फोटोग्राफीमुळे या क्षेत्रचं ख:या अर्थानं लोकशाहीकरण झालंय. फोटोची भाषा वैश्विक आहे. फक्त गोष्ट पकडण्याची कला तुम्हाला अवगत असेल तर तुम्ही यात वाट्टेल ते करू शकता. मात्र सोशल साइट्सच्या लाइक्समध्ये वाहून जाण्याची सवय नाही जडली तर बरं! सोशल माध्यमांवर लाखो फोटो रोज शेअर केले जात असताना, त्यात कचरा किती व कला किती याची जाण खूप पाहत, वाचत व स्वत:ला बंधमुक्त करत येऊ शकते. कुंभमेळा, आषाढी, वाराणसीचा पुष्कर मेळा असे त्याच त्या मोनोटोनस विषयांचे त्याच त्या मोनोटोनस अँगलने काढलेले फोटो दिसताना बहारदार दिसले तरी थकवतात. खरंतर आपल्या आजूबाजूला एवढय़ा गोष्टी आहेत, त्या छायाचित्रित करण्याची गरज आहे. त्यासाठी एक विषय निवडून दीर्घकाळ काम करत राहण्याची शक्ती फार कमी लोकांकडे आहे. आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक व आरोग्य या पातळ्यांवर काहीएक किंमत देऊन मी हे काम करत आहे.
आपल्याकडे फोटोग्राफीबद्दलचा, काम करणा:यांचा व पाहणा:यांचाही दृष्टिकोन संकुचित आहे. जगभरात फोटोग्राफीसाठी ख्यातकीर्त असणा:या फ्रान्सच्या ‘मॅगनम’ या संस्थेच्या 7क् वर्षांच्या इतिहासात रघु राय आणि सोहराब हुरा हे दोनच भारतीय फोटोग्राफर स्थान मिळवू शकले यावरून ही स्थिती पुरेशी स्पष्ट व्हावी.
आता मोबाइलवरही कॅमेरा असतोच, तेव्हा तो टूल होतो, यामुळे प्रत्येकजण फोटोग्राफर आहे. पर्यटक म्हणून येताजाता फोटो काढता. या प्रवासात पुढे कधीतरी ‘सेल्फ एक्सप्रेशन’ म्हणून हे टूल तुम्ही कसं वापरता याला येत्या काळात महत्त्व आहे, येत जाणार आहे. कुठच्याही वेस्टेड इंटरेस्टशिवायचं एक गाणं स्वत:साठीपण लिहिलं पाहिजे ना आपण? डोराथिओ लँग नावाची एक जागतिक फोटोग्राफर म्हणते, ‘कॅमेरा इज दि इन्स्ट्रुमेंट विच टीचेस यू हाऊ टू सी विदाउट ए कॅमेरा!’ - तेच उलगडत जाईल कदाचित येत्या काळात, ‘फोकस’ केलं तर!
मुलाखत आणि शब्दांकन
- सोनाली नवांगुळ
Sonali.navangul@gmail.com
http://indrajitkhambe.pixpa.com