शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

चॉँदनी चौक

By admin | Published: June 24, 2016 5:55 PM

जुन्या दिल्लीचा गजबजलेला भाग. इथेच देशातली सर्वात मोठी जामा मशीद. शहाजहाँनच्या काळात बांधलेली. त्याच्याच आसपास खाऊ गल्ली आणि दिल्ली शहर का मीनाबाजार! उत्साहाने फसफसलेल्या माणसांची जशी गर्दी तशीच शेवया, खजूर, सुकामेव्याची जागोजागी थाटलेली दुकानं. रमजानच्या काळातली इथली रौनक शब्दांत नाहीच सांगता येणार.

रमजानच्या  पवित्र महिन्यातली  शाही सफर
 
 
जुन्या दिल्लीचा गजबजलेला भाग. इथेच देशातली सर्वात मोठी जामा मशीद. शहाजहाँनच्या काळात बांधलेली. त्याच्याच आसपास खाऊ गल्ली आणि दिल्ली शहर का मीनाबाजार! उत्साहाने फसफसलेल्या माणसांची जशी गर्दी तशीच शेवया, खजूर, सुकामेव्याची जागोजागी थाटलेली दुकानं.
रमजानच्या काळातली इथली रौनक शब्दांत  नाहीच सांगता येणार.
 
 
अमृता कदम
 
मजानबद्दलची माझी माहिती ही रोजे आणि  इफ्तार या दोन गोष्टींपुरतीच मर्यादित होती. रमजानमधला उत्साह, अत्यंत धार्मिकतेतला रंगीबेरंगीपणा पहिल्यांदा अनुभवला तो मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवर. ओसंडून वाहणारी गर्दी, सजलेली दुकानं, खाण्यापिण्याची रेलचेल एकदम आवडून गेलं. नंतर रमजानच्या काळात एकदा तरी या भागात फिरनी खाण्यासाठी आवर्जून जाण्याचा आमचा रिवाजच पडून गेला. दिल्लीला आल्यावर रमजानचा महिना सुरू झाल्यावर ठरवलं की आता इथे चॉँदनी चौक भागात जाऊन यायला पाहिजे. जुन्या दिल्लीचा हा गजबजलेला भाग. इथेच देशातली सर्वात मोठी जामा मशीद आहे. शहाजहाँनच्या काळात बांधलेली. त्याच्याच आसपास मोठी खाऊ गल्ली आहे आणि दिल्ली शहर का मीनाबाजारही! त्यामुळे रमजानच्या काळात इथे रौनक असणार हे वेगळं सांगायची गरजच नव्हती. 
संध्याकाळी रोजे सुटण्याच्या थोडंसं आधीच चाँदनी चौकात पोहचलो. जामा मशिदीच्या गेटसमोर उतरून चार पावलं चालल्यानंतर सुरू झाली खजुराच्या स्टॉल्सची गर्दी. मला खजुराच्या दोनच जाती माहिती आहेत- काळे खजूर आणि ब्राऊन खजूर. शिवाय त्यातला उपप्रकार म्हणजे सीडलेस. इतक्या प्रकारचे खजूर मी पहिल्यांदाच पाहिले. उत्सुकतेपोटी एका स्टॉलपाशी थांबून माहिती घ्यायला सुरु वात केली. मोहम्मद बिलाल आणि अनिसुद्दीन यांच्या स्टॉलवर खजुराच्या जवळपास वीस ते पंचवीस जाती होत्या. उत्साहाने ते माहिती देत होते. दुबई, सौदी, इराणमधून हा खजूर दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्ये येतो आणि तिथून हे किरकोळ व्यापारी तो खरेदी करतात. रोजे सोडण्यासाठी खजुराचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात मालही अधिक येतो आणि व्यवसायही भरपूर होतो, असं मोहम्मद बिलाल सांगत होते. कधीकधी दिवसाला अगदी दहा हजार रु पयांपर्यंतही व्यवसाय होऊन जातो, असं ते म्हणाले. हा आकडा ऐकल्यावर खजुराचे साधारणपणो भाव काय असतात, असा प्रश्न पडला. साधारण दीडशे रु पये किलोपासून खजुराचे भाव सुरू होतात आणि सर्वांत महागडा खजूर साधारणपणो दोन ते अडीच हजार रु पये किलोपर्यंत असतो. हा सगळ्यात महागडा खजूर ‘आजवा’ जातीचा आहे. तो फक्त सौदीमध्येच होतो. या खजुराचं धार्मिक महत्त्वही आहे, असं बिलाल आणि अनिसुद्दीन यांनी सांगितलं. मोहम्मद पैगंबरांनी स्वत:च्या हातानं या खजुराचं झाड लावलं होतं, अशी मान्यता आहे. त्यामुळेच या खजुराची बीसुद्धा टाकून देत नाहीत. त्याचे औषधी उपयोग असल्याचंही त्यांनी सांगितलं. 
सगळीकडे खाण्यापिण्याचे स्टॉल्स लागले होते आणि मोठमोठय़ा हंडय़ांमध्ये, तव्यावर पदार्थ तयार होत होते. रोजा सोडायची वेळ होतच आली होती. जामा मशिदीमधला नमाज संपला आणि मोठय़ा संख्येने लोक बाहेर येताना दिसत होते. काहीजण तिथेच मशिदीच्या पाय:यांवर बसलेले होते. मशिदीच्या अत्यंत प्रशस्त अशा आवारात लोक चादरी अंथरून आपल्या कुटुंब, मित्रपरिवारासोबत निवांत बसले होते. सोबत 
खाण्याचे डबे, पाण्याचे कॅन होते. गप्पा, फोटो काढणं सुरू होतं. आपल्या डब्यातले पदार्थ इतरांसोबतही शेअर केले जात होते, त्यासाठी ओळखीची गरज नव्हती. 
तिथल्याच एका गटासोबत गप्पा मारायला सुरुवात केली. दिल्लीतल्या कुरेझी ङिाल भागातल्या शबानाजी त्यांच्या बहिणी आणि मुलांसोबत आल्या होत्या. रमजानच्या काळात किमान एकदा तरी त्या जामा मशिदीमध्ये येतातच. 
इथं आल्यावर शांत वाटतं, असं त्या सांगत होत्या. संध्याकाळचा नमाज झाल्यावर लोक रोजे सोडण्यासाठी घरून जेवण घेऊन येतात किंवा इथं बाहेरच्या स्टॉल्सवर जे मिळतं, तेही कधीकधी विकत घेऊन येतात. नंतर शेवटच्या नमाजपर्यंत थांबतात. सव्वानऊचा नमाज झाला की मग बाहेर जाऊन फिरणं सुरू होतं. 
भव्य अशी जामा मशीद शहाजहाँनच्या काळात बांधली गेली. आजूबाजूला असलेल्या चिंचोळ्या गल्लीत सतराव्या शतकातला मुघल वास्तुकलेचा हा नमुना उभा आहे. 1644 ते 1656 असं आठ वर्षं या मशिदीचं बांधकाम सुरू होतं. मुघल वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली ही मशीद भव्य तर आहेच, पण त्याचबरोबर तिचं अजूनही एक महत्त्व आहे. ईदच्या चंद्रोदयाची वेळ ही जामा मशिदीतून निश्चित केली जाते आणि त्यानुसार देशभरात ईद साजरी होते. त्यामुळे रमजानच्या काळात केवळ दिल्लीतूनच नाही, तर इतर राज्यांतूनही जामा मशिदीमध्ये लोक येतात. तिथे आलेलं असंच एक कुटुंब होतं, मोहम्मद युसूफ यांचं. ते आणि त्यांचे कुटुंबीय मुरादाबादवरून आले होते. रमजानच्या काळात इथे भरपूर गर्दी असते. विशेषत: शुक्र वारी तर बाहेरपर्यंत लोक असतात. या मशिदीचं महत्त्व असं आहे, की आम्ही रमजानच्या महिन्यात एकदा तरी येतोच. त्यांच्यासोबत त्यांचा तरुण मुलगाही होता. नवीन पिढीही धार्मिक संस्कारांचा भाग बनते, हे तो सांगत होता. आजूबाजूला नजर टाकली तरी तरुणांचं लक्षणीय प्रमाण दिसून येत होतं. नमाज अदा करून, रोजा सोडल्यानंतर मशिदीच्या आवारात त्यांचे सेल्फी, फोटोसेशनही सुरू होतं. मशिदीमधल्या कडक शिस्तीच्या कल्पनाचित्रशी हे वातावरण काहीसं विसंगतच होतं. दस:याचा सोहळा पाहायचा तर तो म्हैसूर संस्थानचा. तसंच रमजान जामा मशिदीतून पाहण्याचा अनुभवही वेगळाच आहे. 
रोषणाईने नटलेली जामा मशीद फिरल्यानंतर ‘पोटोबा’ हे उघडच होतं. बाहेर पडल्यानंतर खाण्यापिण्याची अनेक दुकानं खुणावत होती. रबडी, फिरनी, मिठाया, आटीव दुधाची दुकानंही गजबजली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या शेवयांचेही स्टॉल दिसत होते. शीरखुम्र्यातला हा महत्त्वाचा ऐवज. आपण नेहमी वापरतो त्या शेवयांशिवाय इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया दिसत होत्या. त्यामध्ये अत्यंत नाजूक हाताने केलेल्या, खूपच बारीक अशा शेवया होत्या. या बनारसी शेवया.. फेनीमध्ये बनारसी शेवया वापरतात, असं त्या दुकानाच्या मालकाने सांगितलं. शेवयांबरोबरच दुधासोबत खाण्याचा अजून एक पदार्थ म्हणजे खाजला. मैद्यापासून बनलेला खाजला आकाराने आणि दिसायलाही साधारण भटु:यासारखा असतो. पण कडकडीत. 
दुकानांमधून पदार्थांचं ‘दूर’दर्शन तर झालं. आता मला सगळ्यात पहिल्यांदा खायची होती फिरनी. खवा आणि साखर घालून दूध आटवायचं आणि ते आटत असताना थोडेसे तांदूळ त्यात शिजवायचे. त्यानंतर तयार होणारा हा घट्ट पदार्थ. मातीच्या किंचित पसरट वाटीतून सव्र्ह केला जातो. त्या मिश्रणाला मातीचा लागलेला हलका सुगंध.. तोंडातून विरघळतच ही फिरनी पोटात जाते. फिरनी खात असतानाच दाट मलई, त्यावर गुलाब पाकळ्यांची पखरण आणि मध्ये अजून एक पदार्थ अशी चीज दिसल्यावर आपसुकच हे काय आहे असा प्रश्न पडला. त्यावर उत्तर मिळालं- शाही तुकडा. यात नेमकं काय काय घालता, असं विचारल्यावर दूध, मलई, खवा हे नेहमीचे पदार्थ ऐकायला मिळाल्यावर हा शाही तुकडाही ट्राय केला. गरम गरम शाही तुकडा खात असताना त्या दुकानाच्या मालकाने आग्रहाने मँगो आइस्क्र ीमही समोर केलं. ‘शाही तुकडय़ासोबत मिक्स करून खा, मस्त लागेल’ - या सल्ल्यासह! त्याचा सल्ला खरंच योग्य होता, हे पहिला घास पोटात गेल्यानंतर जाणवलंच. इथून बाहेर पडून मीनाबाजार पाहूयात असं ठरवलं. थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी लोकांची मोठी रांग दिसली. एका ढाब्यामध्ये गरिबांसाठी अन्नदान सुरू होतं. रमजानचा महिना हा पवित्र मानला जातो. 
त्यामुळे दानधर्म केला तर बरकत येईल, या समजुतीने हे अन्नदान सुरू होतं. 
मीनाबाजारचं चित्रच खूप कलरफुल होतं. कपडे, अॅक्सेसरीज, अत्तरांची दुकानं. काही धार्मिक वस्तूंचीही दुकानं. लखनवी कुत्र्याचे विविध प्रकार इथे पाहायला मिळत होते. आजकाल परफ्यूम्सचा जमाना असला, तरी अजूनही अत्तराचेही शौकीन लोक बरेच असल्याचं इथले अत्तर दुकानदार युसूफ अन्सारी सांगत होते. हीना आणि खसच्या अत्तराला आमच्याकडे विशेष मागणी असते, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. 
शेवटचा नमाज अदा केल्यानंतर बाजारपेठेत येणा:या लोकांची गर्दी वाढत होती. लोकांच्या या उत्साहाकडे पाहून धर्माच्याही पलीकडे असलेलं सणांचं महत्त्व जाणवलं. दिवाळी-दसरा असो, ािसमस असो की रमजान, लोकांना एकत्र आणणारी, समाज म्हणून बांधून ठेवणारी ही निमित्तं आहेत असं वाटलं. एरवी आपल्याच विश्वात, 
छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांमध्ये गुंतून पडलेल्या लोकांना कुटुंबासोबत, आपल्या मित्रपरिवारासोबत विरंगुळ्याचे, आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठीच कदाचित या सणांची योजना असावी. त्यामुळेच धर्मानुसार केवळ सणाचं नाव बदलतं, त्यामागच्या मूळ भावना या समानच असतात. म्हणूनच सण कोणताही असो, त्याचा आनंद लुटताना मला कोणतंही बंधन जाणवत नाही. 
 
 
 
‘करीमस’चा इतिहास
 
रमजानचा महिना आणि चाँदनी चौकाची सफर. मग तिथेच असलेल्या ‘करीमस’ला भेट द्यायलाच हवी, हे अनेकांनी सांगितलंच होतं. या ‘करीमस’चाही स्वत:चा इतिहास आहे, जो थेट मुघलांपर्यंत मागे जातो. शेवटचा मुघल बादशाह बहादुरशहा जफरचा खानसामा असलेला मोहम्मद अझीझ 1857 च्या उठावानंतर दिल्ली सोडून मीरतला गेला. मात्र 1911 साली पंचम जॉर्ज राजाच्या राज्यारोहणाच्या वेळेस त्याचा मुलगा करीमुद्दीन दिल्लीला परत आला. त्याने इथे एका ढाब्याची सुरुवात केली. आणि त्यानंतर हळूहळू आपल्या वाडवडिलांकडून मिळालेल्या शाही रेसिपींचा वारसा वापरून आपला व्यवसाय नावारूपाला आणला. इथली स्पेशालिटीही टेस्ट केली. केवळ लाजबाब! प्रत्येकाची हीच दाद होती. रोजे सुरू असल्यामुळे हे हॉटेल सध्या दिवसभर बंद असतं. सध्या इफ्तारपासून सेहरीपर्यंत हॉटेल सुरू ठेवलं जातं. केवळ ‘करीमस’च का, इतरही हॉटेल्स, छोटे ठेले आणि स्टॉलही पहाटेपर्यंत सुरू राहतात. 
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
amritar1285@gmail.com