शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

कोका-कोला! - इतिहास घडवलेली ‘ख्रिसमस बॉटल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 6:03 AM

शीतपेयाबरोबरच त्याच्या बाटलीनंही इतिहास घडवला. हे शीतपेय होतं ‘कोका-कोला’! या बाटलीचं डिझाइन आजही वैशिष्ट्यपूर्ण मानलं जातं. ही बाटली डिझाइन करतानाच्या शर्ती बघा. बाटलीचं डिझाइन अनोखं हवं, तिचं वजन आणि त्यातलं पेय ठराविकच असावं, अंधारात नुसत्या स्पर्शानंही बाटली ओळखता यायला हवी,  बाटली फुटली तर तिच्या तुकड्यांवरूनसुद्धा  ती कोका-कोलाची आहे हे लक्षात यायला हवं!

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- स्नेहल जोशी‘कोका-कोला’ असं नुसतं नाव काढलं तर डोळ्यासमोर काय आलं? थंडगार काळं पेय, बुडबुडे आणि कंगोरे असलेली काचेची सुंदर बाटली. ती उघडताना येणारा सोड्याचा आवाज, बाटलीचा हाताला होणारा स्पर्श, बाटली हातात धरताना जाणवणारा काहीसा आत्मविश्वास, हे सगळं खूप उत्कट नसलं तरी प्रत्येकाला नक्की जाणवलेलं असणार. एकच वस्तू आपल्या पाचही इंद्रियांना सुख देऊन जाते हे खरोखर विलक्षण आहे. पण या कोक-बॉटलच्या डिझाइनचे अजून बरेच पैलू आहेत. डिझाइनच्या गोष्टी करताना आपण गेले काही दिवस औद्योगीकरणाबद्दल खूप काही बोललो. यंत्न-तंत्नाच्या साहाय्यानं आपण घाऊक उत्पादन करू लागलो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्पादकांची स्पर्धा होणं साहजिकच होतं. या स्पर्धेत आपला टिकाव कसा लागावा? या प्रश्नाला खूप कल्पक उत्तरं उद्योजक शोधू लागले.कोका-कोलाची गोष्ट आजपासून 132 वर्षांपूर्वी सुरू होते. आपल्याकडे आजही जसे लिंबू सरबताचे ठेले असतात तसे अमेरिकेत सोड्याचे फाउण्टन असतात. अँटलांटाच्या डॉ. जॉन पेम्बरटन यांचं औषधांचं दुकान होतं. त्यांनी कोला नावानं हे सरबत पहिल्यांदा तयार करून आपल्याच दुकानाबाहेर लोकांना चव पाहायला दिलं. ते लोकांना इतकं आवडलं की त्यांनी ते ग्लासवारी विकायला सुरु वात केली. जॉन यांनी त्यांचे स्नेही फ्रँक रॉबिन्सन यांना भागीदार करून घेतलं. नुसतं कोला म्हणण्यापेक्षा ‘कोका-कोला’ या नावात लय आहे त्यामुळे नाव लोकांच्या लक्षात राहील असं म्हणून रॉबिन्सन यांनी या नावाचं सुलेखनसुद्धा स्वत:च केलं. कोका-कोलाचा लोगो आजही तोच आहे. अर्थात डॉ. जॉन यांना त्यांनीच तयार केलेल्या शीतपेयाच्या क्षमतेचा अंदाज नव्हता. त्यांनी आपला वाटा कँडलर नामक उद्योजकाला विकून टाकला. कँडलर दूरदर्शी होते. त्यांनी कोका-कोलाचे सर्व हक्क विकत घेतले.फक्त 13 वर्षांच्या कालावधीत कोका-कोलाचे फाउंटनच अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये पसरले. या उद्योगाला पुढची दिशा दिली ती जोसेफ व्हाइट हेड आणि बेंजामिन थॉमस यांनी. कोका-कोला फाउंटनमधून बाहेर पडून लोकांच्या घरी पोहोचायला हवं असा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यासाठी काचेच्या बाटल्यांमध्ये पॅकेजिंग करण्याचं ठरवलं. काच रासायनिकदृष्ट्या निष्क्रि य असते, त्यामुळे आतल्या पदार्थावर परिणाम करत नाही. या बाटल्या सरळसोट होत्या आणि काचेतच कोका-कोलाचा ट्रेडमार्कउमटवलेला असे. एव्हाना कोका-कोला प्रसिद्ध झाल्यामुळे प्रतिस्पर्धी निर्माण झाले होतेच. कोका-कोलाची नक्कलसुद्धा मोठय़ा प्रमाणात सुरू झाली. पेयाबरोबर बाटलीच्याही प्रती बाजारात आल्या. कोका-कोलाचं वेगळेपण कसं जपावं असा मोठा प्रश्न पडला. उत्तर अर्थातच डिझाइनमध्ये होतं. डिझाइनच्या शर्ती पहा,  बाटलीचं डिझाइन अनोखं हवं. त्यात 6.5 अंस सरबत मावायला हवं. बाटलीचं वजन किमान 14.5 अंस असावं. अंधारात नुसत्या स्पर्शानी बाटली ओळखता हवी. बाटली फुटून पडली असली तर तिच्या तुकड्यांवरूनसुद्धा ती कोका-कोलाची आहे असं लक्षात यायला हवं.इंडियानामधल्या रूट ग्लास कंपनीनं बाटली डिझाइन करण्यासाठी टीम नेमली. याविषयी संशोधन करताना एका विशिष्ट कोकोच्या बी चे चित्न त्यांच्यासमोर आलं. बी आकारानं लांबुळकी होती आणि तिच्यावर रेषा होत्या. बाटलीचा आकार या कोकोच्या बीमध्ये गवसला. 1916 मध्ये बाटलीचे बरेच नमुने करून बघितल्यावर उत्पादकांचं एकमत झालं. 1923 मध्ये अनोखा शिल्पकार असलेल्या या बाटलीच्या डिझाइनवर पेटंटही मिळालं. गंमत म्हणजे त्याकाळी फक्त मंगळवारी पेटंट देऊ करण्याची प्रथा होती. कोका-कोलाच्या बाटलीला पेटंट मिळालं ते 25 डिसेंबरच्या मंगळवारी; त्यामुळे तिला ‘ख्रिसमस बॉटल’ असंही म्हणतात. एवढा सगळा खटाटोप, एवढा खर्च काही केवळ वेगळेपणासाठी नव्हता. यातून पॅकेजिंग आणि वितरणाची प्रणाली उभी करायची होती. कोका-कोलाचा खप अमेरिकेपुरता सीमित राहिला नव्हता. इतर देशांतही तोच फॉम्र्युला वापरून पेय बनविण्याचे कारखाने उभारले गेले. सगळीकडे प्रमाणबद्धता हवी. बाटल्या वाहून नेण्यासाठी क्रेटदेखील डिझाइन करण्यात आले. एका व्यक्तीला 12 बाटल्यांचं वजन सहज उचलता येतं, यावरून क्रेटचा आकार ठरला. पूर्वी हे क्रेट लाकडी होते. बाटल्या वाहतुकीत डुचमळता कामा नयेत, या हिशेबानं आधार दिला गेला, आणि एकावर एक ठेवता यावेत म्हणून चौकोनी क्रेटची रचना करण्यात आली. भरलेल्या बाटल्यांचे क्रेट दुकानदाराला देऊन त्याच्याकडे असलेल्या रिकाम्या बाटल्या परत कारखान्यात घेऊन येण्याचं कामही वितरकांचं आहे. बाटल्या काचेच्या असल्याने त्या निर्जंतुक करून पुन्हा वापरता येतात. यामुळे खूप मोठय़ा प्रमाणावर खर्च तर वाचतो, पण त्याहून अधिक पर्यावरण हानीही काही प्रमाणात टाळता येते. बाटल्या फुटल्या, तरी काच ही पूर्णत: रिसायकल करता येते.कोका-कोलाची ही बाटली कितीतरी स्तरांवर र्शेष्ठ ठरते. तिचं मानव-केंद्रित डिझाइन पेय पिणार्‍याला आनंददायी आहेच, पण कारखानदारांना, वितरकांना, विक्रेत्यांना सगळ्यांनाच लाभदायी ठरलंय. अर्थात गेल्या काही वर्षांत प्लॅस्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे या पॅकेजिंगची मूळ कल्पना धूसर, गढूळ झाली. बदलत्या काळाची, गरजांची, कारखान्यांची, तंत्नाची दखल घेता हे बदल रास्त की नाही हे ठरवणं आत्तातरी अवघड आहे. पण सुमारे 100 वर्षांपूर्वी घडवलेल्या ‘ख्रिसमस बॉटल’मागचे डिझाइनचे विचार नक्कीच जपण्यासारखे आहेत.

snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)