शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

शिवकालीन किल्ले एक संकल्पना

By admin | Published: October 31, 2015 2:17 PM

महाराष्ट्रात 350 ते 400 च्या आसपास लहानमोठे किल्ले आहेत. त्यातील अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूला परास्त करून घेतले आहेत.

- कमलाकर धारप
 
महाराष्ट्रात 350 ते 400 च्या आसपास लहानमोठे किल्ले आहेत. त्यातील अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूला परास्त करून घेतले आहेत. त्यानंतर हिंदवी स्वराजाच्या दृष्टीने त्यांची पुनर्बाधणी केली आहे. छत्रपती शिवरायांनी स्वत: आखणी करून 10 ते 12 किल्ले बांधले, ज्यात किल्ले रायगडाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ते असे पहिले राज्यकर्ते आहेत ज्यांनी स्वराज्यासाठी आरमार स्थापन करून त्याचे सेनापतिपद कान्होजी आंग्रे यांकडे सोपविले. सिंधुदुर्ग हा जलदुर्ग त्यातील आखणी करून बांधलेला आहे, तर इतर जलदुर्ग शत्रूकडून जिंकून स्वराज्यात सामील केले आहेत.
महाराष्ट्रातील किल्ल्यांची बांधणी महाराष्ट्रात उपलब्ध होणा:या काळ्या पाषाणातूनच करण्यात आली आहे. बहुतेक किल्ले हे उंच डोंगरावर आहेत. शत्रूला किल्ल्यार्पयत पोचता येऊ नये यासाठी त्यांनी सभोवताली खोल द:या केलेल्या आढळतात. किल्ल्यावर सहज चढता येऊ नये यासाठी निमुळता व वळणावळणाचा मार्ग केलेला आढळतो. शिवदुर्गाच्या पायथ्याशी एक दार व तटबंदी आणि पुढे टप्प्याटप्प्यात दार आणि तटबंदी अशी रचना केलेली आढळते. मुख्य दार हे गोमुखी असते. तेथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला मुख्य दार असते. त्या भक्कम लाकडी दरवाजावर लोखंडी टोकदार खिळे ठोकलेले आढळतात. अशा प्रकारची दारे प्रामुख्याने रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग येथे आढळतात.
जुनी तटबंदी हे शिवछत्रपतींच्या दुर्गबांधणी शास्त्रचे एक वैशिष्टय़ दिसते. प्रस्तुत रचनेला नालयुक्त तटबंदी असेही म्हणतात. शत्रूच्या तोफगोळ्यांनी पहिली तटबंदी जर कोसळली तर दुसरी तटबंदी दुर्गाच्या रक्षणासाठी सज्ज असते. राजपूत व मोगल राजवटीतील किल्ल्यांची तटबंदी सरळ रेषेत बांधलेली आढळते, तर मराठय़ांच्या किल्ल्यांची तटबंदी नागमोडी असते. शत्रूच्या सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरुजांची रचना प्रत्येक किल्ल्यावर केलेली आढळते. मूळ गड शत्रूसैन्याने काबीज केला तर किल्ल्यातील लोकांच्या संरक्षणासाठी भक्कम बालेकिल्ल्याची बांधणी करण्यात यायची. दारूगोळा ठेवण्यासाठी सुरक्षित स्थळी कोठारे बांधलेली आहेत. पन्हाळगड येथील किल्ल्यावर बाहेरून मशिदीसारखे स्वरूप असलेले कोठार बांधलेले आढळते. धान्याची साठवण करण्यासाठी अंबरखाना प्रत्येक किल्ल्यावर आढळतो. 
प्रत्यके किल्ल्यात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पाहावयास मिळतात. या टाक्यात बारमाही पाणी राहत असते. रायगडावर तर हत्ती धुण्यासाठी हत्ती हौद बांधलेले आढळतात. काही दुर्गावर भूमिगत तलावही आहेत. ही सोय अन्य प्रांतातल्या किल्ल्यांमध्ये क्वचितच केलेली आढळते. खा:या पाण्याच्या समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग या गडावर गोडय़ा पाण्याच्या विहिरी आहेत.
हिंदवी स्वराज्याशी बेईमानी करणा:या अपराध्यांना उंच कडय़ाच्या टोकावरून खाली खोल खाईत ढकलून देण्यात येत असे. बहुतेकवेळा हातपाय बांधून अपराध्याला पोत्यात बंद करून त्याचा कडेकोट करण्यात येत असे. किल्ले शिवनेरी येथील जिभेचा पाडा किंवा किल्ले रायगडावरील टकमक टोक ही त्याची चांगली उदाहरणो सांगता येतील.
शिवकालीन गिरिदुर्गाची बांधणी काळ्या पाषाणाची भक्कम बांधणी होती. इतक्या उंचावर वजनदार दगड कसे नेले असतील व कसे बांधकाम केले असेल हे एक कोडेच आहे. सिंधुदुर्ग या सागरी किल्ल्यातील दगडी बांधकामात चुन्याऐवजी वितळलेले शिसे भरलेले आढळते. समुद्राच्या लाटांनी चुनखडी वाहून जाऊ शकते असा विचार करून शिस्याचा वापर केल्यामुळे ही तटबंदी आजही भक्कमपणो उभी आहे. म्हणूनच इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट’ असा केलेला आढळतो.
महाराष्ट्रातील किल्ल्यांना असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खूप मोठा वारसा आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीतही या किल्ल्यांचा वाटा फार मोठा आहे. पण हा इतिहास आजच्या पिढीला कितपत ठाऊक आहे? त्यांच्यार्पयत हा जाज्वल्य इतिहास कसा पोहोचवायचा, यासाठी नागपूर येथील शिवप्रेमी रमेश सातपुते तळमळीनं प्रयत्न करीत आहेत. नागपुरात गेल्या 29 वर्षापासून ‘किल्ले बनवा स्पर्धा’ ते आयोजित करताहेत. मुलांमध्ये गडकिल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण करण्याचे काम करताहेत. त्यांना रोख बक्षिसे देताहेत. संशोधक, अभ्यासक, पत्रकारांकडून स्पर्धेचं परीक्षण केलं जातं. त्यांच्या एका वर्षीच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून मीही काम केले आहे. नागपुरात हिंगण्यापासून पारडीनाक्यार्पयत  विविध भागात उभारण्यात आलेले हे किल्ले परीक्षणाचे काम तसे जिकिरीचे, पण वेगळा अनुभव देणारे असते. 
किल्ला तयार करण्यासाठी कोणती सामग्री वापरावी इथपासून तर किल्ल्यांच्या स्वरूपाविषयी रमेश सातपुते मुलांना स्वत: मार्गदर्शन करीत असतात. शिवकालीन किल्ल्यांचे स्वरूप कळावे यासाठी गड-दुर्गाची माहिती देणारी पुस्तके, नकाशे, व्हिडीओ अशी सगळी सामग्री ते स्पर्धकांना उपलब्ध करून देतात. शिवकालीन किल्ले निर्माण करीत असताना मुलांमध्ये साहजिकच शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र समजून घेण्याची आवड निर्माण होते, असे सातपुते यांचे म्हणणो आहे.
किल्ल्यांचे हे स्वरूप किल्ले स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा:या स्पर्धकांना समजावून सांगण्यासाठी रमेश सातपुते किल्ले बांधणा:या कार्यशाळांचे आयोजन करीत असतात. किल्ल्यांसंबंधी विविध पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला असून, तो स्पर्धकांना त्यांच्या घरी बसून बघता येतो. किल्ला उभारणीसाठी जागेची निवड करण्यापासून त्यासाठी कोणते साहित्य वापरावे याचं मार्गदर्शन तर ते करतातच, पण पुट्ठय़ांचे खोके, गोणपाट, प्लायवूड, थर्मोकोल. यांसारख्या पाण्याने खराब होणा:या वस्तू वापरू नये, अशा बारीकसारीक गोष्टींबाबतही ते मुलांना माहिती देतात.
त्यांच्या या तळमळीमुळे मुलांमध्ये किल्ल्यांविषयी, आपल्या इतिहासाविषयी आवड निर्माण होत आहे. वास्तविक अशा स्पर्धासाठी महानगरपालिका, मोठय़ा संस्थांनी आर्थिक सहकार्य केल्यास या उपक्रमाला आणखी पाठबळ मिळू शकते. (या स्पर्धेसाठी नागपूर महानगरपालिकेने काही वर्षे आर्थिक साह्य केले होते.) पुरस्कारांसाठी प्रायोजक मिळाले तर या स्पर्धाना मिळणारा प्रतिसादही वाढू शकतो. मुलांमध्ये हसत खेळत इतिहासाची गोडी निर्माण करतानाच, त्यांना एक जबाबदार, सजग नागरिक बनविण्यासाठीही असे उपक्रम कळीचे ठरू शकतात. 
 
(लेखक नागपूर आवृत्तीचे समन्वयक संपादक आहेत.)