शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

आपत्तीच्या आव्हानाला भिडताना

By admin | Published: October 25, 2014 2:57 PM

उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी.. काश्मीरमध्ये आलेला महाप्रलय.. आंध्र प्रदेशात धडकलेले चक्रीवादळ किंवा अगदी पुण्यात डोंगराखाली गाडले गेलेले माळीण गाव.. हा सारा नैसर्गिक आपत्तींचा प्रकोपच! निसर्गाची शक्ती अफाट, असीम हे मान्य; पण तिचा सामना तर करायलाच हवा. भूशास्त्राच्या मदतीने अशा आपत्तींचे पूर्वानुमान लागू शकते. नुकतेच काश्मीर व उत्तराखंड भागात भूशास्त्रीय सर्वेक्षण करून परतलेल्या भूशास्त्रज्ञाचे याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन.

डॉ. संदीप सांगोडे 
 
 
माळीण गावातील डोंगराचेच भूस्खलन झाल्याने मिटलेले गाव व झालेली जीवितहानी, तेलंगण-ओडिशातील प्रचंड वादळ, हिमालयातील ढगफुटी, आसाम-उत्तर प्रदेश-बिहारमधील पूर, त्सुनामी वा भूकंप या आणि अशा स्वरूपाच्या ज्या-ज्या म्हणून नैसर्गिक आपत्ती आपल्या देशावर आलेल्या आहेत त्यातून आपण नक्की शिकलो काय? गेल्या १0-१५ वर्षांत घडलेल्या सर्व घटनांचा आपण आढावा घेऊ लागलो, तर त्यातून त्या सर्वांनी एकच धडा दिला आहे; तो म्हणजे कोणतेही शास्त्रीय तंत्रज्ञान नैसर्गिक आपत्ती रोखू शकत नाही. जपान, अमेरिका यासारखे तंत्रज्ञानाने अतिविकसित असलेले देशसुद्धा हे वास्तव जाणून आहेत.
निसर्गाची असीम शक्ती आणि व्यापकता इतकी प्रचंड आहे, की त्यापुढे मानवाच्या कल्पना, क्षमतांना खूपच र्मयादा पडतात. मग प्रश्न असा उरतो, की जर असे असेल तर जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतील, तेव्हा-तेव्हा आपण परिस्थितिशरण व्हायचे का? जे-जे घडेल आणि घडणार आहे, ते-ते केवळ पाहत राहायचे का? तर तसे अजिबातच नाही. आपल्याला अभ्यासाच्या मदतीने अशा कोणत्याही स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तींचा सुगावा लागू शकतो. त्याद्वारे आपण त्याचे गांभीर्य लक्षात घेऊ शकतो. पूर्वसूचनांद्वारे वित्त आणि जीवितहानी टाळू शकतो. त्याचप्रमाणे पूर्वानुमानामुळे आपत्तींचा सामना करण्यासाठी सजग राहू शकतो. जर शास्त्रशुद्ध ज्ञानाची व आधुनिक विज्ञानाची मदत घेतली, तर नैसर्गिक आपत्तीने होणार्‍या मानवी किंवा आर्थिक नुकसानापेक्षा ते कमीच असते.
यासाठी सर्वांत जास्त उपयुक्त ठरतो तो भूशास्त्राचा सखोल अभ्यास. पुरातन काळात घडलेल्या प्रत्येक सखोल घटनेचा अभ्यास भविष्यात घडू शकणार्‍या घटनेबद्दल महत्त्वाची माहिती देऊ  शकतो.  जटिल अशा भूशास्त्रात नैसर्गिक आपत्तीसारख्या शब्दांचा वापर करण्यात येत नाही, कारण पूर, भूकंप, भूस्खलन  या समतोल स्थापित करणार्‍या नियमित नैसर्गिक प्रक्रिया आहेत.  
दर वर्षी पूर येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पुरामुळे पूरमैदान (ऋ’स्रि’ं्रल्ल२)  बनतात आणि नदी आपला समतोल स्थापित करते.  या गोष्टी शेकडो, हजारो आणि लाखो वर्षांपासून पृथ्वीवर होत आहेत.  भूकंप, ढगफुटी, पूर वगैरेंसारख्या लाखो घटना पृथ्वीच्या इतिहासात आहेत. भूशास्त्राच्या अभ्यासाद्वारे या सर्व घटनांचा ऊहापोह केला जातो.  भूशास्त्ररूपी महाकाय गं्रथालयात घडणारी प्रत्येक घटना म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथच असते आणि त्या ग्रंथाचा सखोल अभ्यास म्हणजेच  पृथ्वीच्या भविष्याचा अभ्यास असतो. २0 वर्षांपासून अशा प्रकारचा अभ्यास ‘नैसर्गिक आपत्ती’ या नावाखाली केला जातो.  
नैसर्गिक आपत्तीच्या व्याख्येमध्ये व्यवस्थापन आणि आपत्ती-निवारणाला जास्त महत्त्व दिले जाते; परंतु नैसर्गिक आपत्तीच्या कारणांची माहिती घ्यायची असल्यास भूशास्त्राचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.  गेल्या २५ वर्षांत भारतात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कामामुळे जे संचित जमले, त्याआधारे या विषयाचा विचार आपण करू या. 
नैसर्गिक आपत्तींचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करू शकतो. ‘आकस्मिक’ आणि ‘अपेक्षित’ असे वर्गीकरण केले तर,भूकंप आणि त्सुनामी आकस्मिक घटनांमध्ये मोडतात.  भूकंप आणि त्सुनामीबद्दल आपण ‘कोठे येतील’ हे भूशास्त्राच्या सखोल अभ्यासाद्वारे सांगू शकतो. भूकंप व त्सुनामी यांची तीव्रता किती असू शकते, हे सांगणे जरी कठीण असले, तरी जर त्या भागातील नैसर्गिक आपत्तीच्या नोंदी उपलब्ध असतील, तर त्यांच्या तीव्रतेबद्दल बोलता येते व अशा नैसर्गिक नोंदींना ‘डिफॉर्मेशन रेकॉर्ड्स’ म्हटले जाते.  अशा नोंदी सूचित करतात, की त्या भागात भविष्यात जास्त तीव्रतेचा भूकंप येण्याची शक्यता आहे. अधिक अभ्यासावरून आपण हेदेखील सांगू शकतो, की  त्या भागात भूकंपामुळे कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ  शकते आणि बचावासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी. सागरकिनारपट्टी भागात त्सुनामीचा अभ्यास फार क्लिष्ट असतो आणि अशा नोंदी आढळल्यास त्या पूर्वी आलेल्या त्सुनामीबद्दल भरपूर माहिती सांगून या अभ्यासात भर टाकतात. 
अशा स्वरूपाचा भूशास्त्राचा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन कोणत्या भागात कशा प्रकारची घरे बांधण्यात यावीत, याबद्दल योजना करण्यास निश्‍चितच मदत मिळते.  भारतात भूकंप येण्याचे सगळ्यात जास्त प्रमाण हिमालय आणि आसाम भागात आहे.  किंबहुना, पूर्ण भारताच्या नकाशात कोठे आणि किती तीव्रतेचे भूकंप येऊ शकतात, याबद्दलचा सखोल अभ्यास करून भूकंपीय धोकाक्षेत्र नकाशे (ीं१३ँ0४ं‘ी ँं९ं१ ि९ल्लं३्रल्ल ेंस्र२) तयार करण्यात आलेले आहेत.  या क्षेत्रानुसार बिल्डिंग नॉर्म्स (इ४्र’्िरल्लॅ ल्ल१े२) तयार केले गेले आहेत.  असे नॉर्म्स काटेकोर पाळल्यास नुकसान कमी होण्याची शक्यता असते. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे कुठेही त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने सर्व समस्या निर्माण होतात. त्यातून नैसर्गिक आपत्तीमध्ये होणार्‍या नुकसानाचे प्रमाणही वाढते. 
भूकंपामुळे भूस्खलन आणि पुरांचीसुद्धा शक्यता असते; जी आपण अपेक्षित नैसर्गिक आपत्तीमध्ये नियंत्रित करू शकतो.  बहुतांना भूस्खलन म्हणजे आकस्मिक नैसर्गिक आपत्ती वाटते; परंतु भूकंपाच्या तुलनेत भूस्खलन होणार असल्याचे भरपूर निर्देशक (कल्ल्िरूं३१२) असतात.  तसेच, भूस्खलन कोठे होऊ शकते, याचे अचूक निदान केले जाऊ शकते.  त्यामुळे अनेक घटनांमध्ये आपल्या असे लक्षात येईल, की त्यांचा जर वेळीच योग्य अभ्यास झाला, तर आपल्याला 
 
भविष्यातील नुकसान व धोका टाळण्याच्या दृष्टीने खूप लाभ होऊ शकतो. 
अपेक्षित आपत्तींमध्ये भूस्खलन, पूर, वादळ, ढगफुटी, किनारपट्टी अपक्षरण आणि दुष्काळ अशा प्रकारच्या घटनांचा समावेश होतो.  भूस्खलनचा भाग नदीच्या दरीला (१्र५ी१ ५ं’’ी८) लागून असेल, तर नैसर्गिक धरण (१्र५ी१ ेिं्रेल्लॅ) आणि नंतर धरणफुटी (ु४१२३्रल्लॅ)सारखे प्रकार घडू शकतात. असाच प्रकार २00५मध्ये सतलज नदीमध्ये झालेला आढळला होता. हिमालयात हा नित्याचाच प्रकार असून, त्याविषयीच्या भरपूर नैसर्गिक नोंदी व त्यांचे अहवाल आहेत. अशा घटनांमुळे फ्लॅश पूर येऊन नदीखोर्‍यातील गावांचे नुकसान होऊ  शकते.  हिमालयात दुसरा एक प्रकार म्हणजे ढगफुटीचा. २0१0मध्ये लेहमधील ढगफुटीमुळे तेथील लोकसंख्या कमी असल्यामुळे जरी जीवितहानी केदारनाथ किंवा काश्मीरमधल्या घटनेपेक्षा कमी झाली असली, तरी ही एक खूप मोठी घटना होती.
 हिमालयात जागोजागी अशा घटनांचे  रेकॉर्ड  मिळत असल्यामुळे आम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला. तेथील प्राप्त झालेले नमुने व उपलब्ध नोंदी यांनुसार भूस्खलन, नदीवरील नैसर्गिक धरणे, हिम सरोवर फुटणे आणि ढगफुटी अशा स्वरूपाच्या घटना नेहमी होत असाव्यात, असे मागील ४0-५0 हजार वर्षांचा पुरावा सांगतो.  सध्याच्या हवामानबदलामुळे या गोष्टी येणार्‍या काळात वारंवार घडण्याची पूर्ण शक्यता आहे.  भूशास्त्रीय सर्वेक्षणाद्वारे स्थिर पृष्ठ ओळखण्यास मदत होऊ  शकते.  अशी स्थिर पृष्ठे विकसित केली जाऊ  शकतात आणि त्यावर गावे वसवली जाऊ  शकतात. शाश्‍वत विकासाची खरी संकल्पना आहे ती ही.  नैसर्गिक स्थितीत बदल न करता, तसेच भविष्यातील आपत्तींचा विचार करून केलेल्या शाश्‍वत विकासामुळे पुष्कळसे नुकसान टाळता येऊ  शकते.  येणार्‍या नैसर्गिक आपत्ती जेव्हा अनिवार्य असतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीने सदैव सज्ज राहणे उपयुक्त ठरते. याचे सर्वाेत्तम उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेश सरकारने फार पूर्वी तयार केलेले वादळ आश्रयस्थान. यामुळे आपल्याला भविष्यातील वादळांचा अंदाज येऊन पूर्व-उपाययोजना सक्षम रीतीने राबविणे शक्य होते. 
हिमालयातून थोडे बाहेर निघाल्यास आपण ज्याला पूर्व हिमालय म्हणतो, तो अजून एका पर्वतीय शृंृखलेचा भाग  आहे ती म्हणजे इंडो-बर्मीज पर्वतरांगा; जेथे मेघालय, त्रिपुरा, मिझोराम तसेच नागालँडसारखी दाट लोकसंख्येची राज्ये आहेत.  या भागात पर्वतशृखंला फार संकलित आहेत.  तसेच, दगडांचे स्तर सैल आणि भग्न आहेत. त्यामुळे भरपूर संवेदनशील अवसाद उपलब्ध आहेत.  तसेच जास्त पर्जन्यवृष्टीमुळे या भागात भूस्खलन होऊ शकते, असे तेथील अभ्यासात आढळून आले. परंतु, मिझोरामसारख्या राज्यामध्ये तीव्र उतारावर घरे वसलेली आहेत. त्यामुळे या भागात भूस्खलनाद्वारे नुकसान होण्याचे भरपूर प्रमाण आहे; परंतु अरुणाचलसारख्या राज्यात जंगलांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा घटनांची तीव्रता कमी असू शकते.  पुढे आसाम भाग ओळखला जातो तो भारताची अत्यंत वेगवान नदी ब्रह्मपुत्रेमुळे. आसामसारख्या प्रदेशात ब्रह्मपुत्रेचे पात्र रुंद आणि उथळ असल्यामुळे पुराचा परिणाम फार होतो. काही प्रमाणात तेथील लोकांनी अनुकूल घरांद्वारे या परिस्थितीवर स्वत:चा विचार करून मात केलेली आहे. परंतु, उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये परिस्थिती अजूनही वाईट आहे. 
वरील सर्व बाबी लक्षात घेता, संपूर्ण भारतीय उपखंडात प्रत्येक भागात काहीना काही नैसर्गिक आपत्तीची शक्यता आहे.  याचे कारण म्हणजे, या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया अपेक्षित  आहेत.  सगळ्यांचा ऊहापोह करणे, तसेच भारतातील प्रत्येक भागात कोणती नैसर्गिक आपत्ती येऊ  शकते, हे मोजक्या शब्दांत सागणे शक्य नाही; पण वरील सारांशात भारताच्या प्रत्येक भागातील भूशास्त्राचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे, हे निश्‍चित होते.  या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे त्या कधी व नक्की कोठे होणार, हे सांगणे कठीण आहे.
समकालीन नैसर्गिक भूरचना समजणे तसेच तीवर वातावरणाचा परिणाम आणि भूगर्भीय शक्तींचा प्रभाव भविष्यात काय बदल घडवू शकतो, याचा भूशास्त्राद्वारे सविस्तर अभ्यास, मॉडलिंग आणि झालेला अभ्यास सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत व्यक्त करणे, हेच आजच्या भूशास्त्रज्ञांसमोर मोठे  आव्हान आहे.  
 
 
भूशास्त्राविषयी जागरूकता आवश्यक
 
दुर्दैवाने आपल्याकडे भूशास्त्राविषयी पुरेशी जागरूकता दिसून येत नाही. भूशास्त्राचा अभ्यासक्रम फार कमी विद्यापीठांत असल्यामुळे स्वतंत्रपणे काम करणारे भूशास्त्रज्ञ कमी आहेत.  भूशास्त्राचे महत्त्व फक्त खनिज आणि पेट्रोलियमला र्मयादित नसून, नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास भूशास्त्रासाठी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे., हे आता तरी लक्षात घ्यायला हवे. भूशास्त्रीय पुराव्याआधारे अशा घटनांची मीमांसा करणे गरजेचे आहे.  या गोष्टी आपत्ती व्यवस्थापनसाठी महत्त्वाच्या आहेत.  आपत्तीकालीन बचावासाठी National Disaster Response Force( NDRF) यासारख्या सरकारी यंत्रणा सदैव तत्पर आहेत; पण आपत्ती येणारच नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 
 
 
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.)