शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

ठेका आणि थाप

By admin | Published: September 09, 2016 5:08 PM

मी आयपीएलच्या सामन्यात असेन, नाहीतर हिमालयातल्या शांततेत; मी एकच असतो. ड्रमवर वाजणाऱ्या ठेक्याचे आणि या निसर्गातील माझ्या असण्याचे नाते शोधणारा. हे नाते फक्त माझ्या मातीतील माझ्या वाद्याशी की जगात जिथे म्हणून ड्रमवर थाप पडते त्या प्रत्येक मातीतील वाद्याशी?

- शिवमणी
मी आयपीएलच्या सामन्यात असेन, नाहीतर हिमालयातल्या शांततेत; मी एकच असतो. ड्रमवर वाजणाऱ्या ठेक्याचे आणि  या निसर्गातील माझ्या असण्याचे नाते शोधणारा.  हे नाते फक्त माझ्या मातीतील माझ्या वाद्याशी की जगात जिथे म्हणून ड्रमवर थाप पडते  त्या प्रत्येक मातीतील वाद्याशी?  जगभरात भेटलेल्या कुठल्याही वाद्यावर मी जेव्हा जेव्हा पहिली थाप मारली तेव्हा मला वाटले, अरे, हा नाद, हा घुमारेदार आवाज   मी कधीतरी आधी ऐकलाय.  आईच्या गर्भात? 
की डोळे मिटून रोज शिवपिंडीवर  अभिषेक करतो तेव्हा?
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. चेन्नईमधील एस. एस. आनंदम नावाच्या एका ड्रमरचा तरु ण मुलगा अशी अगदी जुजबी ओळख असलेल्या शिवमणीच्या आयुष्यात घडलेली. वडिलांना अकस्मात झालेल्या अपघातामुळे त्यांची कामे करीत असलेल्या आणि तेच ड्रमचे विश्व आहे अशा भ्रमात जगत असलेल्या तरुणाचे आयुष्य उलटे-पालटे करणारी ही घटना. प्रसाद स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगच्या कोणत्याशा कामात व्यस्त असताना वॉचमन आपल्या हातात एक व्हिजिटिंग कार्ड घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘ये साब आपसे मिलना चाहते है..’ मी कार्ड हातात घेतले, त्यावर झोकदार अक्षरात लिहिले होते झाकीर...! कोण हे झाकीरभाई? माझ्या या अव्यक्त प्रश्नाशी त्यांना काहीही देणे-घेणे नसावे कारण त्यावेळी त्यांच्या मनात वाजत होते काळाच्या कितीतरी पुढे असलेले संगीत. नकाशाच्या कागदावरील सीमारेषांना न जुमानणारे जागतिक संगीत. प्रांत-भाषा-वर्ण-संस्कृती आणि काळ अशा सगळ्या माणसाने निर्माण केलेल्या भेदांच्या पलीकडे असलेल्या स्वरांच्या भूमीतील संगीताचा शोध घेत असलेला हा कलाकार माझे ड्रमवादन समोर बसून ऐकत होता. झाकीर नावाची जादू जेव्हा समजली नव्हती. वाटले, कसा आला हा भाग्ययोग माझ्या आयुष्यात? आपले दोन्ही बाहू पसरून मला कवेत घेण्यास उत्सुक होते अशा या जगाचे दरवाजे मला उघडून दिले ते झाकीरभाईने. मुंबईत रंगभवनमध्ये होत असलेल्या तालवाद्य महोत्सवात ओके टेमीस नावाच्या इस्तंबूलच्या माझ्या आवडत्या ड्रमरला भेटण्यासाठी मी गेलो होतो. त्याला ड्रम लावायला मदत करण्यासाठी मी स्टेजवर गेलो खरा, पण संयोजकांना माझी ही लुडबुड पसंत नसावी, त्यांनी मला स्टेजवरून जवळ-जवळ हाकललेच. फार अपमानास्पद होते ते सगळेच. काहीही झाले तरी पुन्हा सन्मानाने या व्यासपीठावर यायचेच अशी र्ईर्षा मनात पेटावी इतके अपमानास्पद. पण तो क्षण आयुष्यात कधी यावा? दोन वर्षांनी की दहा? तो आला, फक्त चोवीस तासांनी. आणि तोही झाकीरभाईमुळे. त्यांनीच तर आमंत्रण दिले मला स्टेजवर येण्याचे. अगदी अकस्मात आणि अगदी गांगरून जावे असा तो क्षण होता. मला त्या स्टेजवर निव्वळ वाजवायचे नव्हते तर ज्यांना मी मनोमन गुरू मानत होतो त्या त्रिलोक गुर्टूबरोबर वाजवायचे होते. आयुष्य आरपार बदलून टाकणारा क्षण होता तो. ताल नावाच्या असीम जगाची नव्याने ओळख करून देणारा. या जगाने मला भिन्न शैलींची ओळख करून दिली. लौकिक अर्थाने मी कोणत्याच शाळेचा विद्यार्थी नाही. शाळेचा आणि माझा संबंध निव्वळ अक्षर ओळख करून घेण्यापुरता आणि तेवढाच. शिकलेल्या शहाण्या माणसांसारखे सभ्य, सगळ्या बाजूने बेतलेले आयुष्य जगण्याचा मोह होण्यापूर्वीच मी त्यातून बाहेर पडलो. आणि ड्रम?- मी कोणत्याही गुरूपुढे बसून कधीच शिकलो नाही, असे सांगताना कदाचित त्यात कोणाला अभिनिवेश दिसेल पण प्रत्यक्षात ती माझी प्रामाणिक कबुली आहे. माझे वडील हेच माझे गुरू, सतत ड्रमकडेच ओढ घेणारे माझे मन, कान आणि हात हे माझे बल आणि कोणतीही वस्तू दिसताच त्या वस्तूचा मला मनोमन ऐकू येणारा नाद ही मला गुणसूत्रातून मिळालेली देणगी एवढ्याच बळावर भिडत गेलो जगण्याला. या वाटेवर ड्रमवादनाच्या नव्या-नव्या शैली जेव्हा कानावर पडत गेल्या तेव्हा जाणवत गेले ते त्या वाद्याकडे बघण्याच्या आणि जगण्याच्या दृष्टिकोनातील फरक. भारतीय संगीत म्हणजे तालाच्या सगुण मात्रांकडून सृष्टीतील निराकार अशा अनाहत नादाकडे नेणारी साधना! कलाकाराला बोट धरून लौकिकाच्या पलीकडे नेणारी. तर जाझ-रॉकचे जग महा स्फोटक. सगळ्या श्रोत्यांना आवेगाने कवेत घेणारे, त्यांना बेभान करणारे. हे दोन प्रवाह एकत्र होताना बघणे हा माझ्या दृष्टीने एका वेगळ्या रियाजाचा प्रारंभ होता. हा रियाज मला माझ्या भोवतालच्या निसर्गाशी जोडून देणारा होता. या निसर्गातील झाडांचे ताल, माणसांपासून दूर उभ्या उत्तुंग पर्वतांची स्तब्धता, आकाशात उडणाऱ्या पाखरांच्या पंखांची सूक्ष्म थरथर, वेगवेगळ्या वयात नादाचे वेगवेगळे घुंगरू बांधणाऱ्या पाण्याचे नाद हे सगळे मला सतत आव्हान देत होते. कोडी घालत होते. पुढे जाण्याची दिशा देत होते. त्यामुळे समोर येणाऱ्या कोणत्याच संधीला मी कधी नाकारले नाही आणि कोणत्याही अनुभवाला कोणतेच लेबल कधी लावले नाही. आयपीएलच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंगच्या संघासाठी क्रि केटच्या मैदानातील बेभान करणारे क्षण आणि स्वामी सिद्धानंद सरस्वती यांच्याबरोबर हिमालयात कैलास पर्वतासमोर भोवती असलेल्या असीम शांततेवर उमटणारे आणि पुन्हा त्या शांततेत विरून जाणारे माझे बोल या दोन्ही अनुभवातील मी एकच. ड्रमवर वाजणाऱ्या ठेक्याचे आणि या निसर्गातील माझ्या असण्याचे नाते शोधणारा. हे नाते फक्त माझ्या मातीतील माझ्या वाद्याशी की, जगात जिथे म्हणून ड्रमवर थाप पडते त्या प्रत्येक मातीतील वाद्याशी?- त्याच ओढीने मी जिथे-जिथे प्रवास करतो तिथल्या वाद्यांचा शोध घेतो. जगभरातील वेगवेगळ्या समुदायात वाजविली जाणारी हजारो वाद्ये आज माझ्याकडे आहेत. या प्रत्येक वाद्यावर जेव्हा पहिली थाप मारली तेव्हा मला वाटले, अरे, हा नाद, हा घुमारेदार आवाज मी कधीतरी आधी ऐकलाय. आईच्या गर्भात? की डोळे मिटून रोज शिवपिंडीवर अभिषेक करतो तेव्हा?लहानपणी कर्नाटक संगीताने माझे पोषण केले. के. व्ही. महादेवन, एस. पी. बालसुब्रमण्यम अशी संगीताला ईश्वर मानणारी माणसे त्या वयात मला बघायला मिळाली. म्हणूनच वयाच्या बाराव्या वर्षी पहिली जाहीर मैफल करूनसुद्धा माझे पाय जमिनीवर राहिले. मग गाठ पडली ती ए. आर. रहमान नावाच्या अफाट प्रतिभेच्या अवलियाशी. ड्रम वाजवणारी मशीन्स बाजारात येऊन सगळ्या दाक्षिणात्य सिनेमासृष्टीला आपल्या ताब्यात घेत असताना माणसाच्या हातांवर विश्वास ठेवणाऱ्या या कलाकाराने मला प्रयोग करून बघण्याचे बळ देत सतत शिकते ठेवले आणि मग भेटले झाकीरभाई. संगीतातील प्रयोगांच्या अफाट, अनंत शक्यतांच्या ताजेपणाची सतत अनुभूती देणारे आणि बनचुकेपण येऊ न देणारे!लंडनमध्ये एकदा माझा कार्यक्र म होता. सभागृह खच्चून भरलेले. स्टेजवर मांडलेल्या माझ्या वाद्यांच्या भल्या मोठ्या पसाऱ्याबद्दल वाटणारे कुतूहल वातावरणात जाणवावे एवढी शांतता होती. त्यावर ओरखडा काढणारा ड्रम एकदम वाजवण्याची इच्छा होईना. मी समोर दिसणारा एक कागद हातात घेतला, क्षणभर तो बोटात पकडला, हळूहळू चिमटीत तो कागद फिरू लागला. चिमटीत फिरणाऱ्या त्या कागदातून आवाज येत होता उडणाऱ्या पाखराच्या पंखांचा. तो अस्सल असावा, कारण समोर बसलेली छोटी एकदम उत्स्फूर्तपणे म्हणाली,‘मम्मी, बर्ड इज फ्लार्इंग.’ त्या आवाजातील टपोरा आनंद मला थरारून टाकणारा होता..! हे असे क्षण कलाकार म्हणून नव्याने काही सुचवणारे. असे क्षण ओंजळीत टाकणारे रसिक कुठेही भेटतात. विमानतळावर, कार्यक्र म संपल्यावर भोवती असलेल्या कोंडाळ्यात, मुंबईच्या बाजारात सामान्य म्हणून फिरताना आणि हिमालयात स्वत:चा शोध घेत फिरत असताना. अशा एखाद्या रसिकासाठी मी विमानतळावरसुद्धा माझे ड्रम उघडून वाजवतो. मला ठाऊक आहे, त्यांना चित्र-विचित्र कपडे घालणाऱ्या, तऱ्हेतऱ्हेचे कपडे डोक्याला गुंडाळणाऱ्या या शिवमणी नावाच्या माणसाला भेटायचे नाहीये, त्यांना उत्सुकता आहे ती त्यांच्या समोर असलेल्या कोणत्याही वस्तूतून नाद काढणाऱ्या, काढू शकणाऱ्या एका ड्रमर बद्दल.आणि जिथे नाद आहे तिथे शिवमणी असायलाच हवा ना...!शब्दांकनवंदना अत्रे

vratre@gmail.com