शहरं
Join us  
Trending Stories
1
मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
3
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
4
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
5
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
6
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
7
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
8
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
9
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
10
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
11
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
12
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
13
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
14
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
15
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
16
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
17
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
19
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
20
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

दस्विदानिया- रशियाला धन्यवाद देत देशोदेशी परतलेल्या फुटबॉल वेडय़ांनी स्टेडियमच्या ‘बाहेर’ अनुभवलेल्या थराराची नोंद!

By meghana.dhoke | Published: July 22, 2018 3:00 AM

रशिया. पोलादी पडद्यामागचा देश. उत्सुकतेपेक्षा संशय आणि शंकाच अधिक वाटावी असा. साम्यवादाच्या जुन्या झालरींमध्ये आजही वेढलेला असेल अशी जणू खात्रीच वाटणारा. कामाशिवाय जिथे कधी कुणी गेल्याचं वाचा - ऐकायला मिळत नाही असा! फुटबॉल वर्ल्डकपने मात्र हे जुनं चित्र बदललं. पडदा हटला. त्यामागे जे दिसलं, अनुभवाला आलं, ते अख्ख्या जगाला चकीत करणारं होतं!

ठळक मुद्दे खंडप्राय देशातल्या विविधरंगी जगण्याचा एक तुकडा दिसतो.  रशिया आतून पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा मग दाटून येते.

‘हे एक अत्याधुनिक, झगमगतं, श्रीमंत शहर आहे. इथले लोक घाईत आहेत. त्यांच्या वेगवान आयुष्याशी स्पर्धा करत सतत धावताना दिसतात. जो तो आपापल्या कामात बुडालेला आहे. भरपूर काम आणि भरपूर मजा असा या शहराचा स्वभाव दिसतो. शहरात सगळीकडे बार्स, कॅफे, क्लब्ज, म्युझिअम्स, आर्ट गॅलरीज यांची रेलचेल आहे. हे शहर शार्प सूट्स घालून वावरणार्‍या, दुपारच्या घाईत पटकन लंच उरकून पुन्हा कामाला पळणार्‍या माणसांनी गजबजलेलं आहे. जो तो पैशाचा पाठलाग करताना दिसतो. हे शहर स्वत:ही पैशामागेच धावतं आहे. सतत जागं, धडधडतं. सगळीकडे काचेच्या चकाचक इमारतींची गर्दी. आकाशाकडे झेप घेणारे स्टिल स्कायस्क्रॅपर्स पावलापावलावर दिसतात. या शहराला सेकंदभरही झोप म्हणून लागत नसावी.’- न्यू यॉर्क, लंडन किंवा मुंबई नव्हे; हे वर्णन आहे मॉस्को या शहराचं. आणि त्या वर्णनामध्ये दडलेली आश्चर्याची भावना लपता लपत नाही. फुटबॉल वल्र्डकपसाठी रशियाला गेलेल्या हजारो भारतीयांपैकी ख्यातनाम लेखिका शोभा डे यांना दिसलेल्या मॉस्कोच्या या चित्रात आधुनिकता आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा ठासून भरलेली आहे.आणि आधुनिक जगाशी सहज जोडता येणार्‍या या गुणवैशिष्टय़ांना आश्चर्याची झालर अशासाठी, की हे सगळं रशियामध्ये अनुभवायला मिळालेलं आहे.

रशिया.पोलादी पडद्यामागचा देश. उत्सुकतेपेक्षा संशय आणि शंकाच अधिक वाटावी असा. साम्यवादाच्या जुन्या झालरींमध्ये आजही वेढलेला असेल अशी जणू खात्रीच वाटणारा. कामाशिवाय जिथे कधी कुणी गेल्याचं वाचा-ऐकायला मिळत नाही असा!एलेना आणि झिनिया या दोन रशियन मैत्रिणींनी शोभा डे यांना फुटबॉलपलीकडल्या मॉस्कोचे रंग उलगडून दाखवले.आपल्या देशाविषयी अख्ख्या जगाला वाटणारा एक विचित्र कोरडा दुरावा चांगला जाणून असणारी झिनिया शोभा डे यांना म्हणाली, ‘रशिया बदलला आहे, बदलतो आहे यावर विश्वासच ठेवायला जगाने का तयार नसावं, हेच मला फार चमत्कारिक वाटतं. तुम्हाला काय वाटतं, इथे रशियात बर्फाखाली गोठलेल्या रस्त्यांवर अजूनही अस्वलं नाचतात आणि इथले लोक व्होडका पिऊन झिंगलेल्या अवस्थेत गप्पगार बसून असतात?. आजूबाजूला पाहा. हे मॉस्को शहर आहे. पॅरिसइतकंच सेक्सी! पॅरिसपेक्षाही जिवंत, सळसळतं..’- हा अनुभव केवळ शोभा डे यांचा नाही. फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने रशियाचं पहिल्यांदाच ‘दर्शन’ झालेल्या जगभरातल्या लोकांनी आपल्याला वाटलेलं आश्चर्य उघडपणे बोलून दाखवायला सुरुवात केली आहे!खरं तर फुटबॉल वर्ल्डकपच्या तोंडावरच जगभरात रशियातल्या ‘डिफिकल्ट एन्व्हार्यमेण्ट’ची चर्चा सुरू होती. सध्याच्या जागतिक राजकारणातली रशियाची भूमिका आणि ब्लादिमीर पुतीन या गृहस्थांविषयी एकूणच असलेली जनभावना लक्षात घेता रशियातला वर्ल्डकपचा अनुभव कसा असेल, याविषयी शंका अणि संशयाचं सावट गडद होतं. मानवी हक्कांची उघड पायमल्ली, गुप्तहेरगिरी आणि अपहरणाच्या घटना, एकूणच कोणत्याही अभिव्यक्तीला दडपणारी ‘व्यवस्था’ अशा घुसमटलेल्या, संशयास्पद वातावरणात फुटबॉलचा थरार कितपत बहरेल याविषयी अख्ख्या जगभरात शंका व्यक्त केली गेली होती. त्यात रशियन लोक घुमे. आणि भाषेच्या बाबतीत तसूभरही हटायला तयार नसलेले हटवादी. इतकी सगळी बंद दारं ढकलून  ‘आत’ कसं जाता येणार? - अशी शंका असलेल्या प्रत्येक फुटबॉलप्रेमी-पाहुण्याला पुतीन यांच्या रशियाने आश्चर्याचा धक्का दिला.रशिया नावाच्या या खंडप्राय देशाची दारं जेव्हा जगभरातल्या माणसांसाठी मर्यादित प्रमाणात का होईना उघडली, तेव्हा तिथं गेलेल्या माणसांना काय दिसलं? 

रशियाला जाऊन नुकत्याच परतलेल्या फुटबॉल फॅन्सशी बोललं, गप्पा मारल्या तर त्या गप्पांतून रशियन जगण्याचे काही कवडसे हाताला लागतात.एका देशातलं माणसांचं बदलतं जगणं त्या गप्पांमधून उलगडायला लागतं.शोभा डेंच्या  निरीक्षणाला सनील वर्तकही दुजोरा देतो. सनील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. फुटबॉल वेडा. नवा नवा जॉब आहे तर बजेटमध्ये बसेल अशी विदेश ट्रिप प्लॅन करायचं त्यानं आणि त्याच्या मित्रानं ठरवलं. त्यांचा एक मित्र रशियात एमबीबीएस करतोय, त्याच्या मदतीनं या मित्रामित्रांनी फुटबॉलच्या निमित्ताने रशिया ट्रिप आखली. अर्थात मुख्य हेतू फुटबॉल सामने पाहणं. सनील सांगतो, फुटबॉल वर्ल्डकप प्रत्यक्ष पाहणं ही लाइफटाइम संधी होती. शोधाशोध केली, तर विमान तिकीट, राहण्याचा खर्च बजेटमध्ये होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच तिकिटं काढली. गेलो. मित्र उत्तम रशियन बोलायचा म्हणून काही अडचण नाही आली; पण भाषा हा मोठा अडसर आजही रशियात आहे. आम्ही मॉस्को आणि सेण्ट पिटसबर्ग या दोन शहरांत दहा दिवस होतो. कुठल्याही विकसित देशात असतात तशीच ही चकाचक शहरं. कुठंही एकाधिकारशाहीचं सावट जाणवलं नाही. पूर्व रशियात अजूनही घनदाट जंगलं आहेत; पण आम्ही गेलो तो पश्चिम रशिया विकसित वाटला. तुलनेनं स्वस्त आणि किफायतशीरही. जगभरातून माणसं आली होती, रशियन लोकांना त्यांचं अगत्य होतं. ऐकलं होतं तसे काही रशियन तुटक किंवा तटस्थ वाटले नाहीत. फक्त स्पष्ट वक्ते वाटले.’सनीलसारखाच अनुभव ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी यांचाही. दळवी सांगतात, ‘साम्यवादाची सावली अजूनही रशियावर आहे. तसं उदारीकरणाचं वारं आता आहे, लोक मुक्तपणे फिरताना दिसतात. भौतिक प्रगती दिसते. इतकंच काय मॉस्कोत एका बसवर मी भारतीय औषधाच्या उत्पादनाची मोठी जाहिरातही लागलेली पाहिली. भारतीय उत्पादनं रशियन बाजारपेठेत अशी जाहिरात स्वरूपात दिसतात हे चित्र बोलकं आहे. मात्र आजही रशियात पूर्वीच्या राजवटीचा, शिस्तीचा पगडा आहे. भाषेचा प्रश्न तर मोठाच आहे. मात्र आता बदलत्या काळात तिथं शेती सहकारी तत्त्वावर एकत्र येऊन करण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. रशिया बदलतो आहे, याच्या खाणाखुणा अशा दिसतात. मात्र आजही राजकीय प्रतलावर राष्ट्राध्यक्ष पुतीनच सर्वसामथ्र्यवान आहेत. त्यांनी फुटबॉल हे ‘व्हेईकल’ वापरून खरं तर रशिया नावाच्या या देशाचीच संकल्पना जगासमोर मांडली. फुटबॉलच्या पायात पाय घालून पर्यटनाचं आमंत्रण देणं, जगभरातल्या लोकांनी आपल्या देशात पर्यटनासाठी यावं म्हणून पायघडय़ा घालणं हाच त्यामागचा मूळ हेतू होता. फुटबॉल हा विश्वव्यापी आहे, त्याचाच फायदा घेत त्यांनी रशियन पर्यटनासाठी मोठी संधी निर्माण केली. 1980 नंतर रशियात घडत असलेली ही मोठी जागतिक घटनाच होती. 1980 सालच्या सोविएत युनियनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होती. मात्र अमेरिका आणि अमेरिका धार्जिण्या देशांनी त्या ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला होता. पुढे 1991 साली सोविएत युनियनचं विघटन झालं. त्यानंतरची ही मोठी घटना. म्हणून तर त्यांनी फुटबॉलची मदत घेत हा बदललेला रशियाच जगासमोर ठेवला!’फुटबॉलच्या पोटात आणि पायाखाली असं राजकारण असलं तरी फुटबॉलप्रेमींना जो रशिया अनुभवता आला किंवा ज्या अगत्यानं त्या देशातली माणसं स्वागताला शिस्तीत उभी राहिली तो अनुभव मात्र खासा यादगार होता. करमतारा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजीव सिंग नुकतेच रशियातून परतले. ते सांगतात, ‘रशियातला अनुभव भन्नाट होता. त्यांनी अत्यंत शिस्तीत, बारीकसारीक गोष्टींची काळजी घेत या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. दर दोन मीटरवर आम्हाला एक स्वयंसेवक भेटत असे. उत्तम इंग्रजी बोलणारा, हसतमुख, प्रसन्न. देशातली तरुण मुलं या आयोजनात सहभागी झालेली दिसली. सुरक्षाव्यवस्था, मेट्रो ते मेट्रो स्टेशन सगळीकडे हे स्वयंसेवक कामात गर्क होते. लोकांना स्वतर्‍हून मदतीचा हात देत होते.  कुठं रेटारेटी नाही, आरडाओरडा नाही, नियोजन फसल्याच्या काहीच खुणा नाहीत. फॅन आयडी नावाचं ओळखपत्र प्रत्येकाच्या गळ्यात होतं, त्या एका ओळखपत्रावर मॅच तिकीट ते सर्वत्र वावर हे सारं खूप सहज झालं. अत्यंत सोपं केलं होतं त्यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी सारं. गेल्या विश्वचषकासाठी मी ब्राझीलला रिओ द जानिरिओलाही गेलो होतो. रिओ केवढं मुक्त आणि मनस्वी शहर, मात्र त्याहीपेक्षा मला मॉस्को आवडलं. तिथलं वास्तव्य अत्यंत सुखाचं आणि तरीही विलक्षण जोशपूर्ण होतं.’असाच अनुभव रुस्तमजी बिल्डर्सचे संचालक पर्सी चौधरी यांनाही आला. ते सांगतात, ‘मॉस्को, सेण्ट पिटसबर्ग आणि सोची या तीन शहरांत मी राहिलो. रशियन आदरातिथ्य विलक्षण होतं. सोचीसारख्या तुलनेनं छोटय़ा शहरांत भाषेचा अडसर आला तरी लोक मदतीला तत्पर आणि इच्छुक होते. साधारण युरोपिअन संस्कृतीची झलक रशियातल्या मोठय़ा शहरांत दिसते. बार, पब्ज, रेस्टॉरण्ट हे सारंच फुटबॉलमय झालं होतं. सोची ते सेण्ट पिटसबर्ग दरम्यान मी जो ट्रेनने प्रवास केला, तो रशियातला एक खास रशियन अनुभव असं म्हणता येईल. त्या प्रवासात मला रशिया या देशाची काही झलक पाहता आली.’

रशियात काहीच दिवस राहून आलेल्या या सार्‍यांना रशियन माणसांच्या आतिथ्यशीलतेचा उत्तम अनुभव आला. त्याच रशियाची भारतीय जगण्याला काहीअंशी आपलीशीच वाटणारी गोष्ट इंदिरा बर्वे सांगतात. कारण भारत आणि रशिया या दोन्ही देशांशी त्यांचं आतडय़ाचं नातं आहे. इंदिरा बर्वे यांची आई तातीयाना डेमेदोवा रशियन. वडील भारतीय. त्या जन्मल्या रशियामध्ये. नंतर वयाच्या तिशीर्पयत भारतातच  राहिल्या. नंतर नोकरी-व्यवसायानिमित्त दुबई-लंडन असे मुक्काम करून युरोपातच स्थायिक झाल्या.इंदिरा व्यवसायाने आर्किटेक्ट आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत. सध्या नेदरलॅण्डमध्ये अ‍ॅमस्टडॅमला राहतात. आजही नियमितपणे रशियाला जात असतात. त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला तर त्यांनी रशियन जगण्याची एक सुंदर गोष्टच सांगितली. त्या सांगत होत्या, ‘रशिया नितांत सुंदर देश आहे. विलक्षण सुंदर लॅण्डस्केप, अपार निसर्गसौंदर्य, बर्फाच्छादित शुभ्र माहौल हे सारं तर आहेच; पण त्यापलीकडचा रशियाही खूप सुंदर आहे. अर्थात रशियानं कधीही पर्यटनाला प्रोत्साहन दिलं नाही. फुटबॉलच्या निमित्तानं मात्र जगभराला ते आमंत्रण देण्यात आलं. जगभरातून लोक आले. त्या लोकांकडे पाहून रशियन लोक हसतील तरी का अशी टवाळीही झाली. पण ते खरं नाही, रशियन लोकांना विनोदाची उत्तम जाण आहे. मात्र मुंबईकर माणसं जशी जगतात, गर्दीतही अलिप्त राहतात, रशियन माणसांचं जगणंही तसंच तर आहे. मित्र, कुटुंब यांच्यासह ते भरभरून जगतील, जेवणाच्या पंगती लागतील; पण ते सारं घरात. रशियाची संस्कृती अशी माणसांना धरून राहते. जिथे तापमान वर्षाला सहा महिने शून्याच्या खाली असतं, तिथं माणसांतली ही परस्पर ऊब फार मोलाची ठरते. जगण्यातला असा मोकळेपणा रशियातही आहेच.  महागडय़ा वस्तूंचं अप्रूप आहे. त्याचं कारण असं की कम्युनिस्ट कारकिर्दीत, गोर्बाचेव्ह राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा रशियात काहीच नव्हतं. मुबलकता  नव्हती. आज ती आहे.  रशियाची अर्थव्यवस्था तुलनेनं उत्तम आहे. त्यामुळे माणसांच्या आयुष्यातही सुबत्ता दिसते.’- पण मग राजकीय व्यवस्थेचं काय? पुतीन यांच्या एकसत्ताक हुकुमशाही स्वभावाच्या - कार्यपद्धतीच्या विरोधात जगभरातलं जनमत असलं तरी स्थानिक वातावरण वेगळं आहे. इंदिरा सांगतात, ‘एकारलेलं राजकारण आहे, निवडणुका पारदर्शक नाहीत असे आरोप सर्रास होतात. दडपशाहीच्या विरोधात आवाज उटवू पाहणार्या संघटना कार्यरत आहेत. पण आजही किमान 50 टक्के लोक राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे समर्थक आहेत. पश्चिमी जग पुतीन यांच्याकडे  ‘बॅड बॉय’ म्हणून पाहात असलं, तरी स्थानिकांमध्ये पुतीन लोकप्रिय आहेत. कारण त्यांनी  पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.  अर्थात आजही छोटय़ा शहरातली- ग्रामीण अविकसित भागातली परिस्थिती बरी नाही. दुसरीकडे रशियाची लोकसंख्या घटते आहे. संतती होऊ देणं लोक टाळतात. कशासाठी सारं नव्यानं निर्माण करायचं अशीही काहींची विचारधारा दिसते.’रशियावरच्या साम्यवादाच्या अंमलाविषयीही उत्सुकता असते. सोविएत युनियनचा डोलारा कोसळताना पाहिलेली पिढी इंदिरा बर्वे यांच्या आईची. त्या सांगतात, ‘आज एकाच वेळी रशियात  तीन पिढय़ा दिसतात. एक पिढी कम्युनिस्ट काळात जगलेली. कम्युनिस्ट राजवट कोसळल्यानंतर भयंकर वास्तवाला सामोरं जात जगलेली दुसरी पिढी आणि आजची तरुण पिढी. बराच काळ कम्युनिस्ट राजवटीत जगलेली, आदर्शवादाला कवटाळून जगणं बेतलेली पिढी, तिचे संस्कार आणि समजुती एका रात्रीत बदलणार नाहीत. आदर्शवाद फसला म्हणून एका रात्रीत काही लोक आपली आदर्शवादी विचारसरणी सोडून देत नाहीत. ते हळूहळू बदलतात. राज्यकत्र्याना काही प्रश्नच विचारायचे नाहीत, ते आपल्या भल्यासाठीच काम करणार हा विश्वास ठेवायचा हीच रशियातल्या समाजधारणांची जुनी रीत होती. त्या जगण्याची सवय झाली होती. माझ्या आईच्या पिढीनं कम्युनिझमवर भरवसा ठेवला. पण ती व्यवस्था टिकली नाही. सगळी माणसं समान, सगळ्यांना जगण्याची समान संधी, समान वाटा हा आदर्शवादाचा फुगा फुटला. आदर्शवादाचं स्वपA हातून सुटून गेलं. हे प्रत्यक्ष पाहिलेल्या-जगलेल्या माणसांनी भयंकर नैराश्य अनुभवलं. त्यांचा भ्रमनिरास झाला. व्यवस्थांवरचा विश्वास उडाला. कुणी बॅँकेत पैसे ठेवायला तयार नव्हतं, इतका अविश्वास निर्माण झाला. अनेकांनी आपली आयुष्यभराची पुंजी गमावली. त्या धक्क्यातून अजूनही ती पिढी सावरलेली नाही. सुदैवानं दवाखान्यांसारख्या कल्याणकारी योजना कम्युनिस्ट काळापासून उत्तम आहेत. लोकांवर मोफत उपचार होता. राज्यव्यवस्था जनतेची काळजी घेते, हा एक दिलासा तेवढा होता. त्या आधारावर ही पिढी कशीबशी तरून गेली. त्यानंतरच्या पिढीच्या वाटय़ाला मात्र वास्तवात कठोर जगणं आलं. दोन-दोन नोकर्‍या करून लोकांनी आपलं आयुष्य सावरलं. फार अवघड काळ होता, त्यातून लोकांनी स्वतर्‍चे संसार आणि देशही सावरला. आणि आता नवीन तरुण पिढी. ती जगभरातल्या तरुण पिढीहून वेगळी नाही. ते नव्या इच्छा-आकांक्षा, गॅजेट्स यासह जगत आहेत. रशियन जगणंही असं वेगानं बदलतं आहे.’- इंदिरा बदलत्या रशियाची गोष्ट अशी थोडक्यात सांगतात आणि क्षणभर एका छोटुशा खिडकीतून रशियन समाजात डोकावल्यासारखं वाटतं. खंडप्राय देशातल्या विविधरंगी जगण्याचा एक तुकडा त्यातून दिसतो. रशिया आतून पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा मग दाटून येते.

मुलाखती आणि संकलन :मेघना ढोके