शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

डीकोडिंग..

By admin | Published: May 08, 2016 1:11 AM

नवा छानसा स्मार्टफोन खरेदी करायचा म्हणून वैभवने इंटरनेट सर्च करायला सुरुवात केली. ई-कॉमर्सच्या वेगवेगळ्या वेबसाइट आणि काही मोठय़ा

- मनोज गडनीस
 
फोन, घडय़ाळ, पेनड्राइव्ह.
काही खरेदी करायचं म्हणून
आपण ऑनलाइन जातो.
जे आपण शोधतोय, 
जे आपल्याला खरेदी करायचंय
नेमक्या त्याच वस्तूचे अफलातून
पर्याय आपल्यासमोर यायला लागतात,
खरेदीच्या चटकदार ऑफर्स
डोळ्यांसमोर चमकायला लागतात,
एसएमएस थडकायला लागतात.
त्यातलाच एखादा हटके पर्याय 
आपण निवडतो आणि ती वस्तू
चार-दोन दिवसांत आपल्या दारात हजर!
पण एवढे कसे हे ‘मनकवडे’?
आपल्या मनातलं हे कसं ओळखतात?
- इंटरनेटवरील या हेरगिरीला म्हणतात,
‘डेटा अॅनालिटिक्स’ आणि
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’!
 
नवा छानसा स्मार्टफोन खरेदी करायचा म्हणून वैभवने इंटरनेट सर्च करायला सुरुवात केली. ई-कॉमर्सच्या वेगवेगळ्या वेबसाइट आणि काही मोठय़ा रिटेल दुकानांच्या वेबसाइटवरून वेगवेगळे स्मार्टफोन, त्यांचे टेक्निकल कॉन्फिगरेशन आणि मग अर्थातच किंमत याची पडताळणी त्याने सुरू केली..
फोन खरेदी करायची फारशी घाई नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन माहिती घेण्यात वेळ दवडण्यापेक्षा इंटरनेटच्याच साहाय्याने आगामी दोन-तीन दिवस त्याने ही सर्च मोहीम सुरू ठेवली..
या मोहिमेदरम्यान ज्या ज्या वेळी वैभवने त्याच्या घरी, ऑफिसमध्ये किंवा मोबाइलमध्ये ई-मेल, सोशल मीडिया वेबसाइट अथवा अन्य कोणत्याही वेबसाइटचे सर्फिग केले, त्या प्रत्येक वेळी त्याला त्या सर्व ठिकाणी त्याने सर्वाधिक सर्च केलेल्या आणि बहुधा त्याच्या ‘मनात असलेल्या’ स्मार्टफोनच्या जाहिराती दिसायला लागल्या. एवढेच नव्हे तर त्या फोनच्या खरेदीकरिता विविध क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्सही जाहिरातीच्या रूपाने दिसू लागल्या. स्मार्टफोनच्या ऑफर्सचे ईमेल येऊ लागले. एवढेच नव्हे तर त्याच्या फोनवर याच संदर्भात विविध ऑफर्सचे एसएमएसही यायला सुरुवात झाली. अचानक आपल्या आजूबाजूचे विश्व स्मार्टफोनमय कसे झाले, या विचाराने वैभवही भांबावला. पण त्या आलेल्या ऑफरमधून एक आकर्षक ऑफर खरेदी करून त्याने त्याच्या आवडीचा फोन खरेदी केला.
असा अनुभव आपल्यालाही आला आहे का?
भले आपल्या खरेदीसाठी कुणी आकर्षक योजनांची माहिती आपल्यार्पयत अशा विविध माध्यमांद्वारे पोहोचवित असेल; पण हे असे का व्हावे? आपल्या खासगी आयुष्यात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असा शिरकाव कोण करत आहे? 
- तर यामागे आहे डेटा अॅनालिटिक्स! 
तुमच्या-आमच्या दैनंदिन सवयी, आवडीनिवडी, इंटरनेटच्या विविध वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवर आपल्या स्वभावाचे उमटणारे प्रतिबिंब, अगदी अजरुनाने पाण्यात पाहून छतावर लटकत्या माशाचा डोळा बघत तो टिपावा इतक्या अचूकपणो हे डेटा अॅनालिटिक्स करणारे तंत्रज्ञ टिपत आहेत आणि यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, आवडीनिवडीचा, स्वभावाचा पॅटर्न त्यांच्या फाईलमध्ये बंद होत आहे. 
अशा हजारो- लाखो फाईलमध्ये लोकांच्या माहितीचे पृथ:करण होऊन त्यांच्या वयानुसार, शहरानुसार, लिंगानुसार, त्या व्यक्तीची पत जोखून ही माहिती मग बहुराष्ट्रीय कंपन्यांर्पयत पोहोचते आणि याच माहितीच्या आधारे मग बहुराष्ट्रीय उत्पादन कंपन्या आपल्या नव्या उत्पादनांची रचना करतात, तसेच कोणत्या व्यक्तीला काय हवे, त्याच्याकरिता आपले कोणते उत्पादन उपलब्ध आहे, याचा आढावा घेऊन त्या व्यक्तीर्पयत नेमकेपणाने ती माहिती पोहोचवितात. 
इंटरनेटचे आगमन झाले त्यावेळी ‘इन्फोर्मेशन इज द की’ हे वाक्य सतत कानावर आदळत होते. पण आता वयात आलेल्या इंटरनेटच्या जगात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘डेटा अॅनालिटिक्स’ या दोन शब्दांना, किंबहुना या दोन घटकांची जाण असणा:या लोकांना उत्तम दिवस आले आहेत, कारण आता ‘इन्फोर्मेशन’ ही संज्ञा फारच ढोबळ ठरली असून, महत्त्व आले आहे ते ‘डेटा’ला, विशिष्ट माहितीला. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट फोन या सर्वाच्या माध्यमातून लोकांकडून होत असलेल्या इंटरनेटच्या वापरावर आता ‘बाजारपेठे’ची करडी नजर आहे. नेटवरील लोकांच्या वावरातून त्यांच्या सवयी, आवडी-निवडी, स्वभावाचा पॅटर्न याचे एका त्रयस्थ ठिकाणी बसलेले डेटा अॅनालिटिक्स करणारे तंत्रज्ञ विच्छेदन करतात, प्रत्येक माणसाच्या वर्तणुकीचा ‘ल.सा.वि.’ आणि ‘म.सा.वि.’ निश्चित करून ही गोळीबंद माहिती बाजारपेठेतील महाकाय कंपन्यांना विकतात. याच माहितीच्या आधारे मग कंपन्या आपापली नवी उत्पादने बाजारात आणतात.. आपल्या मनातली, आपल्याला भावतील अशी.. या चक्रव्यूहात अनाहूतपणो ओढले जाणारे आपण सारेच अभिमन्यू आहोत.
 
हे इतके मनकवडे कसे?
आपल्याला नेमके काय हवे आहे, आपण कसला शोध घेतोय, हे कंपन्यांना कळते, त्याचा मुख्य स्नेत ई-मेल सेवा व फोन सेवा देणा:या कंपन्या आहेत. 
पुन्हा स्मार्टफोनचंच उदाहरण. ज्यावेळी 
 
आपण एखादा स्मार्टफोन खरेदी करतो, त्यावेळी इंटरनेटवर त्यावरील कोणतीही अॅप्लिकेशन वापरायची असतील तर त्याकरिता सर्वप्रथम आपल्याला आपला ई-मेल आयडी टाकून फोन ‘कॉन्फिगर’ करावा लागतो. यानंतर आपला ईमेल बॉक्स तर सेट होतोच, पण याचसोबत प्ले स्टोअर अथवा अॅप स्टोअरसाठीदेखील हाच आयडी वापरला जातो. 
बहुतांश लोक स्मार्टफोनच्याच माध्यमातून केवळ व्हॉट्सअॅपच नव्हे, तर फेसबुक, टि¦टर, इन्स्टाग्राम, पींटरेस्ट यांसारख्या अॅप्लिकेशनवर लॉगइन करून तिथूनच त्याचा वापर करत असतात. जवळपास प्रत्येक वेबसाइट, सोशल मीडिया वेबसाइट्स आणि मोबाइल कंपन्याही आपला ग्राहक इंटरनेट कसे वापरतो, कोणत्या वेळी वापरतो, त्यावरून काय काय करतो याची मांडणी करत असतात आणि यातूनच मग या माहितीचे विश्लेषण होते आणि विश्लेषण केलेली ही माहिती कंपन्यांना मिळते. 
 
फायदा की तोटा ?
आपल्या वापरातील यंत्रंच्या माध्यमातून आपल्यार्पयत आणि आपल्या मनाचा ठाव घेण्यार्पयत तंत्रज्ञानाचे हे चक्रव्यूह आता विणले गेले आहे. हा विषय शाळेतल्या ‘दूरदर्शन शाप की वरदान’ इतक्या सहजतेने समजून सोडून देण्याइतका निश्चितच नाही. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मानसी जोशी यांच्या मते, जर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुम्ही करू पाहत असलेल्या कोणत्याही कामाचे, गोष्टीचे जर असे विच्छेदन व्हायला लागले आणि त्या माध्यमातून त्याची (मर्यादित स्वरूपातील) उत्तरे जर तुमच्यार्पयत कुणी पोहोचवायला लागले तर कालांतराने आपल्या विचारशक्तीला अथवा सजर्नशीलतेलाच मर्यादा येईल. किंबहुना, लोकांच्या विचाराचे साचे तयार करून जेव्हा जो विचार जागृत होईल, तेव्हा त्या विचाराला पूरक किंवा गरजेची माहिती त्या साच्यात कोंबली जाईल. मानवी मन हे नवनिर्मितीचे उगमस्थान आहे. अमाप आणि कल्पनाशक्तीचे भांडार आहे. पण जसजसा काळ सरेल, तसतसे डेटा अॅनालिटिक्सच्या तंत्रमुळे मानवी मनाची विचार करण्याची शक्ती कमकुवत होत जाईल व कालांतराने नवे विचार बंदही होण्याची भीती आहे. 
हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता दोन उदाहरणो पुरेशी आहेत. पहिले उदाहरण असे की, आयफोनची निर्मिती करणा:या अॅपल कंपनीने आयफोन-5 मध्ये ‘सेरी’ या तंत्रचा अंतर्भाव केला. 
सेरी ही केवळ मोबाइलमधील स्मार्ट सेवाच नसून खरंतर ती तुमची फोनमधील ‘गुलाम’ आहे. एखाद्याला फोन लावून दे किंवा अलार्म सेट कर अशा अनेक किरकोळ गोष्टी तर सेरी तुमच्यासाठी करतेच, पण तिची क्षमता यापेक्षाही अचाट आहे. तुम्हाला जर समजा शर्टाची खरेदी करायची आहे, आणि तुम्ही सेरीला तुमच्या शर्टाची साइज आणि अपेक्षित किंमत सांगितली तर ती तुमच्या स्क्रीनवर नेमकेपणाने ते शर्ट आणून ठेवते. सेरी जेव्हा तुम्हाला ते शर्ट स्क्रीनवर दाखवते, त्यावेळी त्या शर्टाचे वैशिष्टय़ म्हणजे ते दोन किंवा फारतर तीन रंगांचेच असतात. ते दोन किंवा तीनही रंग तुमच्या आवडीचे असल्यामुळे तुम्ही सेरीवर आणखीनच खूश होता. 
पण, सेरीला हे सारे समजते कसे, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला आहे का? सेरीला ही माहिती मिळण्याचा मुख्य स्नेत असतो तो तुमचा यापूर्वी केलेला गूगल सर्च. जेव्हा तुम्ही सेरीला शर्ट अथवा काही वस्तू शोधण्यास सांगता तेव्हा सेरी तुमच्या जुन्या सर्चमधून तुम्ही नोंदविलेले तपशील विचारात घेत त्या अनुषंगाने सर्च करून नेमकेपणाने तुम्हाला हवी ती माहिती देते. 
सेरी क्षमता ही अचाट आहे, असे अशासाठी म्हटले की, समजा तुम्ही अलीकडेच किंवा अन्य ब्रँडवरून पहिल्यांदा अॅपलचा फोन खरेदी केला असेल तरी, तो फोन अॅक्टिव्ह करण्यासाठी जो ईमेल द्याल त्या ईमेलच्या अनुषंगाने आपला भूतकाळातील सर्च आणि त्या अनुषंगाने आपल्या ‘सवयीं’चे पृथ:करण ती करते आणि तिच्या मेमरीनामक मेंदूत याची साठवण करते. आणि तुमच्या सूचनेनुसार तुम्हाला ती सेवा देते. 
हळूहळू तुम्हाला सेरीच्या या सेवेची सवय होत जाते आणि मग कालौघात सेरी तुम्हाला तुमच्या विचारांचा परिघ ओलांडू देण्यासाठी अडथळे उभे करते. सेरीची ही सेवा अॅपलमध्ये असली तरी अन्य फोन कंपन्यांमध्ये आता असे सेवेसाठी गुलाम सज्ज आहेत. मानवी कामे तंत्रज्ञान सुलभ करते, या गोंडस व्याख्येमागचे हे एक भीषण वास्तवही आहे. 
दुसरे उदाहरण म्हणजे, मोबाइल फोनच्या आगमनापूर्वीर्पयत अनेक फोन नंबर आपल्या लक्षात असायचे. पण तेच नंबर जेव्हा संबंधित व्यक्तीच्या नावाने फोनमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झाली, त्यानंतर हळूहळू आपल्या मेंदूच्या मेमरीतून ते नंबर डिलिट होण्यास सुरुवात झाली. आता आपण ब:यापैकी या सेव्ह केलेल्या नंबरवरच अवलंबून आहोत. 
 
..तर सोशल मीडियामुळे नोकरीवरही गदा!
आपल्या सवयी काय आहेत किंवा आपण कोणती, काय खरेदी करतो, यावरच फक्त नजर राखली जातेय असे नाही. फेसबुक अथवा लिंकडिनसारख्या सोशल मीडियावरील आपला वावर काय, कसा आहे याचीही बारकाईने नोंद होत आहे. यातून आपला स्वभाव, आपली विचारप्रणाली, आपण कुणाला फॉलो करतो, काय कमेंट करतो, काय लाइक करतो याद्वारे आपली अभिरुची जोखली जाते आणि ही माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणा:या एच.आर. अर्थात मनुष्यबळ विकास संस्था विविध कंपन्यांर्पयत पोहोचवित असतात. यामुळे तुमचा बायोडेटा कितीही प्रभावी असला तरी जेव्हा प्रत्यक्ष मुलाखतीला तुम्ही जाता तोवर तुमच्या स्वभावाचे बारकावे मुलाखत घेणा:या व्यक्तीच्या आधीच हाती लागलेले असतात. या माहितीच्या आधारे तो आपल्याबद्दल आधीच मत ठरवून बसतो. आणि मग याचा फायदा किंवा तोटा आपल्यालाच होतो! 
एवढेच काय, पण अगदी एखाद्या व्यक्तीला किती कर्ज द्यावे, याकरिता वैयक्तिक कर्जाची पत ठरविणा:या ‘सिबिल’ या संस्थेनेदेखील कर्जाची पत निश्चित करण्यासाठी जे घटक आहेत त्यात आता संबंधित व्यक्तीचा सोशल मीडियावरील वावर विचारात घेण्याचे सूतोवाच केले आहे. सोशल मीडियावरील त्या माणसाचे अस्तित्व, किती प्रभावी लोक त्याच्या खात्यामध्ये आहेत, कोण त्याच्या पोस्टवर लाइक, कमेंट, शेअर करते असे विषय विचारात घेतले जाणार आहेत. 
 
स्वत:ला गुप्त राखण्याचा 
‘गनिमी कावा’
आपली खरी ओळख, आपल्या आवडीनिवडी कंपन्यांच्या हातात जाऊ नये यासाठी काय करायचं? तंत्रज्ञांच्या मतेही यातून मार्ग काढण्यासाठी समाधानकारक उत्तर नाही. गनिमी कावा हा एक मार्ग आहे. पुन्हा स्मार्टफोनच्या उदाहरणाने सांगायचे झाल्यास, आपल्या फोनमध्ये जिथे जिथे ईमेल आयडी देऊन सेवा कार्यान्वित करावी लागते, अशा सर्व सेवांसाठी एक वेगळा नवा ईमेल आयडी तयार करावा. याचा वापर केवळ आणि केवळ याच गोष्टींसाठी करावा. अन्यथा दुसरा मार्ग थोडासा खडतर आहे, म्हणजे स्मार्टफोनच न वापरण्याचा. तो सगळ्यांनाच सहज शक्य होईल असे नाही. परिणामी गनिमी कावाच कामी येऊ शकतो. 
 
(लेखक ‘लोकमत’ समूहात विशेष प्रतिनिधी आहेत.)
manoj.gadnis@lokmat.com