शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

‘कॉलर’ उडवत समोरच्याची ‘चुटकी’ वाजवू पाहणारे उदयनराजे असं का वागतात?

By सचिन जवळकोटे | Published: June 30, 2018 6:33 PM

पण एक खरं : राजे हे नक्की काय रसायन आहे, हे कोणाला म्हणजे कोण्णाला उमगत नाही!!

ठळक मुद्दे‘राजे मनस्वी आहेत, सनकी आहेत,’ असं जग समजत असलं तरी ‘ते राजकारणात खूप मुत्सद्दी अन् धोरणी आहेत,’ असा ठाम विश्वास त्यांच्या जवळच्यांना वाटतो.

अलीकडच्या काळात असा एकही आठवडा गेला नसावा की सातार्‍याच्या उदयनराजेंचं नाव मीडियात टॉपवर झळकलं नाही! त्यांची कॉलर उडविण्याची स्टाइल लई भारी असं महाराष्ट्रातल्या तरुणांना जेवढं वाटतं, तेवढंच मोठय़ा प्रेमानं एखाद्याच्या गालाचा मुका घेण्याची त्यांची सवयही  कार्यकर्त्यांना  भलतीच आवडते.  आपल्या नेत्यानं आक्रमक असावं, असं कुठल्या कार्यकर्त्यांला वाटत नाही? मात्र एवढं आडदांड अन् रानगट असावं काय, असाही विचित्र प्रश्न कधी कधी उभ्या महाराष्ट्राला पडतो. कारण चुटकी वाजवत स्वत:च्याच पक्षप्रमुखालाही धमकी देणारा हा असा नेता तसा विरळाच !

काही वर्षापूर्वीचा एक किस्सा. सातार्‍यातील बसस्थानकाचा परिसर. मध्यरात्रीचे  दीड-दोन वाजलेले. एवढय़ात एक आलिशान गाडी कच्चùùकन येऊन थांबली. रिक्षा स्टॉपसमोर येऊन उभारलेल्या या गाडीवरचा ‘झिरो झिरो सेव्हन’ नंबर बघून पेंगुळलेले रिक्षावाले चमकले. याचवेळी गाडीतून खुद्द राजे खाली उतरले. पाहता-पाहता त्यांच्याभोवती रिक्षावाल्यांचा घोळका जमला. गाडीतल्या टेपवर लागलेल्या गाण्याचा आवाज वाढत गेला, तसं रिक्षावाल्यांनीही नकळतपणे ठेका धरला. मग काय. सारेच नाचू लागले. शर्ट काढून हवेत उडविण्यार्पयत उत्साह उफाळून वाहात राहिला.

-  नाचून नाचून झाल्यानंतर अखेर पहाटे कधीतरी नृत्याविष्काराचा कार्यक्रम थांबला; पण खरी गंमत पुढं.. दुसर्‍या दिवशी सकाळी सातार्‍यात याची कुजबुज सुरू झाली. मध्यरात्री भर रस्त्यावर म्युझिक लावून अन् अंगावरचा शर्ट काढून नाचलेल्या या प्रसंगाचं वर्णन रंगवून एकमेकांना सांगितलं जाऊ लागलं. चौका-चौकातल्या टपर्‍यांवर रसभरीत चर्चा होऊ लागली.  बाहेरून आलेल्या एका नागरिकाच्या कानावर ही घटना कानावर पडली तेव्हा ( सातारकर नसल्याने) तो दचकला. ‘लोकप्रतिनिधीनं असं शर्ट काढून नाचावं का?’ 

- असा खोचक सवाल त्यानं करताच समोरचा एक सातारकर खाड्कन उत्तरला, ‘डोस्क्यावर पडलास काय भावा? शर्ट काढून नाचायलाबी लई डेरिंग लागतया. ते  तुमच्या-आमच्यासारख्या कॉमन पब्लिकचं काम नाय. ते राजे आहेत म्हणूनच असं करू शकतात!’

- म्हणजे असे अचाट प्रयोग केवळ राजेंनीच करावेत, ही सातारकरांची पक्की मानसिकता. पण किती म्हणून असले वेगळे प्रयोग करावेत राव ? त्याला काही लिमिट-बिमीट ?सातारकर महाराजांची गाडी दोनशेच्या स्पीडनं पळण्यासाठीच सातारा-पुणे हायवेचं सहापदरीकरण केलंय की काय, असा बाळबोध प्रश्न इथल्या लोकांना पडतो. पत्रकार परिषदेत दहा-बारा खुच्र्या एकावर एक रचून त्यावर बसणारे राजे एका ठिकाणी मात्र कधीच स्थिर नसतात. दोन-तीन कोटींच्या लक्झरी गाडीतून मध्येच अकस्मातपणे उतरून एखाद्या कॉलेजकुमाराची भंगार दुचाकी चालवत गावभर चक्कर मारणं, हे त्यांचं अत्यंत आवडीचं काम. बॉडीगार्ड पोलिसाचं रिव्हॉल्व्हर हातात घेऊन ‘जेम्स बाँड’ची स्टाइल मारणार्‍या या राजेंमुळं ‘खाकी वर्दी’ही कामाला लागते. ते नेमकं काय बोलतात, याचे शब्दही कधी-कधी नीट कळत नसले तरीही त्यांची डायलॉगबाजी ऐकण्यासाठी ‘यू-टय़ूब’वर लाखो यूजर्सच्या उडय़ा पडतात. पण असं असलं, तरी एरवी अत्यंत हाय लाइफ एन्जॉय करणारे हे राजे साधं व्हॉट्सअ‍ॅपही नसलेला इवलासा मोबाइल वापरतात. या अजब व्यक्तिमत्त्वाबद्दल महाराष्ट्राला विचित्र वाटत असलं तरी सातारकरांना मात्र यात काùùहीच विशेष वाटत नसतं. त्यांच्या दृष्टीनं ‘अहोùù राजे आहेत ते !’  

आपुलकी व्यक्त करण्यासाठी राजे लाडानं कार्यकत्र्याच्या गालाचा मुका घेतात,  त्याला म्हणे कौतुकानं ‘जादू की झप्पी’ म्हणतात, आता बोला. ‘कार्यकर्ता’ हा महाराजांचा अत्यंत आवडता छंद. त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार. काही वर्षापूर्वी ‘डीजे’वर बंदी आली तेव्हा गणेशोत्सव मिरवणुकीत पोलिसांना ओपन चॅलेंज देत त्यांनी या बंदीचे पुरते बारा वाजवले. सातार्‍यातील मिरवणुकीत घुसून त्यांनी स्वतर्‍च नाचायला सुरुवात केली, आणि मग डीजे मंडळी पार चेकाळली. खाकी बावचळली. कधी काळी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या कार्यकत्र्याला अटक करायलाही खाकी म्हणे धजावत नव्हती. आता काळ बदलला. ‘सातार्‍याचा बिहार होतोय की काय ?’ अशी आवई उठल्यानंतर कायद्याला स्वतर्‍च्या अस्तित्वाची जाणीव झाली.  मध्यंतरी, त्यांच्याविरोधात एका उद्योजकानं खंडणीचा गुन्हा दाखल केला, तेव्हा इथलं वातावरण भलतंच ढवळून निघालं.  खरंतर ‘कोर्ट मॅटर’ हा शब्द सातार्‍याच्या राजेंसाठी तसा नवा नाही. 1999 मध्येही शरद लेवे खून प्रकरणात ते अनेक महिने ‘आत’ राहून आलेले. नंतर न्यायालयातून निदरेष सुटल्यानंतर त्यांच्या जीवनात प्रचंड स्थित्यंतर घडलं. बहुतांश तज्ज्ञांचे राजकीय ठोकताळे चुकवत राजे दोन वेळा खासदार बनले. अख्ख्या देशभरात उसळलेल्या मोदी लाटेतही तब्बल पावणेपाच लाखांचं मताधिक्य घेऊन विजयी होणारा विरोधी खासदार, असा विक्रम राजांच्या नावावर नोंदला गेला. तेव्हापासून तर ते अधिकच आक्रमक होत गेले. खंडणीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यानंतरही हजारो कार्यकत्र्यासह शहरभर फेरफटका मारणारे हेच राजे होते. विशेष म्हणजे हा फेरफटकाही चक्क पोलीस बंदोबस्तात.

सातार्‍यात असताना अत्यंत ‘मनस्वी’रीत्या रात्रीच्या रस्त्यावर मनसोक्त भटकणारे हे राजे बाहेरच्या जगात मात्र अत्यंत वेगळेच असतात. पुण्यातलं त्यांचं ‘कौटुंबिक रूप’ शांत असतं तर ‘दिल्लीतला खासदार’ वेगळाच असतो. लोकसभेच्या अधिवेशनात कर्रùù कर्रùù आवाज करत त्यांचं कोल्हापुरी पायताण पद्धतशीरपणे सर्वाचं लक्ष वेधून घेतं. मात्र हेच राजे फडर्य़ाùù इंग्रजीत बोलत जेव्हा समोरच्यावर छाप टाकतात, तेव्हा त्यांचं खरं रूप शोधता-शोधता समोरचा पार भिरभिरलेला असतो. सातार्‍याच्या गल्लीत कोणत्याही शेंबडय़ा पोरासोबत बिनधास्त सेल्फी फोटो काढता-काढता रांगडय़ा सातारी भाषेत दमदाटी करणारे ‘राजे’ खरे की दिल्ली-मुंबईतील सेलिब्रिटीजच्या उच्च वतरुळात अत्यंत सॉफिस्टिकेटेड वावरणारे राजघराण्याचे पॉलिश्ड वारसदार खरे, हे आजपावेतो कुणालाच उमगलेलं नाही. 

नोटाबंदीनंतर मोदींची पहिली पावती कुणी फाडली असेल तर या राजेंनीच. ‘मोदी मोदी कोण होùùù मोदी पेढेवाले तर आमच्या सातार्‍यातही आहेत की,’ असं बोलून भाजपाची पुरती कळा खाणारे उदयनराजे चक्क आपल्याही पक्षाला सोडत नाहीत. शरद पवार असो की अजित पवार.. यांच्यावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीकाटिप्पणी करण्यासाठी मागं-पुढं बघत नाहीत.  एकीकडं ‘राष्ट्रवादी’ पक्षानं ‘भाजपा’च्या विरोधात ‘हल्लाबोल’चं रान उठविलं असताना, हे राजे आपल्या स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना एकत्र आणतात. हा चमत्कार केवळ राजेच घडवू शकत असले तरी त्यांच्या या सोहळ्याकडे त्यांचेच सहकारी आमदार उघड-उघड पाठ फिरवतात, हाही त्यांच्या राजनीतीचा पराभव मानला जातो. 

मात्र एक खरं! ‘आज याला संपवितो, उद्या त्याला सोडणार नाही,’ अशी नेहमीच भाषा करणार्‍या राजेंविरोधात चकार शब्द काढण्याची हिम्मतही इथले आमदार दाखवत नाहीत. यामागची खरी गोम वेगळीच. हे सारे आमदार पडले साखर कारखाने, बँक, सोसायटय़ा अन् दूध संघवाले. राजे मात्र पुरते मोकळे. त्यांच्यासारखी कॉलर उडवत गावभर फिरणारे त्यांचे तरुण फॅन सोडले तर एकही संस्था त्यांच्या नावावर नाही. राजेंना कशाचंच काय सोयरसुतक नाही. संस्थांच्या नुकसानीची भीती फक्तआमदारांना. त्यामुळेच राजेंची आक्रमकता वरचेवर प्रचंड वाढतच चाललीय. 

राजेंच्या अशा वागण्यानं सर्वसामान्य नागरिक बुचकळ्यात पडतोय,  त्याचं काय?‘राजे मनस्वी आहेत, सनकी आहेत,’ असं जग समजत असलं तरी ‘ते राजकारणात खूप मुत्सद्दी अन् धोरणी आहेत,’ असा ठाम विश्वास त्यांच्या जवळच्यांना वाटतो. मात्र ते नेमकं असं का वागतात, हे गूढ अद्याप कुणालाच उलगडलेलंच नाही. कारण ते ‘अनुभवी नेते’ आहेत की ‘मुरलेले अभिनेते’, याचा शोध घेण्यात त्यांच्या विरोधकांसह त्यांचे सहकारीही दंग आहेत.

 

‘होय, मी गुंडगिरी करतो; पण...

‘महाराज’ हा सातार्‍याचा परवलीचा शब्द. केवळ या शब्दावर अनेकांची कामं होतात. ‘वाडय़ावर जाऊ का?’ असा सवाल करताच आपले कधीकाळी बुडालेले पैसे क्षणार्धात वसूल होतात, या चमत्काराची अनुभूतीही आजवर अनेकांनी घेतलेली. म्हणूनच आजही आपले वैयक्तिक अन् कौटुंबिक हेवेदावे सोडविण्यासाठी जिल्ह्यातील मंडळी त्यांच्याच राजवाडय़ाची वाट धरतात. या वाडय़ावर जणू राजदरबार भरतो. दरबारात झालेला निर्णय दोन्ही बाजूंना मान्य करावा लागतो. कायद्यालाही सोडविता न येणारे बरेच प्रॉब्लेम या दरबारात परस्पर सोडवले जात असले तरी ‘महाराज’ या शब्दावर आजपावेतो अनेक जण म्हणे गबर गंड बनलेत!  ‘होयùù मी गुंडगिरी करतो. पण सर्वसामान्य जनतेसाठी !’ असं कॉलर उडवून छातीठोकपणे हेच उदयनराजे सांगतात, तेव्हा सार्‍यांचीच बोलती बंद होते. असं स्वतर्‍हून जाहीर कबूल करणारा नेता देशाच्या लोकशाहीनं कदाचित प्रथमच बघितला असावा.

म्हाराजांना सांगू काय..?

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातली ‘राजेशाही’ नष्ट झाली असली तरी आपलं ऐतिहासिक ‘राजेपण’ जपण्यात सातार्‍याचं श्रीमंत छत्रपती भोसले घराणे आजपावेतो यशस्वी ठरलंय. कैक एकर परिसरात पसरलेल्या त्यांच्या ‘जलमंदिर’ वाडय़ासमोर जेव्हा कार्यकत्र्याचा राबता सुरू होतो, तेव्हा सातारकर ओळखतात की ‘उदयनराजे आले.’ पूर्णपणे समोर वाकून या श्रीमंत छत्रपतींना मानाचा मुजरा करायला आजही त्यांचे कार्यकर्ते तयार असतात. त्यांच्या नावाची नंबर प्लेट बनविणं, ही तर इथल्या शेकडो दुचाकीस्वारांची खासियतच. आता यामुळं वाहतूक पोलिसांचा ससेमिरा चुकतो, हा भाग वेगळा. मात्र, केवळ शंभर रुपयांच्या दंडासाठी ‘महाराजांना सांगू का?’ म्हणत उगाचंच मोबाइल कानाला लावणारी अन् मिसरूडही न फुटलेली कोवळी पोरं सुका दम देतात, तेव्हा बिच्चार्‍या पोलीसदादालाही कळत नाही. हसावं की रडावं ?

(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.) 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले