‘मेक इन इंडिया’ची संकल्पना आणि भविष्यातील
प्रवासाबद्दल अमेरिकेतील ज्येष्ठ उद्योजक
प्रकाश भालेराव यांच्याशी संवाद.
भांडवलाच्या ओघापेक्षाही मला महत्त्वाची वाटते ती जगभरात ठळक होत असलेली भारताची ‘प्रतिमा’. या देशाबद्दल जगभरच्या औद्योगिक वतरुळामध्ये आजवर आकर्षण होते ते सशक्त बाजारपेठ म्हणून.पण आज भारत हे एक ‘डेस्टिनेशन’ ठरते आहे.
भांडवलाबरोबरच परदेशी प्रतिभा आणि प्र™ोलाही भारताकडे वळावेसे वाटणो, ही मोठी गोष्ट आहे.
‘मेक इन इंडिया’ सप्ताहातून परतताना साधलेला हा संवाद.
भारतीय अर्थकारण परिवर्तनाच्या उंबरठय़ावर उभे आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे उद्योग आणि अर्थकारणाची चर्चा सर्वसामान्यांर्पयत पोचल्याचे दिसते आहे. या वातावरणाचे विश्लेषण आपण कसे कराल?
- मला वाटते की स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांमध्ये औद्योगिक स्तरावर प्रथमच एक मोठी संधी भारतासमोर उभी आहे. फार लांब जायला नको. गेल्या तीन वर्षापूर्वीची तुलना केली तरी वर्तमानातले बदल ठळक दिसतात. हा बदल केवळ भारतातल्या औद्योगिक वातावरणाबाबतच्या जाणिवेत नाही, तर भारतात झालेल्या परदेशी गुंतवणुकीच्या आकडय़ांमध्येही तो दिसेल. गेल्या पावणोदोन वर्षात भारतात येणा:या थेट परदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्याचे दिसते. भांडवलाच्या ओघापेक्षाही मला महत्त्वाची वाटते ती जगभरात प्रदर्शित होत असलेली भारताची ‘प्रतिमा’. या देशाबद्दल जगभरच्या औद्योगिक वतरुळामध्ये आजवर आकर्षण होते ते सशक्त बाजारपेठ म्हणून. पण आज भारत हे एक ‘डेस्टिनेशन’ ठरते आहे. भांडवलाबरोबरच परदेशी प्रतिभा आणि प्र™ोलाही भारताकडे वळावेसे वाटणो, ही मोठी गोष्ट आहे.
देशासमोर एक मोठी संधी आहे, हे निश्चित. या संधीचे विश्लेषण केवळ राजकीय अंगाने करणो चूक ठरेल. भारतातील तरुण आणि कुशल मनुष्यबळाचे प्रमाण, इंग्रजी भाषेची जाण, आजच्या घडीला अनेक क्षेत्रंचा कणा असलेल्या माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रत भारतीयांचा ठसा आणि आता स्थिर सरकार या संपूर्ण परिप्रेक्ष्यातून याकडे पाहावे लागेल. हे सर्व घटक लक्षात घेता केवळ देशाच्या अर्थकारणाचा नव्हे, तर आगामी दशकात संपूर्ण देशाचा कायाकल्प करेल अशा संधी आपल्यासमोर उभ्या आहेत.
नेमक्या याच काळात भारतीयांच्या कौशल्याची छाप जागतिक अर्थकारणावर अधिक ठळक व्हावी, हा आणखी एक विशेष योग. गूगल, मायक्रोसॉफ्ट, पेप्सी अशा अनेक बलाढय़ कंपन्यांतील भारतीयांच्या प्रभावी आणि यशस्वी नेतृत्वाने भारताविषयीच्या जागतिक जाणिवेला नवे बळ दिले आहे. 196क्, 197क्, 198क्, 199क् च्या दशकांतही भारतीयांचा असाच दबदबा होता. पण तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीतील फरक असा की, तेव्हा भारतीयांची ओळख उत्तम इंजिनियर म्हणून होती, तर आता त्यांची ओळख ‘उत्तम बिझनेस लीडर’ म्हणून ठळक होते आहे.
अनिवासी भारतीय उद्योजक म्हणून ‘मेक इन इंडिया’ मिशनविषयीचे आपले विश्लेषण काय? आकर्षक शब्दच्छलाने केलेली ही केवळ एक घोषणा ठरेल की त्याचे उद्दिष्ट प्रत्यक्षात येईल?
- मेक इन इंडिया मिशन हे विचार आणि आराखडा म्हणून दमदारच आहे. मात्र ते प्रत्यक्षात कसे आकार घेते हे पाहणो महत्त्वाचे ठरेल. मेक इन इंडियाचा प्रवास आकर्षक खरा, पण सोपा नाही. पूर्वी भारतात कंपनी स्थापन करायची असेल तर ते मोठे दिव्य असे. आता तशी स्थिती राहिलेली नाही. व्यवस्थेत आणि यंत्रणोत अनेक बदल होत आता ‘सिंगल विण्डो’ प्रणालीर्पयत आपण येऊन ठेपलो आहोत. पण हे पुरेसे नाही. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रत्यक्ष उद्योगांना भेडसावणा:या अडचणी, आव्हाने, समस्या यांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने सरकारी पातळीवरून सहकार्य मिळणो गरजेचे आहे. उदाहरणार्थ स्टार्टअप्स. भारतीय स्टार्टअप कंपन्या सध्या जोमाने व्यवसाय करताना दिसत आहेत. पण प्रारंभीच्या अडचणीतून मार्ग काढत त्यांच्या महसूल प्राप्तीला सुरुवात होते न होते तोच करविषयक सरकारी यंत्रणा वसुलीसाठी या उद्योगांच्या दारात उभ्या राहतात. स्टार्टअप उद्योगांना बळकटी द्यायची असेल तर सध्याच्या व्यवस्थांचा पुनर्विचार, पुनर्आखणी करणो गरजेचे आहे. या धोरण लवचिकतेबद्दल दीर्घकाळ चर्चा सुरू असूनही प्रत्यक्षातल्या बदलांना अजून म्हणावा तसा वेग आलेला नाही.
स्टार्टअप्स हा सध्या परवलीचा शब्द आहे. अमेरिकेतील आघाडीचे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट म्हणून आपण अशा कंपन्यांबरोबर दीर्घकाळ काम केलेले आहे. भारतीय स्टार्टअप्स उद्योगांबद्दल आपले काय निरीक्षण आहे?
- बाजारपेठेत मागणी असू शकेल/ निर्माण होऊ शकेल अशा लहान-मोठय़ा संकल्पना प्रत्यक्षात आणून त्याचे उद्योगात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे स्टार्टअप्स. मेक इन इंडिया मिशनला बळकटी देईल, पूरक ठरू शकेल अशी ही स्टार्टअप्सची संकल्पना आहे. छोटय़ा प्रमाणात अगदी 5, 1क्, 15 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यापासून मोठी ङोप घेईर्पयतचा आवाका या कंपन्यांमध्ये असू शकतो. पण स्टार्टअप्सच्या जगताचा आढावा घेतला तर 1क् पैकी 8 स्टार्टअप्स हे काही ठरावीक काळाने बंद पडतात किंवा तग धरू शकत नाहीत हे वास्तव आहे. आठ स्टार्टअप्स बंद झाल्यानंतर नववा स्टार्टअप यशस्वी झालेला दिसतो, तर दहावा स्टार्टअप घवघवीत यश संपादित करताना दिसतो. त्यामुळे स्टार्टअप उद्योग, त्याचे स्वरूप, त्याची क्षमता आणि तो फुलविण्यासाठी सरकारी पातळीवरून आवश्यक असे सिंचन होणो अतिशय महत्त्वाचे आहे. भारतातील तरुण मनुष्यबळाची मोठी संख्या आणि नव्या-बदलत्या वातावरणात उद्योजकतेबाबत त्यांच्या मनाशी आलेला निर्भिडपणा यामुळे भारतीय स्टार्टअप्स निश्चितच भारतीय अर्थकारणातील एक महत्त्वाचा घटक ठरेल.
अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक आणि भारतात भांडवली गुंतवणूक असलेले अनिवासी भारतीय म्हणूनही भारतातील औद्योगिक वातावरण
आणि येथील निर्णयप्रक्रियेशी आपण दीर्घकाळ संबंधित आहात. देशात राजकीय स्थित्यंतर झाल्यानंतर राजकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्या दृष्टिकोनात काही बदल झाल्याचे जाणवते का?
- निश्चित आणि जाणवण्याइतपत बदल दिसतो, तो दोन स्तरांवरचा आहे. भारतीयांबद्दल जगातील अनेक देशांमध्ये निर्माण झालेल्या ‘स्वारस्या’ची पुरेपूर जाण पंतप्रधान मोदी यांना आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने जागतिक व्यासपीठांवर भारताची यथोचित मांडणी ते करताना दिसतात. मोदी यांच्या परदेशी दौ:यांबद्दल भारतात होणारी टीका मी जाणून आहे. मला त्यातील राजकारणात स्वारस्य नाही. पण एक अनिवासी भारतीय म्हणून मी माङो चिंतन सांगतो. मोदी यांनी भारत, भारतीय लोकांच्या क्षमता, भारतीय अर्थकारणात असलेली ताकद याची मांडणी प्रमुख देशांतून सातत्याने केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असलेल्या अनेक देशांतील राष्ट्रप्रमुखांशी ते व्यक्तिगत संपर्क वाढविताना दिसतात. दोन देशातील आर्थिक संबंध सुदृढ होण्यासाठी या रणनीतीचा निश्चितच फायदा होतो. गेल्या काही महिन्यांत भारतात वाढलेली थेट परदेशी गुंतवणूक हा याच प्रयत्नांचा परिपाक आहे असे मला वाटते. दुसरा आणि अधिक स्वागतार्ह बदल आहे, तो सातत्याने टीकेची धनी ठरणा:या भारतीय नोकरशाहीमध्ये! अनेक भारतीय शिष्टमंडळे जेव्हा परदेशी येतात तेव्हा त्यांच्या बैठका आणि अन्य समारंभात मी सक्रियतेने वावरलेलो आहे. पण कालौघात खूप मोठा फरक जाणवतो. आधी येणा:या शिष्टमंडळातील नेत्यांना, नोकरशहांना त्यांच्या कामाची व्याप्ती जाणवत नसे. आव्हाने काय आहेत याचा उलगडा नसे आणि अभ्यासाच्या पातळीवर अनेकदा आनंदच असे. आता मात्र हे चित्र झपाटय़ाने बदलताना दिसते आहे. उदाहरणाने सांगायचे तर अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सिलिकॉन व्हॅलीमध्ये येऊन गेले. पूर्वी अशा बैठकांमध्ये समोरचे लोक बोलायचे आणि आपले लोक ऐकत राहायचे. पण फडणवीसांच्या बैठका वेगळ्या होत्या. या बैठकांचे स्वरूप चर्चात्मक होते. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला त्यांच्या विषयाची नेमकी माहिती होती आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने सखोल प्रश्नांची विचारणा होताना दिसली. हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे.
जागतिक अर्थकारणाला दिशा देणा:या अमेरिकेसारख्या देशात आपले वास्तव्य आहे. तेथून भारतीय अर्थकारणातील हे बदल कसे दिसतात?
- एकच अनुभव सांगतो. माङया अमेरिकेतील ऑफिसमध्ये अनेक देशातील लोक काम करतात. एकदा एका मिटिंगदरम्यान सहज मी त्यांना विचारले, तुमच्या दृष्टीने जगातील प्रभावशाली अशा पाच प्रमुख नेत्यांची नावे सांगा. स्वाभाविक पहिले नाव बराक ओबामा यांचे आले. मग रशियाचे पुतीन आणि चिनी राष्ट्रप्रमुखांचे नाव आले. पण सर्वाच्याच यादीतले चौथे नाव भारताच्या पंतप्रधानांचे होते. माङया ज्या तरुण सहका:यांनी मोदी यांचे नाव घेतले त्यापैकी अनेकजण अमेरिकेत पहिल्यांदाच आलेले आहेत आणि त्यांचा भारताशी काहीही संबंध नाही. पण भारतीय बाजारपेठ-अर्थकारणातील क्षमता, आणि ती जोखून या ‘नव्या’ भारताला जगात सर्वदूर पोहोचविण्याचा मोदी यांचा प्रयत्न यामुळे भारतीयांबद्दल जगात निर्माण झालेल्या नव्या प्रतिमेचाच हा पुरावा होता. आपण भारताचे ब्रॅण्डिंग म्हणतो, ते हेच! भारतातील तरुण लोकसंख्येमुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे, हे आपण सारेच जाणतो. भारतीय लोकसंख्येत 54 टक्के लोक हे सरासरी वयाच्या तिशीमध्ये आहेत. तिशीतील या पिढीचा उद्योगव्यवसाय, वाढते उत्पन्न आणि त्यांची क्रयशक्ती यामुळे जगातील एक विशाल ‘बाजारपेठ’ म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. या तुलनेत अमेरिका, युरोप, चीन आदि महासत्तांमधील लोकसंख्येचा पॅटर्न हा बाजारपेठेच्या दृष्टीने नकारात्मक आहे. अर्थात, तेथील सरासरी लोकसंख्या ही तरुण नसल्याने बाजारपेठेच्या दृष्टीने त्या नकारात्मक आहे.
भारताचे सामथ्र्य ठरू शकणारे हे मनुष्यबळ वर्तमानाच्या कौशल्य-कसोटीवर उतरण्यास पात्र आहे का, याबद्दल अनेक तज्ज्ञांच्या मनात चिंता आहे. भारतीय विद्यापीठांमधील शिक्षण आणि उद्योगक्षेत्रच्या वेगाने बदलत्या गरजा यामध्ये मोठे अंतर पडल्याचे दिसते, आपल्याला काय वाटते?
- खरे आहे. मी माङो शिक्षण संपवून अमेरिकेत गेलो तेव्हा भारतीय शिक्षण व्यवस्था आणि भारतीय उद्योगात असलेली दरी आजही कायम आहे. ही दरी मिटवत देशाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी एक नवी सुदृढ ‘इको-सिस्टीम’ तयार होणो नितांत गरजेचे आहे. विद्यापीठ आणि उद्योग यांनी सोबत राहणो किती गरजेचे आहे किंवा तसे सोबत राहिल्यास काय आविष्कार घडू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिलिकॉन व्हॅली. आज जी सिलिकॉन व्हॅली दिसते तशी 195क् च्या दशकात नव्हती. विविध क्षेत्रतले कारखाने, संरक्षण क्षेत्रतील काही कारखाने यांनी ती व्यापली होती. मात्र या उद्योगाला आवश्यक असे कुशल मनुष्यबळ मिळत नव्हते. उद्योगाच्या गरजा समजावून घेत त्यानुसार शिक्षण देणारी व्यवस्था यांच्यात प्रचंड तफावत होती. अगदी स्टॅनफोर्डसारख्या मोठय़ा विद्यापीठातूनही उद्योगांच्या गरजा लक्षात घेत शिक्षण दिले जात नव्हते. कालांतराने ही दरी वाढली आणि काहीतरी गणित चुकत असल्याचे या दोन्ही घटकांच्या लक्षात आले. मग त्यानुसार चिंतन करत आणि आगामी काळातील गरजा व अर्थकारणाचा विचार करत या दोन्ही घटकांनी एकमेकांना विश्वासात घेत एकमेकांसाठी पूरक असा व्यवस्थात्मक बदल केला. या बदलाचा मूर्त आविष्कार आपण सिलिकॉन व्हॅलीच्या रूपाने पाहत आहोत.
‘चलता है’ आणि ‘जुगाड’ हा भारतीयांचा स्थायिभाव असल्याचे बोलले जाते, आपण कसे पाहता?
- अगदी खरे आहे. मात्र या दोन्ही घटकांकडे मी सरसकट बघत नाही. त्यात थोडा फरक आहे असे मला वाटते. पहिला मुद्दा ‘चलता है’ या वृत्तीचा. या वृत्तीने आपल्याला आजवर निश्चित फटका बसलेला आहे. आणि आता ते परवडणारे नाही. जागतिक स्पर्धेत एक सक्षम देश म्हणून उतरताना आपल्याला आपले स्थान जर अधोरेखित करायचे असेल तर या वृत्तीचा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे. ओरिजनल थिंकिंगपासून ते उत्पादनाच्या दज्रेदार मांडणीसाठी ‘चलता है’ ही वृत्ती आपल्या मनातून आणि व्यवस्थेतून डिलिट करावी लागणार आहे. दुसरा मुद्दा ‘जुगाड’चा. गडबड घोटाळा करण्याचा जुगाड आणि एखाद्या आव्हानाची सोडवणूक सजर्नशील आणि अभिनवपणो करण्याकरिता अवलंबलेला मार्ग म्हणजे जुगाड.. यातला सूक्ष्म भेद समजून घ्यायला हवा. दुस:या पद्धतीने काही नवा पर्याय, नवी संकल्पना, नवे समीकरण साधले जात असेल ते निश्चित विचारात घ्यायला हवे. अशा चाकोरीबाहेरच्या विचारातून जन्मलेल्या अभिनव संकल्पनांमुळेच अनेक आविष्कार जन्माला येतात. ‘जुगाड’ म्हणून सरसकट त्याची हेटाळणी करणो योग्य नव्हे.
‘ब्रॅण्ड इंडिया’ ही संकल्पना केवळ झगमगत्या समारंभांमध्येच लखलखेल की प्रत्यक्षात उतरेल?
- ही संकल्पना केवळ प्रत्यक्षात उतरेल असे नव्हे, तर ‘ब्रॅण्ड इंडिया’ जगात चकाकेल. भारताला असलेले बाजारपेठीय मूल्य लक्षात घेता भारत ही जगाची गरज बनणार आहे. या देशातले वर्तमान बदल पाहता विकासाची प्रक्रिया वेग धरेल यात शंका नाही. ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आर्थिक सुधारणांची मोठी आवश्यकता आहे. राजकीय किंवा अन्य कारणाच्या फे:यात सध्या सुधारणा अडकलेल्या दिसतात. त्या प्रत्यक्षात आल्या तर वारे बदलेल आणि ब्रॅण्ड इंडिया जगावर अधिराज्य गाजवताना दिसेल. अमेरिका, युरोप, चीन हा जागतिक महाशक्तींचा क्रमही बदलेल आणि चीनची जागा भारत घेईल, याबद्दल माङया मनात शंका नाही.
मुलाखत : मनोज गडनीस