शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

दुभंग

By admin | Published: June 10, 2016 5:18 PM

मूळ प्रवाहापासून अलग होऊन आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखणे आणि सतत सत्तावतरुळात राहणे प्रामुख्याने जमले ते दोघांनाच. शरद पवार आणि ममता बॅनर्जी

दिनकर रायकर

(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)
 
सत्तरच्या दशकात काँग्रेसच्या प्रवाहाला एक वेगळे वळण मिळाले. मूळ कॉँग्रेसपासून काही प्रवाह  वेगळे झाले आणि त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग धरला. अधूनमधून काही छोटे मोठे ओहोळ  आपला वेगळा मार्ग शोधत होते, पण काही काळात  लुप्तदेखील होऊन जात होते. मूळ प्रवाहापासून अलग होऊन  आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखणे आणि  सतत सत्तावतरुळात राहणे  प्रामुख्याने जमले ते दोघांनाच. शरद पवार आणि ममता बॅनर्जी. त्याआधी कोणालाच ते शक्य झाले नाही.
अर्थात त्यामागेही काही कारणे आहेत..
 
राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्त्येनंतर प्रथमच पी. व्ही. नरसिंहराव यांच्या रूपाने नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेरील व्यक्तीला देशाचे आणि काँग्रेस सरकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. काँग्रेस पक्षाच्या परंपरेनुसार राव यांच्याचकडे पक्षाचे अध्यक्षपद असल्याने नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला नाही. पण राव सरकार जाऊन अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकार सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. सोनिया गांधी यांचे मूळ परदेशी असल्याने त्यांनी पक्षाचे नेतृत्व करू नये अशी नि:संदिग्ध भूमिका शरद पवारांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेला तारिक अन्वर आणि पूर्णो संगमा यांनीही उघड समर्थन दिल्याने पक्षाने या तिघांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली. परिणामी 1999 च्या मे महिन्यात पवारांनी काँग्रेसला दुसरा मोठा दणका देत राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली.
 
काँग्रेस ही वाहती गंगा आहे’ हे वाक्य आजवर अनेकदा अनेक काँग्रेसजनांनी उच्चरले आहे. गंगा वाहत असताना ज्याप्रमाणे तिला वाटेत अनेक उपनद्या आणि छोटेमोठे ओढे येऊन मिळतात तसेच काँग्रेसच्या बाबतीतही अनेक वर्षे होत आले. पण सत्तरच्या दशकात काँग्रेसच्या प्रवाहाला एक वेगळे वळण मिळाले. मूळ गंगेपासून तिचे काही प्रवाह वेगळे व्हावेत आणि त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग धरावा असाच काहीसा प्रकार या दशकात झाला. किंबहुना अधूनमधून असे काही वेगळे प्रवाह वेगळ्या वाटेने जाण्याचा पायंडा या दशकात पडला. मध्य प्रदेशातील आणि आताच्या छत्तीसगड राज्यातील काँग्रेसचे जुने नेते अजित जोगी यांनी काँग्रेसच्या प्रवाहापासून अलग होण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे तो या प्रवाहबदलाच्या पायंडय़ातील अगदी अलीकडचा दाखला.
काँग्रेस पक्षाकडून जोगी यांना जे काही देता येण्यासारखे होते ते सारे अगोदरच देऊन झाले होते. परंतु छत्तीसगड विधानसभेच्या एका पोटनिवडणुकीच्या वेळी स्वत: अजित जोगी जरी नाही तरी त्यांच्या पुत्राने काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेऊन भाजपाला मदत केली आणि कुठेतरी जोगी यांनी आपणहून आपल्या वाटेत काटे पेरून घेतले. पण तरीही जोगी यांनी घेतलेली भूमिका जगावेगळी, आश्चर्यकारक वा धक्कादायक आहे असे म्हणता येत नाही.
1969 पूर्वीपर्यंत स्थिती तशी नव्हती. काँग्रेसपासून अलग होण्याचा विचारदेखील कोणी करू धजावत नव्हते. पण त्याचवर्षी अशी काही परिस्थिती निर्माण झाली की पक्षापासून एखादा प्रवाह अलग होण्याचे तर राहोच, पण या गंगेसमान विशाल पात्रतच उभी फूट पडली. त्याला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निमित्त घडले. काँग्रेस पक्षाने नीलम संजीव रेड्डी यांना या पदासाठीचे उमेदवार म्हणून घोषित केले, पण श्रीमती इंदिरा गांधी यांच्या मनात वराहगिरी व्यंकटगिरी यांचे नाव होते. इंदिरा गांधींनी सर्व काँग्रेसजनांना उद्देशून ‘सद्सद्विवेकबुद्धी’ने मतदान करण्याचे आवाहन केले आणि गिरी राष्ट्रपती बनले व या घटनेतच पक्षाच्या फुटीचे बीजही पडले.
पक्षातील तेव्हाचे वयोवृद्ध नेते एकीकडे आणि इंदिरा गांधींचे नेतृत्व मान्य करणारा तरुणांचा वर्ग दुसरीकडे असा दुभंग निर्माण झाला. इंदिरा गांधींच्या समर्थकांनी काँग्रेस (इं) या नावाने वेगळे अस्तित्व निर्माण केले, तर जे फुटीला अनुकूल नव्हते त्यांच्या पक्षाला काँग्रेस (ओ) असे नाव मिळाले. या नावातील ‘ओ’ म्हणजे ऑर्गनायङोशन,  पण लोक सर्रास ‘ओल्ड’ म्हणजे म्हाता-याकोता:यांचा पक्ष म्हणून त्यास संबोधू लागले. इंदिरा गांधींच्या अत्यंत आक्रमक आणि खरे तर लोकाभिमुख व लोकानुनयी राजकारणामुळे काँग्रेस (इं) म्हणजे इंदिरा काँग्रेस सर्वव्यापी, तर संघटन काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस नाजूक बनत गेली. कालांतराने ती अध्यक्षांच्या नावाने म्हणजे कधी रेड्डी, कधी स्वर्णसिंग, तर कधी अर्स काँग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. याच सुमारास इंदिरा गांधी आणि त्यांची काँग्रेस सर्वशक्तिमान होत गेले.
काँग्रेसमधील या फुटीला आजच्या परिभाषेत ‘ट्रेण्ड सेटर’ असेही म्हणता येईल. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर काँग्रेसला ख-या अर्थाने दणका दिला तो शरद पवारांनी आणि तोदेखील एकदा नव्हे, दोनदा. देशातील अंतर्गत आणीबाणीनंतर सत्तेत आलेल्या जनता सरकारच्या चिरफळ्या उडाल्यावर देशात पुन्हा एकदा इंदिरा काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल सुरू झाला. 1978 साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अशा दोन काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या. विधानसभा अधांतरी झाली. म्हणून काँग्रेसचे हे दोन प्रवाह सत्तेसाठी एकत्र आले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री, तर इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री. पण हे सरकार शरद पवारांनी पाडले. आपला गट सोबत घेऊन त्यांनी समांतर काँग्रेस काढली आणि भाजपा, जनता दल आदिंना सोबत घेऊन पुरोगामी लोकशाही आघाडीची स्थापना केली व सत्तादेखील हस्तगत केली. देशातील हा एक पूर्णपणो वेगळा आणि अनोखा प्रयोग होता. पण पवारांचे हे सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले आणि 1980 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याची सत्ता स्वबळावर हस्तगत केली. नंतरची 1985 ची निवडणूक पवारांनी समाजवादी काँग्रेसच्या नावाने आणि पुलोद प्रयोगात जोडलेल्या मित्रंना सोबत घेऊन लढविली पण सत्ता त्यांच्यापासून दूरच राहिली. या निवडणुकीच्या आधी श्रीमती इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्त्या होऊन राजीव गांधी विक्रमी मताधिक्य प्राप्त करून देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यांचे नेतृत्व मान्य करून  पवार स्वगृही परतले. 
या सर्व घटना घडत असताना अधूनमधून काही छोटे मोठे ओहोळ आपला वेगळा मार्ग शोधत होते, पण काही काळात लुप्तदेखील होऊन जात होते. काँग्रेस फॉर डेमॉक्रसी किंवा शंकरराव चव्हाणांनी स्थापन केलेली महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस आदिंचा त्यात समावेश. इंदिरा गांधींचे एक निकटवर्ती आणि पक्षात मोठे वजन बाळगून असलेले जी. के. मूपनार यांनीही वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. पी. चिदम्बरम हे मूपनार यांच्या तमिळ मनिला काँग्रेसचे (टीएमसी) एक मातब्बर नेते. पण आज या पक्षाचे नावही निघत नाही. 
2004 मध्ये झालेल्या निवडणुकीने जरी त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आणली तरी काँग्रेस हाच लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. परिणामी सरकार स्थापन करण्याची संधी काँग्रेसलाच मिळणार हे उघड झाले. पण सरकार स्थापन करण्यासाठी समविचारी म्हणजे भाजपा विरोधी पक्षांची गरज होती. सोनिया गांधी यांनी स्वत: पंतप्रधान न होता डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपद देऊ केले आणि मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी मित्रंची काँग्रेसची गरज भागविली व सरकारमध्ये सामील होण्याचाही निर्णय घेतला. तथापि, मूळ काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केवळ देशाच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सत्तेतही पवार सहभागी झाले आणि दशकभर त्यांनी या सत्तेचा उपभोग घेतला पण आपली वेगळी चूल मात्र आजही मोडलेली नाही. 
काँग्रेसच्या मूळ प्रवाहापासून अलग होऊन आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखणो आणि सतत सत्तावतरुळात किंवा त्याच्या परिघात राहणो हे जसे पवारांना जमले तसे ते आणखीही एका व्यक्तीने करून दाखविले आणि ती व्यक्ती म्हणजे ममता बॅनर्जी. काँग्रेसपासून फारकत घेऊन त्यांनी त्यांच्या राज्यात म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची (पुन्हा टीएमसी) स्थापना केली आणि डाव्यांची वर्षानुवर्षाची मक्तेदारी आणि मिरासदारी मोडीत काढून पाच वर्षापूर्वी स्वबळावर त्या राज्याची सत्ता काबीज केली. अगदी अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने डाव्या पक्षांना सोबत घेऊन ममतांच्या पुढय़ात आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण हे आव्हान परतवून लावत त्यांनी त्या राज्याची सूत्रे आपल्याच हाती कायम ठेवली. अर्थात पवार आणि ममता यांना जे साध्य करता आले ते त्यांच्या आधीच्या कोणालाही साध्य करता आले नाही हा जरी इतिहास असला तरी त्यामागेही एक कारण आहे.
जोवर इंदिरा गांधी केवळ पक्षाच्याच नव्हे तर सरकारच्याही केन्द्रस्थानी होत्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे देशातील जनतेचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते, तोवर त्यांच्या पुढय़ात अन्य कोणी पाय रोवून उभा राहील ही शक्यताच नव्हती. आज तशी स्थिती नाही. निवडणुकांमधील जय-पराजयाचा यात संबंध नाही. 1977 साली देशातील जनतेने इंदिरा गांधींचे केवळ सरकारच नव्हे, तर व्यक्तिश: त्यांनाही पराभूत केले होते. पण या पराभवातून पुन्हा उसळी मारण्याची जी विजुगिषी वृत्ती त्यांच्यात होती तिचाच आज काँग्रेसमध्ये पूर्ण अभाव दिसून येतो आहे.