शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

असा करावा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:11 PM

अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास का करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ...

अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास का करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चांगले करिअर करण्यासाठी आणि स्वत:च्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर कशाची गरज असेल, तर ती म्हणजे अभ्यासाची. हे एकदा समजले, की अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर समजायला मदत होते. सर्व शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय ठेवावे, त्यातून इच्छाशक्ती निर्माण होते. इच्छाशक्तीतून एकाग्रता वाढते. एकाग्रतेतून अभ्यास करण्याची क्षमता वाढते. क्षमतेतून आत्मविश्वास वाढतो. डोळ्यासमोर कायम मोठे ध्येय असेल, तरच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात. मूळ उद्देशापासून कधीच विद्यार्थ्यांनी भटकू नये, अभ्यास करून चांगले करिअर करणे हाच विद्यार्थ्यांचा मूळ उद्देश आहे आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही, हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे, विद्यार्थ्यांनी एकूण उपलब्ध असलेला वेळ व एकूण करावयाचा अभ्यास याचे व्यवस्थित नियोजन करावे, परीक्षेची अंदाजे तारीख लक्षात घेऊन आजपासून त्या तारखेपर्यंत प्रत्येक दिवसाचे नियोजन करावे, शाळेच्या दिवशी कमीत कमी ३ ते ४ तास अभ्यास तर पूर्ण सुटीच्या दिवशी कमीत कमी १४ तास अभ्यास सहज करता येतो.अभ्यासाला बसल्यावर सलग दोन ते तीन तास जागेवरून उठू नये, अभ्यास शांत ठिकाणी करावा, विद्यार्थ्यांनी झोप सात ते आठ तास घ्यावी, सोप्या विषयांना दोन वेळेस तर कठीण विषयांना तीन वेळेस रिव्हिझन होईल, असा अभ्यासाचा टाइमटेबल बनवावा, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना त्या विषयांच्या कमीत कमी मागील पाच प्रश्नपत्रिका बघाव्यात म्हणजे अभ्यासाला योग्य दिशा मिळते. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषय शाळेतच, कोचिंग क्लासमध्ये शिक्षकांच्या तासिकेतच लक्ष देऊन समजून घ्यावेत म्हणजे घरी करावयाचा अभ्यास सोपा होऊन जातो. शाळेत होणाऱ्या घटक चाचण्याही विद्यार्थ्यांनी नियमित आणि अभ्यास करून देत राहाव्यात, अभ्यासातील अडथळे समजल्या जाणारे मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट टाइमपास करणारे मित्र इत्यादी सर्वांपासून विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या दूर राहावे, हेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा अतिशय अमूल्य असा वेळ वाया घालत आहेत.सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:ला समजेल अशा भाषेमध्ये स्वत:च्या नोट्स काढाव्यात, या नोट्स काढण्यासाठी तीन ते चार पुस्तकांचा प्रथम चांगला अभ्यास करावा व नंतर त्या नोट्समधून शेवटपर्यंत अभ्यास करत राहावा, सर्व महत्त्वाचे सूत्र, आकृत्या, समीकरण इत्यादींचा एक संच बनवून कायम स्वत:जवळ ठेवावा, तो आयुष्यभर कामात येतो. विद्यार्थ्यांनी संतुलित आहार घ्यावा, स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. स्वत:च्या जीवनातील समस्या, घरातील वाद, आर्थिक समस्या, आजारपण इत्यादींचा आपल्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, अशी सकारात्मक मन:स्थिती बनवावी, परीक्षेत किंवा जीवनात कुठेही अपयश आले, तर विद्यार्थ्याने खचून जाऊ नये, अपयशाची खरी कारणं शोधावी, पुन्हा नियोजन करावे, स्वत:च्या चुकीतून धडा घेऊन पुन्हा जिद्दीने कामाला लागावे. सरावाने आणि अभ्यासाने अतिशय साधारण विद्यार्थीसुद्धा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकतो आणि जीवनात प्रगती करू शकतो. अभ्यास जर चांगला झाला असेल, तर परीक्षेची भीती मुळीच वाटत नाही. अभ्यासातून यश मिळाले तर तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो व त्या आत्मविश्वासातून पुढचे यश प्राप्त होते. ही यशाची मालिका आजच सुरू करा, आजच्या स्पर्धेच्या युगात एक जरी वर्ष वाया गेले तर तुमच्या क्षेत्रातील लाखो विद्यार्थी पुढे निघून जातात. त्यामुळे वेळेचे भान ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी वेळचे काम वेळेवर करणे अत्यावश्यक आहे. आजच सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अभ्यासाची, परीक्षेची, करिअरची आणि एकंदरीत संपूर्ण जीवनाची जबाबदारी घ्या आणि कामाला लागा.

- प्रा. गणेश देशमुख

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण