नितीन कुलकर्णी
चित्र काढण्याच्या प्रक्रि येतच ‘विचार’ दडलेला असतो. एका बॉलपेनने शुभ्र कागदावर रेषा काढायला लागा. काढलेली रेषा बघत बघत पुढचे चित्र काढत जा. आपोआपच एक कल्पना जन्म घेईल..
------------
‘रेखाचित्रण डिझाइनच्या प्रक्रियेत विचाराची एक महत्त्वाची कृती आहे’ - प्रसिद्ध आधुनिकतावादी ब्रिटिश वास्तुविशारद सर रिचर्ड मॅक कॉरमॅक यांचं हे मत.
चित्र काढण्याच्या प्रक्रियेतच विचार करण्याची शक्यता दडलेली असते. एका बॉलपेनने शुभ्र कागदावर रेषा काढायला लागा. काढलेली रेषा बघत बघत पुढचे चित्र काढत जा. हे करताना तुमच्या मनात जर काही विषय असेल तर आपल्याला आत्तापर्यंत काढलेल्या चित्रचे वेगळे अर्थ करण्याची गरज भासणार नाही. ते आपसूकच होईल व त्यातून एक कल्पना जन्म घेईल. या प्रक्रियेला चित्रविचाराची सुरुवात म्हणता येईल. असा चित्रविचार ज्यांना ज्यांना दृश्यातून सर्जन करण्याची गरज असते अशांना करावा लागतो, म्हणजे चित्रकार, ग्राफिक- अॅनिमेशन आर्टिस्ट, प्रॉडक्ट डिझाइनर, सेट डिझाइनर, वेब डिझाइनर इत्यादि. या सर्व व्यावसायिकांचे दोन प्रमुख भाग पडतात. कलाकार व डिझाइनर्स. कलेच्या व डिझाइनच्या कक्षेत केलेले रेखाटन तंत्रच्या दृष्टीने जरी सारखे भासले तरी उद्देशाच्या दृष्टीने वेगवेगळे असते. यामध्ये गुणात्मक फरक असतो.
कलाकृती म्हणून काढलेले रेखाटन सौंदर्याची अनुभूती व त्याचा आविष्कार या सूत्रत बांधलेले असते. त्याचमुळे बघणा:याच्या मनात विषयाचा तपशील व त्याच्या अर्थापेक्षा चित्रकाराच्या मनातला भाव प्रतिबिंबित होण्याची शक्यता जास्त असते. याउलट डिझाइनरने काढलेले चित्र त्याच्या वस्तूविषयाच्या सादरीकरणाबाबत जास्त सजग असते. यासंदर्भात ‘इमारत’ हा विषय असलेली चित्रं बघू.
दृश्य : 1
पहिले चित्र एडवर्ड हॉपर (1992-1967) या अमेरिकन चित्रकाराचे ‘रूम्स फॉर टुरिस्ट्स’ या चित्रसाठी केलेल्या सरावचित्रचे.
या चित्रकाराचे वैशिष्टय़ असे की तो अमेरिकेतील त्या काळातील इमारती व त्यांचा भवताल यांच्या साहाय्याने इथे राहणा:या लोकांचा एकाकीपणा दर्शवित असे. यांसारख्या अनेक चित्रंत हे भयाण वास्तव पाहताक्षणी जाणवतं. इमारतीचा क्लोजअप व चारकोल या रेखाचित्र माध्यमाचा प्रभाव यातून हा भाव व्यक्त होतो. दुसरे चित्र जगप्रसिद्ध वास्तुविशारद ला कार्बूझीये याचे. या इमारतीच्या रेखाटनात लालित्य दिसते, जे आपल्याला वास्तुविशारद आणि अंतर्गत सजावटकारांच्या रेखाटनांमधे दिसते. लालित्यपूर्ण रेषांद्वारे इमारतीचा तपशीलही टिपण्याचा प्रयत्न इथे दिसतो. महत्त्वाचे असे की, या इमारतीची कल्पना खेकडय़ाच्या कवचापासून स्फुरली होती.
दृश्य : 2
‘डिझाइनर कधीही रोदँच्या थिंकरसारखा (विसाव्या शतकातील एक जगप्रसिद्ध शिल्प) ध्यान लावलेल्या एकाकी अवस्थेत दिसणार नाही. उलट तो त्याच्या विचारांना सतत व्यक्त रूपातून बाह्यस्थ करेल. हे व्यक्त रूप केवळ वस्तूचं अंतिम डिझाइन म्हणून समोर न येता, रेखाटनांच्या टप्प्यांची प्रक्रि या म्हणून अधोरेखित होते.’ - ब्रायन लॉसन (हाऊ डिझाइनर्स थिंक, 198क्) यांचं हे मत.
वेगवेगळ्या वस्तूंच्या निर्मितीची कल्पना, रूपरेखा तयार करणारे डिझाइनर्स हे त्यांच्या रेखाचित्रणाशी घट्ट जोडलेले असतात. त्यांच्याजवळ को:या कागदांची अथवा चौकटी ग्राफची डायरी सतत असते. जेव्हा एखादा विचार मनात येतो किंवा एखादी रंजक गोष्ट दिसते तेव्हा लगेच ते त्याची दृश्यनोंद त्यात करत असतात. या नोंदींचा उपयोग पुढे कधीही होऊ शकतो. या पद्धतीचा प्रणोता युरोपातल्या प्रबोधन काळातला लिओनादरे दाँ व्हिंसी ठरतो. लिओनादरे जगात चित्रकार म्हणून प्रसिद्ध असला, तरी त्याचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रतले संकल्पनात्मक काम क्र ांतिकारी आहे. त्याच्या नोंदवह्यांत निसर्गातील तत्त्वांचा तसेच मानवी शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास रेखाचित्रंच्या आधारे केलेला दिसतो. आधुनिक काळात अस्तित्वात आलेले अनेक अभियांत्रिकीतले शोध त्याच्या डायरीत मूळ स्वरूपात रेखांकित झालेले दिसतात. अशीच एक संकल्पना इथे दिली आहे, याचे नाव आहे ‘एरियल स्क्रू’.
दृश्य : 3
रेखाचित्र व नावाप्रमाणो मोठय़ा केलेल्या पेचाने आकाशात चक्राकार रुतायला जणूकाही हा स्क्रू उंच ङोपावणार आहे, ही लिओनादरेची कल्पनाभरारी पुढे खरंचच हेलिकॉप्टरच्या रूपाने प्रत्यक्षात 193क् च्या दशकात अवतरली. हेलिकॉप्टरची मूळ कल्पना सुमारे 5क्क् वर्षांपूर्वी चित्ररूपात आली हे विसरता कामा नये. यातूनच रेखाटन हे दृश्यविचाराचे (पर्यायाने कुठल्याही सृजनाचे) एक समग्र माध्यम म्हणून सिद्ध होते.
डिझाइनर्सना त्यांच्या रेखाटनांमधून घन, त्रिमित वस्तूंविषयी स्पष्ट माहिती सांगायची असते, ज्यातूनच पुढे अशा वस्तू उदयाला येऊ शकतात. अर्थात, पुढे अनेक चाळण्यांमधून त्या वस्तूची सार्थकता उपयोजकाकडून तावूनसुलाखून जोखली जात असते व सुधारत असते. डिझाइनर्सच्या चित्ररेखाटनांचे तीन मुख्य प्रकार व उद्दिष्टेअसतात.
1) मनातील सुप्त कल्पनांना वाट करून देणो व त्यांना मूर्त दृश्यरूप देणो, जेणोकरून त्या कल्पना मानवी बोधनाच्या कक्षेत आणल्या जाऊन पुढे तर्काच्या पातळीवर तपासल्या जातील. ही झाली बोधन प्रक्रियेतली रेखाटने.
दृश्य : 4
‘केटल विथ बर्ड’ अमेरिकन डिझाइनर माइकल ग्रीव्ज याने डिझाइन केलेली चहाची किटली व रेखाचित्र (1985).
2) पुढे त्या वस्तूंच्या व्यावसायिकांना पटवण्यासाठी रेखाटनांच्या पुढच्या टप्प्याचा उपयोग होतो, ज्यात रंग, त्रिमितीबरोबरच वस्तूच्या साधनाचा पोत (म्हणजे लाकूड, स्टील इत्यादि) यांचा आभास निर्माण केलेला असतो.
3) या वेगळ्या प्रकारच्या चित्रंमधून वस्तूच्या प्रत्यक्ष निर्माणकत्र्यासाठी माहिती व सूचना केलेल्या असतात. यांचा उपयोग सॅम्पल बनविण्यासाठी होतो आणि नंतर यातूनच मार्केटिंगच्या कल्पना ठरतात. अशा प्रकारच्या चित्रंना स्पेसिफिकेशन शिट्स व रेंडरिंग असे संबोधले जाते.
दृश्य : 5
एर्नो गोल्डफिंगर याची ‘मेटल चेअर विथ अ स्प्रिंग सीट’ (1925) पिवळ्या ट्रेसिंगवर ऑर्थोग्राफिक पद्धतीत काढलेले तांत्रिक चित्र. खुर्चीचे तीन व्ह्यूज (समोरचा, बाजूचा व वरून बघितलेला) मोजमापासकट काढलेले आहेत. विशेष म्हणजे, प्लॅन अर्धाच काढलाय, कारण आकार समभूज आहे.
(उत्तरार्ध)
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘डिझाइन’ या विषयाचे प्राध्यापक आहेत.)नितीन कुलकर्णी