शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

दुष्काळ - - जनतेच्या भावनांशी खेळ - भवताल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:35 AM

दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जमाफी करण्यात आली. या कर्जमाफीचा किती फायदा शेतकऱ्यांना झाला हे सर्वांनी पाहिले.

- दीपक शिंदे -  -  भवताल

दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जमाफी करण्यात आली. या कर्जमाफीचा किती फायदा शेतकऱ्यांना झाला हे सर्वांनी पाहिले. पीकविम्याची कथा काही यापेक्षा वेगळी नाही. दरवर्षी शेतकरी पीकविमा काढतो; मात्र नुकसानभरपाई अत्यंत अल्प मिळते. अनेक शेतकºयांनी चेक आपल्या खात्यावरही भरलेले नाहीत.दुष्काळाने गांजलेल्या, आर्थिक अडचणीत असलेल्या, भेगाळलेल्या जमिनीकडे सुकलेल्या चेहºयाने आर्तपणे पाहणाºया आपल्यातीलच लोकांना ज्यांना किमान पिण्यासाठीही सहज पाणीही मिळत नाही त्यांच्या घशाची कोरड दूर व्हावी यासाठी सरकारी कार्यालयाकडून पाण्याचे टँकर पाठविण्याचे नियोजन केले जाते. पाण्याचा टँकर आल्यावर गावाच्या वेशीवरच असताना घरातील बाया बापडे घरातील हंडा, कळशी घेऊन भरभर चालतजातात. लहान पोरं पाणी आलं रे म्हणत गावभर बोभाटा करत पळत सुटतात, तर म्हातारी माणसं काठी टेकत आपला नंबर लावण्याचा प्रयत्न करतात. पण, सातारा जिल्ह्यात चक्क पाण्याची दुचाकी येते...टँकर काही दिसत नाही अन् पाहुण्यांकडे फेरा मारून चहापाणी घेऊन ही दुचाकी परतते.

राज्यात यावर्षीचा दुष्काळ फार मोठा असेल याची जाणीव झाल्याने सरकारी पातळीवर अगोदरच खबरदारी घेण्यात आली. दुष्काळी भागात पावसाळ््यानंतर लगेचच पाणीपातळी खोलवर गेली आणि दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने तातडीने टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. टँकरच्या फेºयाही सुरू झाल्या. रेशनिंगवर जसे साखर, डाळ आणि रॉकेल मिळते त्याप्रमाणे माणसागणिक पाणीही मिळू लागले. एका माणसाला २० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याप्रमाणे टँकर गावाकडे पाठवून देण्याचे नियोजन करण्यात आले. टँकरसाठी ठेकेदार ठरले, गावे ठरली आणि गावातील माणसेही ठरली. दुकानदार गावात दिसला तरी लोक अहो रेशनिंग कधी येणार असे विचारत त्याप्रमाणेच गावाच्या कट्ट्यावरही आता पाण्याचा टँकर कधी येणार याची चर्चा रंगत असे. आठवड्यातून चार खेपा टाकण्याचे नियोजन होते. पण, काही दिवसांनी पाण्याच्या टँकरच्या खेपा चाराच्या दोन झाल्या...दोनच्या कमी होत एक.. वेळ अशी आली की, टँकर येणे बंद होत गावात केवळ टँकर आल्याचा भास होत गेला. त्यामुळे सरकार दरबारी मात्र खेपा वाढत गेल्या आणि बिले निघत गेली. पण, जनता पाण्यासाठी टोहो फोडत राहिली.

दुष्काळामुळे माणसांसह प्राण्यांचेही अतोनात हाल होतात. दुष्काळामुळे अनेक योजनांमध्ये सवलत दिली जाते. दुष्काळी तालुका म्हणून त्यासाठी वेगळे निकष ठरविले जातात. पण, या दुष्काळातही स्वत:ची तुंबडी भरून घेण्याचा प्रकार होतो आहे. त्याला अगदी ग्रामसेवकापासून ते वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत सर्वांचा हातभार लागतो. ज्यांच्यापर्यंत मदत पोहोचवायची त्यांच्यापर्यंत मदत पोहोचतच नाही. त्यामुळे लोकांच्या परिस्थितीत फारसा बदल न होता स्थलांतर वाढते. दुष्काळी भागात यावर्षी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली. सत्यमेव जयतेच्या निमित्ताने वॉटर कपची स्पर्धा झाली. लोकांनी झपाटल्यासारखे श्रमदान करत पाण्यासाठी छाती फोडली. पण, यावर्षी पाऊसच पडला नसल्याने पाणीच साठले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परतीचा थोडाफार पाऊस झाला. मात्र, त्यामुळे पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. त्यातच जलयुक्तमध्ये किती काम झाले याचीही सध्या न्यायालयीन चौकशी सुरू आहे. जलयुक्त शिवारवर राज्यभरात ७ हजार ४५९ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ५ लाख ४१ हजार ९१ कामे पूर्ण झाली आहेत. २० हजार ४२० कामे प्रगतीपथावर आहेत.

सरकारने मागेल त्याला शेततळे दिले. अनेकांनी या योजनेचा फायदा घेतला. काहींनी फायदा फक्त कागदावर घेतला. प्रत्यक्षात अनेक शेततळी खोदली गेलीच नाहीत. त्याचप्रमाणे विहिरीतील गाळ काढण्याचा प्रकार. विहिरीतील गाळ काढण्याऐवजी प्रकरणातच ‘गाळा’ काढण्याचे काम शेतकºयापासून ते अधिकाºयांपर्यंत सर्वांनी केले. दुष्काळाने पिचलेल्या शेतकºयाने शेती विक्रीस काढली. शेती विकली गेल्यानंतरही त्याचा वनवास संपत नाही. त्याच्या सात-बारावर नोंद करण्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतात. त्याशिवाय शेती दुसºयाच्या नावावर होत नाही.

सातारा जिल्ह्यातील चारा छावण्यांचे प्रकरण तर राज्यभर गाजले. छावण्यांसाठी पुरवठा केल्या जाणाºया चाºयामध्येच अनेकांनी डल्ला मारला. अशा सुमारे १३४ छावण्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ प्रशासनावर आली. रोजगार हमीच्या काळातही अनेक कामे करण्यात आली. पण, त्यातही मस्टरवर माणसांची संख्या अधिक आणि कामावर कमी अशी परिस्थितीत निर्माण झाली. त्यातच पुन्हा दुष्काळी भागातील लोक रोजगार हमीच्या कामावर गेले, तर घरच्या जनावरांना कोण सांभाळणार अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या योजनांच्या प्रमाणेच पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात झाली आहे. पाणीपुरवठा योग्य होतो की नाही हे पाहण्यासाठी प्रशासनाने पाण्याच्या गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविली. ठेकेदारांनी यावरही उपाय शोधला आणि जीपीएस मशीन चक्क दुचाकीला बसविले. दुचाकीला मशीन लावून ते गावभर फिरवायचे आणि प्रत्यक्षात पाण्याची फेरी कमी करण्याचा उद्योग करायचा असा प्रकार घडला आहे. त्यामुळे दुष्काळ हा अडचणी दूर करण्यासाठी आहे का भ्रष्टाचाराचे कुरण आहे हाच प्रश्न पडतो.कसा होतो टँकरने पाणीपुरवठ्यात भ्रष्टाचारएका व्यक्तीला २० लिटर पाणीएक टँकर १२ हजार ते २० हजार लिटरचा१२ हजार लिटरच्या टँकरच्या ४ खेपा...प्रत्यक्षात २ खेपाच टाकायच्या२० हजार लिटरच्या टँकरच्या ४ खेपा, त्याही दोनच दाखवायच्याजवळ फिडींग पार्इंट असताना लांबवरच्या फिडींग पॉर्इंटवर पाणी भरायचे.खासगी टँकर भरण्याचीही व्यवस्थाकसा झाला होताचारा छावणी घोटाळाछावणी रेकॉर्डला जितकी जनावरे होती तितकी प्रत्यक्षात छावणीत नव्हती.लहान जनावरे मोठी करून दाखविणे व जादा अनुदान घेणे.जनावरांना स्वच्छ पाण्याचापुरवठा न करणे.दैनंदिन बारकोडिंग न करणे.छावण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे न लावता पैसे उकळले.गव्हाणीसाठी स्वतंत्र अनुदान होते; परंतु केवळ अनुदान घेतले.रेकॉर्ड अद्ययावत नव्हते.