शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

Education: कॉम्प्युटर नॉलेज हवे तरी कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 1:59 PM

Computer Knowledge: भारत हा विरोधाभासांचा देश आहे. कोणत्याही क्षेत्रात दोन टोकांची परिस्थिती राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि कधी कधी घरांमध्येही दिसून येते. ‘

- अनय जोगळेकर (माहिती - तंत्रज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक)  भारत हा विरोधाभासांचा देश आहे. कोणत्याही क्षेत्रात दोन टोकांची परिस्थिती राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि कधी कधी घरांमध्येही दिसून येते. ‘आयटी’ म्हणजे केवळ ‘इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी’ नसून ‘इंडियाज टुमॉरो’ असल्याचे प्रतिपादन अटल बिहारी वाजपेयींनी केले होते. २१व्या शतकात प्रवेश करताना भारत आयटी क्षेत्रातील उदयोन्मुख महासत्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये भारतीय लोक जागतिक आयटी कंपन्यांचे नेतृत्त्व करताना दिसू लागले.

सन २०२०-२१ मध्ये सांख्यिकी मंत्रालयाच्या कार्यक्रमांतर्गत १५ ते २९ वयोगटातील सुमारे ११ लाख तरुणांच्या माहिती तंत्रज्ञानासाठी आवश्यक मूलभूत कौशल्यांबाबत केले गेलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. संगणकावर कॉपी पेस्ट करणे, फाइल एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे, संगणकावर एखादा प्रोग्रॅम इन्स्टॉल करणे अशी सामान्य कौशल्ये आत्मसात असणाऱ्यांची संख्या एक तृतीयांशाहून कमी आहे. संगणकीय कोडिंगसारखी तुलनेने अवघड कौशल्ये आत्मसात असणाऱ्यांची टक्केवारी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आहे. यातही देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागातील आणि शहरी तसेच ग्रामीण युवक यांच्यातील दरी खूप मोठी आहे.

एकीकडे अमेरिकेतील परदेशात जन्म झालेल्या लोकांनी स्थापन केलेल्या युनिकॉर्न कंपन्यांमध्ये भारतीय पहिल्या क्रमांकावर असताना एवढी साधी कौशल्ये शालेय पातळीवर आपण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यात असफल ठरत असू तर हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे. माहिती तंत्रज्ञानाचा आवाका सेवा क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नसून, चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि ड्रोनचा वापर वाढत आहे. आज देशामध्ये स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ८० कोटींच्या वर गेली असून, गेल्या वर्षी भारतीयांनी युपीआयद्वारे ८३ अब्ज व्यवहार केले.

म्हणजेच संगणकीय कौशल्ये बेताची असणारे अनेक लोक आज मोबाइलद्वारे पैशांचे व्यवहार करत आहेत, यु-ट्यूबचा वापर करून अनेक गोष्टी कशा करायच्या, हे स्वतःच स्वतःला शिकवत आहेत आणि इ-रिटेल प्लॅटफॉर्मचा वापर करून खरेदी-विक्रीही करत आहेत. आज ग्राफिक डिझाइनपासून व्हिडीओ एडिटिंगपर्यंत अनेक कौशल्ये संगणकावर माउसने कॉपी पेस्ट किंवा फाइल ट्रान्स्फर न करता केवळ दोन बोटांच्या साहाय्याने आपल्या स्मार्टफोनवर प्रभावीपणे वापरणे शक्य झाले आहे. की-बोर्डची जागा व्हाइस टायपिंगने घेतली आहे. आजही २१व्या शतकाच्या सुरुवातीला महत्त्वाची मानली गेलेली संगणकीय कौशल्ये तितकीच आवश्यक आहेत का? की निशाणी डावा अंगठा या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणाकडे बघण्यात आणि मोबाइल तंत्रज्ञानाच्या विकासानुरूप बदल करण्यात एक व्यवस्था म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत? 

टॅग्स :Educationशिक्षण