शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

शैक्षणिक चित्रफिती

By admin | Published: June 24, 2016 5:00 PM

विविध संकल्पना समजण्यात ग्रामीण भागातील मुलांना अनेकदा अडचणी येतात. त्यासाठी शेकडो शिक्षकांनी स्वत:च तांत्रिक प्रशिक्षण घेऊन अनेक शैक्षणिक चित्रफिती तयार केल्या आहेत. शिक्षण सुलभीकरणाचं महत्त्वाचं कार्य त्यामुळे होत आहे.

 शिक्षण सुलभीकरणासाठी- हेरंब कुलकर्णीसंगणकाचा वापर आता केवळ कार्यालयांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. शैक्षणिक उपक्रमांसाठी आणि प्रत्यक्ष शिकण्यासाठीही त्याचा खूप मोठा उपयोग होतो. शिक्षणातील विविध संकल्पना समजून घेण्यासाठी आणि संवादी शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचं महत्त्व खूपच आहे. विशेषत: शैक्षणिक व्हिडीओंचं.हेच लक्षात घेऊन ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांनी स्वत:च असे व्हिडीओ तयार करायला सुरुवात केली. त्यासाठीचं तंत्रज्ञान शिकून, विद्यार्थ्यांना सहभागी करून तयार केलेले हे शैक्षणिक व्हिडीओज् ग्रामीण भागात शिक्षण सुलभीकरणाचं महत्त्वाचं काम करताहेत. मुलांना शिकण्यात जे अडथळे येतात ते लक्षात घेऊन बहुसंख्य शिक्षकांनी हे व्हिडीओ तयार केलेले आहेत हे यातलं विशेष. भाषा, गणित, इंग्रजी, भूगोल यासारख्या विषयांतील कठीण घटक त्याचप्रमाणे कविता सादरीकरण, पाठांचे नाट्यीकरण यात केले जाते. परिसरातील दृश्ये आणि मुलांचे आवाज, अभिनय यात असल्याने मुले हरखून जातात.या शिक्षकांचे शेकडो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत. त्यातून एकमेकांचे व्हिडीओ राज्यभर शिक्षक वापरतात. चंद्रपूर जिल्ह्यातील गिरीधर पानघाटे, विठ्ठल आवंडे, धनराज यमुलवार, प्रज्ञा सोनटक्के व विवेक इत्तडवार या शिक्षकांनी केवळ तंत्रज्ञान व व्हिडीओ निर्मितीसाठी ‘झेप’ नावाचा एक गट तयार केला असून, कविता या प्रकारावर त्यांचे विशेष काम आहे. आॅर्गनचा वापर करून गाण्याचे ट्रॅक तयार केले. त्यावर कविता गायन केले. मुलांच्या आवाजात गायन केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज त्यात टाकले जातात. भूगोलात सूर्यमालिका संकल्पना हा व्हिडीओ कल्पकतेने करण्यात येत आहे. बालाजी जाधव (सातारा) यांनी तर शिक्षकांनी तंत्रज्ञान कसे शिकावे यासाठी बनविलेले व्हिडीओ खूप लोकप्रिय झाले आहेत. मूव्ही, पीपीटी कशा बनवाव्यात.. असे अनेक प्रकारचे मार्गदर्शन या व्हिडीओंत आहे. ते सर्व व्हिडीओ त्यांनी ‘शिक्षणभक्ती’ या यू ट्यूब चॅनलवर टाकले आहेत. श्रीकृष्ण निहाळ यांनी पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमानुसार १०० पेक्षा जास्त व्हिडीओ तयार केले असून, ते मोफत उपलब्ध करून दिले आहेत. कीर्ती पालवे (खामगाव, ता. शेवगाव) यांनी भूमितीतल्या अनेक कठीण घटकांवर, इंग्रजीत शब्द व चित्र असे आणि भूगोलातील प्राण्यांच्या निवाऱ्याच्या चित्रांसह आकर्षक व्हिडीओ केले आहेत. प्रवीण डाकरे (ढाकणेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी पहिलीसाठी इंटरअ‍ॅक्टिव ज्ञानरचनावादी व्हिडीओ तसेच लेजीम खेळण्याचे व्हिडीओ नऊ भागात बनवले आहते. संगीतमय पाढे मुलांना गुंतवून ठेवतात. राजेंद्र गणवीर (घोडेगाव देवळी, जि. वर्धा) यांनी व्हिडीओ दाखवताना क्रोमाच्या पडद्यासाठी हिरव्या तरटपट्टीचा वापर केला. मुलांना आपण फिल्ममध्ये दिसतो याचा विलक्षण आनंद झाला. गणपत दसपुते (माळीवाडा, जि. नगर) यांनी पहिलीच्या वर्गातील चित्ररूप असे १०६ शब्द व त्याचे चार भागात व्हिडीओ निर्माण केले आहेत. त्याचप्रमाणे अप्रगत मुलांसाठी काना ते अनुस्वार असे शब्दांचे सुमारे १०० व्हिडीओ बनविले आहेत. कौसरबानू नाजर या उर्दू शाळेच्या (खामगाव, शेवगाव, नगर) शिक्षिकेने केवळ उर्दू माध्यमाचे एकूण ८० शैक्षणिक व्हिडीओ तयार केले. विरुद्धार्थी शब्द, प्राणी, पक्षी, समूहदर्शक शब्द असे अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार केले. मुलांचे आवाज रेकॉर्ड केले. आपला आवाज रेकॉर्ड केलेले बघून मुले हरखून गेली. उर्दू भाषेतील फॉण्ट पुस्तकासारखे मिळणे कठीण गेले, पण ते मिळवले. आज महाराष्ट्रातील शेकडो उर्दू माध्यमाच्या शाळांतील शिक्षक कौसर यांचे व्हिडीओ वापरून मुलांना शिकवतात...काही शिक्षक सामाजिक विषयावर फिल्म बनवतात. अजय पाटील (पिसवली) यांनी ‘आम्ही मुले बोलतोय’, ‘माझ्या गुरुजींची गाडी’, ‘धुळवड’ अशा सुंदर फिल्म बनवल्या. भंडारा जिल्ह्यात देवानंद घरत व इतर शिक्षकांनी ज्ञानरचनावाद या विषयावर डीव्हीडी बनवून जिल्हाभर वितरित केल्या. नगर जिल्ह्यातील उमेश घेवरीकर यांनी राष्ट्रीय सण साजरे करताना प्लॅस्टिकचे ध्वज जमिनीवर पडत असल्याने जनजागृतीसाठी संदेश देणारा ‘द विनर’ हा लघुपट, शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर मुलांसोबत चर्चा करून ‘द ब्लॅकबोर्ड’, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या’ या विषयावरील ‘घेतला वसा’, बालविवाहावर ‘तुलसी’, घर सोडून पळून जाणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवरील ‘घर वापसी’ असे लघुपट केले. अगदी साधा कॅमेरा आणि परिसरातील दृश्ये अशा कमी खर्चात या फिल्म बनविल्या. मतदार जागृतीची फिल्म तर निवडणूक आयोगाने स्वीकारली आहे. त्यांच्या फिल्म एक मिनिट, चार मिनिटे इतक्या अल्प काळाच्या असल्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून राज्यभर फिरतात. वसुधा वैद्य या नागपूरच्या शिक्षिका तर केवळ लघुपट निर्मितीत काम करायचे म्हणून नोकरी सोडण्याचा विचार करीत आहेत. शैक्षणिक लघुपटात पर्यावरण, पाणीबचत, एकात्मता, सर्वधर्मसमभाव, शिक्षणाचे महत्त्व असे विषय शिक्षक हाताळू शकतात. राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक लघुपट महोत्सव होत असतात, त्यात हे लघुपट पाठवता येतील. त्यातून शाळांची या क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करता येईल. खालील संकेतस्थळावर मोफत व्हिडीओ उपलब्ध आहेत.. 

http://www.refseek.com/directory/educational_videos.html goo.gl/gkTnNB, www.primaryteachers.in

विविध संकल्पना समजण्यात ग्रामीण भागातील मुलांना अनेकदा अडचणी येतात. त्यासाठी शेकडो शिक्षकांनी स्वत:च तांत्रिक प्रशिक्षण घेऊन अनेक शैक्षणिक चित्रफिती तयार केल्या आहेत. शिक्षण सुलभीकरणाचं महत्त्वाचं कार्य त्यामुळे होत आहे.तुम्हालाही बनवायचेत शैक्षणिक व्हिडीओज्?शिक्षकांना स्वत: पाठावर आधारित व्हिडीओ तयार करता यावेत यासाठी पेशाने इंजिनिअर असलेले भूषण कुलकर्णी आता शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर कार्यशाळा घेत आहेत. आतापर्यंत बारा जिल्ह्यात ४५ कार्यशाळा घेऊन तीन हजार शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत व्हिडीओ निर्मिती सोबतच कमीत कमी खर्चात शाळा ई-लर्निंगसाठी कशी तयार करावी यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन केले जाते. मोबाइल वापरून कमी खर्चात सुंदर व्हिडीओ तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. डबिंग, टायटल, क्रोम इफेक्ट, एडिटिंग यासाठी कोणते तंत्र वापरावे याचे ते मार्गदर्शन करतात. दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये उच्च दर्जाचे ध्वनिमुद्रण, मल्टीट्रॅक आॅडिओ प्रोसेस (आॅडासीटी), पाठावर आधारित पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचे व्हिडीओ रूपांतरण (पीपीटी व कॅमटासीया), व्हिडीओ एडिटिंग व मिक्सिंग, ग्रीन क्रोमावर आधारित बदलणारे बॅकग्राउंड, व्हिडीओ निर्मिती इत्यादि विषय (सॉफ्टवेअर) शिकवले जातात. मुख्य तीन प्रकारे व्हिडीओ निर्मिती या कार्यशाळेत शिकवली जाते. १. माहितीपट निर्मितीसाठी स्क्रीप्ट लेखन - ध्वनिमुद्रण - फोटो/व्हिडीओ गोळा करणे - फोटो/व्हिडीओ-ध्वनी-संगीत यांचे एकत्रीकरण/संकलन व व्हिडीओ निर्मिती.२. पाठांवर आधारित व्हिडीओ निर्मितीसाठी - स्क्रीप्ट लेखन - ढढळ प्रेझेंटेशन निर्मिती - ढढळ स्क्रीन रेकॉर्डिंग - संकलन व व्हिडीओ निर्मिती.३. क्रोमा व्हिडीओ / शॉर्ट फिल्म निर्मितीसाठी संवाद लेखन - कॅमेराद्वारे शूटिंग - डबिंग / संकलन व व्हिडीओ निर्मिर्ती.(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

herambkulkarni1971@gmail.com