शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

ऐवज...

By admin | Published: July 10, 2016 9:57 AM

अमेरिकेत न्यूजर्सीमधील युनियन काऊंटी परफॉर्मिंग आर्टस सेंटरमध्ये भरलेल्या भारताबाहेरच्या पहिल्या विश्व मराठी नाट्य संमेलनातील गोष्ट

 
राजीव परांजपे -
६८ साली मी एक जुना आॅर्गन 
खरेदी केला आणि तो दुरुस्त करण्याचाही प्रयत्न केला...! 
कलाकार म्हणून माझा रियाज 
वादक, कारागीर आणि ‘निर्माता’
असा तऱ्हेवाईक होता! 
आॅर्गन कलाकार आणि ते वाद्य 
भविष्यात उरणार की नाही 
अशी धास्ती असतानाही जीव तोडून 
आॅर्गनचा भाता दाबत राहणाऱ्या 
माझ्यासारख्या तरुणाला तेव्हा कदाचित समाजाने पार वेडा ठरवले असेल; पण त्याकडे लक्ष देण्यासाठी 
मला वेळ होता कुठे..? 
माझ्या अंगणातील जुन्या गाड्या 
आणि नाट्यसंगीत यापलीकडे माझ्यासाठी फारसे जग नव्हते. 
पण माझ्या या वेडाकडे 
जगाचे मात्र बारीक लक्ष असावे...
 
 
अमेरिकेत न्यूजर्सीमधील युनियन काऊंटी परफॉर्मिंग आटर््स सेंटरमध्ये भरलेल्या भारताबाहेरच्या पहिल्या विश्व मराठी नाट्य संमेलनातील गोष्ट. सकाळी बेगम बर्वेचा प्रयोग झाला, रात्री कट्यारचा प्रयोग सुरू झाला. तेथील नियमाप्रमाणे थिएटर फक्त अकरा वाजेपर्यंतच उपलब्ध होते. नाटक सुरू झाले आणि पहिल्याच गाण्याला कडकडीत वन्समोअर..! असे वन्समोअर घेणे म्हणजे त्यावेळी तरी प्रयोग अर्धवट करण्याची कुऱ्हाड पायावर मारून घेण्यासारखे होते. कारण नियमावर ठाम बोट ठेवणारी अमेरिकन संस्कृती. पण त्या संस्कृतीला मराठी नाट्यसंगीताची भाषा आणि सुंदरता समजत नसली तरी तुडुंब भरलेल्या सभागृहाचा आनंद आणि त्या वातावरणात उमटणाऱ्या स्वरांची श्रीमंती कदाचित समजत असावी. कारण आपल्या नियमांचा सगळा बडेजाव बाजूला ठेवत ते म्हणाले, नाटक-संगीतातील इतका आनंद आजवर या सभागृहाने कधीच अनुभवला नाही. तुमचा हा प्रयोग जितका वेळ रंगेल तितका वेळ चालू द्या, घड्याळाकडे आणि सभागृहाच्या भाड्याकडे न बघता. कारण त्यासाठी अधिक भाडे तुम्हाला द्यावे लागणार नाही...! भाषा आणि आशय यापलीकडे जाऊन स्वरांची नेटकी बांधेसूद बैठक आणि वेग याच्या आधारे अवघ्या काही मिनिटांत दमदार गाण्याचा ऐवज देणारे मराठी नाट्यसंगीत हा मराठी संस्कृतीचा एक कधीही न कोमेजणारा सुगंधी बहर आहे. या बहराच्या वाटेवर जाण्याचा योग माझ्या आयुष्यात येणे हे भाग्याचे पण काहीसे स्वाभाविक होते. हा भाग्याचा योग आला तो निव्वळ आॅर्गनमुळे...! 
वातावरणात भरून राहणाऱ्या आॅर्गनच्या या जादुई स्वरांची माझी पहिली भेट झाली त्यानंतर लगेचच मीही माझ्या हार्मोनियमचा टोन बदलण्याच्या खटपटीला लागलो, इतके त्या स्वरांनी झपाटले होते मला. भंगारातून जुन्या गाड्यांची इंजिन्स आणून त्यातून नव्या गाड्या बनवण्याचा खटाटोप नाहीतरी मी तेव्हा करीत होतोच. तीच चिकित्सक कारागिरी बुद्धी वापरीत मी हा प्रयोग केला, पण तो काही तितकासा साधला नाही. मग ६८ साली पाचशे रु पये देऊन मी एक जुना आॅर्गन खरेदी केला आणि बाजारातून घरी आला तेव्हा जेमतेम वाजणारा तो आॅर्गन उघडून दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला...! थोडक्यात काय, तर कलाकार म्हणून माझा रियाज केवळ आॅर्गन वाजवण्यापुरताच नव्हता, तर ते वाद्य दुरु स्त करण्याइतका आणि पुढे मला हवे तसे वाद्य तयार करण्याइतका तऱ्हेवाईक होता असे म्हणायला हरकत नाही..! मी जेव्हा हे वाद्य वाजवत होतो तेव्हा ते वाजवणाऱ्या कलाकारांची संख्या इतकी जुजबी होती की त्यामुळे ही प्रजाती लवकरच नामशेष होऊन त्याबरोबरच वाद्य बनवणारे आणि ते दुरु स्त करणारे कारागीरही या समाजातून अदृश्य होतील या धास्तीने मी या सगळ्या प्रकारच्या धडपडीला सुरुवात केली. 
आॅर्गन वाजवणारे कलाकार आणि ते वाद्य भविष्यात उरणार की नाही अशी धास्ती असतानाही जीव तोडून त्या आॅर्गनचा भाता दाबत राहणाऱ्या माझ्यासारख्या तरुणाला तेव्हा कदाचित भोवतालच्या समाजाने पार वेडा ठरवले असेल. पण त्याकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ होता कुठे..? माझ्या अंगणातील जुन्या गाड्या आणि नाट्यसंगीत यापलीकडे माझ्यासाठी फारसे जग नव्हते. पण माझ्या या वेडाकडे जगाचे मात्र बारीक लक्ष असावे...
८० च्या दशकात भारत नाट्यमंदिरच्या सर्व संगीत नाटकांना आॅर्गनची साथ करणारे विष्णुपंत वष्ट यांना एकाएकी पक्षाघाताचा झटका आला आणि मला निरोप आला, पुढच्या आठवड्यात संगीत स्वयंवरचे तीन प्रयोग आहेत आणि त्यासाठी तुला वाजवायचेय...! मला वाजवायचेय? गंधर्व ठेक्यावर म्हटली जाणारी ती स्वयंवरमधील २५-३० अफाट लोकप्रिय गाणी, त्यांचे राग, तो ठेका हे सगळे असे एका आठवड्यात डोक्यातून मनात आणि तिथून बोटात उतरवणे हे झेपणारे मला? माझ्या या शंकेचे निरसन करण्याच्या फंदात कोणी फारसे पडले नाही. ती शंकाच त्यांना बहुधा नसावी! मग पुढचे पाच-सहा दिवस मी संगीत स्वयंवर अक्षरश: जगत होतो. त्यातील गाणी, त्यांचे मूळ राग, त्या रागातील स्वरांच्या वाटेने गाण्यात येऊ शकणारे अन्य राग, त्या गाण्यातील भाव, त्या गाण्यातील हमखास दाद मिळणाऱ्या मोक्याच्या जागा, ठेक्याचे नखरे हे सगळे पुन्हा-पुन्हा समजून घेत होतो, माझ्यात उतरवू बघत होतो. स्वत:च स्वत:चा गुरू होण्याच्या आग्रहामुळे आजवर खूप गंधर्व संगीत ऐकले होतेच. त्याचे झरे खूप खोलवर झिरपत गेले असावे बहुधा. मला ज्या विश्वासाने विष्णुपंत वष्ट यांच्या खुर्चीवर बसवले गेले त्या जागी मी अजिबात बुजलो नाही, कुठेही चाचपडणारा नवखा कलाकार ठरलो नाही. एक नक्की, साथीला असलेले सारंगिये मधुकर खाडिलकर आणि तबला साथीदार चंद्रकांत कामत यांच्यासारख्या कलाकारांनीही सांभाळून घेतले. हा अनुभव घेताना सतत वाटत होते.. हेच, हेच तर मला मनापासून करायचे आहे. आणि ते प्रेम जाणल्यामुळे असेल कदाचित, त्यानंतर आॅर्गनच्या स्वरपट्ट्यांवरून फिरणाऱ्या माझ्या हातांना फारशी उसंत मिळालीच नाही. संगीत नाटक आणि आॅर्गन या नात्याबरोबर आॅर्गन आणि राजीव परांजपे हे नाते दृढ होत गेले, रसिकांसाठीसुद्धा...! 
या तीन दशकाच्या प्रवासाने संगीत सौभद्र, मानापमान आणि स्वयंवर ही खाडिलकर-गडकरी पठडीतील नाटके बघितली, अनुभवली आणि नव्या बाजाचे दारव्हेकर मास्तरांचे कट्यारही बघितले. छोटा गंधर्व, रामदास कामत, जयराम शिलेदार अशा पट्टीच्या, तयारीच्या कलाकारांना साथ करण्याचे आव्हान घेण्याची हिंमत केली, तसे आजच्या राहुलसारख्या नव्या पिढीचे म्हणणे समजून घेत, त्यांनाही नाट्यसंगीताच्या परंपरेचे परिपक्व जाणतेपण समजावून सांगितले. आणि आज तर तेच काम प्राधान्याने करतो आहे. ३०-३५ संगीत नाटकांचे दोनेक हजाराहून अधिक प्रयोग वाजवता-वाजवता ही नाटके मला तोंडपाठ न झाली तरच नवल. पण त्याचबरोबर नाट्यसंगीतविषयक खूप सारा असा ऐवज माझ्याकडे जमा होत गेला आहे, जो माझ्याकडील व्हिंटेज गाड्यांइतकाच दुर्मीळ आहे. या प्रवासाची एक मजा आहे.. नाटक तेच असले, त्यातील कलाकार तेच असले तरी रोजच्या प्रयोगाची रंगत वेगळीच असते. रोज घडण्या-बिघडणाऱ्या स्वयंपाकासारखे असते ते...! त्यातही समोर जेव्हा छोटा गंधर्व किंवा रामदास कामत यांच्यासारखे कसलेले कलाकार असतील तर माझ्यासारख्या साथीदारांची जबाबदारी वेगळीच असते. सतत नव्या वाटांनी त्यांच्यासमोर येत असलेल्या स्वरांचा माग घेत त्यांच्यामागे जाण्याची ही धांदल असते. अशा कलाकारांसाठी मी एक रियाज नक्कीच करतो, त्यांच्या नाटकाच्या किंवा गाण्याच्या आधी सतत फक्त त्यांचेच गाणे ऐकत राहतो, रोज नव्याने त्यांना समजून घेत राहतो. असे कलाकार फक्त नाटकातील नसतात, तर शास्त्रीय संगीत गाणारेही अनेक असतात... 
या वाटेवर तृप्तीचे क्षण अनेक, पण एखादा अवीट तृप्तीचा. सकाळी-सकाळी भीमसेनअण्णांचा फोन येतो आणि एखादा दुय्यम दर्जाचा गायकसुद्धा दाखवणार नाही एवढ्या साधेपणे ते विचारतात, ‘राजीवजी, मी भीमसेन बोलतोय, तुम्ही माझ्या संतवाणीला आॅर्गन साथ कराल का?’ मी क्लीन बोल्ड...! मग झाकीरभार्इंच्या ठेक्याची, माझ्या आॅर्गनच्या स्वरांची साथ घेत पंडितजी सगळ्यांना त्या चंद्रभागेच्या पैलतीरी नेतात, तेव्हा वाटते या प्रवासाला परतीची वाट असूच नये...
(उत्तरार्ध)
 
मराठी संगीत नाटकात ऑर्गन सर्वात प्रथम आणला तो बालगंधर्व यांनी. 
१९ व्या शतकात संगीत नाटकांमध्ये पायपेटी साथीसाठी वापरली जायची. गंधर्वांची पायपेटी बिघडली तेव्हा त्यांनी पुण्यात ज्या माणसाकडे ती दुरु स्तीला टाकली ते दुकान कॅस्तलिनो नावाच्या गोवेकराचे होते. त्याने गंधर्वांना आपल्याकडील छोटा आॅर्गन दाखवला आणि तो वापरून बघण्याचे सुचवले. पोर्तुगीजांनी चर्चमधील प्रार्थनेसाठी म्हणून भारतात आणलेले हे वाद्य, त्याचा भरदार नाद ऐकून बालगंधर्वांनी आपल्या साथीसाठी निवडले आणि बघता-बघता ते साथीच्या वाद्याच्या ताफ्यातील जणू हुकुमाचे पान होऊन बसले...! रसिकांवर भूल घालणारी गंधर्वांची लडिवाळ गायकी आणि त्याच्या जोडीला ऑर्गनचे भरदार सूर हे असे अद्वैत होऊ लागले की गंधर्वांच्या गायकीबरोबरच या वाद्याचा जन्म झालाय असे कोणा भाबड्या गंधर्वप्रेमीला वाटले असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येणार नाही...!