शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सगळ्यांनाच आरोग्यदायी जगण्याचा हक्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 08:14 IST

एक लाट आली, ती गेली, दुसरी लाट आली ती उताराला लागत असल्याचे वाटत आहे. ती गेली नाही तोच आता तिसऱ्या लाटेची भीती आहे. अशा किती लाटा येणार माहीत नाही.

अ. पां. देशपांडे

भारतासारख्या लोकशाही देशात घटनेने जगण्याचे जे मूलभूत हक्क सर्व जनतेला दिले आहेत, त्यात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, लेखन आणि भाषण स्वातंत्र्य असे अनेक आहेत. किंबहुना आता एखाद्या देशात भारतासारखी घटना असो अथवा नसो, सगळीकडे लोक असे हक्क मागू लागले आहेत. २०२० सालात सुरू झालेल्या कोरोनाच्या महामारीत जेवढी माणसे मृत्युमुखी पडली आणि जी महामारी अजून संपली नाही त्यामुळे आरोग्यदायी जगण्याचा हक्क हा प्रकर्षाने जगभर चर्चेचा विषय झाला आहे. उदा. आमच्या आरोग्यावर इतर देशांना घाला घालायचा अधिकार असावा का? चीनने कोरोनाचा विषाणू जगभर पसरविला हे जगजाहीर आहे. म्हणजे युद्धे आता सीमेवर आपले सैनिकच फक्त लढणार नसून शत्रू आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यापाशी आला आहे. त्याच्यापासून आपण कसे सावध राहणार?

बरं, पूर्वी एक देश दुसऱ्या एका देशाबरोबर युद्ध खेळत असे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात एकापेक्षा अधिक देश त्यात सहभागी झाले होते आणि होरपळले होते; पण आताच्या या कोविड-१९ नावाच्या जैविक युद्धात हल्ला करणाऱ्या एका देशाने जगातल्या सर्व देशांवर एकाचवेळी हल्ला केला असून, म्हटले तर कोणाच्याही हातात पारंपरिक शस्त्रे नाहीत. कशी असणार? कारण हे पारंपरिक युद्ध नाहीच मुळी. दर युद्धात तंत्र वेगळे. महाभारतकाळी कौरव पांडवात झालेले युद्ध हे धर्मयुद्ध होते. म्हणजे समोरच्या माणसाच्या हातात गदा असेल तर त्याच्याशी लढणाराही गदेनेच लढे. तलवारीने नाही. समोरच्याच्या हातात भाला असेल तर याच्याही हातात भाला असे. पण, चीनने आता खेळलेला डाव हा गनिमी कावा होता. सगळे देश गाफील होते. यात चीनचेही लोक मारले गेले; पण युद्धात दोन्ही बाजूचे लोक मारले जातातच.

अशा कोरोनाच्या गंभीर प्रसंगी आपण दक्षता घेणार कशी? हा विषाणूच कोणाला माहीत नाही, त्यामुळे त्यावरचे उपाय काय आहेत, औषधे कोणती आहेत, हा होऊ नये म्हणून काही लस आहे का? एक ना अनेक. त्यामुळे सगळे जग चाचपडते आहे. या महामारीत आपण सतत चढउतार पाहत आहोत. एक लाट आली, ती गेली, दुसरी लाट आली ती उताराला लागत असल्याचे वाटत आहे. ती गेली नाही तोच आता तिसऱ्या लाटेची भीती आहे. अशा किती लाटा येणार माहीत नाही. (मी परमेश्वराला मानत नाही, कारण बरेच लोक ते एकट्या परमेश्वराला ठाऊक असे म्हणतात. पण त्याला ठाऊक असले तरी तो आपल्याला कुठे सांगतो?) आरोग्यदायी जगण्याच्या हक्काला अनेक पैलू आहेत. आपले आरोग्य चांगले राहण्यास जितके सरकार जबाबदार असते, तितकेच आपणही वैयक्तिकरीत्या जबाबदार असतो.

उदा. आपल्या जेवणखाण्यासाठी चांगले धान्य व तेल-तूप मिळणे गरजेचे आहे, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे. एरवीही आपल्याला रुग्णालये कमी पडतात. कर्करोगासारख्या विशेष रोगाच्या उपचारासाठी भारतभरच्या रुग्णांना मुंबईकडे धाव घ्यावी लागते. त्यासाठी अशा सोयी जिल्ह्याजिल्ह्यांच्या ठिकाणी व्हायला हव्यात. रुग्णालयातही डॉक्टर्स आणि परिचारिकांची संख्या कमी पडते. या झाल्या सरकारी मदतीने मिळणाऱ्या सोयी; मात्र आपले आरोग्य नीट राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याला वैयक्तिकरीत्या करायला हव्यात, त्या किती कटाक्षाने आपण करतो हेही प्रत्येकाने आपणहून आणि प्रामाणिकपणे तपासून पाहायला हवे. एकट्या सरकारला दोष देऊन आपली त्यातून सुटका होणार नाही. गरिबीमुळे सगळ्यांना पुरेसे तीन वेळांना पुरे पडेल असे अन्नधान्य विकत घेता येत नाही. ज्यांना विकत घेता येते, तेही सकस आहार घेतात का? हा सध्याच्या काळात प्रश्न आहे. 

लोकांचा चटपटीत खाण्याकडे ओढा वाढला आहे. जे जिभेला चवदार वाटते ते शरीराला परवडणारे नसते. रोज व्यायाम करणारे लोकही कमी आहेत. दंड-बैठका-सूर्यनमस्कार-चालणे-धावणे यांसारख्या व्यायामाला खर्च काही येत नाही. त्यासाठी व्यायामशाळांची गरज भासत नाही की पैसे पडत नाहीत; मात्र इच्छाशक्ती जरूर लागते. लोकांच्या सवयीही घातक असतात. तंबाखू खाणे एकतर वाईट आणि ती खाऊन रस्त्यावर थुंकणे आणखी वाईट. थुंकण्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. लोकांना रस्त्यावर कचरा टाकायची वाईट सवय आहे. यामुळे समाजात अस्वच्छता वाढत जाते व रोगराई पसरत जाते आणि शेवटी येते ते आपले मानसिक आरोग्य. मनाची शांती ठेवल्याने सर्व गोष्टी अंगी लागतात. त्यासाठी प्रत्येकाने थोडी योगसाधना करणे, आपले मन वाचन, खेळ, सिनेमा-नाटक पाहणे, संगीत ऐकणे अशा गोष्टीत रमविणे गरजेचे आहे. नाहीतर सर्व गोष्टी उपलब्ध असूनही मनाला कशाची तरी घोर चिंता असल्याने झोप लागत नसेल तर शरीरस्वास्थ्य नीट राहणार नाही.

वैयक्तिकरीत्या जबाबदारआपले आरोग्य चांगले राहण्यास जितके सरकार जबाबदार असते, तितकेच आपणही वैयक्तिकरीत्या जबाबदार असतो. उदा. आपल्या जेवणखाण्यासाठी चांगले धान्य व तेल-तूप मिळणे गरजेचे आहे, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आवश्यक आहे.

आरोग्यासाठी...सांडपाण्याची व्यवस्था चोख हवी. पावसाचे पाणी रस्त्या-रस्त्यांत साठून राहता कामा नये. वाहने व कारखानदारीने हवा-पाणी प्रदूषित केलेली असता कामा नये. घरे आरोग्यदायी असायला हवीत व तेथे घरातल्या घरात शौचालयाची, अंघोळ करण्यासाठी मोरीची व्यवस्था हवी. आरोग्य बिघडल्यानंतर आपल्याला दवाखाने व रुग्णालये लागतात. त्याबाबतीत आपल्याकडे विलक्षण तुटवडा आहे. 

१६० कोटी लोकांची काळजी वाहायची आहेआणखी २० वर्षांनी भारताची लोकसंख्या १६० कोटींवर जाऊन स्थिरावेल, असा अंदाज आहे. स्थिरावणे म्हणजे जन्मदर आणि मृत्युदर सारखा असणे. या १६० कोटी लोकांची काळजी या देशाला वाहायची आहे. 

(लेखक मराठी विज्ञान परिषदचे कार्यवाह आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतfoodअन्नMahabharatमहाभारत