चंद्रमोहन कुलकर्णी
मी परीक्षकांपुढे उभा राहिलो. आता माझी ख:या अर्थाने परीक्षा होती. मी थेटच सांगून टाकलं, ‘‘सर, मला हे जमणार नाही!’’असतील, नसतील ती सारी कारणं सांगून टाकली. सर म्हणाले, ‘‘हे ठीक आहे,
पण प्रॅक्टिकलचं काय? ते करावंच लागेल.’’मी गप्प. थोडय़ा वेळानं उत्तर सापडल्यासारखं वाटून म्हणाले,‘‘फोटोग्राम माहिती आहे का?’’.
----------------------------
.वर्षभरात कॅमे:याच्या किमतीएवढी रक्कम काही साठली नाही. तशी ती साठणारही नव्हती. कधी पुस्तकात बघून, वाचून, कधी जोशी सरांचा कॅमेरा हाताळून, कधी मित्रच्या भावाच्या कॅमे:याच्या साहाय्यानं असं मजल दरमजल करत आमचा फोटोग्राफीचा प्रवास सुरू होता. चुका करत, दुरुस्त्या करत, धडपडत, कधी जोशी सरांच्या पाठिंब्यावर, तर कधी स्वबळावर आम्ही लढत होतो. दिवस पुढे जात होते. फोटोग्राफी, त्यातल्या तांत्रिक गोष्टी तोंडपाठ होत होत्या. किती लाईटला किती अॅपर्चर नि शटर स्पीड किती आणि किती डेप्थ ऑफ फील्ड आणि झूम कोणती, वाईड कधी वापरायची, फ्लॅश कधी नि कसा वापरायचा इथपासून लायटिंगचे सगळे अँगल आम्हाला तोंडपाठ झाले होते. इतकंच नव्हे, तर निरनिराळे फिल्टर्स आणि ते कधी वापरायचे, प्रिंट काढताना काय काय काळजी घ्यावी, अगदी रोल कसा भरावा इथपासून ते पार अगदी प्रिंट्स वाळवून ते कापताना कोणत्या प्रकारच्या फोटोला किती आणि कशी बॉर्डर ठेवायची, कोणते फोटो ब्लीडला कापायचे ह्या सगळ्या इत्थंभूत माहितीनं आमच्या नोटबुक्स काठोकाठ भरलेल्या असत. पण ती सगळी होती माहिती! प्रत्यक्ष अनुभव शून्य आणि त्यामुळे ज्ञानाचं भांडं रिकामंच होतं. तिथं सगळा खडखडाट!
नाही म्हणायला मित्रच्या घरी त्याच्या भावाची डार्करूम मात्र सुसज्ज होती. ती काही तो सतत वापरत नसे. आम्हाला तिथं जाण्याची आणि वापरायची पूर्ण मुभा होती. इकडून तिकडून कॅमेरे उसने घेऊन, काही ना काही जुगाड करून फोटो काढणा:यांची संख्या बरीच होती. मग त्यांचे प्रिंट्स आम्ही काढून देऊ लागलो. प्रिंट्सच्या कागदाचा खर्च त्यांनी करावा, प्रिंटचं बाकीचं बाळंतपण आम्ही करावं; आणि त्या बदल्यात त्यांचे वाया गेलेले फोटो आम्ही आमचे म्हणून आमच्या पोर्टफोलिओला लावावेत, असा व्यवहार ठरला. हे चाललं. नुसतं चाललंच नव्हे, तर पळालं!!
आमचा पोर्टफोलिओ पूर्ण भरला. निरनिराळ्या फोटोंची भरपूर व्हरायटी असलेला पोर्टफोलिओ! व्हरायटीचं रहस्य आमच्याकडे नसलेल्या कॅमे:यात आणि असलेल्या एनलाजर्रमध्ये दडलं होतं!
ह्याच काळात मग आम्ही प्रिंट्स काढण्याच्या कलेत पारंगत झालो. निरनिराळी तंत्रं वापरून अनेक इफेक्ट्स बघून सरसुद्धा चकित होत. ब्लॅक अॅण्ड व्हाईटमधल्या हार्डडिस्कमध्ये प्रिंट आणि कॉण्ट्रास्टच्या अनेक प्रकारांपासून सेपिया टोन आणि फोटोग्रामर्पयतच्या प्रकारात आम्ही मास्टरी मिळवली होती!!
कष्ट वाया जात नाहीत. कुठे ना कुठे तुम्ही केलेले कष्ट उपयोगी पडतातच, ह्याचा प्रत्यय लवकरच आला, फायनल परीक्षेच्या वेळी.
फायनल परीक्षा मुंबईला! जे. जे. स्कूलमध्ये! परीक्षेर्पयत कॅमेरा घेण्याएवढे पैसे मी काही जमा करू शकलो नाही. बहुतेकांनी आपापली सोय केलेली होती. पण ऐन वेळेर्पयत कॅमेरा न मिळाल्यामुळे हात हलवत बसणारे माङयासारखे आणखी काहीजण होते. कुणी म्हणायचं, ‘‘तिथं देतात!’’
कुणी म्हणायचं, ‘‘तिथं कुठले आलेत द्यायला, जे. जे. स्कूल आहे ते. आपल्यासारखा गावठी कारभार नसतो त्यांचा.’’
परीक्षेला कॅमेरा लागेलच असं सरांनी सांगितलं होतंच. त्यांची काहीच चूक नव्हती.
**
मुंबई.
सुरुवातीचे काही पेपर्स होऊन परीक्षेला ब:यापैकी सरावलो होतो. आजूबाजूला चार ओळखी झाल्या होत्या. चहाच्या टप:या, पानबिडीची दुकानं, कॉलेजमधल्या कॅण्टीनमधले वेटर, मुख्य म्हणजे कॉलेजमधले शिपाई!
परीक्षेच्या वेळी शिपायांशी असलेली ओळख फार महत्त्वाची ठरली!
अडल्या नडल्याला शिपाई मुलांच्या मदतीला धावून येत. ऑफिशियली मदत तर करावीच लागे, पण अनऑफिशियलीही मदत करत. ब:याचशा शिपायांना ‘आर्टिस्टिक सेन्सही’ होता. त्यातले काहीजण तर फोटोग्राफीतही निष्णात होते!
फोटोग्राफीचा माझा पेपर जसजसा जवळ येऊ लागला तसतसं माझं टेन्शन वाढत चाललं. ऐन वेळेस बघू काय ते असा विचार करता करता प्रत्यक्ष परीक्षा येऊन ठेपली होती. कॉलेजमधून कॅमेरा मिळाला असता, पण त्याला आमच्या कॉलेजचं पत्र, अजर्विनंत्या वगैरे छपन्न गोष्टी कराव्या लागणार होत्या. एक शिपाई कॅमेरा द्यायला तयार झाला होता, डिपॉङिाट भयानक! शिवाय भाडं!
खरंतर काहीतरी करून कॅमे:याचं जुगाड करता आलं असतं, अगदीच नाही असं नाही. पण ऐनवेळेला कॅमेरा हातात येऊनही काय उपयोग झाला असता? कॅमे:याचं मला प्रत्यक्ष नॉलेज काहीच नव्हतं! माङयाकडे होती, ती फक्त माहिती! माहितीनं भरभरून टम्म फुगलेल्या नोटबुक्स!
मला कॅमेरा प्रत्यक्ष हाताळण्याचा काहीच अनुभव नव्हता. होती ती नुसतीच पोपटपंची! डेप्थ ऑफ फील्डची व्याख्या मला तोंडपाठ होती, पण प्रत्यक्ष फिल्डची डेप्थ मी फारशी कधी अनुभवलीच नव्हती. आणि आता तर मी परीक्षेच्या हॉलमध्येच होतो. कॅमेरा हातात येऊनही काहीच उपयोग नव्हता. फोटोग्राफीची नुसती माहिती असून चालत नाही; ज्ञान लागतं, अनुभव लागतो. नुसती पुस्तकं वाचून आणि वह्या खरडून फोटोग्राफी करता येत नसते.
मी परीक्षकांपुढे उभा राहिलो. पेपर असा होता. गच्चीवर जायचं. तिथं कॅमेरा, ट्रायपॉड, लाईट्स वगैरे सगळी जय्यत तयारी असणार होती. एक छोटी मुलगी तिथं दोरीवरच्या उडय़ा खेळेल. योग्य ते लायटिंग आणि शटरस्पीड, अॅपर्चर वगैरे सेट करून तुम्ही फोटो काढायचा. अर्थातच फुल फिगर, पोट्रेट नाही!
झटक्यात मला परिस्थितीचा अंदाज आला. आता वेळ दवडून चालणार नव्हतं. कॅमेरा देत नाहीत वगैरे सगळ्या गप्पा होत्या. त्यांनी नीट कॅमेरा वगैरे सगळं उत्तम दर्जाचं दिलं होतं. आता माझी ख:या अर्थाने परीक्षा होती. मी थेटच सांगून टाकलं, ‘‘सर, मला हे जमणार नाही!’’
मला वर्षभरात कॅमेरा कसा घेता आला नाही आणि मला प्रॅक्टीसच कशी नाही वगैरे महाभारताची कथा मी त्यांच्यापुढे कथन केली. माझी थिअरी कशी चांगली आहे आणि थिअरीचा पेपर मी कसा झकास सोडवलाय हेही त्यांना मी सांगितलं.
माझी स्टोरी शांत चित्तानं ऐकून घेऊन तेवढय़ाच शांतपणानं त्यांनी मग मला फोटोग्राफीच्या थिअरीतले चारदोन अवघड प्रश्न विचारले. एक छोटी तोंडी परीक्षाच घेतली त्यांनी माझी पुन्हा. मी झकास उत्तरं दिली. (पोपटपंची!!)
खात्री पटली त्यांची. पण तरी सर म्हणाले, ‘‘हे ठीक आहे, पण प्रॅक्टिकलचं काय? ते करून दाखवावंच लागेल.’’
मी गप्प.
थोडय़ा वेळानं उत्तर सापडल्यासारखं वाटून म्हणाले, ‘‘फोटोग्राम माहिती आहे का?’’
मी जोरात होùù म्हटल्यावर एका शिपायाला हाक मारून बोलावून घेतलं आणि मला हवी ती मदत करायला सांगून मला डार्करूमचा रस्ता दाखवला. मला आता फोटोग्रामची परीक्षा द्यायची होती.
मी खूश होतो. झगमग वाचली होती. शिवाय फोटोग्राममध्ये मी माहीर होतो. गेले वर्षभर मी तोच उद्योग करत होतो नं!!
फोटोग्राम म्हणजे काही अवघड नसतं. एरव्ही फोटोचा प्रिंट काढताना फोटोच्या निगेटिव्हचा वापर करावाच लागतो. फोटोग्राममध्ये तसं नसतं. डार्करूममध्ये रेड लाइटच्या अंधारात एन्लाजर्रच्या खाली फोटोग्राफिक पेपर ठेवून त्यावर ज्याची सावली पडू शकेल असं काहीही ठेवायचं. उदाहरणार्थ, गुलमोहराची छोटय़ा पानांची लहान डहाळी. नक्षीदार काचेचा एखादा तुकडा, अगदी ब्लेडसुद्धा चालतं. एन्लाजर्रमधून कागदावरच्या वस्तूंवर काही क्षणांत लाईट पडतो, कागद एक्सपोज होतो आणि तो डेव्हलप केल्यावर प्रिंटमध्ये उमटतात ते वस्तूंचे छान छान बाह्य आकार! हे आकार कसकसे उमटू शकतील, ह्याचा अभ्यास आणि अंदाज तुमचा जेवढा जास्त, तेवढा फोटोग्राम भारी!!
शिपायाला मी पिंपळाच्या झाडाचं वाळून जाळी पडलेल्या झाडाचं एखादं पान पैदास करायला सांगितलं.
कुरकुर करून का होईना त्यानं ते पंधरावीस मिनिटांत आणलं कुठूनसं. तोर्पयत डार्करूममध्ये जाऊन मी ‘एक्सपेरिमेंट’ करत बसलो. ब्लेडचे तुकडे, ब्रश, पेन्सिली, काचेचे तुकडे असलं काहीबाही ठेवून जमेल तेवढी कॉम्पोङिाशन्स करत होतो.
त्यानं आणलेल्या पानाचं तर मी अक्षरश: एक्स्प्लॉयटेशनच केलं. हार्ड, सॉफ्ट, सेपिया, ओव्हरलॅप. आठवतील तेवढे आणि जमतील तेवढे प्रकार मी मला दिलेल्या वेळात करून पाहिले, जास्तीत जास्त रिझल्ट मिळवले.
हे रिझल्ट तर मी मिळवलेच; शिवाय फोटोग्राफीच्या फायनल परीक्षेचा माझा रिझल्टही उत्तम लागला होता!!
आज ‘डार्करूम’ ही गोष्ट जवळजवळ कालबाह्य झाल्यासारखी असली, तरी ‘फोटोग्राम’ या ना त्या स्वरूपात जिवंत आहे. ग्राफिक आर्टमध्ये अजूनही आपलं अस्तित्व आणि महत्त्व राखून आहे.
(उत्तरार्ध)