शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

उत्तेजकांची शिडी

By admin | Published: July 30, 2016 2:29 PM

आॅलिम्पिक स्पर्धा गाजतेच. यंदाही ती अगोदरच गाजतेय. स्पर्धेपेक्षाही डोपिंगमुळे. स्पर्धा जिंकल्यामुळे मिळणारं निर्विवाद श्रेष्ठत्व, सत्ता, संपत्ती, प्रत्यक्ष युद्धाला पर्याय मानलं जाणारं हे मैदानावरचं युद्ध आणि त्यातलं जगज्जेतेपद.. खेळाडूच कशाला, जगभरातले देशही या युद्धातून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी धडपडताना आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाताना दिसतात. त्याची प्रचिती पुन्हा एकदा येतेय.

- पवन देशपांडेळ कोणताही असो.. खेळाडू कोणताही असो.. खेळणं म्हणजेच जिंकणं हे जणू सूत्रच बनत चाललंय. कोणालाच पराभूत व्हायचं नाहीए आणि त्यासाठी काहीही करायची अनेकांची तयारी आहे. आॅलिम्पिकसारख्या स्पर्धा तोंडावर आल्या की अनेक अतिरथी महारथी याच कारणानं तोंडावर आपटताना आणि आपल्या अख्ख्या कारकिर्दीवर पाणी फेरताना अन् आपल्या देशाचं नाव शरमेनं खाली घालताना दिसतात. दुर्दैवानं कोणताच देश त्याला अपवाद नाही. भारतात नरसिंग यादवच्या निमित्तानं डोपिंगचा मुद्दा पुन्हा एकदा देशभर गाजला. क्रीडा क्षेत्राची हानी तर झालीच, पण त्यातून ज्या नवनवीन गोष्टी घडल्या त्यामुळे आपलं हसंही झालं. नरसिंगनं आॅलिम्पिकच्या सर्व पात्रता पार केल्यानंतर तो डोपिंगमध्ये अडकला़ त्याला यात गोवलं गेलं असं त्याचं आणि त्याच्या प्रशिक्षकाचं म्हणणं आहे़ सत्य काय आहे, ते येत्या काळात बाहेर येईलच़ पण अशा पद्धतीनं खेळात उत्तेजकांचा शिरकाव झाल्याची मुळं खरं तर खूप खोलवर आहेत़ म्हणजे जेव्हापासून खेळ अस्तित्वात आले तेव्हापासून अशा प्रकारच्या उत्तेजकांचा वापर केला जात आहे़स्पर्धात्मक पातळीवर जेव्हापासून खेळांना सुरुवात झाली तेव्हापासून आणि अगदी आॅलिम्पिकची सुरुवातही डोपिंगला अपवाद नव्हती. त्यावेळी घेतली जाणारी उत्तेजकं वेगळी होती, स्वरूप वेगळं होतं, पण जिंकण्याच्या इर्ष्येपोटी त्या काळीही उत्तेजकं घेतली जायची़ अगदी अलीकडच्या काळाचा जरी विचार करायचा झाला तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून म्हणजे १९०४ च्या आॅलिम्पिकमध्ये मॅरेथॉन स्पर्धा जिंकणारा थॉमस हिक याला स्ट्रिशिन नावाचा पदार्थ आणि ब्रँडी दिली गेली होती़ अगदी तो धावत असतानाही त्याला त्याच्या प्रशिक्षकानं पाण्यातून उत्तेजकं दिल्याचा इतिहास आहे़ हा प्रकार नंतर नंतर वाढत गेला आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही आल्या़ गोळ्या, पावडर, द्रव्य अशा साऱ्याच प्रकारात उत्तेजकं तयार होती आणि ती आजही घेतली जातात़ रोममध्ये झालेल्या सायकल स्पर्धेत उत्तेजकांच्या अतिसेवनामुळे एका सायकलपटूचा रेसिंगदरम्यानच मृत्यू झाला़ ह्या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला जाग आली़ उत्तेजकांवर बंदी आणली जाऊ लागली आणि खेळाडूंच्या कडक चाचण्या घेतल्या जाऊ लागल्या़ त्यासाठी खास नियामक संस्थाही तयार झाल्या़ या संस्था खेळाडूंनी कुठली उत्तेजकं तर घेतली नाहीत ना याची वैद्यकीय पद्धतीनं चाचणी घेतात़ त्यात तो खेळाडू नापास झाल्यास त्याचं स्पर्धेतलं स्थान रद्द केलं जातं़ खेळाडूंनी कोणत्या प्रकारची उत्तेजकं किंवा पूरक पदार्थ घेऊ नयेत याची यादीच त्यांनी तयार केली आहे़ ही यादी जवळपास दोनशेपेक्षा अधिक घटकांची आहे़ पण त्याचं तंतोतंत पालन होताना दिसत नाही़ रशियासारखा खेळसंपन्न देशच खेळाडूंना उत्तेजकं देत असल्याचंही यंदाच्या आॅलिम्पिकच्या निमित्तानं समोर आलं. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीनं या देशातील खेळाडूंवर सुरुवातीला पूर्णपणे बंदी घातली होती़ पण अखेरच्या आठवड्यात पूर्ण बंदी न घालता निर्णय रशियातील क्रीडा संघटनांवर सोपवला़ पण रशियाच्या सर्वच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय डोपिंगविरोधी समितीच्या चाचण्यांचा सामना करावा लागू शकतो़ आणि त्यातून अनेक खेळाडू बादही ठरवले जाऊ शकतात़ यापूर्वीही काही खेळाडूंना स्पर्धांना मुकावं लागलं आहे आणि काही खेळाडूंना मिळालेली पदकंही काढून घेण्यात आली आहेत़ काही महिन्यांपूर्वी स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाचं डोपिंग प्रकरण जगासमोर आलं़ तिनं उत्तेजकं घेतल्याचं कबूलही केल़ं़ त्यात तिची आणि ओघानंच टेनिस खेळाचीही मोठी बदनामी झाली़लान्स आर्मस्ट्राँग नावाचा जगद्विख्यात सायकलपटूही असाच डोपिंगमध्ये अडकला होता़ त्यानं टू दी फ्रान्स या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या सायकल स्पर्धेत मिळवलेली सात पदकं काढून घेण्यात आली होती़ १९९४ साली विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅरिडोना इफेड्रिन नावाच्या उत्तेजक पदार्थाच्या सेवनात दोषी आढळला होता़.कोणत्याही प्रकारे प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करायची, त्यासाठी अनैतिक आणि बेकायदा मार्गांचा वापर करावा लागला तरी चालेल अशी वृत्ती बाळगून मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंमुळे खेळ आणि देश बदनाम होतात़ शिवाय खेळाडूंच्या शरीराची हानी होते ती वेगळीच.काही खेळाडूंची उत्तेजकं सेवनाची तयारी तर प्रत्यक्ष सरावापेक्षाही जास्त. आपण सेवन केलेली उत्तेजकं चाचण्यांमध्ये कशी सापडणार नाहीत यासाठीचा त्यांचा आटापिटा तर अगदीच लक्षणीय. त्यासाठीची रॅकेट्स जगभर अस्तित्वात आहेत. त्यात ‘सापडला’ तर गेला, पण नाही सापडला तर पदक मिळवण्याची शक्यता जास्त. उत्तेजकं घेऊन स्पर्धेत उतरण्याची ही मानसिकता दोन असमान पातळ्यांवर स्पर्धा निर्माण करते. जिंकण्याची ही इर्ष्या, हा शॉर्टकट एक दिवस खरोखरच आपल्याला आयुष्यातून उठवेल हे माहीत असतानाही हे सारं घडतंय..‘मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे’ ही मानसिकता, स्पर्धा जिंकल्यामुळे मिळणारे मानमरातब, सत्ता, संपत्ती, प्रत्यक्ष युद्धाला पर्याय मानलं जाणारं हे मैदानावरचं युद्ध आणि त्यातलं जगज्जेतेपद.. खेळाडूच कशाला, जगभरातले देशही या युद्धातून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आणि दुसऱ्याला ‘पराभूत’ करण्यासाठी धडपडत असताना उत्तेजकांची ही शिडी अधिकाधिक उंच जातानाच दिसते आहे. ही ‘शिडी’ कशी छाटायची, तिचं महत्त्व कसं कमी करायचं? - सगळ्याच देशांपुढचं आणि सच्च्या क्रीडाप्रेमींसमोरचं हे मोठं प्रश्नचिन्ह आहे.डोपिंगमध्ये भारत ‘टॉप थ्री’जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने अर्थात वाडाने जाहीर केलेल्या २०१४ सालच्या वार्षिक अहवालात डोपिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. भारताकडून तब्बल ९६ वेळा डोपिंग नियमांचे उल्लंघन झाले आहे. या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे. रशियातील एकूण १४८ खेळाडू डोपिंगमध्ये फेल झाले आहेत. २०१४ साली जगभरात १६९३ वेळा डोपिंग नियमांचे उल्लंघन झाले आहे. अ‍ॅथेलेटिक्स आणि बॉडीबिल्डिंग या प्रकारात सर्वाधिक ४०० वेळा डोपिंग आढळून आले आहे.रक्त बदलणारे महाभागइंजेक्शन घेणारे, गोळ्या किंवा पावडर घेणारे खेळाडू इथपर्यंत डोपिंगचा प्रकार ठीक होता़ पण आता त्याहीपुढे जाऊन ‘ब्लड डोपिंग’चा प्रकार समोर आला आहे़ खरं तर १९८० च्या दशकापासून ही पद्धत काही खेळाडू अवलंबतात़ पण आता सुरक्षित वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध असल्यानं रक्त बदलण्याची रिस्क अनेक जण घेत असल्याचं पुढं आलं आहे़ खरं तर ब्लड कॅन्सर सारखा महारोग असणाऱ्या रुग्णाचं रक्त बदलण्यात येतं़ मात्र खेळाडू आपल्या अंगातील ऊर्जा वाढावी यासाठी आपल्यापेक्षा अधिक लाल रक्तपेशी असणाऱ्या समान रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त स्वत:च्या शरीरात घेतात़ मात्र आता उत्तेजक सेवनविरोधी संघटनांनी यावरही उपाय शोधला असून, त्यातही अनेक महाभाग अडकले आहेत़(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

pavan.deshpande@lokmat.com