शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
3
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
4
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
5
"अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
7
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
8
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
9
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
10
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
11
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
12
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
13
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
14
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
16
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
17
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
18
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
19
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
20
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला

अवकाशी डोळा.. ‘सर्जिकल स्ट्राइक’साठी इस्त्रोचा रामबाण!

By admin | Published: October 08, 2016 4:42 PM

दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी उपग्रहांचा वापर पहिल्यांदा अमेरिकेनं केला. त्यातूनच ओसामा बिन लादेनचा खात्मा झाला. पाकिस्तान-अफगाण सीमेवरील तालिबान्यांना नेस्तनाबूत करण्यात आलं. आणि आता पाकिस्तानात घुसून भारतानं तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आजच्या घडीला भारताचे तब्बल ३३ उपग्रह पृथ्वीवर नजर ठेवून आहेत़ केवळ एका उपग्रहाच्या मदतीनं आपण पाकचं कंबरडं मोडलं.

- पवन देशपांडेपाच वर्षं होऊन गेली या घटनेला. शांततेत जगू इच्छिणाऱ्या जगाला ‘त्या’ रात्री सुखद हादरा देणारी घटना घडली होती. एक आॅपरेशन यशस्वी झालं होतं.या कानाची त्या कानाला खबर नव्हती. ज्या देशात ते झालं, तो पाकिस्तानही गाढ झोपेत होता. दुसरीकडे, दूर अमेरिकेत मात्र या आॅपेरशनचं लाइव्ह चित्रण पाहणं सुरू होतं. त्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘सिच्युएशन रूम’मध्ये खुद्द बराक ओबामा आपल्या अधिकाऱ्यांना घेऊन, खुर्चीत मांडी घालून चिंताक्रांत अवस्थेत बसलेले होते. कोणालाही कळू न देता त्यांनी आपलं सैन्य पाकिस्तानात उतरवलं होतं. टार्गेट होतं जगातील सर्वांत मोठा क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन. दहशतवादी जगात सर्वोच्च मानला जाणारा आणि अमेरिकेवर सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला करणारा नेता. अमेरिकेनं हे टार्गेट अचूक टिपलं. त्याच रात्री त्याचा मृतदेहही नष्ट केला. ही माहिती अमेरिकेनं जगासमोर आणली तेव्हा साऱ्यांची बोटं आश्चर्यानं तोंडात गेली होती.पण, ओबामांनी हे सारं लाइव्ह पाहिलं होतं. ऐकलं होतं. टार्गेटही आधीच मिळालं होतं. निश्चित केलं गेलं होतं. यात सर्वांत महत्त्वाची भूमिका होती सॅटेलाइटची. पाकिस्तानात घुसून ओसामाचा खात्मा करण्यात आला होता. हे सारं आठवण्याचं कारण भारतानं नुकताच केलेला ‘सर्जिकल स्ट्राइक’. दुसऱ्या देशात घुसून अशा प्रकारे कारवाई करण्याची भारताची ही पहिलीच वेळ नाही; पण जगासमोर आपण ही यशस्वी मोहीम पहिल्यांदाच स्वत:हून आणली. त्याची जोरदार चर्चा आता जगभरात सुरू आहे. या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका निश्चितच सैनिकांनी बजावली. शत्रुराष्ट्रात घुसून तेथील सैन्याचा सामना करत दहशतवाद्यांना कंठस्नान घालणं ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही़ भारतीय जवानांनी जिवाची बाजी लावून ते करून दाखवलं. त्यासाठी त्यांना सलाम करायलाच हवा़ मात्र, आता यावरूनही राजकारण रंगले आणि दुर्दैवाने ज्या गोष्टीची चर्चा व्हायला हवी, त्याची तेवढी झालीच नाही़ ही गोष्ट म्हणजे या मोहिमेत वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान.पाकिस्तानसारख्या कुरापतखोर राष्ट्रात दडून बसलेल्या दहशतवाद्यांची तळं शोधून त्यांना अचूक टिपायचं म्हणजे अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा लागणार होताच़ भारतानं तो केलाही़ यासाठी वापरण्यात आली सॅटेलाइटनं पाठविलेली छायाचित्ऱं अनेक दिवस इस्रोच्या टीमनं यासाठी काम केलं़ कोणत्या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू आहेत़, कोणत्या भागात प्रशिक्षण तळ असण्याची शक्यता आहे आणि कुठे शस्त्रधारी दहशतवादी आहेत हे सारं टिपण्याचं काम भारताच्या सॅटेलाइटनं अचूक पार पाडलं. साऱ्या शक्यता तपासून ही मोहीम आखण्यात आली होती़ उरी हल्ला करून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताला पलटवार करायची संधी दिली असं म्हणतात़ कारण, सर्जिकल स्ट्राइकसारख्या मोहिमा आखण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी घेतला जातो आणि त्यावर सर्व प्रकारचे तज्ज्ञ काम करत असतात़ तसे भारताचे तज्ज्ञही यावर गेल्या काही दिवसांपासून काम करतच होते़ इस्रोकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे कशा प्रकारची कारवाई यशस्वी होऊ शकते, याची पुरेपूर कल्पना लष्कराला होती. संरक्षण क्षेत्रात इस्रोचं महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झालं. सर्जिकल स्ट्राइक्समध्ये वापरण्यात आलेली छायाचित्रे कार्टोसॅट-२सी या सॅटेलाइटने पाठविली होती़ इस्रोनं पाठविलेल्या अशा पाच कार्टोसॅट सॅटेलाइट्सची मालिका सध्या अवकाशातून जमिनीवर डोळा ठेवून आहे़ कार्टाेसॅटची मालिका अवकाशात पाठवायची योजना इस्रोनं २००५ सालीच सुरू केली होती़ तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या क्षमतांचे पाच उपग्रह इस्रोने अवकाशात नेऊन ठेवले आहेत़ आणि ते पृथ्वीभोवती घिरट्या घालून हव्या त्या ठिकाणची छायाचित्रंही पाठवित आहेत़ सर्जिकल स्ट्राइक्समध्ये कामी आलेले कार्टोसॅट-२सी सॅटेलाइट याच वर्षी जून महिन्यात पाठविण्यात आले होते़ हा उपग्रह म्हणजे भारतीय संशोधकांनी संरक्षण क्षेत्राला दिलेलं वरदान आहे़ केवळ नव्वद मिनिटांत हा उपग्रह पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो़ या उपग्रहाचा वेग प्रति सेकंद तब्बल ३७ किलोमीटर एवढा आहे़ पण, एवढ्या वेगात जात असतानाही हा उपग्रह ०.६५ मीटर रिझोल्युशनची छायाचित्रं पाठवू शकतो. या क्षमतेची छायाचित्रं घेण्याची क्षमता असलेला उपग्रह पाकिस्तानच काय चीनकडेही नाही़ तसेच एवढ्या वेगातही एका मिनिटाचा व्हिडीओदेखील हा उपग्रह तयार करू शकतो आणि पृथ्वीवर पाठवू शकतो़ सर्जिकल स्ट्राइक्ससारखे आॅपरेशन राबवण्यासाठी अचूक माहिती हाती असावी लागते. कारण वेळ कमी असतो आणि आपल्याकडील सैन्याची हानीही होऊ नये यासाठी अचूक निशाना तसंच वेळ साधावी लागते़ म्हणूनच सॅटेलाइटचा वापर महत्त्वाचा ठरतो़ एका बाजूला कार्टोसॅट सॅटेलाइटकडून मिळालेली छायाचित्रे आणि दुसऱ्या बाजूला गुप्तचर यंत्रणेने दिलेले इनपुट्स अशा साऱ्यांचा अभ्यास करून मोहीम फत्ते केली जाते. तशी ती यावेळी केली गेली़ खरं तर जागतिक व्यापाराचं केंद्र असलेल्या दोन जुळ्या उत्तुंग इमारतींवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे डोळे खाडकन उघडले होते आणि तेव्हापासूनच अशा प्रकारच्या सॅटेलाइट यंत्राचा वापर दहशतवादाच्या नायनाटासाठी करण्याचा विचार सुरू झाला होता़ म्हणजे भारताने अशी मोहीम हाती घ्यायच्या पाच वर्षं आधी़!दहशतवादी शोधून काढण्याच्या अमेरिकेच्या दृढनिश्चयानं अवकाशातील सॅटेलाइट्सचा संरक्षण क्षेत्रासाठी वापर करण्याचा विचार प्रकर्षाने पुढे आला़ त्यानंतर अमेरिकेने अनेक छोटे-छोटे सॅटेलाइट्स अवकाशात सोडले आणि त्याद्वारे अनेक दहशतवाद्यांनाही टिपले़ ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्याची यशस्वी मोहीम ही त्याचाच एक भाग. त्यानंतर पाकिस्तान-अफगाण सीमेवर दबा धरून बसलेल्या तालिबानी दहशतवाद्यांवर ड्रोन हल्ले करणे असो वा इसिससारख्या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर हल्ले करणे असो, सारेच सॅटेलाइटच्या मदतीद्वारे केले जात आहे़ जवळपास सगळे विकसित देश आपापल्या संरक्षण दलांसाठी सॅटेलाइट्सचा वापर करत आहेत. भारत त्यातही प्रवीण असल्याचं आता सिद्ध झालं आहे़ अवकाश संशोधनासाठी इस्रोकडे सध्या १७ हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळाची फौज आहे़ हीच फौज आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासही मदत करत आहे़ मग ते जीपीएस तंत्र असो वा मोबाइल-इंटरनेट, इस्रोची कामगिरी मोलाची आहे. सर्जिकल स्ट्राइकमुळे संरक्षण क्षेत्रातील या संस्थेचं महत्त्व वाढलं आहे. आता केवळ एका सॅटेलाइट तंत्राचा वापर आपण केल्याचं पुढे आलं आहे़ भारताचे अवकाशात तब्बल ३३ सॅटेलाइट्स आहेत आणि एक मंगळाभोवती फिरतो आहे़ त्यापैकी दहा सॅटेलाइट्स हे केवळ पृथ्वीवर नजर ठेवून आहेत़ एका सॅटेलाइटच्या वापरामुळे आपण पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ नष्ट करू शकलो आणि पाकला धडा शिकवू शकलो. इतर सॅटेलाइट्सचा वापर याकामी केला तर घुसखोरी आणि सीमेपलीकडे दडून बसलेले दहशतवादी यांना समूळ नष्ट करण्यासाठी लष्कराला वेळ लागणार नाही़ इराक आणि सिरियावर युरोपचा वॉचइसिस ही दहशतवादी संघटना संपवण्यासाठी युरोपने कंबर कसली आहे़ अमेरिका या संघटनेवर अधिक हल्ले करते की आपण अशी स्पर्धा गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेली आहे़ या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी युरोपने आपले सॅटेलाइट्सही या कामावर लावले आहेत़ सॅटेलाइट्सद्वारे इसिसचे तळ शोधणे आणि दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा माग घेणे, त्यांच्यावर हवेतून मारा करणे असा प्लॅन गेल्या काही दिवसांपासून युरोप राबवित आहे़यापूर्वीही घडवली होती अद्दलकारगिल युद्धावेळी भारतीय जवानांनी सीमारेषा ओलांडू नये असा स्पष्ट निर्णय वाजपेयी सरकारने घेतला होता़ परंतु त्यानंतर २००२ आणि २००३ या काळात भारतीय विशेष दलाने सीमारेषा ओलांडून अनेकदा धाडी टाकल्या़ मात्र त्यानंतर अशी मोहीम उघडली जाण्यास तब्बल दहा वर्षांचा कालावधी गेला़ २०१२ मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून जवानांवर हल्ला केला आणि भारतीय जवानाचा शिरच्छेद केला त्यावेळी भारतानेही पाकिस्तानात घुसून मुहतोड जवाब दिला होता़ त्यानंतर ताजे सर्जिकल स्ट्राइक केले गेले़ जीसॅट-६ वापरल्यास...कार्टोसॅटचा वापर आपण केलाच पण अशाच प्रकारचे जीसॅट-६ नावाचे सॅटेलाइट संध्या भारतीय सुरक्षा दलाच्या दिमतीला अवकाशात आहे. हे सॅटेलाइट गेल्यावर्षी अवकाशात पाठविण्यात आले़ खास संरक्षण क्षेत्रासाठी याचा वापर होणार आहे़ तब्बल २००० किलो वजनाचा हा सॅटेलाइट कोणत्याही बाजूचा व्हीडिओ लाइव्ह दाखवू शकतो़ म्हणजे जर भारतानं ओसामाला मारण्यासारखं आॅपरेशन राबवलं तर त्याचंही चित्रण आपल्याकडे उपलब्ध असू शकतं़ कारण एखाद्या जवानाने आपल्या डोक्यावर कॅमेरा असलेलं हेल्मेट घातलं आणि ते जर जीसॅट-६ शी थेट कनेक्ट केलं तर युद्धजन्य स्थितीचं लाइव्ह चित्रण पाहता येऊ शकतें ओसामाच्या वेळी अमेरिकेनं हेच केलं होतं़अमेरिकाही करणार भारतीय सॅटेलाइटचा वापरअमेरिकेचा तालिबानी दहशतवाद्यांविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे आणि त्यासाठी अमेरिकन सैनिकही अफगाणिस्तानात आहेत़ काही वेळा अमेरिका तालिबानींच्या तळांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन विमानांचाही वापर करते़ या साऱ्या मोहिमेवर अमेरिकेत बसून लक्ष ठेवता यावे यासाठी अमेरिका सॅटेलाइटचा वापर करते़ आतापर्यंत युरोप याकामी अमेरिकेला मदत करत होती़ त्यानंतर चीनकडून ही मदत घ्यावी असा अमेरिकेचा विचार होता़ पण आता अमेरिकेने भारतीय सॅटेलाइटची मदत घेऊन अफगाणमधील दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासंबंधी विचार सुरू केला आहे़ म्हणजे, एक बलाढ्य देश, ज्यांच्याकडे नासासारखी अवकाश विज्ञानातील बाप संस्था आहे, तो देशही भारताची मदत घेऊ पाहतोय, यावरूनच भारतीय संशोधकांचे यश स्पष्ट होते़काळे धंदेही होतील उघडआकाशात असलेल्या डोळ्यांमुळे जमिनीवर कुठे काय सुरू आहे, याची माहिती मिळत आहे आणि येत्या काळात अशा माहितीचा योग्य वापरही केला जाणार आहे़ मुंबईतील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीचे चित्र सॅटेलाइटद्वारा दिसली होती़ त्यावरूनच आपल्याला कल्पना येऊ शकते की अवैधरीत्या सुरू असलेल्या गोष्टीही सॅटेलाइट चित्रणामुळे उघड होऊ शकतात. अवैधरीत्या सुरू असलेले खाणकाम असेल किंवा इमारतींचे बांधकाम असेल.. ही माहितीही सहज सॅटेलाइटद्वारे उपलब्ध होऊ शकते़ फक्त त्याचा वापर करून अवैध धंदे बंद करण्याची राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

pavan.deshpande@lokmat.com