शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
3
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
4
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
5
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
6
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
7
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
8
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
9
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
10
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
11
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
12
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
13
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
15
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
16
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
17
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
18
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
19
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
20
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

Father's Day 2022: फादर्स डे निमित्त बाबांबरोबर वरण भाताची गोडी वाढवणारी एक मार्मिक गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: June 19, 2022 1:38 PM

Father's Day 2022: या कथेतील वरण भाताची गोडी चाखल्यावर तुम्ही बाबांबरोबर चाखलेल्या कोणत्या पदार्थाची चव जिभेवर आणि मनावर रेंगाळली अवश्य सांगा!

>> ज्योत्स्ना रवींद्र गाडगीळ

कथेचे नाव : वरण भात 

'अहो, जेवायला काय करू ?'

समस्त स्त्रीवर्गाला पडलेला प्रश्न ही मला विचारते, तेव्हा माझं उत्तर ठरलेलं असतं-'वरण-भात कर!' २० वर्षं झाली संसाराला, अद्याप हिच्या हातच्या वरण-भाताचा कंटाळा आला नाही. कारण, हिने सर्वार्थाने माझ्या आयुष्यातली आईची उणीव भरून काढली आहे.

सुलक्षणा... माझी बायको... बडोद्याची. तिचं स्थळ सांगून आलं होतं.

मी लग्नाळू होतो, पण मनात सुप्त भीती होती. येणारी 'ती' कशी असेल, कशी वागेल, आम्हाला सांभाळून घेईल का?...आई गेल्यानंतर घरात बाबा आणि मी. इतकी वर्षं बाबांनी एकमार्गी संसाराचा गाडा ओढला. पण आता तेही थकले होते.

सुलुचं स्थळ, आयमीन सुलक्षणाचं स्थळ आलं, तेव्हा मी पॉझिटीव्ह झालो. ओळखीतल्या काकांनी तिचं वर्णनच तसं केलं होतं. ते परस्पर आमचं लग्न जुळवून मोकळे झाले होते. जणू आम्ही फक्त होकार कळवायला जात होतो.

सुलक्षणाचा साधा फोटोही मी पाहिला नव्हता. त्याकाळात फेसबुक नसल्याने तिचं प्रोफाइल पाहून एकंदरीत तिची वैचारिक ओळख करून घेणंही शक्य नव्हतं. शनिवारी रात्री गुजरात एक्सप्रेसने आम्ही निघालो. बाबांना म्हटलं, तिने मला होकार दिला, तर 'खावानु, पिवानु, मज्जानी लाईफ!' माझ्या टुकार विनोदावर बाबा मनमोकळे हसले.

दुसऱ्या दिवशी हॉटेल मध्ये फ्रेश होऊन ११ च्या सुमारास तिच्या घरी धडकलो. उंबरठ्याबाहेर सुंदर रांगोळी काढली होती. ती पाहता प्रवासाचा क्षीण निघून गेला. घरात पाऊल टाकताच तिचं नीटनेटकं आवरलेलं सुंदर घर पाहून मला आमचं पसरलेलं घर आठवलं. तिचे बाबा आणि मामा आमच्या स्वागताला उभे. चहा-पाणीही त्यांनीच दिलं.

सुलक्षणा पण समदुःखी. तिची आईसुद्धा तिच्या बालपणीच गेली. ती तिच्या मावशीच्या तालमीत वाढलेली. गेल्याच वर्षी मावशीही गेली. त्यामुळे घरात इतर बाई माणसाचा वावर नव्हता. माझी नजर सुलक्षणाला शोधत होती. मात्र स्वयंपाक घरातून फक्त भांड्यांचाच आवाज येत होता. सगळा स्वयंपाक झाल्यावर कमरेला बांधलेला पदर सोडत ती बाहेर आली आणि बाबांना वाकून नमस्कार केला. बाबांच्या तोंडून आणि माझ्या मनातून एकच वाक्य निघालं, 'अगदी नावाला साजेशी आहे-सुलक्षणा!'

बाबांनी चार किरकोळ प्रश्न विचारले. मला तर न मागता सगळीच उत्तरं मिळाली होती. तिचे मामा म्हणाले जेवून घेऊ, मग दोघांना मनमोकळं बोलता येईल.

हात पाय धुवून आम्ही चौघं पाटावर बसलो. हिने स्वयंपाक घरातून चार ताटं वाढून आणली. मला वाटलेलं, जेवणात थेपला, उंधियु, ढोकळा असं काही खायला मिळेल, पण हिने सगळा मराठमोळा बेत केला होता. बाबा अवघडून म्हणाले, 'पोरी, एकटीने एवढं सगळं कशाला करत बसलीस? नुसता वरण-भातही चालला असता.'

बाबांचे शब्द कानावर पडताच, माझी नजर ताटाबाहेरील रांगोळीवरून थेट ताटामध्ये वाढलेल्या भाताच्या मुदिवर गेली. मी जाम सुखावलो. थोडे आपलेही संस्कार दाखवावे, म्हणून ताटासमोर हात जोडले, मामांनी 'सुरुवात करा' म्हणताच वरण भातावर तुटून पडलो.

भाताची मुद तोडली, तसं साजूक तूप ओघळत खाली आलं. वरणाच्या सुवासाने भूक चाळवली होती. सुलक्षणा वरण वाढायला आली, म्हणाली, 'तळं करा'

मी भाम्बवलेल्या चेहऱ्याने वर पाहिलं, तेव्हा तिची माझी पहिल्यांदा नजरानजर झाली. तिने पटकन नजर चोरली आणि पुन्हा म्हणाली, 'भाताचं तळं करा, वरण वाढते.'

अशा ठेवणीतल्या भाषेची मला सवय नव्हती. बाबा स्वयंपाक करायचे, मी निमूटपणे जेवायचो. तिचं बोलणं माझ्या डोक्यावरून गेलंय, हे लक्षात घेऊन तिनेच वरणाच्या डावेनं भातात तळं केलं आणि त्यात वरण वाढलं. बाजूलाच बाबा बसले होते. माझी फजिती पाहून ते गालातल्या गालात हसले.

मऊ भातात बोटं शिरली आणि आईची कचकचून आठवण आली. आईने कालवलेला गुरगुट्टया भात आठवला.

'गोविन्द गोपाळ हे दोन बंधू, जेवित होते दही भात लिम्बु' असं म्हणत ती वरण भाताचा घास भरवायची आणि तिचं काव्य एडिट करत मी, 'जेवित होते, वम भात लिम्बु'  म्हणत 'वम भात' खायचो.

माझी आई साक्षात अन्नपूर्णा! तिच्या हातचा वरण-भात खाऊन कित्येक जणांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले असतील. दुर्दैवाने ते आशीर्वाद फळले नाहीत. तापाचं निमित्त झालं, आई तडकाफडकी गेली. तिच्या आठवणीने मन भरून आलं. बाबांनी माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. माझी मांडी थोपटली आणि खुणेनेच सुरुवात कर म्हटलं.

भात छान कालवून घेतला. लिंबाची फोड पिळून घेतली. पहिला घास तोंडात टाकला आणि पुन्हा बाबा आणि मी एकमेकांकडे पाहिलं. तीच चव, तेच प्रमाण, तेवढीच सात्विकता एका घासात एकवटून आली होती. बाबांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आता मी त्यांची मांडी थोपटली आणि त्यांना सावरलं. त्यादिवशी आम्ही दोघांनी यथेच्छ वरण-भात खाल्ला. भाजी-पोळी-कोशिंबीर असा बाकीचा बेतही उत्तम जमुन आला होता. श्रीखंड खाऊन डोळ्यावर पेंग आली होती, पण सुलक्षणाशी एकांतात बोलण्याची संधी मिळणार, म्हणून दोन्ही मुठी पालथ्या करून डोळे चोळले आणि तिची वाट बघू लागलो. सगळं आवरून ती खोलीत आली.

'अहो, तुम्ही जेवून घ्या, मी थांबतो.'

'हरकत नाही, मी जेवीन सावकाश'

'बरं, तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर मनमोकळेपणाने विचारा.'

'माझे प्रश्न काहीच नाहीयेत, फक्त बाबांची काळजी आहे. माझ्या लग्नानंतर ते एकटे पडतील, ह्या विचाराने अस्वस्थ व्हायला होतं, म्हणून...'

'समजू शकतो. तुम्हाला जशी तुमच्या बाबांची काळजी आहे, तशी मला माझ्या बाबांची. हरकत नसेल तर तुमचे बाबा कायमचे 'आपल्या' घरी आले तर आवडतील.

'आपल्या घरी???' चकाकत्या डोळ्यांनी सुलक्षणा माझ्याकडे बघत होती.

मी खोडसाळपणे म्हटलं, 'अट एकच आहे, आजच्या सारखा वरण-भात रोज करून वाढावा लागेल.'

'मला काहीच हरकत नाही, पण तुम्हाला तळं करता आलं पाहिजे.' सुलक्षणेच्या हजरजबाबी उत्तराने माझ्या हृदयात कायमचा तळ ठोकला गेला.

आता तर ती माझी सुलु आणि दोन मुलांची आई झाली आहे. आमचा फुलता संसार बघून बाबा आणि सासरे दोघांनी दहा वर्षांपूर्वी एक्झिट घेतली. त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही सुखासुखी सुरू आहे. मी माझं वचन पाळलं आणि सुलु ने तिचं!

आजही तोच वाफाळलेला भात, पिवळं धमक वरण, साजूक तूप आणि लिंबाची फोड माझी वाट पाहतेय. इतकी वर्षं हा पदार्थ चवीने खातोय, पण शप्पथ सांगतो, वरण भाताचा पहिला घास तोंडात टाकला, की माझा 'गुलाबजाम' चित्रपटातला सिद्धार्थ चांदेकर होतो...!

टॅग्स :relationshipरिलेशनशिपfoodअन्न