शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

ट्रेन १८!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 6:03 AM

बुलेट ट्रेनच्या आधी येत्या काही दिवसांत येतेय ताशी दोनशे किलोमीटर वेगानं धावणारी ‘सेमी हाय स्पीड’ रेल्वे..

ठळक मुद्दे ‘मेक इन इंडिया’ योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.

भारतीय रेल्वेचा आजपर्यंतचा नोंदवला गेलेला सर्वाधिक वेग होता ताशी १६० किलोमीटर; पण रेल्वेनं आता ‘ट्रेन १८’ ही नवी रेल्वे रुळांवर उतरवण्याचा निर्णय घेतला असून, पारंपरिक रेल्वेपेक्षा ती सर्वार्थानं वेगळी असणार आहे.बुलेट ट्रेनच्या आधी ही ‘सेमी हाय स्पीड’ रेल्वे रुळांवर उतरेल. या रेल्वेची चाचणीही घेण्यात आली असून, येत्या काही दिवसांत प्रवाशांना घेऊन ती धावताना दिसेल. ही रेल्वे आतापर्यंतची सर्वात वेगवान रेल्वे तर असेलच; पण तिच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांमुळेही सध्या ती चर्चेत आहे.काय आहे ‘ट्रेन १८’चं वैशिष्ट्य?..- ‘मेक इन इंडिया’ योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं असतील.- रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि ‘अ‍ॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स’ असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.- पहिल्या ‘ट्रेन १८’मध्ये १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ तर दोन डबे ‘एक्झिक्युटिव्ह’ असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.- ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.- ही रेल्वे येत्या काळात ‘शताब्दी एक्सप्रेस’ची जागा घेईल.- सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वे देशात वेगवेगळ्या मार्गावर धावतील.- ही रेल्वे बनवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च आलेला आहे. आयात रेल्वेपेक्षा हा खर्च निम्म्यानं कमी आहे.- ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावेल, हे अजून निश्चित नसले तरी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावण्याची ती शक्यता आहे.- सर्व काही नियोजनाप्रमाणे झालं तर २५ डिसेंबर २०१८पासून ही रेल्वे रुळांवर धावू शकेल. २५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. भारतीय रेल्वेचीही वाजपेयी यांना ती आदरांजली ठरेल.- मंथन प्रतिनिधी