शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

उडत्या टॅक्सीतून तरंगता प्रवास

By admin | Published: May 06, 2017 5:06 PM

माणसाच्या उडत्या प्रवासाच्या नव्या प्रयत्नांचा हवाई पाठलाग...

पवन देशपांडे
 
कर्णकर्कश हॉर्न.. रोजच्या ट्रॅफिकचा वैताग..गाड्यांमुळे होणारं प्रदूषण.. धुराच्या लोळात अंधुक झालेले रस्ते..रस्त्यातले खड्डे आणि खड्ड्यातले रस्ते.. वाटेत लागणारे सिग्नल्स..न संपणाऱ्या रांगांतलं किरकिरेपण.. हव्या त्या जागी, हव्या त्या वेळी पोहोचणार तरी कसं? या साऱ्या कटकटींपासून वाचायचं तर हवेतून तरंगतच जायला हवं. हो, हवेतून उडत जाणारी ही टॅक्सी आता प्रत्यक्षात येऊ घातली आहे. दुबई आणि डल्लाससह काही शहरांत या एअर टॅक्सीची  चाचणीही घेण्यात आली आहे़.
 
 
अत्यंत घाईत एखादे काम करायला किंवा ऑफिसच्या बैठकीला निघालात आणि नेमकं त्याचवेळी रस्त्यात ट्रॅफिक लागलं तर...?
ही अशी वेळ आपल्यासाठी खरंतर नेहमीच येते़ 
नेमक्या आपल्या घाईच्या वेळी कुठेतरी ट्रॅफिक तुंबून बसलेली असते. रस्त्यात कुठेतरी खड्डा खोदलेला असतो. वाहतूक मंद गतीने सुरू असते. रस्त्याचे काम तरी सुरू असते. 
यातूनही सुटका असेल तर एकापाठोपाठ एक लागणारे रेड सिग्नल आपला पिच्छा सोडत नाहीत़ 
त्रागा, त्रागा आणि त्रागा करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो़ कारण, चित्रपटात दाखवतात तशी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर जाण्याची सोय आपल्याकडे नसते़ आपण मग कधी ट्रॅफिकला शिव्या देत, कधी नशिबाला दोष देत, तर कधी सिस्टिमला दोष देत आपला वेळ काढतो़ 
पण, या सगळ्या कटकटींतून मुक्ती मिळण्याचा मार्ग प्रत्यक्षात येण्याची शक्यता बळावली आहे़ 
त्यानं काय होईल?
खड्डे नकोत. कोणतेही खोदकाम नको. सिग्नल नकोत अन् ट्रॅफिकही नको़ एवढंच काय रस्तेही नकोत़ कार, सिटी बस किंवा आॅटोरिक्षाही नको़ अशा मार्गाने तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल. 
खरंय. हे सगळं नको असेल तर जमिनीपासून काही फूट वर तरंगत हवेतून जाण्याशिवाय पर्याय नाही़ 
ही सोय आहे एअर टॅक्सीची. 
तुम्ही टॅक्सीचं बुकिंग करण्यासाठी त्या कंपनीचा अ‍ॅप सर्च करता़ आपल्या आसपास टॅक्सी आहे का? आपल्या वेळेत आपल्याला टॅक्सी मिळेल का? किती भाडे लागेल? एवढेच नाही तर किती वेळात आपली टॅक्सी येईल? अशी सगळी माहिती टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीच्या अ‍ॅपवर लगेच मिळते़ शिवाय टॅक्सीचे पर्यायही दिलेले असतात़ समजा तु्म्हाला छोटी गाडी हवी असेल तर, सेडान प्रकारातील गाडी हवी असेल तर तीही आणि त्याहीपेक्षा मोठी हवी असेल तर तशीही सुविधा उपलब्ध असते़ एवढेच नाही तर आता टॅक्सी कमी असणाऱ्या शहरांमध्ये आॅटोचाही पर्याय उपलब्ध असतो़ पण येत्या काही वर्षांमध्ये तुम्हाला अशा अ‍ॅपच्या माध्यमातून उडणारी टॅक्सीही बुक करता येईल़ 
अर्थात हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारी ही टॅक्सी. फिल्मी वाटेल. पण, आता ही संकल्पना येत्या काही वर्षांतच प्रत्यक्षात येणार आहे. 
दुबई आणि डल्लास यांसह काही शहरांमध्ये एअर टॅक्सीची चाचणीही घेण्यात आली आहे़ 
एका इमारतीच्या टॉप फ्लोअरला ‘एअरपोर्ट’ असेल़ तिथे गेले की एक एअर टॅक्सी तुम्हाला घेऊन दुसऱ्या इमारतीवर असलेल्या एअरपोर्टला लँड होईल़ हा सारा प्रवास हवेतून असेल़ 
माणूस हवेत उडायची स्वप्ने पाहू लागला तेव्हापासून ते आतापर्यंतच्या हवेतील रॉकेट वेगाने होणाऱ्या प्रवासापर्यंतच्या विज्ञानाच्या वेगात अनेक पिढ्या सहभागी झाल्या आहेत. आताच्या हवाई प्रवासाच्या सोयी ह्या दीड शतकाआधी माणसाने पाहिलेल्या हवाई स्वप्नांचे फलित आहे़ तेव्हा फक्त आपल्याला हवेत उडता यावे, त्यासाठी पंख असावे या दृष्टीने शोध सुरू झाला होता़ आता आपल्याला हवेतील प्रवासाच्या जवळपास साऱ्याच सोयी-सुविधा उपलब्ध आहेत़ ३० हजार फूट उंचावरून प्रवास करतानाही घरात असतात तशा सर्व सोयी असतात़ 
पण ही असते सार्वजनिक सोय़ एखादी विमान कंपनी ती उपलब्ध करून देते़ अनेक लोकांसाठी एकच विमान असते़ अर्थात काही स्पेशल लोकांसाठी स्पेशल विमाने असतात ती बात अलाहिदा़ पण त्याचेही प्रमाण फारच कमी आहे़ विमानातून एकट्याने प्रवास करण्याची संकल्पना अद्यापतरी सर्वसामान्यांच्या आवाक्यापर्यंत पोहोचलेली नाही़ 
हाच बदल काही वर्षांमध्ये होऊ घातला आहे़ 
आता थेट टॅक्सीसेवा देणाऱ्या कंपनीने उडणाऱ्या टॅक्सीची सेवा देण्याची घोषणा केली आहे़ ही सेवा येत्या तीन वर्षांत सुरू होईल, अशी खात्रीही उबर या कंपनीने व्यक्त केली आहे़ 
ही टॅक्सी असेल छोट्या आकाराची़ एका माणसाला बसता येईल एवढीच़ ती बॅटरीवर चालेल़ फोटोग्राफीसाठी किंवा इतर काही कामांसाठी छोटे छोटे ड्रोन वापरले जातात़, त्याचीच ही मोठी आवृत्ती असेल, असे सध्यातरी दिसते़ कारण ही टॅक्सी बॅटरीवर चालणार आहे़ शिवाय एका ठिकाणाहून उड्डाण घेतल्यानंतर कोणत्या मार्गाने कोणत्या ठिकाणी लँड व्हायचे आहे, याचे प्रोग्रामिंग करून ठेवलेले असेल़ विशेष म्हणजे, यात कोणीही पायलट नसेल़ रिमोटद्वारे आॅपरेट न होता थेट प्रोग्रामिंगने याचे कार्य चालेल़ दुर्दैवाने या प्रोग्रामिंगमध्ये ऐनवेळी बिघाड झालाच तर त्याला लगेच बॅकअप प्रोग्राम असेल. ही टॅक्सीसेवा सुरू करण्यासाठी सध्या प्राथमिक पातळीवर चाचण्या झाल्या आहेत़ ही वाहतूक बॅटरीवर आधारित असल्याने ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ 
पण, या सेवेच्या भवितव्याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत़ अनेक शंका अद्याप कायम आहेत.
तुम्ही विमान कुठेही उतरवू शकत नाहीत. हेलिकॉप्टरलाही त्यासाठी नियम आहेत. अनेक परवानग्यांच्या फेऱ्यातून जावे लागते. आपण रस्त्यांवर विमान उतरवण्याचा विचार करत आहोत. पण एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उड्डाण करताना त्यासाठी शहरभरात अनेक छोटे छोटे एअरपोर्ट बनवावे लागतील. कदाचित त्यांना फ्लाइंग टॅक्सी पोर्ट असंही म्हटलं जाईल. पण, एखादी टॅक्सीसेवा देणारी कंपनी या व्यवसायात उतरली, तर त्यांना खासगी पातळीवर असे पोर्ट उभारण्यास परवानगी मिळण्याची शक्यता सध्यातरी दुरापास्त वाटते. भारतात तर परवानगीशिवाय खासगी ड्रोन उडवण्यासही परवानगी नाही. त्यासाठी सध्या नियमावलीही नाही. मग अशा टॅक्सींचा विचार ही तर दूरचीच गोष्ट आहे. 
ही सोय उपलब्ध होण्यासाठी आता अनेक बड्या कंपन्या काम करत आहेत़ भविष्यातील प्रवास आणखी सुखकर व्हावा, यासाठी नवनव्या शक्कल लढवत आहेत़ 
पण़़ हे सारं खरंच प्रत्यक्षात शक्य आहे का? त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, मनुष्यबळ, परवानग्या अन् महत्त्वाचे म्हणजे त्यासाठीची सुरक्षा, हे सारं मिळवणं सोपं आहे का?
आहे तरी काय या उडत्या टॅक्सींची कहाणी? सारं जग त्याचीच उत्सुकता बाळगून आहे़ 
वाट पाहतंय, हे मृगजळ प्रत्यक्षात यावं, याची़
 
किती वर्षे वाट पाहावी लागेल?
मुंबईसारख्या शहरात लोकल ट्रेन, मेट्रोने उपनगरं जोडली गेली आहेत़, पण या व्यवस्थेचीही मर्यादा एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंतच़ या लोकल, मेट्रोमधून उतरल्यानंतर गाठावी लागते टॅक्सी किंवा रिक्षाच़ मग ट्राफिकचा संबंध येतोच़ पुन्हा रस्त्यावरही काही किलोमीटरपर्यंत थांबलेल्या वाहनांच्या रांगा आणि तीच कटकट. त्यामुळे अशा गर्दीच्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवेतून जाण्याची सोय असणे, म्हणजे स्वप्नवत प्रवासच म्हणावा लागेल़ पण आपल्या राज्यात छोटी शहरे विमानाने दुसऱ्या मोठ्या शहराशी आत्ता कुठे जोडली जात आहेत, त्यात छोटे ड्रोन उडवण्यासही बंदी आहे. हेलिकॉप्टर तर क्वचितच पाहायला मिळतात़ त्यात अशी उडती टॅक्सी आपल्याही शहरात यावी, असे वाटत असेल तर त्यासाठी किमान २० वर्षे तरी वाट बघावी लागेल़
 
उडत्या टॅक्सीच्या मर्यादा
विमानाची उड्डाणाची पद्धत वेगळी असते़ म्हणून विमान प्रवास हेलिकॉप्टर प्रवासापेक्षा स्वस्त असतो आणि परवडणारा असतो़ हवेच्या दाबापेक्षा अधिक दाब निर्माण करून वर झेपावण्यासाठी हेलिकॉप्टरला अधिक इंधन लागते़ फोटोग्राफीसाठी वापरला जाणारा ड्रोन आकाराने लहान असतो़ त्यामुळे त्याला लागणारी बॅटरीही कमी आकाराची चालते़ पण त्यालाही उड्डाणाच्या मर्यादा असतात़ अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ ड्रोन सहसा हवेत राहू शकत नाही़ तसेच तंत्रज्ञान जर या फ्लाइंग टॅक्सीमध्ये वापरले गेले तर त्याला मर्यादा येणार आहेत़ एखादी टॅक्सी किती काळ हवेत राहू शकेल, यानुसार तिचे मार्गही ठरवावे लागतील़ सध्या मोबाइलसाठी छोट्या छोट्या बॅटऱ्याही अधिक काळ चालतात़, पण हवेत उडणाऱ्या या उडत्या टॅक्सींसाठी छोट्या आकाराची, वजन कमी असणारी, पण अधिक काळ अधिक क्षमतेने चालणारी बॅटरी तयार करावी लागेल़ सध्या चाचणी करण्यात आलेल्या फ्लाइंग कारमध्ये बॅटरीही तपासली गेली असणार यात वाद नाही, पण त्यात अधिक क्षमता असल्यास कुठलाही धोका निर्माण होणार नाही़
 
दुबईत पर्यटकांसाठी आकर्षण
फ्लाइंग टॅक्सी हे पर्यटनासाठी मात्र आकर्षण ठरेल़ आपल्याकडे मुंबईच्या समुद्रातून उडणारे विमान आहे़ पुणे-नाशिकसारख्या शहरांमध्ये एखाद्या तळ्यावर विमान उतरू शकते़ पर्यटकांसाठी आकर्षण म्हणून या विमानाची सोय करण्यात आली असली तरी त्याला फारसा प्रतिसाद असल्याचे दिसत नाही़ नवी फ्लाइंग टॅक्सीसेवा दुबईसारख्या शहरात सुरू केली जाणार आहे़ तेथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही भरपूर आहे़ या पर्यटकांना नवीन आकर्षण म्हणून या सेवेकडे पाहिले जाऊ शकते़ 
 
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)