शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

फूटपाथ ते पंचतारांकित हॉटेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 6:02 AM

लक्ष्मणराव मूळचे अमरावती जिल्ह्यातील. कामाच्या शोधात दिल्लीत चहा विकू लागले. चहाइतकीच त्यांना लिखाणाचीही गोडी. त्यांच्या पुस्तकांची कीर्ती राष्ट्रपती भवनापर्यंत आणि चहाची कीर्ती पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचली. आजही ते चहा विकतात.. सकाळी आलिशान हॉटेलमध्ये आणि दुपारी रस्त्यावरच्या आपल्या टपरीवर!

ठळक मुद्देलक्ष्मणराव यांचे साहित्य प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या चहाचे दिवानेही खूप आहेत. त्यांची महती जनपथ मार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचली आणि हॉटेल प्रशासनाने त्यांना नोकरीची ऑफर दिली. गेल्या महिन्यातच ‘टी कन्सल्टंट’ म्हणून ते रुजू झालेत.

- विकास झाडे

दिल्लीने कायमच ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:।।’ अशी संस्कृती जोपासली आहे. इथल्या वाहनांच्या गर्दीत प्रत्येक दहापैकी एक कार अन्य राज्यातून नोंदणी झालेली दिसेल. एखाद्या विडीपान टपरीसमोर जमलेल्या गर्दीत दोन-तीन भाषा कानावर हमखास धडकणारच. देशभरातील सगळ्या भाषाधर्मियांना सहजतेने सामावून घेणारी ही दिल्ली आहे. जो दिल्लीत रमला तो दिल्लीकर होतो. मग त्यालाही दिल्ली भरभरून देत असते. मिल बंद पडल्याने वयाच्या २३ व्या वर्षी दिल्ली गाठून फुटपाथवर संसार थाटत आकाशाला कवेत घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका मराठी तरुणाची कहाणी अशीच रोमांचकारी आहे. दिल्लीच्या फुटपाथनेच या तरुणाला जगण्याची नवी उमेद दिली. श्रम, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागण्याचा त्यांच्यातील मराठी संस्कार लक्ष्मण शिरभाते या ‘चहावाल्या’ तरुणाला ‘साहित्यिक’ लक्ष्मणराव म्हणून नवी ओळख देणारा ठरला. आज लक्ष्मणराव ६९ वर्षांचे आहेत. ३० ग्रंथ, कादंबऱ्या त्यांच्या नावाने जमा आहेत. या कादंबऱ्या फुटपाथवर जशा लक्ष वेधतात तशाच आता त्या दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये उच्चभ्रू लोकांच्या गर्दीत असतात.

चार दशकांपेक्षा अधिक काळ फुटपाथवर अधिकृतपणे ‘चार बाय सहा’ इतक्या जागेवर लोकांना चहा देताना स्वत:चे साहित्यिकविश्व उभे करणारे लक्ष्मणराव यांची ख्याती आता देश-विदेशात पसरली आहे.

लक्ष्मणराव मूळचे अमरावती जिल्ह्यातील. घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हायस्कूलपर्यंत कसेबसे शिक्षण घेता आले. त्यानंतर त्यांना सुतगिरणीत काम करावे लागले. गिरणी बंद पडल्यावर कधीही न पाहिलेल्या दिल्लीला पोहोचले. मात्र, पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दीनदयाल उपाध्याय मार्गावर बांधकामाच्या ठिकाणी डोक्यावर विटा उचलण्याचे काम सुरू केले. काम रोज मिळत नसल्याने याच परिसरातील विष्णू दिगंबर मार्गावरील टपरीवर विडीपान विकण्याचे काम सुरू केले. फुटपाथवर अनधिकृत बसतो म्हणून त्यांना पोलिसांचा खूपदा मार खावा लागला. अनेकदा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे सामान फेकून दिले. संघर्षानंतर फुटपाथ हॉकरचा परवाना मिळाल्यावर लक्ष्मण रावांनी चहाची टपरी सुरू केली. केवळ लोकांना चहा पाजणे एवढेच त्यांचे ध्येय नव्हते. त्यांच्या डोक्यात विविध विषय असायचे. गावातील रामदास या पहिलवान तरुणाची प्रेमकथा त्यांच्या डोक्यात होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ती कागदावर उतरवली आणि पहिली कादंबरी तयार झाली. आठवड्यातील एक दिवस ते दरियागंज येथील पुस्तक बाजारात घालवायचे. त्यांना गुलशन नंदा खूप भावले आणि त्यांच्यातील साहित्यिक उदयास आला. शेक्सपीयर, सोफोक्लीज, मुन्शी प्रेमचंद, शरदचंद्र चटोपाध्याय हे त्यांचे आवडते लेखक झाले. याच काळात त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बीए, एमएची पदवी घेतली.

गेल्या चार दशकांतील फुटपाथवरील चित्र बरेच बदलले. थाटलेल्या चहाच्या दुकानालगत एक कापड अंथरलेले असते आणि त्यावर ३० ग्रंथ, कादंबऱ्या पसलेल्या असतात. या परिसरातील लोकांसाठी ते आदराचा विषय आहेत. पोलीसही त्यांना आता कडक सॅल्युट मारून निघून जातात. लक्ष्मणराव दररोज सकाळी पाच ते सहा तास घरी लेखन-वाचन आणि दुपारी तीनपासून रात्री नऊपर्यंत चहाची टपरी चालवतात. ‘फुटपाथवर अख्खे आयुष्य गेले, आता या जागेची सवय झाली. या जागेने माझ्यातील लेखक जगवला. ती जागा सोडवत नाही म्हणून चहा विकतो,’ असे ते आवर्जून सांगतात. या काळात त्यांचे राष्ट्रपतींकडून कौतुक झाले, कित्येक पुरस्कारही मिळाले.

आता लक्ष्मणराव यांची ग्रंथसंपदा जगभर पसरली आहे. त्यांची पुस्तके फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, ॲमेझॉन, शॉप क्लुज, डेली हंट, पेटीएम, किंडलवर विक्रीस उपलब्ध आहेत. विदेशातील लोक लक्ष्मणराव यांना भेटायला येतात. ज्या हिंदी भवनपुढे चहा विकण्यात आयुष्य चालले त्याच हिंदी भवनच्या सभागृहात लक्ष्मणराव पुस्तके कशी लिहायची आणि प्रकाशन कसे करायचे यावर कार्यशाळा घेतात. आता त्यांचे साहित्य उर्दू, पंजाबी आणि इंग्रजी भाषेतही आहे. गंमत म्हणजे लक्ष्मणराव यांचा पत्रव्यवहाराचा अधिकृत पत्ता, आधार कार्ड, मतदान कार्ड याच पत्त्यावरील आहे. त्यांना खूप पत्रे येतात. शेजारच्या इमातीमधील गार्ड किंवा कर्मचारी सन्मानाने त्यांची पत्रे ठेवून घेतात.

लक्ष्मणराव यांचे साहित्य प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या चहाचे दिवानेही खूप आहेत. त्यांची महती जनपथ मार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचली आणि हॉटेल प्रशासनाने त्यांना नोकरीची ऑफर दिली. गेल्या महिन्यातच ‘टी कन्सल्टंट’ म्हणून ते रुजू झालेत. हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रत्येकाला पहिला चहा लक्ष्मणराव यांनी केलेला मिळतो. या हॉटेलमध्ये लक्ष्मणरावांची सगळी पुस्तके प्रदर्शित करण्यात आली आहेत.

लक्ष्मणराव म्हणतात, महाराष्ट्रातून खूप मोठमोठे लोक इथे दररोज येतात. मी मराठी आहे हे माहिती झाल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात. खूप छान वाटते.

लक्ष्मणराव अफलातून व्यक्ती आहे. ते अद्यापही सायकलवर फिरतात. कधी दिल्लीला आलात तर त्यांना हमखास भेटा. २०० रुपये खिशात असतील तर पंचतारांकित हॉटेलमध्ये अन्यथा दुपारी ३ नंतर हाच चहा त्यांच्या टपरीवर १० रुपयांमध्ये प्या..!

(निवासी संपादक, नवी दिल्ली)