लोकमत न्यूज नेटवर्कअलीकडच्या काळात कुठे पर्यटनाला, पिकनिकला जाऊन आलात?अर्थातच कोरोनाच्या काळात ते शक्य नव्हतं आणि नाही. त्यामुळे लांबच्या पर्यटनाला, विशेषत: परदेशात पर्यटनाला जाण्याचा अनेकांचा बेत हुकला आणि त्यांना घरातच थांबावं लागलं. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. आता काही देशांत पर्यटनाला सुरुवात झाली असली, तरी अगोदरचा तो उत्साह आणि उत्सुकता आता नाही. त्यामुळे पर्यटनापासून लोक अजूनही चार हात लांबच राहताहेत.पण पर्यटनासाठी जगातले सर्वाधिक पसंतीचे देश कोणते? लोक देशाबाहेर पर्यटनासाठी कुठे जातात?याबाबत जागतिक पर्यटन संस्थेनं नुकताच एक सव्र्हे प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 2008 ते 2018 या कालावधीत पर्यटकांसाठी जगातल्या सर्वाधिक पसंत देशांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे फ्रान्स. या दहा वर्षांत सर्वाधिक पर्यटकांनी फ्रान्सला भेट दिली आहे. दुसर्या क्रमांकावर आहे अमेरिका, तर तिसरा क्रमांक पटकावला आहे स्पेननं.अर्थातच पहिल्या दहा क्रमांकात भारताचा कुठेही समावेश नाही. भारताचा नंबर कितवा हेही कळू शकलेलं नाही. कारण जागतिक पर्यटन संस्थेनं पहिली दहा नावंच फक्त जाहीर केली आहेत. अर्थात या यादीत यायचं तर त्यासाठी भारताला बरेच प्रय} करावे लागतील.
पर्यटकांची पसंती फ्रान्सला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 6:04 AM
पर्यटनासाठी जगातले सर्वाधिक पसंतीचे देश कोणते? लोक देशाबाहेर पर्यटनासाठी कुठे जातात? याबाबत जागतिक पर्यटन संस्थेनं नुकताच एक सव्र्हे प्रसिद्ध केला आहे.
ठळक मुद्देया यादीत भारताचे स्थान कुठे?