>> अक्षय भिंगारदिवे
त्या : अक्षय बोलतोय?मी : हो.त्या : खूप सरळ, साधं आणि सोपं लिहितोस बाळा.मी धन्यवाद. त्या : मी तुझा कॉन्टॅक्ट नंबर आठवडाभर शोधला. मी : फेसबुकवर एक मेसेज केला असता तरी..त्या : अरे फेसबुक नाही वापरत मी.मी : मग लेख कुठे वाचले?त्या : आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मैत्रीण शेअर करत असते. मी : ओके.त्या : मलाही माझं आयुष्य बदलवणारा एक अनुभव शेअर करायचा आहे. मी : ओके. त्या : विषय नाही विचारणार?मी : नाही.त्या : का?मी : माझ्या आईने एखादा अनुभव शेअर करायची इच्छा व्यक्त केली असती, तर तिलाही विषय नसता विचारला.त्या : तुम्ही मुलं ना खूप हट्टी असता. कधीच आम्हा वेडपट आयांचं ऐकत नाही. मी : अगदी सहमत.त्या : अक्षय सर्वांना पावसाळा आवडतो. मी : हो. कारण पावसाळा नवचैतन्य घेऊन येतो.त्या : मला मात्र पावसाळा अजिबात आवडत नाही.मी : का?त्या : सांगते.मी : ओके.त्या : आमचं त्रिकोणी कुटुंब.मी : ओके.त्या : मी, माझे मिस्टर आणि सौरभ.मी : सौरभ म्हणजे मुलगा?त्या : हो. २७ वर्षांचा. अगदी तुझ्यासारखा.. मी : म्हणजे?त्या : साडेपाच फूट उंच, बडबड्या, पॅशनेट, सर्वांना मदत करणारा आणि.. मी : आणि?त्या : आणि.. मी बोलतच राहील.मी : आईची माया.त्या : १५ ऑगस्ट २०१६ मी : कसली तारीख?त्या : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सौरभ आणि त्याच्या मित्रांनी फिरायला जाण्याचा प्लॅन केला. मी : ओके.त्या : म्हणूनच दरवर्षीप्रमाणे अगदी सकाळपासून मी चौकशी करत बसलेले.मी : कसली?त्या : किती जण जाणार आहात? गाडी कुठली आहे? ड्रिंक करणारे किती जण आहेत? गाडी कोण चालवणार आहे?मी : मग?त्या : सौरभने सांगितलं होतं की, ६ जण जाणार आहोत. २ जण ड्रिंक करणारे आहेत. मात्र ते ड्रायव्हिंग करणार नाहीत.मी : ओके.त्या : त्यानंतर सौरभला मी बजावलंदेखील होतं. मी : कशाबद्दल? त्या : पोहता येत नसल्याने, खोल पाण्यात उतरू नको.मी : साहजिकच.त्या : त्याने नेहमीप्रमाणे होकारार्थी मान डोलावली आणि बॅग उचलून तो घराबाहेर पडला. मी : ओके. त्या : रात्री ९ वाजेपर्यंत घरी येईल, असं सौरभने जाताना सांगितलं होतं. मी : ओके.त्या : रात्रीचे १० वाजून गेल्यावरही सौरभ घरी न आल्याने, मला काळजी वाटायला लागली होती. मी : मग?त्या : घरी यायला उशीर होणार असेल, तर सौरभ फोन करून हमखास कळवायचा. मी : त्यादिवशी?त्या : त्यादिवशी त्याचा नंबर नॉट रिचेबल होता.मी : ओके.त्या : मी रात्री ३ वाजेपर्यंत त्याची वाट बघत जागी होते. मात्र मग त्यांनतर माझा डोळा लागला. मी : ओके.त्या : सकाळी उठले तर मिस्टर घरी नव्हते, आणि माझी नणंद, बहीण आणि जाऊबाई घरी आलेल्या होत्या.मी : ओके.त्या : सौरभ अजूनही घरी न आल्याने, मी अस्वस्थ झालेली होते. मी : साहजिकच.त्या : त्यात ही सर्व लोकं अचानक घरी आल्याने, मनात नको नको ते विचार येत होते. मी : बरोबर.त्या : अखेरीस दुपारी १ वाजता मला समजलं.
मी : काय?त्या : सौरभच्या गाडीचा अपघात झाल्याने त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे.मी : अरे..त्या : ती बातमी कळल्यापासून तर, मी वेड्यासारखी रडत होते. काहीही करून मला सौरभला पाहायचं होतं.मी : काळजी..त्या : मात्र सर्वांनी मला समजवण्याचा प्रयत्न केल्याने, अखेरीस मी देवासमोर हात जोडून उभी राहिले.मी : आई..त्या : माझ्या सौरभला सुखरुप घरी आण, एवढीच प्रार्थना तेव्हा मी देवापुढे करत होते.मी : जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तशी माझी अस्वस्थता वाढत होती. त्या : अखेरीस साडेपाच वाजता मला बिल्डिंगच्या खाली मोठा गोंधळ ऐकू आला. मी : मग?त्या : मला काहीच सुचत नसल्याने, मी गर्दीच्या दिशेने धावत निघाले. मी : मग?त्या : अक्षय तुझा विश्वास बसणार नाही.. मी : कशावर?त्या : माझ्या सौरभला त्या लोकांनी गाठोड्यात आणलेलं. मी : OMGत्या : मला माझे मिस्टर म्हणाले की, सौरभ आपल्याला सोडून गेला. मी : नाही सहन होत. त्या : कसा विश्वास ठेवणार, तूच सांग..मी : आईचं काळीज.त्या : मला शेवटचं पाहता पण नाही आलं माझ्या लेकराला.मी : नियती.त्या : अक्षय मी त्या घटनेनंतर जिवंत प्रेत बनले होते.मी : मानसिक धक्का. त्या : हो. त्यातून बाहेत यायला मला ३ वर्षे लागली.मी : हॅट्स ऑफ.त्या : जगायची इच्छाच उरली नव्हती.मी : आठवणींच्या रूपात, सौरभ कायम तुमच्या सोबतच आहे. त्या : म्हणून तर कारण शोधलं.मी : कसलं?त्या : अपघाताचं. मी : काय झालेलं?त्या : दिवसभर मौजमस्ती करून संध्याकाळी सौरभ आणि त्याचे मित्र जेवायला एका ढाब्यावर थांबलेले.मी : मग?त्या : तिथे त्यांच्यापैकी काही मित्रांनी ड्रिंक केलेली.मी : ओके.त्या : दारूच्या नशेत त्यातल्या एकाने गाडी चालवण्याचा हट्ट केला.मी : मग?त्या : बाकीच्या मित्रांनी खूप समजावलं, मात्र त्याने काही ऐकलं नाही.मी : च्यामारी.त्या : रात्री जोरदार पाऊस चालू होता आणि त्यात तो मुलगा नशेत. मी : मग?त्या : रस्त्यात बंद पडलेला ट्रक त्याला दिसलाच नाही. मी : अरे..त्या : तरी अखेरच्या क्षणी त्याने स्वतःची बाजू वाचवली आणि गाडीची दुसरी बाजू ट्रकला धडकली.मी : बाप रे..त्या : ६ पैकी २ जण जागेवर गेले, त्यात माझा सौरभ होता. मी : दुर्दैव.त्या : जगलेल्या चौघांपैकी दोघांना अजूनही व्यवस्थित चालता बोलता येत नाही. आयुष्याचं अपंगत्व.. मी : वाईट. त्या : पावसाळा सुरु झाला की, तुम्ही मुलं हमखास फिरायला निघता.मी : हो.त्या : मात्र खबरदारी किती जण घेतात?मी : विचार करायला लावणारा प्रश्न आहे.त्या : पावसाळ्यात धबधब्याजवळ सेल्फी काढताना कित्येक जण पडतात, बुडतात आणि जखमी होतात.मी : पावसाळ्यात रोज बातम्या वाचायला मिळतात.त्या : स्कुटी स्लिप होतात, मोठ्या गाड्यांचे भीषण अपघात होतात.मी : बरोबर.त्या : मी स्वतः दरवर्षी पर्यटनस्थळांना भेट देऊन, प्रशासनाच्या या गोष्टी निदर्शनास आणून देते. मी : पुढाकार.त्या : मी माझा सौरभ गमावला, तसा कुठल्या आईने तिचा मुलगा किंवा मुलगी गमवायला नको, एवढीच इच्छा आहे. मी : तुम्हाला ती वेदना ठाऊक आहे.त्या : मुलांनी स्वच्छंद बागडावं, फिरावं आणि आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. मी : हो.त्या : मात्र जबादारीचं भानही ठेवावं. मी : गरजेचं.त्या : मुलं ही आई वडिलांची म्हातारपणाची काठी असतात. मी : आधार असतात.त्या : तुमच्या क्षणिक सुखासाठी, आम्हाला आयुष्यभराची शिक्षा देऊन निराधार करू नका.मी : करेक्ट.त्या : कारण ज्यादिशी आजची तरुणाई मजा आणि माज या दोन शब्दातील फरक ओळखेल, त्याच दिवशी माझ्यासारख्या लाखो आयांना निर्धास्त झोप लागेल.मी : ज्जे बात!