शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
4
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
5
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
6
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
7
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
9
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
10
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
11
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
12
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
14
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
15
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
16
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
17
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
18
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
20
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

गगन सदन हो निर्भय...

By admin | Published: May 14, 2016 1:41 PM

हवेत झेप घेतल्यावर माणसाच्या पंखांना आभाळाचा लळा लागला. त्यात अनेक जीवघेणो अपघात झाले, आतंकवादाचेही अनुभव आले. त्यातूनच हवाईसेवेने नवे धडे गिरवले. हत्त्यारंशोधक यंत्रणा बसविली गेली. तपासात एक्सरेचा वापर सुरू झाला. रेडिओ टेहळणी सुरू झाली. प्रत्येक प्रवाशाचा चेहरा, हस्तरेषा आणि नेत्रपटलावरील नक्षीचीही नोंद होऊ लागली. स्फोटकं हुडकायला नवी तंत्रं आली. सगळ्या प्रवाशांची अंतर्वस्त्रं तपासणं किंवा संपूर्ण शरीराचा स्कॅन करणं आवश्यक झालं.

ही वाट दूर जाते
 
- डॉ. उज्ज्वला दळवी
 
पहिल्यांदाच इतका दूर जातोय. नीट लक्ष ठेवा हं. थँक्यू बरं का!’’
माङो पती पंचाहत्तर साली परदेशी जायला निघाले तेव्हा सासूबाईंनी शिदोरी, पाण्याची बाटली तर दिली होतीच पण ‘हवं-नको बघा हं’ असं हवाईसुंदरीला बजावलंही होतं. शिवाय स्वत: विमानात फिरून, लेकाच्या सीटवर बसून, खिडकी-दिवे वगैरे सगळी व्यवस्था ठीक असल्याची प्रत्यक्ष खात्री करून घेतली होती. 
निष्पाप-निरातंक-निर्दहशत असा रम्यकाल होता तो! जगातला सर्वात निर्धोक प्रवास म्हणजे विमानप्रवास असा संख्याशास्त्रचा दावा होता. आणि तरीही विमानसफर हा कधीही बगीच्यातला फेरफटका नव्हता. त्याच्यात निष्काळजीपणाला, फाजील आत्मविश्वासाला वाव नव्हता. अगदी पहिलं विमान घडवणा:या-उडवणा:या राईट बंधूंनीही ते यंत्र बनवताना व्यापक अभ्यास केला होता. पहिल्या, 1903 सालच्या उड्डाणापूर्वीच त्यांनी त्यातल्या अनेक तांत्रिक चुका सुधारल्या होत्या आणि हजारो वेळा लांब पल्ल्याच्या ग्लायडरङोपा घेऊन हवेतले प्रवाह, वा:याची मनमानी आणि तरंगण्यातले धोके यांचा दांडगा अनुभवही घेतला होता. तरीही हलकेपणासाठी भक्कमपणाशी तडजोड केल्यामुळे त्यांचं पहिलं, लाकडी विमान अगदीच लेचंपेचं होतं. त्याला दावणीला बांधावं लागे. पहिल्याच उड्डाणानंतर दावं बांधण्यापूर्वी ते जोराच्या वा:याने उलटंपालटं होऊन मोडूनही गेलं. पण एकदा हवेत ङोप घेतल्यावर माणसाच्या पंखांना आभाळाचा लळा लागला. 
पहिल्या महायुद्धातली हारजीत हवेतल्या भरारीवरच अवलंबून होती. त्या काळात विमानांमध्ये झपाटय़ाने प्रगती झाली. रेडिओ-टेलिफोनने वैमानिकाचा जमिनीशी संवाद जमला. लाकडाऐवजी हलकं, कणखर अॅल्युमिनियम विमानबांधणीत वापरल्याने मंदगती बायप्लेन्सऐवजी वेगवान विमानं बनवता आली. दुस:या महायुद्धात रडारसंपर्कजमला, जेट विमानं बनली, हवेच्या प्रतिकाराशी निमुळतं नमतं घेतल्यामुळे वायुवेगाचं गणित जमलं. महायुद्धं संपली. ऑटोपायलट आणि जीपीएसने विमानसारथ्य सुकर झालं. उंचावरून वेगाने उडणा:या विमानातून माणूस ‘हवाई-प्रवासी’ झाला.
त्या स्थित्यंतरादरम्यानच्या ‘कच्चालिंबू’ विमानांनी अनेक धोके पत्करले. शेकडो वैमानिकांनी अपघातात प्राण गमावले. पण प्रत्येक अपघाताने विमानवाहतुकीत सुधारणा होत गेली. त्यामुळे अपघातामागचं कारण शोधून त्यावरचा उपाय सरसकट सगळ्या विमानांना लागू करायचा पायंडा पडला. अनाम राहिलेल्या त्या वीर-वैमानिकांना संशोधकांनी वाहिलेली ती श्रद्धांजलीच होती.
1956 साली दोन विमानांची आकाशात टक्कर होऊन 128 लोक मृत्युमुखी पडले. तसं पुन्हा होऊ नये म्हणून अमेरिकन सरकारने भरमसाठ खर्च केला; हवाई वाहतूक नियंत्रणाची घडी बसवली आणि ती राबवायला ऋीीि1ं’ अ5्रं3्रल्ल अॅील्लू8 स्थापन केली. 1983 साली कॅनडाच्या एका विमानात आग लागली, धूर कोंदला. वैमानिकाने विमान सुखरूप जमिनीवर आणलं. पण धुरामुळे 23 प्रवाशांना बाहेर पडायची वाट दिसलीच नाही आणि ते मरण पावले. तेव्हापासून विमानाच्या जमिनीवर दिव्यांच्या ओळी विराजमान झाल्या. त्या आपत्काळी प्रवाशांच्या पायाखालची वाट उजळवून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतात. 
समाजातल्या अपप्रवृत्तींनी हवाईवाहतुकीला सुरुवातीपासूनच सतावलं आहे. पेरूच्या 
क्र ांतिकारकांनी 1931 साली बंदुका रोखून एक विमान दहा दिवस वेठीला धरलं होतं. त्यानंतरही बंदूक-बळावर अनेक धर्मकारणी-राजकारणी विमान-अपहरणं झाली. त्यामुळेच प्रवाशांकडच्या चाकू-सु:या-बंदुका शोधणारी चुंबकीय यंत्रणा विमानतळांवर बसवली गेली.
1976 साली क्यूबाच्या क्र ांतिकारकांनी टूथपेस्टच्या टय़ूबमध्ये लपवलेल्या स्फोटकांनी क्यूबाचंच विमान उडवून 73 प्रवाशांना मारलं. मृतांमध्ये विशीच्या आतले चोवीस सुवर्णपदकविजेते खेळाडूही होते. तेव्हापासून सुरक्षा तपासात -1ं8चा वापर सुरू झाला. ऐंशीच्या दशकात एअर इंडियाचं ‘सम्राट कनिष्क’ आणि पॅन अमेरिकन एअरलाइन्सचं ह्यउ’्रस्रस्री1 टं्र िा 3ँी रीं2  ही विमानं आतंकवाद्यांच्या बॉम्बनी उडवली. त्यानंतर विमानतळाच्या महत्त्वाच्या विभागात रेडिओ टेहळणी सुरू झाली. तिथे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्रंशिवाय प्रवेश मिळेना. 
मग दहशतवाद्यांनी एक मोठा कट रचला. 
11 सप्टेंबर 2क्क्1 रोजी पॅलेस्टीनी दहशतवाद्यांनी चार अमेरिकन विमानं पळवून अमेरिकेतल्या महत्त्वाच्या इमारतींमध्ये घुसवली. न्यूयॉर्कमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींत स्फोट झाले, त्या कोसळल्या. त्यांच्यातल्या सजीव-निर्जीवांचे चतकोर-नितकोरी तुकडे झाले. भोवतालच्या इमारतींचंही जबरदस्त नुकसान झालं. एकूण 2996 माणसं मेली. 
अख्खी विमानं पळवून केलेल्या त्या आत्मघातकी हल्ल्यानंतर मात्र जगभरातल्या हवाईरक्षकांना खडबडून जाग आली. खेळातल्या चाकू-बंदुकांनाही विमानात मज्जाव झाला. कॅमे:यांना जोडलेली संगणकी सुरक्षायंत्रणा, रडार-टेहळे, त्यांच्याखेरीज मोक्याच्या ठिकाणांवर बसवलेले इतर अनेक यांत्रिक हेर विमानतळावरच्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवायला लागले. सगळ्या संशयितांच्या नावांची यादी विमानतळ अधिका:यांना दिली गेली. प्रत्येक प्रवाशाचा चेहरा, हातावरच्या रेषा आणि नेत्रपटलावरची नक्षी यांचीही नोंद व्हायला लागली. सामानातली स्फोटकं हुडकायला नवी तंत्रं आली. 
त्याच वर्षीच्या डिसेंबरात एका आतंकवाद्याने पॅरिसचं विमान उडवायला आपल्या बुटातून स्फोटकं न्यायचा प्रयत्न केला. इतर प्रवाशांनी त्याचा बेत हाणून पाडला. पण त्यानंतर प्रवाशांची बूटतपासणी व्हायला लागली. 2क्क्6 मध्ये शीतपेयाच्या बाटलीतून स्फोटक द्रवांचं मिश्रण विमानात न्यायचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. मग 1क्क् मिलिलिटरपेक्षा अधिक द्रवपदार्थांना विमानात बंदी झाली. तान्ह्या बाळांसाठी दूधही नेता येईना. 2क्क्9 मध्ये एका दहशतवाद्याने आपल्या अंतर्वस्त्रमधून बॉम्ब विमानात नेला. तेव्हापासून सगळ्या प्रवाशांची अंतर्वस्त्रं तपासणं किंवा संपूर्ण शरीराचा स्कॅन करणं आवश्यक झालं. 
या स्पर्धेत हवाई सुरक्षा यंत्रणा अधिकाधिक अभेद्य होत चालली आहे. पण त्या तटबंदीतली एखादी सूक्ष्म भेगही जिवावर उदार झालेल्या अतिरेक्यांना पुरेशी असते. ही चुरस अशीच चालत राहणार. हवाई-प्रवास मानवी मनाला नेहमीच अद्भुत, रोमांचकारी वाटतो. म्हणूनच समाजातल्या आत्मघातकी विध्वंसक प्रवृत्तींनाही त्याचं जबरदस्त आकर्षण वाटतं. उडतं विमान ‘उडवलं’ किंवा त्याचंच क्षेपणास्त्र बनवून अतिमहत्त्वाच्या इमारती उद्ध्वस्त केल्या की जगभराला आतंकवादाची दहशत वाटते. ती प्रसिद्धी आतंकवादाला खतपाणी घालते. वाट चुकलेल्या नव्या तरुणांना भुरळ पाडते. म्हणूनच दहशतवादी हल्ले प्रसिद्धीच्या झोतात राहू नयेत. अतिरेक्यांचा डंका वाजू नये. दुर्लक्ष, अनुल्लेख यांनीच ते कह्यात राहतील. ती जीवघेणी चढाओढ आटोक्यात ठेवायचा हा एक मानसशास्त्रीय मार्ग आहे. 
 
दीर्घकाळ काम केल्यावर माणसांसारखीच विमानांचीही गात्रं थकतात. त्यांच्या धातूच्या शिरात झीज झाल्यामुळे फ्रॅक्चर होतं. काही उडत्या विमानांचे विभाग तसे मोडून कोसळले. आतले हवाईसेवक उडून गेले! त्याशिवाय वीज पडणं, वादळवा:याचे तडाखे बसून तोल जाणं, पंखांवर बर्फ जमणं, काचेवर पक्षी आदळणं अशा नैसर्गिक आणि सामानातल्या स्फोटक पदार्थांना आग लागणं, विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होणं, आभाळात, अध्र्या उड्डाणात इंधन संपणं अशा यांत्रिक-तांत्रिक अनेकविध कारणांनी प्रवासी विमानांचे भीषण अपघात झाले. प्रत्येक अपघातानंतर आंतरराष्ट्रीय हवाईसेवेने नवे धडे गिरवले. तांत्रिक सुधारणा केल्या, नवे नियम केले आणि ते इमानेइतबारे राबवले. विमानप्रवासातले तांत्रिक धोके कमी झाले. पण कडेकोट बंदोबस्ताला सुरुंग लावायला एक छिद्र पुरतं. म्हणून छिद्रान्वेषी समाजकंटकांशी सामना करायला विमानवाहतुकीच्या सुरक्षा यंत्रणोला सततच ‘होशियार! खबरदार!’ राहावं लागतं.
 
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया 
आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
 
ujjwalahd9@gmail.com