शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

‘गँग ऑफ ससून’

By संतोष आंधळे | Published: June 09, 2024 10:45 AM

Sassoon Hospital News: देशभर गाजत असलेले पाेर्शे अपघात प्रकरण तर एखाद्या वेबसिरीजच्या कथानकाला लाजवेल असेच आहे. विशेष म्हणजे त्या कथानकाच्या केंद्रस्थानी ससून रुग्णालय आहे. या रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्या पद्धतीने अपघात प्रकरणातील आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न केले, ते त्यांचे कृत्य त्यांच्या पेशाला आणि रुग्णालयाच्या परंपरेला काळिमा फासणारे आहे. डॉक्टरांच्या या कृत्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

- संतोष आंधळे(विशेष प्रतिनिधी) वैद्यकीय विश्वात जगभरात अनेक डॉक्टर्स आहेत जे अभिमानाने पुण्यातील ‘बीजे’मधून पासआऊट झालो असे सांगतात, त्यांची आज काय स्थिती होत असेल? कारणही तसेच आहे. गेल्या काही  वर्षांत ससून सर्वोपचार रुग्णालय आणि त्याला संलग्न असणाऱ्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये विविध गैरप्रकारांची मालिका सुरू आहे. ससून हे केवळ घोटाळ्यांचे उगमस्थान आहे की काय, असे चित्र गेल्या वर्षभरापासून आहे. वृत्तपत्रांतील बातम्यांचे मथळे पाहिले  तर हेच दिसते. ‘ससून’चा नावलौकिक सातासमुद्रापार असला, तरी अलीकडे गैरप्रकारांचा संसर्ग झालेल्या या रुग्णालयाची वाताहत होत असल्याचे दिसते. ‘प्राउड ऑफ ससून’पासून सुरू झालेला या रुग्णालयाचा प्रवास आता ‘गँग ऑफ ससून’पर्यंत येऊन पोहोचला आहे की काय, अशी शंका येते.  

रुग्णालयातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती काळाच्या ओघात बदली होऊन बाहेर गेल्या, सक्तीच्या रजेवर पाठवल्या गेल्या किंवा नियमित रजेवर गेल्या. तरीही काहींनी बाहेरून रुग्णालयाच्या कामकाजात हस्तक्षेप सुरूच ठेवल्याने हे रुग्णालय गैरकृत्यांचे उगमस्थान आणि आश्रयस्थान बनले आहे. दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र प्रकरण,  अमली पदार्थ प्रकरण, किडनी रॅकेट असो, रुग्णाचा पाय उंदराने कुरतडण्याची घटना असो, हॉस्टेलमध्ये डॉक्टरांनी थर्टी फर्स्ट साजरा करून सरकारी मालमत्तेचे केलेले नुकसान असो या आणि अशा अनेक गैरप्रकारांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काही घडले की चौकशी समिती नेमून विषय मिटवायचा, हे समीकरणच बनले. राजकीय आशीर्वादाने महत्त्वाच्या पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसायचे आणि पुन्हा राजरोसपणे आहे तेच पुढे सुरू ठेवायचे, हे ‘ससून’मधील आजकालचे विदारक वास्तव आहे.

या सगळ्या गैरमार्गांच्या पार्श्वभूमीवर ‘ससून’चा कानोसा घेतला तर या कॉलेजमध्ये ‘गँग ऑफ ससून’ नावाची टोळी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या टोळीतील काहींचा पोलिस शोध घेत आहेत. अपघात प्रकरण हे एक उदाहरण आहे. या रुग्णायातील काही बेजबाबदार डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही. कुणीही यावे आणि भ्रष्टाचार करून मलई खाऊन जावे, अशी या रुग्णालयांची अवस्था आहे. या रुग्णालयाचे काही डॉक्टर्स आणि कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने रुग्णालयाची बदनामी झाली असली, तरी अनेक डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी तन्मयतेने रुग्णसेवा करीत आहेत. 

ससून रुग्णालयाची आब राखायची असेल तर शासनाला मोठी ‘सर्जरी’ करावी लागेल. खासगी रुग्णालयांत होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचार या रुग्णालयात मोफत केले  जातात. मध्यमवर्गीय, गरीब घरांतील रुग्णांसाठी ‘ससून’ हे वरदान आहे; मात्र त्याची विश्वासार्हताच धोक्यात आली तर गरीब रुग्णांचा त्याच्यावरील विश्वास उडण्यास वेळ लागणार नाही. 

ससून आणि महात्मा गांधीकेवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही ‘ससून’मधील विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सिनेक्षेत्रात ज्याचे नाव आदराने घेतले जाते ते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि त्यांच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी या कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. अनेक विद्यार्थी आरोग्य व्यवस्थेतील मोठ्या पदांवर आहेत.  गोरगरीब रुग्णांसाठी हक्काचे स्थान असलेल्या या रुग्णालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अपेंडिक्सचे ऑपरेशन १२ जानेवारी  १९२४ रोजी झाले होते. ससून रुग्णालयातील  ती खोली वारसा म्हणून जतन करून ठेवली आहे.   

सामान्यांचा या रुग्णालयावरील विश्वास उडाला तर त्यांना किंवा त्यांच्या नातलगांना कर्ज काढून नाइलाजाने खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागतील. धनदांडगे खासगी रुग्णालयात उपचार घेतील; पण गरिबांनी कुठे जायचे हे सरकारला ठरवावे लागेल. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPuneपुणेHealthआरोग्य