शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सगळेच पाहिले !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 7:38 AM

क्रांती आणि स्वातंत्र्यासाठी देहभान विसरून जिवाची बाजी लावणारा झपाटलेला स्वातंत्र्यलढा पाहिला. विकासाच्या आसक्तीने आसुसलेला समाज पाहिला. कोयना, उजनी, जायकवाडीसारख्या धरणांच्या साथीने हरित-धवल क्रांतीच्या स्वप्नाला गवसणी घालणारा काळ असो अथवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था असो, हे सगळे पाहिले !- मन आनंदाने भरून येते, आणि खिन्नही वाटते !!

गणपतराव देशमुख

स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवून क्रांतिलढ्यात झोकून देणाºया तरुणांची फौज पाहिलेला मी माणूस आहे. स्वातंत्र्यापासून आजवरच्या प्रत्येक स्थित्यंतराचे सक्रिय साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. आज भौतिक आघाडीवर जगाच्या स्पर्धेत अव्वल वाटणारी प्रगती आपल्या देशाने केल्याचा आनंदही होतो. पण मुंबईच्या फ्लॅटमध्ये दोन महिने आई मरून पडते तरी तिच्या मुलाला त्याचा पत्ता नसतो असल्या घटना वाचतो, तेव्हा मन खिन्न होते. माणसा-माणसांमधील जिव्हाळा, कुटुंबातील एकोपा अन् प्रेम जतन करणारे संवेदनशील मन समाजातून गायब होत चालले आहे. आपली कुटुंबव्यवस्था ही एका जमान्यात जगाला हेवा वाटायला लावणारी होती. स्वातंत्र्यानंतर आपल्या समाजाचा चेहरा देखणा झाला; पण मन मात्र कमालीचे विद्रूप झाले. बदलत्या जमान्याने आपल्याला अपरिहार्यतेच्या दरीत लोटले.पूर्वी कुटुंबाचे अर्थकारण शेतीवर अवलंबून होते. एकत्र राहून शेतीत राबताना कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट व्हायचे. सुख-दु:खाला एकमेकाला आधार द्यायचा हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव आपोआप बनायचा. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या देशाचे शिक्षणाचे प्रमाण केवळ १६ टक्के होते. लढा देऊन मिळविलेल्या स्वातंत्र्यामुळे त्यावेळच्या तरुण पिढीत देशभक्तीची भावना होती. शिक्षणामुळे आपला विकास होणार ही भावना जागृत झाली होती. अर्थकारण मात्र शेतीवरच अवलंबून होते. काळाबरोबर शेतीवरचा भार कमी करण्यासाठी शिक्षण घेतलेली मुले शहराकडे वळू लागली. प्रत्येक पिढीगणिक शेतीचे तुकडे पडत गेले. नोकरी-धंद्याच्या गरजेपोटी शहराकडे धावणे गरजेचेच होते. त्यामुळे कुटुंबे आपोआपच विभक्त होऊ लागली. कुटुंबांचा एकोपा दुभंगू लागला. त्याचाच परिपाक आज समाजातील अनेक घटनांमध्ये आपण पाहात आहोत.१९४५ साली दुसºया महायुद्धात रशियाने जर्मनीला रोखले, त्यानंतर १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. जागतिक आणि देशात घडलेल्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम माझ्या पिढीच्या मनावर होत होता. मला आठवते, कॉलेज जीवनापासून मी देशभक्त तुळशीदासदादा जाधव यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच वावरलो. ते जोवर काँग्रेसमध्ये होते तोवर मी काँग्रेसमध्ये होतो. त्यांनी आदेश द्यायचा आणि मी त्यांनी सांगितलेल्या वाटेवर चालत राहायचे. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. मीही तुळशीदासदादांसोबत शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. विचार आणि नेत्यांवरील निष्ठा हा त्यावेळच्या कार्यकर्त्यांचा पिंड होता. आज बघा, स्वार्थ साधला गेला नाही की कार्यकर्ता बंड करतो. (अर्थात याला माझे कार्यकर्ते अपवाद आहेत!)एकूणच मानवी आणि कौटुंबिक मूल्यांना आपण तिलांजली द्यायला निघालो आहोत की काय, अशी आजची परिस्थिती पाहून मला दु:ख होते. जीवनात समाजासाठी राजकारण करताना माझ्या कौटुंबिक जबाबदाºया पार पाडताना अनेक वळणावर अडचणी आल्या. कौटुंबिक जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारीला मी अग्रक्रम दिला. तशा अडचणीच्या प्रसंगात माझ्या कुटुंबाने मला समजून घेतले व साथ दिली. तरुण वयात आमच्यापुढे १९४२च्या क्रांतिलढ्यात संघर्ष करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे आदर्श होते. बदलत्या काळाने येणाºया प्रत्येक पिढीची मानसिकता बदलली. त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असे नाही, तो होता पण झाकून असायचा. भ्रष्टाचारी माणसाकडे समाज वेगळ्या नजरेने पाहायचा. आज भ्रष्टाचार खुला झाला आहे. भ्रष्टाचारी माणसाला समाजाची भीती उरलेली नाही. नवमहाराष्टÑाच्या निर्मितीनंतरच्या राज्याच्या पहिल्या विधिमंडळ सभागृहात शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन जनतेने मला पाठविले. ११ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा जागतिक विक्रम माझ्या जनतेने घडविला. आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता यांसारख्या पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली. आजवर मी विधानसभेच्या १३ निवडणुका लढलो. त्यापैकी ११ निवडणुकांमध्ये विजयी झालो. मला या क्षणापर्यंत निवडणुकीसाठी एक रुपया खर्च आलेला नाही. लोक आग्रहाने निवडणुकीला उभे करतात. निधीही तेच गोळा करतात. मला आठवते, १९६२ साली मी लढलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ सात हजार रुपये खर्च झाला होता. दोन जीप गाड्या प्रचारासाठी असायच्या. त्यातली एक जीप तर कायम उभीच असायची. कारण वाहनांऐवजी पायी फिरून मते मागण्याचा कार्यकर्त्यांचा पिंड असायचा.आज मात्र निवडणूक आणि राजकारणाचे चित्रच बदलले आहे. ज्याला राजकारण करायचे आहे त्याला ५० टक्के जातीचे आणि ५० टक्के पैशाचे पाठबळ असेल तोच टिकतो! बदललेल्या समाजाचे आणि राजकारणाचेही हे विदारक गणित आहे.आज वयाच्या ९२व्या वर्षीही मी गावोगावी फिरतो. लोकांशी माझा सतत संवाद सुरू असतो. शरीर साथ देते म्हणून मी हे करू शकतो. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी मी सज्ज राहावे, असे लोक म्हणतात. मी काम करीत राहणार आहे, निवडणुकीचे ज्या-त्या वेळी पाहू! स्वातंत्र्यानंतर सर्व भौतिक आघाड्यांवर आपण लक्षणीय प्रगती केली. आपली नवी पिढीदेखील विकास आणि प्रगतीच्या मुद्द्यावर खूपच तरबेज असल्याचे पाहून मन सुखावते. वैचारिक आणि सामाजिक आघाडीवर मात्र नव्या पिढीतील संभ्रम पाहून मन विषण्ण होते.निवडणुकीच्या राजकारणात आज नरेंद्र मोदींसारख्या प्रतिगामी नेत्यांकडे देशाची सत्ता आहे. ही परिस्थिती कायम राहील, असे मात्र मला वाटत नाही. नवी पिढीच राजकारण आणि सत्ताकारणात क्रांती घडवेल, असे माझे मन म्हणते !

शब्दांकन : राजा माने

(लेखक ११ वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा जागतिक विक्रम करणारे सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत.)