शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

गीरच्या सिंहिणी!

By admin | Published: October 11, 2015 8:13 PM

कधी ‘माणसां’नी वाटा अडवल्या, तर कधी प्राण्यांनी हल्ले केले, पण सारे वार छातीवर ङोलून या धाडसी महिला जंगलातल्या ‘बाळां’ना ‘अभय’ देताहेत.

गजानन दिवाण

कधी ‘माणसां’नी वाटा अडवल्या, तर कधी प्राण्यांनी हल्ले केले, पण सारे वार छातीवर ङोलून या धाडसी महिला जंगलातल्या ‘बाळां’ना ‘अभय’ देताहेत.

-------------
 
सिंहाला सामोरे जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच भल्याभल्यांना घाम फुटतो. गुजरातेत काही तरुणींनी हे धाडस केले. वेळेचे बंधन नाही. दिवस नाही, रात्र नाही. कॉल आला, की कधी एकटय़ाने तर कधी समूहाने जंगलात जायचे. अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना सोडवायचे. कधी सिंह, तर कधी बिबटे. कधी कधी अजगरही. काळजाचा ठोका चुकविणा:या या प्राण्यांना संकटातून सोडवण्यासाठी सिंहाचेच काळीज लागते.  
गीरमध्ये वनरक्षक म्हणून पूर्वी पुरुषच दिसायचे. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत सिंहासमोर जाण्याचे धाडस केवळ पुरुषांचेच, असा समज असावा कदाचित. 2क्क्7 साली गुजरात सरकारने तो दूर केला. सिंहाच्या समोर जाणारी रसिला वढेर ही पहिली तरुणी ठरली. गीरच्या जंगलात महिला वनरक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारत तिने महिलांना सिंहाचे बळ दिले. आज या अभयारण्यात 42 महिला सहायक कार्यरत आहेत. रसिला या सर्वाना लीड करीत आहे.  ‘डिस्कव्हरी’ चॅनलनेही त्यांची दखल घेतली. अलीकडेच या चॅनलने ‘द लायन क्वीन्स ऑफ इंडिया’ ही तीन भागांची मालिका प्रसारित केली. त्यामुळे या सिंहिणींची ख्याती सातासमुद्रापार पोहोचली. जखमी प्राण्यांवर डॉक्टरांच्या मदतीने उपचार करणो, प्राण्यांच्या दररोजच्या जगण्यावर बारीक लक्ष ठेवणो, प्राणी आणि जंगलाच्या संवर्धनासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देणो अशा अनेक जबाबदा:या पार पाडाव्या लागतात त्यांना. कधी सिंहांना, बिबटय़ांना, तर कधी मोठमोठय़ा अजगरांना सामोरे जावे लागते. दररोज किमान 25 कि.मी. पेट्रोलिंग! उन्हाळ्यात तर सूर्य 45 अंश सेल्सिअस एवढी आग ओकत असतो.  
1413 चौरस कि.मी. पसरलेल्या ‘गीर’मध्ये 2क्क्5 साली 35क् सिंह होते. एप्रिल 2क्1क् मध्ये झालेल्या गणनेनुसार ही संख्या 411 वर पोहोचली. पुढे नोव्हेंबर 2क्1क् मध्ये ‘गीर’ने आणखी एक गुड न्यूज दिली. येथील 5क् सिंहिणींचा पाळणा हलणार असल्याचे संकेत जीपीएस मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे मिळाले. एशियन सिंह जगभरात केवळ ‘गीर’मध्ये आढळतो. त्यामुळे र्निवश होण्याच्या मार्गावर असलेल्या एखाद्या कुटुंबात पाळणा हलणार असल्याची अचानक बातमी यावी, असा तो आनंद होता. ‘गीर’चे स्वास्थ्य उत्तम असल्याची पावतीच होती ती. 
जंगलाच्या या सुदृढ आरोग्यात 26 वर्षीय रसिला वढेरचं योगदान खूप माठं आहे. जुनागडमधल्या भांडुरी गावातली गरीब कुटुंबात जन्मलेली रसिला वनरक्षक म्हणून दाखल झाली. तिचा प्रत्येक दिवस नवा थरार घेऊन येत होता. अशा हजारो यशकथा तिच्या नावे जमा आहेत. आपत्तीजनक स्थितीतून 350 सिंहांना बाहेर काढण्याचा भीमपराक्रमदेखील तिच्या नावावर आहे. केवळ नोकरी म्हणून ती हे करीत नाही. निसर्ग आणि प्राणी हे तिचे जिव्हाळ्याचे विषय. याच प्रेमापोटी तिने ही जंगलाची वाट धरली. सुरुवातीला इतर महिलांप्रमाणो सिंहाला सामोरे जाताना तिलाही भीती वाटायची. परंतु हळूहळू स्वत: महिला आहे हे विसरून ती सिंहाला सामोरे जाऊ लागली आणि भीती कायमची पळून गेली. कितीही झालं तरी जंगली प्राणीच तो. 2क्12 साली अंदाज चुकला आणि सिंहाने तिच्यावरच जीवघेणा हल्ला केला. 15 जखमा तिच्या शरीरावर आजही या हल्ल्याची साक्ष देतात.  
‘गीर’चे आरोग्य राखण्यात रसिलाला साथ मिळते ती संपूर्ण टीमची. 26 वर्षीय जयश्री पातट, 24 वर्षीय शबनम रिनबलोच अशा अनेक सिंहिणींची. लहानपणी घराबाहेर पडताना मुस्लीम कुटुंबातील रिवाजाप्रमाणो अनेक बंधने पाळणारी शबनम आता थेट सिंहाला सामोरे जाते. जामनवाडा हे तिचे गाव. तिच्यासह आणखी तिघींनी 2क्क्9 साली जंगलाची वाट धरली. महिन्याला पाच हजार 2क्क् रुपये मिळायचे त्यावेळी. काय भागणार एवढय़ात? पण या कमी पैशांचे त्यांना काहीच वाटले नाही. 2क्11 साली नऊ शिकारी बाइकस्वारांच्या मुसक्या आवळणारी 25 वर्षीय मनीषा वाघेला ही ‘नोकरी’ असल्याचे मानत नाही. जंगल हा तिचा श्वास आहे. 
आमरेली येथून संस्कृतची पदवी घेतलेल्या 24 वर्षीय विलास अंतनाला जंगली प्राण्यांची किमान माहितीही नव्हती. इतर मैत्रिणींनी हा मार्ग स्वीकारला म्हणून तिनेही वनरक्षकाची नोकरी पत्करली. गीरमध्ये आढळणा:या प्रत्येक पक्षी, प्राण्याचे शास्त्रीय नाव आता ती सांगते. एवढेच नाही तर त्याची सविस्तर माहितीही देते. कामाला वाहून घेतल्याशिवाय हे कसे शक्य आहे?
प्रत्येक सिंहिणीचे असे हे वेगळेपण. सारखी आहे ती गरिबी. घरची परिस्थिती हलाखीचीच. या स्थितीतही इतर महिलांप्रमाणो संसार, मुलेबाळे सांभाळण्याची कसरत करतानाच तेवढय़ाच आपुलकीने त्या जंगल आणि त्यात राहणा:या प्रत्येक प्राण्याची काळजी घेतात. आज ‘गीर’चे वैभव आपण अनुभवतो ते यामुळेच.