शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

फुकट्या प्रवाशांना खाली उतरवा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 6:01 AM

नकारात्मक विचारांचं टुमणं लावणारे विचार बऱ्याचदा आपल्याला त्रस्त करतात. आपल्या जीवनाच्या बसमध्ये घुसतात. काही केल्या हे फुकटे खाली उतरत नाहीत आणि आपला प्रवासही किरकिरा करतात.. काय करायचं अशा वेळी?..

ठळक मुद्देजीवनाची बस आपली आहे, त्यात कोणाला सहभागी करुन घ्यायचे? यावर आपला सर्वस्वी हक्क आहे, याचं भान ठेवा.

- डॉ. राजेंद्र बर्वे

काका वयस्करच होते आणि जुन्या काळातील मराठी बोलत होते. त्यांच्या भाषेत म्हणायचं तर मला विशेष (भारी नाही) मौज (मजा, फन्) वाटत होती. असं मराठी फारसं कानी पडत नाही, हेच खरं.

‘‘माझ्या मागे या विचारांचं टुमणं लागलं आहे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात, तसं झालंय. मी अगदी बेजार (फेडअप्) झालो आहे, या दुखण्यानं. जरा विसावतो, मग माझं घोडं पुढे दामटतो. मला आता खरोखरच त्याचं बोलणं रम्य वाटत होतं. असो. मुद्दा असा की काका दमले होते, कंटाळले होते, संत्रस्त झाले होते. कारण मनात टुमणं लावणारे विचार. फक्त विचारच त्रस्त करत आहेत का? मी विचारता झालो.

नाही, खचितच नाही. नकारात्मक विचारांची पाठराखण करीत जुन्या स्मृती जाग्या होतात, अर्थातच क्लेशकारक. त्यांच्या संगतीने मनाला विषण्ण करणाऱ्या भावना पाठोपाठ येतात. कित्येक तास मनाची वास्तपुस्त करून समजूत काढण्यात निघून जातात आणि म्हणावी तशी मनाला गतिमानता येत नाही. विचारांमुळे मनाच्या सचेतनतेला अवरोध होतो.

काकांनी विचारांचे बरेच तपशील वर्णन करून सांगितले एकुणात त्याचं ठीक चाललं नव्हतं.

मला माझं जीवन स्वतंत्रपणे जगायचं आहे. मी अशी गुलामगिरी का पत्करू? काकांचा पारा एकदम चढला. मला माझे निर्णय घ्यायचे आहेत. कुठे जायचं? कधी जायचं याविषयी मी स्वायत्त आहे; पण हे विचार...

ते पुन्हा विसावले. मी त्याचं नेमकं वय विचारलं. आजच्या हिशेबाप्रमाणो ते अजिबातच वयस्कर नव्हते. ‘काका’ किंवा आजोबा तर नव्हतेच.

.. आणि या महासाथीच्या कारणास्तव वास्तव्य स्वगृही, बाहेर विहार करण्यास बंदी. एखादी गाडी (त्यांच्या भाषेत स्वयंचालिका ऑटोमबाइल) दुरुस्तीला दुरुस्तीगृहात (गॅरेज) मध्ये खितपत पडावी, असं झालंय.

काही तरी नामी युक्ती सांगा. मी कविमनाचा आहे. त्यामुळे एखादं रूपक वापरून सांगितलं तर समज आणि उमज पडेल. रूपक म्हणजे एखादा दृष्टांत म्हणा ना!!

मी किंचित विचाराधीन झालो. त्यांना रुचेल आणि पचनी पडेल व पुढे अंगवळणी पडेल, असं उदाहरण हवं होतं. तसा चपखल बसणारा दृष्टांत गवसला. (माझीही भाषा सुधारू लागली!)

खरं म्हणजे त्यांनीच अनेक दृष्टांतांच्या मदतीने आपली समस्या मांडली होती. त्याचा आधार घेऊन पुढे गेलो.

आपलं जीवन एखाद्या वाहनासारखं असतं. आपण चालवत असतो. त्या पद्धतीने ते पुढे जातं. आपण कितीही प्रयत्न केला तरी ते फारसं खाजगी राहत नाही, त्याचं सार्वजनिक वाहन होतं.

तुमची अडचण अशी आहे की, तुमच्या या बसमध्ये फारच फुकटे प्रवासी बसलेत !

‘म्हणजे, मी नाही समजलो ! म्हणजे असं की, तुम्हाला न विचारता अनेक प्रवासी कोणत्या तरी थांब्यावर तुमच्या बसमध्ये घुसलेत. ते खूप दंगा करीत आहेत. त्यांना खरं म्हणजे कुठेही जायचं नाही, फक्त तुमच्यामागे टुमणं लावायचं आहे. आमच्याकडे लक्ष द्या, आमचं ऐका, आमची दाद फिर्याद घ्या. आम्ही तुमचे सहप्रवासी आहोत, असा ते आरडाओरडा करीत आहेत.

आता तर त्यांनी कहर केलाय. तुमच्या वाहन कक्षापर्यंत ते आले आहेत आणि तुमच्या कानीकपाळी ओरडून तुमचं लक्ष वेधून घेत आहेत.

तू लहानपणी चुका केल्या आहेत. आठवतं वयात येताना तू आई-वडिलांना उलटून बोलायचास. लग्न झाल्यानंतरही तुला इतर स्त्रियांविषयी आकर्षण वाटत असे, तर आणखी एक फुकटा प्रवासी म्हणतो, ‘तू स्वत:ला पार शहाणा समजतोस; पण प्रत्यक्षात तुला अकाउंट्समधलं फारसं कळत नाही, ‘तुझ्या मुलगा-मुलगीमध्ये तू भेदभाव केलास.’ अशा प्रकारचे प्रवासी तुमच्या बसमध्ये शिरलेत. तुमच्या हातातलं स्टिअरिंग चक्र त्यांनी पकडलेलं आहे. तुमच्या गिअरशी ते झटापट करीत आहेत.

असे बरेच प्रवासी त्या बसमध्ये आहेत.

त्यांच्या नजरेत थोडा आश्वस्तपणा आणि भीती दिसू लागली. आश्वस्तपणा यासाठी की, त्यांच्या समस्येचं नेमकं स्वरूप उलगडलेलं दिसत होतं आणि भीती कसली वाटते आहे?

असं वाटतंय की, हे फुकटे प्रवासी माझ्या प्रवासाची वाताहत करीत आहेत. मी आता खड्ड्यात पडणार, नाही तर अपघात होणार.

‘होय, अशा फुकट्या प्रवाशांना आपल्याबरोबर घेतलं की, गाडी हमखास नैराश्य, औदासीन्य यांच्या दिशेने भरधाव पुढे जाते. हे प्रवासी मग इतके चढेल होतात की, ब्रेक निकामी करतात आणि वेग वाढवतात.

‘अगदी खरंय, शंभर टक्के सत्य आहे.’

‘काका मला सांगा गाडी कुणाची? - तुमची. कुठे जायचं किती वेगानं जायचं? का जायचं? हे ठरवण्याचा सर्वस्वी हक्क आणि अधिकार केवळ तुमच्याकडे आहे. आपलं जीवन केवळ आपलं म्हणजे आपलं नसतं, तर आपल्या मालकीचं असतं. सर्वस्वी आपल्या अधिपत्याखाली असतं.

हे फुकटे प्रवासी आपल्यावरच्या कडक शिस्तीच्या संस्काराच्या नावाखाली आपल्या बसमध्ये चढतात. ‘माणसाने चुकताच कामा नये, मनातल्या भावनांचं दमनच केलं पाहिजे ! अशा संस्कारांना डोक्यावर घेतलं की, ते बसमध्ये घुसतात.

माणूस चुका करतो, चुकतमाकत शिकतो. मनात उसळणाऱ्या भावनाचं दमन करायचं नसतं, त्यांना समजून घ्यायचं असतं. आपण नियंत्रण ठेवतो ते आपल्या वागणुकीवर ! तुमच्याशी केलेल्या संवादातून याचा स्पष्ट उलगडा होतो आहे की तुम्ही अतिशय सभ्यतेनं आणि पापभिरुपणानं वावरलेला आहात. ‘अगदी अचूक सांगितलंत आपण’ मग काय करु आता?’ तुम्ही बोलता बोलता विसावता आहात. तसे वैचारिक विसावा घ्या. म्हणजे तुमची बस जरा थांबवा. जीवनाचा दुसरा घाट चढून गाडी गरम झाली आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट बसचे सर्व दरवाजे उघडे टाका, खिडक्याही उघडा.

आणि त्या फुकट्यांचं काय करु? हकलून देऊ?

‘नाही, त्या फुकट्यांना हकलून देण्याचीही तसदी घ्यायची नाही तुमच्या एक लक्षात आलं नाही की तुमच्या बसचे दरवाजे नि खिडक्या तुम्ही बंद ठेवले होते.

आपण निर्धारानं थांबलो की आणि मनाचे दरवाजे उघडले की.. नवे छानदार विचार मनात येतात. खरं पाहता, बालपणातील, किशोरवयामधील तारुण्यावस्थेतल्या अनेक सुंदर आठवणी माझ्या बसमध्ये यायला उत्सुक आहेत. अनुभवाचं दान मी मोजलंय त्यांच्यासाठी! लाखमोलाचा विचार आहे. मला त्या क्षुद्र, नकारात्मक आठवणींच्या फुकट्या प्रवाशांना हकलून द्यायलाच नको त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की त्या आपोआप नष्ट होतात.

 

फुकटे आलेच, तर काय करायचं?

१) ज्या क्षणी मनात नकारात्मक, मन खच्चीकरण करणाऱ्या आठवणी, विचार येऊ पाहतात त्याक्षणी थांबा.आपल्या जीवनप्रवासात या फुकट्यांना स्थान नाही, याची आठवण ठेवा.

२) जीवनाची बस आपली आहे, त्यात कोणाला सहभागी करुन घ्यायचे? यावर आपला सर्वस्वी हक्क आहे, याचं भान ठेवा.

३) अशा फुकट्या आठवणी आणि विचारांकडे लक्ष दिलं की त्यांना चेव चढतो. ते आपल्याबरोबर बऱ्याच फुकट्यांना घेऊन येतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की ते चेतनाहीन होऊन, नाहीसे होतात.

४) हा केवळ विचार नाही, थांबून दुर्लक्ष करण्याचा अनुभव घ्या.

५) दुर्लक्ष म्हणजे तरी काय? अहो, आपला प्रवास हाच आपला आनंदाचा ठेवा आणि प्रवाह नाही का? प्रवासातली मौज घ्या.

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com