शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

‘घातसूत्र’- अस्वस्थ क्षणांच्या कुशीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:03 AM

‘घातसूत्र’ हे पुस्तक टायटनिक (सन 1996) ते ट्रंप यांचे सत्तेवर येणे (सन 1996) अशा 104 वर्षांच्या कालावधीचा आणि त्या दरम्यान घडलेल्या मुख्य जागतिक घटनांचा वेध घेते.

ठळक मुद्देअनेक देशांची मुशाफिरी केल्यावर माझी हळूहळू खात्नी पटत गेली की जगातल्या सर्व गोष्टींचे मुळाशी फक्त पैशाचा विचार आणि अर्थकारण आहे.

- दीपक करंजीकर

मला आठवते माझी अमेरिकेतील 9/11ची सकाळ. तो मंगळवार होता. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात. अचानक टीव्हीवर एक दृश्य दिसले. न्यू यॉर्कच्या प्रसिद्ध ट्विन टॉवर्सपैकी एक इमारतीत एक विमान घुसले होते. हॉलिवूडपटासारखा प्रसंग. मग दुसरे आणखी एक. तिसरे पेंटगॉनच्या इमारतीत एक व्हाइट हाउसच्या दिशेने. त्यावेळी आकाशात साधारण पाच हजार विमाने होती. सगळी जबरदस्तीने उतरवली गेली. सगळी उड्डाणे रद्द झाली. अमेरिका स्तब्ध आणि भांबावलेली. रासवट आर्थिक ताकदीचा कणखर वॉल-स्ट्रीट थरथर कापत होता. आम्ही कंपनीतले सर्व सहकारी एका प्रशस्त, आलिशान; पण आता अतिशय पोरक्या वाटणार्‍या एका मोठय़ा मीटिंगरूममध्ये अतिशय चिंतित चेहर्‍याने बसून होतो. सांत्वन आणि समजूत यांच्या पलीकडचे क्षण. गंभीरपणे कोणाचे नातलग त्यावेळी त्या हल्लाग्रस्त विमानात होते का? याची विचारपूस झाली. समोर एक स्क्र ीन टीव्ही, त्यात सतत दाखविण्यात येणारी ती भयावह दृश्ये, अमेरिकेच्या आर्थिक ताकदीच्या बुलंद मनोर्‍यांची पडझड, अमेरिकेच्या अस्पर्शित ताकदीला तब्बल 55 वर्षांनंतर दिलेले आव्हान आणि गेल्या 70 वर्षात दुसर्‍यांदा तब्बल चार दिवस बंद पडलेले न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज याच्या एकत्न आणि गंभीर अशा सावल्या त्या सर्व वातावरणावर होत्या. सगळ्यांच्या मनावर एकतर या घटनेचा अनपेक्षित ताण होताच त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ माणसे हे अजून संपलेले नसेल या भीतीने ग्रासली होती. माझ्यासारखी परदेशी माणसे अमेरिकन समाजाची ही बधीर शोकाकुल अवस्था बघताना त्या लोकांच्या मूकपणे हे सहन करण्याच्या पद्धतीने जास्तच अबोल झाली होती. सर्व कर्मचार्‍यांना सुटी देण्यात आली. आम्ही सर्वजण तिथून हललो. माझा एक अमेरिकन सहकारी मित्न माझ्याबरोबर होता. मला त्याच्याशी बोलण्याची, या सगळ्या गोष्टींना एक साधारण अमेरिकन नागरिक कसा सामोरा जातो याची उत्सुकता होती; पण तातडीने ती व्यक्त करणे सभ्यपणाचे ठरेल असे मला वाटले नाही. त्याच पार्किंग लॉटमध्ये निरोप घेताना तो म्हणाला ‘सब वेला थांबूया का?’ तिथून आम्ही निघालो तसे तो मला म्हणाला, अगदी सहज ‘दीपक, वॉल स्ट्रीटवर या हल्ल्याचा दीर्घ परिणाम होईल. तू एक काम कर, बाजार सुरू होईपर्यंत डीझ्ॉस्टर रिकव्हरी प्लॅन बनविणार्‍या कंपन्यांचे शेअर बघून ठेव. आणि पैसे असतील तर विकत घे. पुढच्या दिवसांत त्यांना खूप चांगला भाव येईल.’ लांबवर जात असलेली त्याची कार पाहताना मला मनात मात्न बरेच काही रेंगाळत राहिले. भांडवलशाही देशातली माणसे एखाद्या घटनेचा कसा विचार करतात नाही? सगळे अमेरिकन दु:खी होतेच तसे तोही होताच. प्रश्न तो नाहीये; पण त्या दु:खातही त्याची बाजाराची जाणीव किती तीव्र होती? मला अप्रूप आणि दु:ख दोन्हीही वाटले. मी उगाच भाबडेपणाचा आव आणणार नाही; पण सभोवताली घडणार्‍या सर्व गोष्टींकडे बाजाराच्या नफ्यातोट्याच्या चष्म्यातून पाहणे मला अंतर्मुख  करून गेले. असा विचार हे कसे काय करू शकतात हा प्रश्न माझी छळवणूक करत राहिला. त्यानंतर एकदा एक आयटीमधला सल्लागार मला म्हणाला की, या देशातल्या बहुतांश कंपन्यांचा पे रोल डेटा ज्या कंपनीच्या ताब्यात आहे ती ज्यांच्या मालकीची आहे ते वॉलस्ट्रीटवरील बँकर्स, त्या माहितीप्रमाणे शेअर बाजारात अनेक नव्या सिक्युरिटीज आणत असतात. घडलेल्या अशाच काही घटनांनी मला या देशातले काही लोक असा का विचार करता ही माहिती संकलित करण्याचे आमची कंपनी काम करते. या आणि असल्या अनेक घटनांनी मला या सगळ्याचा शोध घ्यायला प्रवृत्त केले. जसजशा नव्या गोष्टी कळत तसातसा मी त्यांचे संदर्भ शोधीत असे. त्या पुस्तकांतल्या नोंदी करून ठेवत असे. हळूहळू प्रचंड माहिती गोळा होत गेली. मला आठवते, एकदा रात्नभर बसून मी ती सगळी माहिती माझ्या कार्यालयातल्या मोठय़ा व्हाइटबोर्डवर लिहून काढली. त्याची संगती लावण्याचा प्रयत्न केला. मी घरी निघालो तेव्हा बाहेर प्रसन्न सकाळ होती आणि माझ्या मनात मात्न इतके काहूर होते की वाटे सारेच अंधारले आहे. असल्या अनेक अस्वस्थ क्षणांच्या कुशीत या पुस्तकाचा जन्म आहे असे म्हटले तरी चालेल. त्या देशात इतकी वर्षे काम केल्यावर आणि इतर अनेक देशांची मुशाफिरी केल्यावर मात्न माझी हळूहळू खात्नी पटत गेली की जगातल्या सर्व गोष्टींचे मुळाशी फक्त पैशाचा विचार आणि अर्थकारण आहे.हे पुस्तक टायटनिक सन (सन 1996) ते ट्रंप यांचे सत्तेवर येणे (सन 1996) अशा 104 वर्षांच्या कालावधीचा आणि त्या दरम्यान घडलेल्या मुख्य जागतिक घटनांचा वेध घेते.फेडरल बँकेची उभारणी, ग्रेट डिप्रेशन, रशियन क्रांती,  दोन महायुद्धे, 9/11 असा घटनाक्र म -वल्र्ड बँक, नाणेनिधी, बँक ऑफ इंटरनॅॅशनल सेटलमेंट, कौन्सिल फॉर फॉरीन रिलेशन, ट्रायलटरल कमिशन, सीआयए, मोसाद असल्या संरचना-आणिवॉल स्ट्रीटवरचे बँकर्स आणि त्यांचे सूत्नधार --अशा त्रिस्तरीय प्रतलाचे ते वर्णन करते.हे पुस्तक कदाचित जगातलं पहिलं असं पुस्तक आहे की ज्यात सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय घटनांचा पडद्यामागल्या हलचालींचा मागोवा घेणात आला आहे आणि तो अतिशय तार्किक पद्धतीने त्यातले बारकावे वाचकांसमोर मांडायचा एक वस्तुनिष्ठ प्रयत्न मी केलाय आणि हे सगळं संदर्भासहीत लिहिलेले आहे या पुस्तकांसाठी मी तब्बल 481 पुस्तके वाचली आणि त्यातल्या ज्यांचा प्रत्यक्ष संदर्भ येतो अशा 150 पुस्तकांची यादी परिशिष्टात दिलेली आहे.जागतिक माध्यमांनी मेनस्ट्रीम बातम्यांच्या नावाखाली जी काही पसरवलेली आहे ती किती मायावी आहे याची सतत बोचणारी जाणीव मला होत असे.ज्यांना आजची आपली आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती सतत कशी बदलत आहे.. त्या जागतिक धोरणे व ती धोरणे राबविणारी त्यामागाच्या अदृश्य शक्ती कोणत्या आहेत हे जाणून घ्यायचे आहे त्यांनी हे जरूर वाचावे. कारण या सगळ्याचा . त्यांचा आपल्या रोजच्या जगण्याशी अत्यंत निकटचा असा संबंध आहे.कदाचित हे वाचताना, व्यक्ती म्हणून आपण किती नगण्य आहोत ही जाणीव होऊ शकते. लोकाशाही, व्यक्तिस्वातंत्र्य आणि आर्थिक सुबत्ता ह्य सगळ्या गोष्टींना कसे राबविले जाते याचा नवीन दृष्टिकोन मिळण्याचीही शक्यता आहे..घातसूत्न : दीपक करंजीकरग्रंथाली (मुंबई) प्रकाशन