शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जीवन-मृत्यूच्या प्रवासाचा 'हिरवा' थरार...

By admin | Published: June 25, 2016 2:36 PM

श्वासोच्छ्वास तर सुरू आहे, तरीही जिवंत म्हणता येत नाही.. मृत तर नक्कीच नाही. ‘ब्रेनडेड’! त्या व्यक्तीला खरोखरच जिवंत ठेवायचं तर एकच पर्याय. त्याच्या अवयवांचं लवकरात लवकर दुसऱ्या कोणातरी गरजूच्या शरीरात प्रत्यारोपण करायचं आणि त्याचं हृदय धडधडत ठेवायचं. हातात वेळ अत्यंत मोजका आणि प्रवास तर अत्यंत जिकिरीचा. मग क्षणाक्षणाला पुन्हा सुरू होतो जीवन-मरणाचा प्रश्न...

 पवन देशपांडेतरुण वय. सळसळतं रक्त. श्वास सुरू आहे; पण मेंदूनं साथ सोडलेली. म्हटलं तर जिवंत, म्हटलं तर मृत.. अचानक झालेला अपघात आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालेलं.  ब्रेनडेड!डॉक्टरांनी हे सांगितलं आणि घरच्यांवर आभाळच कोसळलं. त्याही स्थितीत छातीवर दगड ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि देहानं नाही तरी अवयवांच्या रूपात त्याला जिवंत ठेवायचं ठरवलं.त्याच्या स्वत:च्या शरीरात जरी नाही तरी दुसऱ्या कुणाच्या तरी शरीरात त्याचं हृदय धडधडत राहावं यासाठी त्यांनी ब्रेनडेड झालेल्या आपल्या तरुण मुलाचं हृदय दान करण्याचं ठरवलं.त्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाला एक वेगवान प्रवास..हृदयाची गती वाढावी तशी पुढील सारी चक्र वेगानं धावायला लागली.सुरतमध्ये रात्र चढत होती तशी नातेवाईक-नर्स-वॉर्डबॉय-डॉक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर यांच्यापासून ते एअरपोर्ट-रस्ते वाहतूक व्यवस्थापन करणाऱ्या पोलिसांच्या यंत्रणा अशा साऱ्यांचीच धावपळ सुरू झाली. कारण अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या तरुणाचं हृदय काढून ते थेट मुंबईत मुलुंडमध्ये न्यायचं होतं. जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका रुग्णासाठी.हृदयाचा हा प्रवास होता सुरतपासून ते मुंबई-मुलुंडपर्यंतचा. कोठेच थांबलो नाही तर रस्ते मार्गे जवळपास पाच ते सहा तासांचा. त्यानंतर शस्त्रक्रिया. म्हणजे आणखी एखादा तास. पण हृदय काढून घेतल्यापासून ते हृदय पुन्हा एका नव्या शरीरात प्रत्यारोपीत करण्याची ही प्रक्रिया तब्बल चार ते सहा तासांच्या आत करायची होती. कमीत कमी वेळेत ही सगळी प्रक्रिया पार पाडणं हे हृदय बसविण्यात येणाऱ्या रुग्णासाठी आवश्यक होतं. पण प्रवास लांबचा होता. पर्याय एकच होता. विमानाचा. सुरतहून हृदय हवाईमार्गे थेट मुंबईत आणायचं. पुढे रस्ते मार्गे शक्य तेवढ्या वेळेत मुलुंडच्या रुग्णालयात पोहोचवायचं. त्यासाठी रस्ताही मोकळा असणं महत्त्वाचं होतं. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली.डॉक्टर पोहोचले होते. रुग्णवाहिका सज्ज होती. शिवाय सुरत आणि मुंबईतही ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. हवाई वाहतूक नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेनं मार्ग मोकळा करून दिला होताच.शस्त्रक्रिया पार पाडून हृदय निघालं. सुरतच्या रुग्णालयापासून ते मुंबईत मुलुंडच्या रुग्णालयापर्यंत त्याचा प्रवास केवळ ५५ मिनिटांत झाला. ही किमया साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी जवळपास ५०० जणांची टीम कार्यरत होती...कसं शक्य झालं हे?अलीकडच्या काळात असे काही आश्चर्यकारक प्रसंग आपण अनुभवले. भरमसाठ ट्रॅफिक असलेल्या एखाद्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायलाही बऱ्याचदा तास, अर्धा तास निघून जातो. अशा परिस्थितीत इतक्या लांबचा प्रवास आणि तोही काही मिनिटांत!पण असं झालं खरं.त्यामुळे ‘मृत’ व्यक्ती तर आपल्या अवयवांच्या रूपानं जिवंत राहिलीच; पण मृत्यूशय्येवरच्या रुग्णालाही जीवदान मिळालं!इंदूर-दिल्ली, इंदूर-मुंबई, नाशिक-पुणे, औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-पुणे.. असे अनेक ‘जिवंत’, थरारक आणि यशस्वी प्रवास अलीकडच्या काळात घडले, घडू शकले.त्याचं प्रमुख कारण ‘ग्रीन कॉरिडॉर.ही खरं तर युरोपियन संकल्पना; पण आता सगळीकडेच तिचा उपयोग केला जातोय. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे वाहतुकीचा असा खास मार्ग, ज्यात सारे सिग्नल्स मॅन्युअल मोडनं आॅपरेट केले जातात आणि आपल्या गरजेनुसार वाहतुकीचं नियंत्रण केलं जातं.हाच ग्रीन कॉरिडॉर आता अनेकांसाठी संजीवनी ठरतोय..पण या ‘ग्रीन कॉरिडॉर’वरचा हा जिवंत प्रवास नेमका होतो तरी कसा? कोण कोण त्यात, कसं सहभागी होतं?ती कहाणीही गंभीर, तरीही तितकीच रोचक आहे.