- विजय दर्डा
7 मे हा रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन!
त्यानिमित्त या प्रतिभावंत सृजनश्रेष्ठाला अभिवादन.
भारत हा सांस्कृतिकदृष्टय़ा मागासलेला,
अंधश्रद्धांनी बुरसटलेला
गारुडी-बैराग्यांचा देश आहे,
असा समज त्या काळात
पाश्चात्त्य देशांमध्ये दृढ होता.
हा समज दूर करण्यासाठी
रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्यपूर्व काळात अखंड कार्यरत राहिले.
एक सिद्धहस्त कादंबरीकार, नाटककार, कवी आणि गीतकार
अशा चतुरस्र प्रतिभेने गुरुदेवांनी साहित्य, कला व संगीताच्या क्षेत्रवर उमटविलेला अनुपमेय असा ठसा,
त्यांच्या निधनानंतर
सात दशकांनंतरही कायम आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळविणारे युरोपच्या बाहेरचे पहिले साहित्यिक होते, हे आपण सर्वजण जाणतो. गुरुदेवांच्या ‘गीतांजली’ या बंगाली कवितासंग्रहाच्या त्यांनीच केलेल्या ‘अॅन ऑफरिंग ऑफ साँगज्’ या इंग्रजी रूपांतरणासाठी त्यांना सन 1913मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘जन गण मन.’ हे आपले राष्ट्रगीतही गुरुदेवांच्याच सृजनशील प्रतिभेतून जन्मले, हेही आपणास ठाऊक आहे. पण आपण गुरुदेव टागोरांना ओळखतो ते केवळ नोबेलविजेते कवी किंवा आपल्या राष्ट्रगीताचे जनक म्हणूनच नव्हे. खरे तर त्यांनीच लिहिलेली गीते पुढे बांगलादेश व श्रीलंकेचीही राष्ट्रगीते झाली.
आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी झोकून देणारे एक ‘क्रुसेडर’ म्हणून आपण गुरुदेवांना ओळखतो. भाषणो, लिखाण आणि शांतिनिकेतनसारख्या दज्रेदार शिक्षणसंस्थांच्या स्थापनेतून त्यांनी हे महान कार्य केले. भारत हा सांस्कृतिकदृष्टय़ा मागासलेला, अंधश्रद्धांनी बुरसटलेला गारुडी-बैराग्यांचा देश आहे, असा समज त्या काळात पाश्चात्त्य देशांमध्ये दृढ होता. हा समज दूर करणो हा टागोर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हाती घेतलेल्या मिशनचा मुख्य हेतू होता. एक सिद्धहस्त कादंबरीकार, नाटककार, कवी आणि गीतकार अशा चतुरस्र प्रतिभेने गुरुदेवांनी साहित्य, कला व संगीताच्या क्षेत्रवर उमटविलेला अनुपमेय असा ठसा, त्यांच्या निधनानंतर सात दशकांनंतरही कायम आहे.
गुरुदेव बंगालमधील ठाकूर या प्रतिष्ठित ब्राrाण कुळात जन्मले. या ठाकूर कुळाला 3क्क् वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. या ठाकूर कुलोत्पन्नांनी सांस्कृतिक क्षेत्रत केलेली कामगिरीच नेहमी प्रामुख्याने अधोरेखित झाली असली तरी, खरे तर या कुटुंबाचे व्यापार, राजकारण, साहित्य आणि संगीत अशा विविधांगी क्षेत्रंत संमिश्र योगदान होते.
मोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी गुरुदेव टागोरांनीच दिली. त्याचप्रमाणो रवींद्रनाथांचे ‘गुरुदेव’ असे नामाभिधान महात्मा गांधींनी केले. महात्माजींच्या राष्ट्रवादी विचारांचा गुरुदेवांवर मोठा प्रभाव होता व गांधीजींनी केलेले स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व आणि अहिंसा व सत्याग्रहावरील त्यांच्या निस्सीम श्रद्धेचे टागोरांना कमालीचे कौतुक होते.
काही महत्त्वाच्या विषयांवर टागोर व गांधी यांच्यात टोकाचे मतभेद जरूर होते तरी या दोघांचे परस्परसंबंध अपार विश्वासाचे व मैत्रीचे होते. हा त्या काळातील नेतृत्वाच्या परिपक्वतेचाच महिमा म्हणावा लागेल.
आपल्यामधील मतभेदांचा कडवटपणा परस्परांच्या नात्यामध्ये न आणण्याचा आणि त्याद्वारे हाती घेतलेल्या कार्याला झळ न पोचवण्याचा समंजसपणा दोघांनीही अखंड सांभाळला. गुरुदेव आणि महात्माजी या दोघांमधील मतभेदाचे तरीही परस्पर आदराचे हे उदाहरणच पाहा -
बिहारमध्ये 1934मध्ये विनाशकारी भूकंप झाला. ‘अस्पृश्यतेच्या पापासाठी परमेश्वराने आपल्याला केलेली ही शिक्षा आहे,’ असे या आपत्तीचे वर्णन महात्माजींनी केले. गुरुदेवांनी हे साफ अमान्य केले.
एवढेच कशाला भोजन आणि आहार यासारख्या मूलभूत गोष्टींवरही दोघांचे मतैक्य नव्हते. या विषयांवर दोघांमध्ये गांभीर्याने चर्चा होत असे.
कट्टर फलाहारी असलेले महात्मा गांधी एकदा म्हणाले, ‘गव्हाच्या पु:या तुपात किंवा तेलात तळणो म्हणजे पौष्टिक धान्याचे विष करण्यासारखे आहे.’ यावर गुरुदेवांनी गांधीजींना सांगितले, ‘असे असेलच तर कदाचित ते सावकाश भिनणारे विष असावे. मी तर आयुष्यभर पु:या खात आलो आहे आणि त्याने मला अद्यापर्पयत तरी काही बाधा झालेली नाही.’
पण त्यांचे मतभेद केवळ अशा साध्या व क्षुल्लक गोष्टींपुरते नव्हते. शिक्षण आणि गांधीजी ज्याला अत्यंत प्रिय ध्यानसाधना म्हणत त्या चरख्यावरील सूतकताईसंबंधीही त्यांचे मतभेद होते.
गुरुदेव टागोर आणि गांधीजींसारख्या महान व्यक्ती आपल्यासाठी आदर्श ठरतात ते त्यांच्यातील मतभेदांमुळे नव्हे तर मोलाचे धडे देणा:या त्यांच्या जीवनपटांमुळे. टागोर व गांधी हे आपल्या आधुनिक राष्ट्र उभारणीतील दोन आधारवड आहेत. त्यांच्या आयुष्यांतून आपण नैतिकतेचे, तात्त्विक व जीवनोपयोगी असे अनेक धडे घेऊ शकतो. पण त्यांच्याकडून शिकण्याचा याहूनही मोठा गुण कोणता असेल तर तो हा की, ज्याच्याशी मोठे मतभेद आहेत त्याच्याविषयीही आदर व सन्मान बाळगणो! हे गुण आपण अंगी बाणविले नाहीत तर आपली सर्वशक्ती निर्थक संघर्षातच खर्च होईल. नव्हे आपले आयुष्यच निर्थक होऊन जाईल.
गुरुदेवांच्या पुण्यस्मृतीला विनम्र आदरांजली!
अखेरीस, परमेश्वराची करुणा भाकताना गुरुदेवांनीच ‘गीतांजली’मध्ये गुंफलेले शब्द आठवतात :
मला शक्ती दे ईश्वरा,
माङया हृदयाच्या तळाशी लपलेल्या तमावर
आघात होऊ दे तुङया धरधरीत कटाक्षाचा..
माङो सुख आणि दु:ख, माङो आनंद
आणि विवंचना, सारेच सावरून उचलून
सहज वागवता यावे म्हणून शक्ती दे,
दयाघना!
माङया काळजातल्या प्रेमाला सेवेचे पंख फुटू देत,
हीनदीनाला छातीशी धरू दे, ईश्वरा;
उर्मट सत्तेच्या उन्मादापुढे वाकणो घडू नये म्हणून
माङया गुढग्यांना बळ दे!
हीण झडून जाऊ दे, पाचोळा उडून जाऊ दे,
मळभ लख्ख होऊ दे, ईश्वरा;
रोजच्या श्वास-उच्छ्वासाच्या घनगर्द झाडीतून
माङो मन उंच उडते राहू दे!
शक्ती दे, जन्मदात्या,
माङो सारे सामथ्र्य मला तुङया चरणाशी वाहू दे..
मतभेदांचा सन्मान करणारा स्नेह
भारताच्या इतिहासातला एक मोठा कालखंड व्यापणारे गुरुदेव आणि महात्माजी यांना परस्परांविषयी अतीव आदर होता आणि टोकाचे मतभेदही!
गुरुदेवांना नाटकांखेरीज वाचन, लेखन यासारख्या अध्ययनाखेरीज गणित व विज्ञानात रुची होती. याउलट गांधीजींना पुस्तकी शिक्षण निर्थक वाटत असे. प्रत्यक्ष कामातून, स्वानुभवातूनच माणसाचे खरे शिक्षण होते, असे गांधीजी मानत.
चरखा चालवून आत्मोन्नतीचे गांधीजी कट्टर समर्थक होते. याउलट बुद्धीला जराही चालना न देता जुनाट चरख्याचे चाक सदोदित फिरवत राहणो हे गुरुदेवांना कंटाळवाणो वाटे.
(लेखक लोकमत वृत्तपत्रसमूहाचे चेअरमन आहेत)