नानं काठोकाठ भरलेला प्रज्ञावंत फळानं भरगच्च झालेल्या वृक्षासारखा असतो- निदान असावा, अशी अपेक्षा असते. फळांनी लगडलेला वृक्ष जसा भूमीला अभिवादन करण्यासाठी झुकतो, म्हणजे नम्रता धारण करतो, तसा ज्ञानी माणूस असतो. त्यासाठीच ‘विद्या विनयेन शोभते’ असे एक संस्कृत सुभाषित आहे. खराखुरा ज्ञानी माणूस स्वत:च्या विद्वत्तेचा गर्व करीत नसतो. तो उन्मत होत नसतो. इतरांना कमी लेखत नसतो. स्वत:च्या ज्ञानाचे उठसूट प्रदर्शन करीत नसतो आणि या अफाट ज्ञानसागरात अजून खूप खोलवर आणि लांबर्पयत जायचे आहे, आपल्या ज्ञानाला खूप मर्यादा आहेत, याची त्याला पदोपदी जाणीव झालेली असते. ज्याला आपल्या अपूर्णतेची जाणीव असते, त्यालाच पूर्णत्वाचा ध्यास लागतो व त्यासाठी आयुष्याचे समर्पण करून तो ज्ञानोपासना करतो. धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण, इतिहास, भाषा, संस्कृती अशा नाना ज्ञानशाखांची निष्ठेने साधना करणा:या अर्वाचिन तपस्व्यांची फार मोठी परंपरा आपल्यामध्ये होऊन गेली आहे. पण, यांपैकी कोणीही ‘मी सर्वज्ञ आहे आणि इतर बाकीचे अज्ञ आहेत,’ अशी अहंमन्य भाषा वापरल्याचे वाचनात नाही, ऐकण्यात नाही.
गढूळ पाण्याचा अर्धा माठ
By admin | Published: May 17, 2014 8:35 PM
स्वत:च्या ज्ञानाचे उठसूट प्रदर्शन करीत नसतो आणि या अफाट ज्ञानसागरात अजून खूप खोलवर आणि लांबर्पयत जायचे आहे,
आजकाल मात्र याच्या उलटा अनुभव येतो आहे. संशोधन, लेखन, चिंतन आणि प्रबोधन यांमध्ये पावशेर योगदान असले, तरी सव्वाशेराची ऐट मिरविणारी मंडळी खूप भेटतात. यांच्याकडे मौलिक स्वरूपाचे संशोधनही नसते आणि नवविचारांचे धनही नसते. चार संदर्भग्रंथांच्या आधारे चार पानांचे विस्कळीत गाठोडे म्हणजे यांचा शोधनिबंध असतो. असे लेखन करणारी मंडळीही फार कमी आहेत. बाकीची सारी विद्वान मानली जाणारी मंडळी बायको-मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात, भारी व्याजदराने दिलेल्या कर्जाचा हिशेब ठेवण्यात गर्क झालेली असतात. बिघडलेले हवामान, बिघडलेले राजकारण, बिघडलेला समाज अन् वाया गेलेली तरुण पिढी यांवर ते तावातावाने बोलतात. पण, बिघडलेल्या शिक्षणात माझाही अंशमात्र दोष आहे, हे मानायला ते तयार नसतात. त्यामुळे अशा या चार पानी संशोधकांना आपोआप प्रतिष्ठा मिळते, नव्हे ती ओरबाडून घेतात. ‘बोडक्या बायांत मूठभर केसांची बाई गंगावती’ अशी एक म्हण आहे. ती यांना लागू पडते. फेस समुद्रावर तरंगावा आणि रत्ने तळाशी असावीत, अशी आजची परिस्थिती आहे. थोर तत्त्वचिंतक दलाई लामा यांनी म्हटल्याप्रमाणो ‘पदव्या भरपूर झाल्या, पण ज्ञान आणि शहाणपण दुर्मिळ झाले,’ असेच म्हणावे लागेल.
हे एवढे रडगाणो सांगण्याचे कारण असे, की एका विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रला जाण्याचा योग आला. त्यासाठी त्या विषयातले ब:यापैकी लेखन असलेले आणि ब:यापैकी नाव असलेले चार-पाच मान्यवर आलेले होते. तसा विचार केला, तर त्यांच्या तुलनेत माझी पात्रता आणि माङो योगदान मी स्वत:च कमी मानतो. या चर्चासत्रला आसपासची बरीच अभ्यासू प्राध्यापक मंडळी आली होती. चहापानावेळी, जेवताना, रात्री शिळोप्याच्या गप्पा मारताना आमच्या बैठकीत असलेला एक तरुण प्राध्यापक मला जरा उथळ आणि बोलण्याचा विवेक नसलेला वाटला. आधी त्याने या निमंत्रित मान्यवरांच्या भाषणावर वेडीवाकडी टीका केली. ‘त्यांच्या भाषणात दम नव्हता. यांच्या भाषणात काही राम नव्हता. त्यांचे भाषण केवळ पाल्हाळिक बडबड वाटली. यांचे भाषण शुद्ध वेळखाऊ झाले,’ अशी त्याची मुक्ताफळे ऐकून सारे चकित झाले. बरे, या विषयाचा त्याचा सखोल अभ्यास आहे, त्याचे चार-दोन लेख प्रसिद्ध झालेले आहेत, असेही नव्हते. त्याचे एक पुस्तक प्रसिद्ध झालेले असले, तरी ते वेगळ्या विषयावरचे होते आणि त्या ग्रंथालाही फारशी गुणवत्ता नव्हती.
तो अधूनमधून कविता करतो, हे आम्हा सर्वाना ज्ञात होते; पण त्याच्या कविता म्हणजे क्रियापदे गाळलेले गाळीव गद्य वाटायचे किंवा रंगीबेरंगी अशा यमक साधणा:या शब्दांची ती माळ वाटायची. ‘गडे-नागडे, साकडे-लाकडे, तुरी-अस्तुरी, इतके तिकडे-चोहीकडे आनंदी आनंद गडे’ अशा अवगुणांनी त्याची कविता माखलेली असली, तरी केशवसुत, मर्ढेकर, कुसुमाग्रज, करंदीकर यानंतरचा श्रेष्ठ कवी मीच, अशी त्याची भाषा असायची. काही माणसे अध्र्या हळकुंडाने पिवळी होतात, पण या थोर कवीला आणि थोर समीक्षकाला पिवळे होण्यासाठी अर्धे हळकुंड नुसते अंगाला टेकविले, तरी पुरेसे व्हायचे.
दुस:या दिवशी चर्चासत्रला प्रारंभ होण्यापूर्वी आम्ही सारे चहापान करीत होतो. मोजकेच लेखन केलेले, पण सखोल व्यासंग असलेले त्या भागातील दोन निवृत्त प्राध्यापकही शेजारी होते. कुणी काय लिहिले, नवे कुणी काय वाचले, यांवर आमची चर्चा चाललेली असतानाच हे थोर पंडित आमच्या शेजारी येऊन बसले. आमची चर्चा एका नव्या समीक्षाग्रंथावर चालली असताना मध्येच हा तसा बडबडला. म्हणाला, ‘‘काय आहे त्या पुस्तकात? चार इंग्रजी पुस्तके हाताशी घेऊन तयार केलेला हा उद्योग आहे. त्याला फार अक्कल लागत नाही. नाही तरी त्याला काय येते? तो अमुकअमुक गडी स्वत:ला विद्वान प्राध्यापक समजतो. पण, सारा उसने-पासने- मागून घेतलेला हा प्रपंच. कागद आणि शाई सोडली, तर त्याचे स्वत:चे त्या ग्रंथात काय आहे? आपण उगीच खोटय़ा स्तुतीची मोरपिसे लावतो या लोकांना.’’ त्यावर सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक अस्वस्थ झाले. त्यांनी आपला चहाचा कप शेजारी ठेवला. कदाचित त्यांना त्याची पूर्ण माहिती असावी. कदाचित, ते त्याला शिकवायला असावेत. त्याचा वकूबही त्यांना ठाऊक असावा. त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, ‘‘पुस्तक न वाचता, त्या विषयातले आपणाला फारसे ठाऊक नसताना अशी मूर्ख बडबड करणो चुकीचे आहे. त्याला आपण खोटी तरी चार मोरपिसे लावतो. पण, तुला कोण लावतो आणि किती लागली? कुणावरही अशी उथळ टीका करणो, प्रत्येकाची अक्कल काढणो म्हणजे स्वत: ज्ञानी नव्हे. तुझा पीएच. डी. प्रबंध मला ठाऊक आहे. तूच मला कमी-जास्त बघण्यासाठी दिला होता. तो काय पात्रतेचा आहे, मी जाणतो. तुङो शुद्धलेखन मला ठाऊक आहे. तुला सीता-गीता शब्द लिहिता येत नाहीत. वारांगणा आणि वीरांगना, रोडगा आणि रोडका, घास आणि घाट यांतला अर्थभेद तुला ठाऊक नाही. निदरेष आणि सुसंगत वाक्यरचना तुला जमत नाही.
नेत्रदीपक वैचारिक ङोप घेतलेला आणि मौलिक विचार सांगणारा तुझा लेख सांगशील का आम्हाला? बाळा, हे बरे नव्हे. हा उथळपणा झाला. मत्सराचा आविष्कार म्हणजे ज्ञान नव्हे. कोणताही माणूस पूर्ण नसतो. त्यांच्यातला चांगुलपणा घ्यावा. हीनपणा दुर्लक्षित करावा. तुझा स्वभाव म्हणजे जनावराला झालेल्या जखमेवर नजर ठेवून त्यातले किडे खाणा:या कावळ्यासारखा झाला.’’
‘‘सर, पण मला असं म्हणायचं होतं की..’’ असे तो म्हणू लागताच ते प्राध्यापक म्हणाले, ‘‘एखादी रेघ पुसून छोटी करण्यापेक्षा त्या रेषेखाली मोठी ठळक रेघ आपण काढायची असते. बिरबलाने आपणाला हेच दाखवून दिले आहे.’’
शरमिंदा चेहरा न दाखवता तो खाली मान घालून बसला.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व
निवृत्त प्राचार्य आहेत.)