शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हेदी

By admin | Published: February 19, 2016 6:09 PM

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचं स्थान अनन्यसाधारण. पण या वास्तवालाही दुसरी बाजू आहे. मुलांना कायम पदराखाली घेऊन त्यांना ‘बंदिवाना’चं आयुष्य जगायला

 प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईचं स्थान अनन्यसाधारण. पण या वास्तवालाही दुसरी बाजू आहे. 

मुलांना कायम पदराखाली घेऊन त्यांना ‘बंदिवाना’चं आयुष्य जगायला भाग पाडणारी ब:याचदा आईच असते. परंपरेची गोधडी फाडणा:या वास्तवाचा दाहक चित्र-अनुभव.
हेदी.
 
‘जगातला सर्वात मोठा खलनायक म्हणजे आई!’   
हे थेटपणो अंगावर येणारं विधान मीच माङया ‘या पालकांनाच शाळेत धाडायला हवे’ या व्याख्यानात करत आलोय. दरवेळी माझं व्याख्यान संपल्यावर चारसहा महिला मला भेटायला येतात आणि आईविषयी असं सरळसरळ  उफराटं  बोलल्याबद्दल आपली नापसंती आणि तीही ब:याचदा अगदी तीव्र शब्दात व्यक्त करतात.  मी अधिकची उदाहरणं देऊन माझं म्हणणं पुन्हा एकदा नीटपणो  समजावून देतो. काही महिलांना पटायला लागतं. 
हे सारं आज आठवण्याचं कारण म्हणजे सहासष्टाव्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवाच्या स्पर्धा विभागात पाहिलेला ‘हेदी’ हा टय़ुनिशियाचा अतिशय प्रभावी चित्रपट! माङया व्याख्यानानंतर मला येऊन भेटणा:या स्त्रियांना त्याबद्दल सांगावंसं वाटलं पण  त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही, हेही जाणवलं याचं कारण हा चित्रपट पाहायला माङयासोबत असलेला एक भारतीय समीक्षक! तो याच जनसमूहाचा प्रतिनिधी होता आणि हेदीच्या आईनंच हेदीचं नुकसान केलंय हे तो मानायलाच तयार नव्हता.काहीशा तिरीमिरीतच त्यानं माझा निरोप घेतला. 
बाकी सारं सोडा, चित्रपटात एका महत्त्वाच्या दृश्यात हेदी आपल्या थोरल्या भावासमोर आईला तिनं त्याचं जे काही कडबोळं केलं त्याबद्दल तिला प्रथमच सुनावतो ते दृश्यही माझा हा मित्र नीट पाहायला आणि समजून घ्यायला तयार नव्हता. कदाचित तेच नेमकं त्याच्या नजरेतून सुटलं असावं. असं कुणी आईला सुनावतं का, असंही त्याला वाटलं असावं.
हेदीच्या लहानपणापासूनच ‘हे कर, ते करू नको’ असं आई जे सांगत आलीय तेच सारं ती तसंच आता पंचविशीतल्या हेदीला सांगत राहते. त्याचे सारे निर्णय तीच परस्पर घेते. आताही त्याचं लग्न तिनंच ठरवलंय. मुलगीही तिनंच पाहिलीय. ठरवलीय. हेदीला स्वत:चं असं व्यक्तिमत्त्वच नाही. बाहेर पडताना हेदीच्या हाती खर्चापुरते पैसे देणा:या आईला हेदीच्या लग्नासाठी पॅरिसहून आलेला थोरला मुलगा जेव्हा, ‘हे काय, लहान मुलासारखं त्याला पैसे देतेस’ असं म्हणतो तेव्हा आईचं उत्तर तयारच असतं आणि क्षणाचाही विलंब न करता ती ते देतेही :
‘असू दे. त्याचा अख्खा पगार तो माङया हाती ठेवतो आणि त्यातूनच मी त्याला खर्चाला दररोज पैसे देते. त्यामुळे त्याचे पैसेही साठतात थोडे थोडे. त्याला एवढय़ात कसा सारा व्यवहार कळणार? लहान आहे रे तो अजून.’  
कुठलीही आई जेव्हा आपल्या कुठल्याही  वयातल्या मुलाला ‘लहान’ म्हणते तेव्हा ती त्या मुलाचं किती नुकसान करते हे तिला तर नाहीच कळत, परंतु त्या बाळोबालाही कळत नाही. अशी आई मुलाची वाढच होऊ देत नाही आणि हे पुन्हा ती कुठल्याही दुष्ट हेतूने करतच नाही. त्याच्या   भल्यासाठीच करते. आई मुलाचं करीत असलेलं हे अशाप्रकारचं भलं या वास्तवाकडेच हेदी   आपल्याला थेटपणो पाहायला लावतो.
हेदीच्या आईने सतत त्याला पदराखाली घेऊन एकप्रकारच्या तुरु ंगात कायमचं बंदिवान करून टाकलंय. मुळातच तो शेंडेफळ म्हणून लाडका. थोरला बापाच्या तोंडावळ्याचा. इतकंच नाही तर बापासारखा स्वतंत्र वृत्तीचा. त्यामुळे  ‘माझं सोनुलं बाळ’ असं सतत करत राहायला हेदीच हाताशी उरला. थोरला पुढल्या शिक्षणासाठी पॅरिसला गेला, तिथेच नोकरी धरली आणि त्याने तिथल्याच फ्रेंच मुलीशी लग्न केलं. आईला काही करा - बोलायची सवडच त्याने ठेवली नाही. त्यातलं आईला काहीच आवडलेलं नाही. त्यामुळे आईने हेदीचा ताबा पूर्णत: आपल्या हाती घेतला आहे. त्याचं सगळं तीच ठरवू लागली. इतकं की तिनं हेदीला कधी हे जाणवूच दिलं नाही की आपलं स्वत:चं असं काही जगणं असतं. असायला हवं. 
एकीकडे हेदी असा आईच्या कचाटय़ात सापडलेला, तर दुसरीकडे ऑफिसमध्ये बॉस त्याचा रिंगमास्टर. सतत त्याच्याच तालावर नाचायचं. लग्नासाठी तो सुटीही द्यायला तयार नाही. उलट इकडे घरात लगीनघाई चाललेली, तर बॉस त्याला सेल वाढविण्यासाठी दूरच्या शहरात पाठवतो. परंतु ‘ब्लेसिंग इन डिसगाईस’ म्हणतात त्याप्रमाणो हेदीसाठी हा दौरा इष्टापत्तीचा ठरतो. एक तर प्रथमच तो आईच्या पदराबाहेर पडतो आणि बाहेरचं जग पाहतो. त्याला स्वत:ची जाणीव होते. ओळख पटते. समोर आलेल्या पहिल्याच मुलीविषयी त्याला वेगळं काही वाटायला लागतं. तो तिच्या प्रेमात पडतो. जिच्याशी लग्न ठरलं तिला याआधी एक दोनदा चोरून भेटताना तरुण मुलामुलींच्या मनातली नवथर भावना त्याने प्रथमच अनुभवणं आणि आक्र सलेल्या व्यक्तिमत्त्वातल्या शरीरभावना नीट व्यक्त न होणं यातून गेलेला हेदी आता या मुलीच्या बाबतीत मात्र अवघडत अवघडत का होईना पुढाकार घेतो. प्रथम त्याच्या नजरेत भरतं ते तिचं उफाडय़ाचं शरीर जे अगदी स्वाभाविकच आहे. त्याच्या आक्र सलेल्या व्यक्तिमत्त्वाला भिरकावून द्यायला उत्कट शरीरभावना गरजेची असते आणि तेच इथे एका सहजतेनं घडून येतं. हेदीचं एकूणच व्यक्तिचित्र  या चित्रपटात फारच सुरेखपणो आणि बारीकसारीक तपशिलानिशी जमून आलंय.
मोहम्मद बेन अतिआ या तरुण दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच चित्रपटात ज्या नजाकतीनं आणि प्रगल्भतेनं ही कौटुंबिक समस्या हाताळलीय त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. आपल्या आरंभीच्या चित्रपटात बहुतांश दिग्दर्शकांना परंपरांना आव्हान देणं विशेष आवडतं आणि एकाअर्थी ते स्वाभाविकदेखील असतं. मोहम्मद अतिआचं खास कौतुक अशासाठी की ही एक वेगळी परंपरा त्याने आपल्या चित्रपटासाठी निवडली आणि ती अशा पद्धतीने हाताळली की आईविषयी सारा आदरभाव, भक्तिभाव मनोमन जपत तो दाखवत असलेलं आईचं दुसरं रूप प्रेक्षक पाहू शकतो. अपवाद अर्थातच वर उल्लेख केलेल्या परंपरांची गोधडी अंगाभोवती घट्ट लपेटून घेणा:या माङया समीक्षक मित्रसारख्यांचा.
हेदीची पटकथा सहजपणाने फुलत जाते. त्यातलं नाटय़ अतिशय नैसर्गिकपणाने आलेलं आहे. घराघरात दिसणारं पण सहजपणो नजरेस न पडणारं असं काही छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून पटकथाकाराने पेरलं आहे. त्यातली प्रत्ययकारकता चोख आहे. सोळा नंबरी अस्सल आहे.
आईनं ठरवलेलं लग्न मोडून हेदी जिच्या प्रेमात  पडलाय त्या मुलीबरोबर परदेशात जायचा निर्णयही तो ऐनवेळी बदलतो. यातून तो त्याचे निर्णय आता किती समर्थपणो घेऊ शकतो हे दिसून येतं. त्याक्षणी त्याने असाच निर्णय घेणं हे तिथवर त्याचा जो स्वचा शोध चाललाय त्याच्याशी जुळून येतं. त्यातली अपरिहार्यता तितकीच स्वाभाविक असते. तो त्याचे निर्णय घेऊ शकतो. त्यातलं बरंवाईट त्याला कळू शकतं आणि त्याची जबाबदारी घेण्याची प्रगल्भ जाण त्याला आलेली असते. हेदीची ही कमाई हेच त्याच्या कथेचं सार आहे. तेच ईप्सित आहे.
बर्लिनासारख्या प्रथितयश चित्रपट  महोत्सवात एरवी कौटुंबिक मेलोड्रामा म्हणून बाजूला काढला गेला असता असा चित्रपट दाखवला जाणं आणि तोही तिथल्या प्रतिष्ठित स्पर्धा विभागात, ही एक प्रगल्भ चित्रपट जाणिवांचं दर्शन  घडविणारी गोष्ट वाटते. अनेकांनी विविध कलामाध्यमातून उलगडून दाखवलेली कौटुंबिक नातीगोती नव्या संदर्भात, आधुनिक दृष्टिकोनातून पुन्हा दाखवणं आणि बर्लिनसारख्या महोत्सवात त्याची योग्य अशी दखल घेणं हे माङयातल्या महोत्सवाच्या वारक:याला खचितच विशेष वाटतं आणि म्हणूनच ‘हेदी’ची इतकी विस्तृत दखल घ्यावीशी वाटते.