शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

निरुपद्रवी बिबट

By admin | Published: October 11, 2015 7:36 PM

रेंज चार्जमध्ये मला नेमून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या कामांत तारुबंदामध्ये चार हेक्टर क्षेत्रवर मध्यवर्ती रोपवाटिका तयार करणो हे एक काम होतं.

प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
 
रेंज चार्जमध्ये मला नेमून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या कामांत तारुबंदामध्ये चार हेक्टर क्षेत्रवर मध्यवर्ती रोपवाटिका तयार करणो हे एक काम होतं. ह्या रोपवाटिकेत जवळपास दहा लाख सागवान रोपे (साग जडय़ा) तयार करावयाची होती. हा रोपांचा साठा माझीच नव्हे तर जवळच्या इतर वनपरिक्षेत्रंचीही गरज भागवणार होता. नवीन रोपवाटिकेच्या जागेची निवड करताना देखरेखीसाठी जवळ असणो, विद्युतपुरवठा, मुबलक पाणी हे महत्त्वाचे घटक होते. हे घटक विचारात घेऊन विभागीय वनाधिका:यांनी माङया निवासस्थानाच्या मागे तलावाला खेटून असलेलं वनक्षेत्र निवडलं. रोपवाटिका अशा जागी होती की त्याच्या सलग तार कुंपणामुळे वन्यप्राण्यांना तलावावर जायला, विशेषत: रात्रीच्या वेळी, अडथळा निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे रोपवाटिकेतून जाणा:या छोटय़ा ओढय़ांच्या भोवतीच्या पाण्याकडे जायच्या जागा मी हेतुपुरस्सर मोकळ्या सोडल्या होत्या. वीस फूट रुंदीच्या ह्या गल्ल्याच्या भोवती तारा लावून घेतल्या होत्या, जेणोकरून प्राणी कोणत्याही अडथळ्याविना पाण्यावर जाऊ शकतील. पण दुर्दैवाने ह्या गल्ल्या त्याचा वापर करणा:यांमध्ये, वन्यप्राण्यांमध्ये फारशा लोकप्रिय झाल्या नाहीत. 
पाणवठय़ाकडे जाणा:या परिसरात नवीन काही घडलं, बदल झाला तर त्याबाबत वन्यप्राणी संवेदनशील असतात आणि जास्तच सावधपणो पाणवठय़ाकडे जातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी जवळपास कुठेतरी टपून बसले असतील असं वाटतं, तर मांसाहारी प्राण्यांना घातक मनुष्यप्राण्यांचा धोका असल्याचा संशय येत राहतो. त्यांच्या मनात हे चांगलंच भिनलेलं असतं की जराशा निष्काळजीपणामुळे त्यांना प्राणाला मुकावं लागू शकतं. एका संध्याकाळी मी माङो ड्रायव्हर निमकर यांच्यासोबत वैराट-कोहा रस्त्यावरच्या चचर्दा नावाच्या पाणवठय़ापासून पाच मीटर अंतरावर एका झुडपाआड दडून बसलो होतो. आदल्या संध्याकाळी मी गडद तपकिरी रंगाचं अस्वल बघितलं होतं, त्यामुळे ह्या निरव ‘बुजुर्ग’ पाणवठय़ावर आणखी काहीतरी ‘मोठ्ठं’ दिसेल अशा अपेक्षेत मी होतो. मी ह्या पाणवठय़ाला बुजुर्ग असं संबोधलं आहे, कारण ‘दा’ म्हणजे बुजुर्ग. मेळघाटातील नावात शेवटी ‘दा’ असणारे असे बरेच पाणवठे मी नव्याने शोधले व पुनरुज्जीवित केले होते. तर त्या संध्याकाळी पाचच्या सुमारास एक भेकर अतिशय सावधपणो पाणवठय़ावर आलं. दोन-चार घोट पाणी ढोसेपर्यंत त्याला आमच्या अस्तित्वाचा पत्ता लागला नव्हता. कदाचित त्याचा त्याच्या दृष्टीपेक्षा घ्राणोंद्रियावर जास्त भरोसा असावा. जसा हवेचा रोख बदलला तसा त्याला आमचा वास लागला आणि आम्ही त्याच्या अगदी जवळ आहोत असा साक्षात्कारही झाला. त्याने भयचकित होऊन धोक्याचा मोठा इशारा केला. आमच्यापासून दूर दरीत पळत जात पुढची पंधरा मिनिटं तो सतत धोक्याचे इशारे देत सुटला होता. त्याने इशारे देणो थांबवेपर्यंत जवळपास आठ-दहा किलोमीटर अंतर नक्कीच कापलं असावं. त्याची ही टोकाची प्रतिक्रिया आम्हाला फारच गमतीदार वाटली आणि आम्ही हसत सुटलो. आमच्या हसण्यातून सावरल्यावर माङया खाकी टी-शर्टावरील काळ्या पट्टय़ांकडे बघत निमकर म्हणाले, ‘साहेब, तो तुम्हाला वाघ समजला आणि त्यामुळे घाबरून त्याने इतका दंगा घातला.’ निमकरांच्या सांगण्यात तथ्य होतं. त्या फसगतीला माझा वेष कारणीभूत ठरला असावा. जंगलात जाताना आजूबाजूच्या परिसरात बेमालूमपणो मिसळून जाणारा वेष धारण करणं किती महत्त्वाचं असतं हे ह्या प्रसंगावरून मला चांगलंच समजलं.
तर परत एकदा तारुबंद्याकडे वळू. तलावाकडे जाणारा वन्यप्राण्यांचा रस्ता माङया रोपवाटिकेमुळे बंद झाला आहे ह्याबद्दल मला फार अपराधी वाटत होतं. बरं, मी काढून दिलेला कृत्रिम मार्गही त्यांना असुरक्षित वाटत होता. त्यामुळे काहीतरी मार्ग काढणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांना सोयिस्कर ठरेल अशा ‘हाथकुआ’ नावाच्या ठिकाणी एक पाणवठा विकसित करावा असं मी ठरवलं. तारुबंदा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणा:या हाथकुआ जंगलात सामुदायिक विहीर होती. कालपरत्वे गावातल्या तलावाजवळ आणखी एक सामुदायिक विहीर निर्माण झाल्याने ही हाथकुआची विहीर वापरात राहिली नव्हती. रस्सी, दोर अशा कोणत्याही साधनाशिवाय निव्वळ हाताने पाणी घेता येईल एवढी ह्या विहिरीतील पाण्याची पातळी होती आणि म्हणूनच हाथकुआ असं अर्थवाही नाव तिला पडलं होतं. मी जेव्हा विहिरीला भेट दिली तेव्हा माङया असं लक्षात आलं की विहीर गाळाने भरलेली आहे आणि विहिरीकडे जाणारा मार्ग टणटणीने भरलेला असल्याने वन्यप्राण्यांना तिथपर्यंत जाणं मुश्कील आहे. त्यामुळे थोडाफार गाळ काढला, टणटणी उपटून काढली. हे करत असताना पाण्याकडे जाण्याच्या मार्गाला हलकासा उतार दिला, जेणोकरून वन्यप्राण्यांना बुडण्याची भीती वाटू नये. 
आठवडाभरातच मला माहिती मिळू लागली की वन्यप्राण्यांनी हा पाणवठा आपलासा केला आहे. मी स्वत: तिथल्या पाऊलखुणा पाहून निश्चिती केली की जंगलच्या रहिवाशांनी हा जुना ‘नवीन’ पाणवठा स्वीकारला आहे. तारुबंदा तलावापेक्षा हा पाणवठा केव्हाही पसंतीचा ठरणारा होता. लवकरच तलावावर जाणा:या सर्वच प्राण्यांचा मोर्चा हाथकुआकडे वळला. माङया दृष्टीने ही फार समाधानाची बाब ठरली होती. माङया मनातली बोच दूर झाली होती. एक दिवस माङया मनात विचार आला की आपल्या पाणवठय़ावरील पाहुण्यांची भेट घ्यावी. 
त्याकरता हाथकुआ जवळच्या एका झाडावर मी मचाण बांधून घेतलं. मचाण आजूबाजूच्या परिसराशी एकरूप होईल अशी दक्षता घेतली होती. त्याकरता डहाळ्या, माङया ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या मच्छरदाणीचा आधार घेतला होता. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी बघण्यासाठी सर्चलाईटचा वापर तेव्हा गैर नव्हतं. त्यामुळे अंधारल्यावर त्याचा वापर करावा असा विचार केला. सहसा सर्चलाईटच्या विजेची सोय जीपच्या बॅटरीमधून घेतली जाते. बॅटरी वजनी असल्याने इथे मचाणावर आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे झाडाच्या बुडाशीच त्या ठेवण्यात आल्या होत्या. सर्चलाईटच्या वायरची लांबी सहा फूट असल्याने मचाणाची उंची कमी ठेवण्यात आली होती. त्यामुळे ख:या अर्थाने मी जमिनीपासून फक्त चार फुटांवरच बसलो होतो. आमच्या छोटय़ाशा मचाणाकरता ‘टू इज कंपनी अॅण्ड थ्री इज अ क्राऊड’ ही उक्ती लागू पडत होती. त्यामुळे माङया सोबत फक्त एस. ए. कोर्टम नावाचा एक तरुण वनरक्षक ठेवला होता. चारच्या सुमारास आम्ही आमच्या ड्रायव्हरला जायला सांगितलं. गावाच्या दिशेने एखाद्या आडोशाला त्याला थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वन्यप्राण्यांच्या पाणवठय़ाला येण्याच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आमची जीप लावली होती. माङयाकडे वॉकीटॉकी नसल्याने ड्रायव्हरला बोलावण्यासाठी मी त्याच्या दिशेने सर्चलाईट मारल्यावर त्याने मला घ्यायला यायचं असं ठरलं होतं. 
ड्रायव्हर गेल्यावर जवळपास एक तास काहीच घडलं नाही. नंतर एक फारच सावध, संशयी मोर पाणवठय़ाशी आला आणि सर्व आलबेल आहे अशी खात्री केल्यानंतर पंधरा मिनिटांनी त्याने पाण्याचा पहिला घोट घेतला. मोर गेल्यावर सात रानडुकरांचं एक टोळकं उगवलं. गमतीचा भाग म्हणजे इथे जवळच ‘सुकळी-भुरा’ नावाचा एक पाणवठा होता. एका वृद्ध कोरकूने मला ‘सुकळी’ म्हणजे रानडुक्कर आणि ‘भुरा’ म्हणजे बुडणं असा त्या नावाचा उलगडा केला होता. कारण फार पूर्वी इथे एक रानडुक्कर पाणी पिण्याकरता आलं होतं आणि बुडून मेलं होतं. 
अंधार पडता पडता पाच सांबरं आली, त्या टोळीचा शिलेदार नर सांबर माङया दिशेने बघत अचानक थबकला. त्याचे कान टवकारले गेले, शेपूट वर झाली आणि त्याने त्याचा पुढचा पाय मुडपून जमिनीवर आपटून मोठय़ाने धोक्याचा इशारा केला. वा:याची दिशा आमच्या मचाणाकडून सांबरांच्या दिशेने होती. त्यामुळे मी खुणोने कोर्टमला धोक्याच्या इशा:याचे कारण विचारलं. त्याने खूण करून सांगितलं की आपणच कारणीभूत आहोत. मला ते कारण तितकंसं पटलं नाही. असाच काही वेळ गेला आणि मिट्ट काळोख पडल्यावर मी सर्चलाईट लावला. सांबरं अगदी स्तब्ध उभी होती. ती सावध होती पण शांत होती. पण ही शांतता त्यांच्या धोक्याच्या इशा:याने अधूनमधून भंग पावत होती. ती पाणी पीतही नव्हती की तिथून जातही नव्हती. कसली तरी भूल पडल्यागत त्यांची अवस्था झाली होती. हा प्रकार अर्धा तास चालू होता. आमच्या आसपास एखादा प्राणी तर नाही ना हे पाहण्यासाठी मी सर्चलाईटने मचाणाभोवती तपासणी सुरू केली. सर्चलाईटचा झोत झाडाच्या बुडाशी गेल्यावर माङया दिशेने रोखलेले दोन चमकणारे डोळे दिसले. क्षणार्धात मला कळून चुकलं की मचाणाखाली अगदी हाताच्या अंतरावर एक पूर्ण वाढ झालेला बिबटय़ा बसला आहे. त्याने आमच्या मचाणाखाली केव्हा तळ ठोकला आणि त्या सांबरांना खिळवून ठेवलं हे आम्हाला कळलंसुद्धा नव्हतं. सर्चलाईटने मचाणाखाली आमची तपासणी चालू होती, तर आमच्या ड्रायव्हरला वाटलं त्याला बोलावण्याचा संकेत केला आहे म्हणून तो घटनास्थळी अचानक उगवला. ह्या गडबडीत बिबटय़ा एका दिशेने, तर दुस:या दिशेने सांबरं निघून गेली. नंतर आम्ही जीपने तारुबंद्याला परतत असताना कोर्टमने मला विचारलं, ‘साहेब, बिबट झाडावर चढण्यात पटाईत असतो, आत्ता वेळेवर जीप आली नसती तर काय आफत झाली असती.’ ह्यातून त्याला सुचवायचं होतं की बिबट आमच्यावर हल्ला करू शकला असता. पण त्याला माझं उत्तर होतं की ‘आपण त्याचं भक्ष्य नाही म्हणून त्याने आपल्याला काही केलं नसतं.’ पुढे माङया नोकरीच्या उर्वरित काळात माझी अशा निरुपद्रवी बिबटशी खूप वेळा भेट झाली. 
 
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त 
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
 
pjthosre@hotmail.com