शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

धातूचे नाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:04 AM

वस्तुविनिमयानंतर सोन्या-चांदीची ढेकळे  ‘चलन’ म्हणून वापरात यायला लागली. पण त्यांच्या शुद्धतेविषयी साशंकता होती. त्यामुळे बर्‍याचदा व्यवहार अडकत, रद्द होत.  यावर जालीम उपाय म्हणून लिडियन लोकांनी  शुद्ध सोन्या-चांदीची, ठरावीक वजनांची नाणी  बाजारात आणली आणि तिथून पुढे  व्यवहाराचा इतिहासच पूर्णपणे बदलला.

ठळक मुद्देवस्तुविनिमयाच्या र्मयादांवर मात करण्यासाठी जन्माला आलं नवं ‘चलन’!

- हृषिकेश खेडकर

परिस्थितीशी झगडत, मार्ग काढत आणि मेंदूला चालना देत आपल्या डिझाइनच्या गोष्टीतला माणूस आता स्थिरावला आहे. छोट्या छोट्या पाड्यांमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहणारा हा माणूस प्रगतीच्या नवीन वाटा शोधतो आहे. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीचे टप्पे शोधताना माणसाला एक नवीन गोष्ट सापडली आहे ती म्हणजे व्यवहार!स्वत:ला जे जमेल ते करून किंवा इतरांशी संवाद साधून आपल्या जगण्यातल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकणार नाही याची खात्री आल्यावर माणूस सुरु वातीला वस्तूंची देवाणघेवाण करू लागला. ही देवाणघेवाण वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणे किंवा एखादी सेवा देणे या स्वरूपाची होती. आपल्या सगळ्यांनाच परिचित असणारा हा व्यवहार म्हणजे वस्तुविनिमय प्रणाली किंवा बार्टर सिस्टीम! विकासाच्या वाटेवर धावत असताना वस्तुविनिमयामार्फत व्यवहार करणार्‍या माणसाला या प्रणालीच्या र्मयादा जाणवू लागल्या. गावं, शहरं, विविध प्रदेश जसे जोडले गेले तसे दैनंदिन व्यवहार अधिक गुंतागुंतीचे होऊ लागले. वस्तुविनिमय करताना एखाद्या वस्तूची किंवा सेवेची गरज, गुणवत्ता, बाजारभाव, उपलब्धता अशा एक ना अनेक गोष्टी भेडसावू लागल्या. या व्यावहारिक अडचणींवर मात करत माणसाने वस्तुविनिमय प्रणाली मोडीत काढली आणि इथे जन्म झाला तो मानवी उत्क्र ांतीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या कल्पित संकल्पनेचा (मिथिकल कन्सेप्ट) ज्याला आपण चलन (करन्सी) म्हणतो आणि या कल्पित संकल्पनेचं डिझाइन केलेलं भौतिक रूप म्हणजे ‘नाणं’ (कॉइन).आपली डिझाइनची गोष्ट आज घडते आहे मध्यपूर्वेतील टर्की  नावाच्या देशात. साधारण 2500 वर्षांपूर्वी पश्चिम टर्कीत लिडिया  नावाचं राज्य होतं. क्र ॉसेस हा या राज्याचा राजा होता. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि उत्तर पश्चिमेकडील एक मोठे व्यापाराचे केंद्र असलेले सर्डीस शहर हे लिडिया राज्याचे राजधानीचे ठिकाण. हात लागेल त्याचं सोनं करणार्‍या मिडास नावाच्या राजाची आख्यायिका आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे, या आख्यायिकेतला एक असा समज आहे की हा मिडास राजा या सर्डीस शहरात राहत असे. इसवी सन पूर्व 550मध्ये क्र ॉसेस राजाने सर्डीस शहरात मोठय़ा प्रमाणात सोन्याचे उत्खनन केले आणि या मौलिक धातुमधून मानवी उत्क्र ांतीच्या इतिहासात चलन म्हणून सर्वप्रथम वापरली गेलेली सोन्याची नाणी बनवली.लिडियन नाणी अस्तित्वात येण्याच्या आधी व्यवहारांमध्ये मौलिक धातूंची देवाण-घेवाण केली जात असे. बहुतेक वेळेला सोन्याची किंवा चांदीची ढेकळे या कारणासाठी वापरली जात असत. पूर्वी व्यवहारात या धातूंच्या आकाराला महत्त्व नसून त्यांचे वजन आणि शुद्धता या दोन कसोट्यांवर व्यवहारातली त्यांची किंमत ठरवली जात असे. परंतु यात एक महत्त्वाची त्नुटी कायम साशंकता निर्माण करणारी होती; ती म्हणजे नैसर्गिक अवस्थेत सोने आणि चांदी यांचे कायम मिसळण असलेले धातूचे साठे सापडतात. कित्येकदा तर यांच्याबरोबर बाजारभावांनी कमी असणारे इतर धातूदेखील सापडतात. या साशंकतेमुळे बर्‍याचदा व्यवहार अडकून पडत किंवा रद्दबातल होत असत. या परिस्थितीवर जालीम उपाय म्हणून लिडियन लोकांनी शुद्ध सोने आणि शुद्ध चांदी वापरून बनवलेली ठरावीक वजनांची नाणी बाजारात आणली आणि तिथून पुढे व्यवहाराचा इतिहास पूर्णपणे बदलला. पण लिडियन लोकांना हे समजलं कसं? या प्रश्नाचं उत्तर देताना इतिहासतज्ज्ञ डॉक्टर पॉल क्र ॉडोक सांगतात की, मिर्श धातुमधून तांबे किंवा पितळ बाहेर काढणे तितकंसं अवघड नाही; पण खरा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे सोने उत्खननात निघणार्‍या चांदीचा. रासायनिक प्रक्रि येत सोने अतिशय कणखर पदार्थ आहे; पण चांदीदेखील यथार्थ प्रमाणात रासायनिक प्रक्रि येत तग धरू शकते; यावर उपाय म्हणून लिडियन लोकांनी खाणीतून सोन्याची अत्यंत बारीक पावडर गोळा करायला सुरु वात केली त्याचबरोबर धातूच्या मोठय़ा ढेकळांना ठोकून बारीक पत्रा काढून तो मीठ आणि सोडियम क्लोराइड यांच्या मिर्शणात साधारण आठशे डिग्री सेल्सिअसला तापवून त्यातून सोने धातू वेगळा केला. अशा पद्धतीने शुद्ध सोन्यापासून बनवलेल्या नाण्यांवर त्याचे वजन आणि त्याची किंमत कळण्यासाठी लोहाराच्या मदतीने मुद्रा घडवायला सुरु वात केली. या नाण्यांना मुद्रांकित करण्यासाठी सिंहाच्या छबीचा वापर केला जाऊ लागला. नाण्याचे वजन आणि त्याची किंमत ही त्यावर मुद्रांकित केलेल्या सिंहाच्या छबीवरून ठरवली जात असे. जसे की, सगळ्यात कमी किमतीच्या नाण्यावर सिंहाचा फक्त पंजा मुद्रांकित केला जात असे. लिडियन लोकांनी चालू केलेल्या या चलन पद्धतीमुळे व्यवसाय करणार्‍यांची नाण्याची शुद्धता आणि वजन मोजून बघायची चिंताच मिटली.या बदलामुळे सर्डीस शहरात व्यवहार करणे कोणालाही अतिशय सरळ, सोपं आणि आकर्षक वाटू लागलं. अर्थातच लोकांचा जसा विश्वास वाढला तसं सर्डीसच्या या नाण्यांनी त्याच्या भौगोलिक सीमा ओलांडल्या आणि लिडियन लोकांचे हे नाणे दैनंदिन व्यवहारातले मानक बनून गेले. पुढे काही काळानंतर झालेल्या एका लढाईत पर्शियन सम्राट सायरसने क्र ॉसेसचा पराभव केला आणि क्र ॉसेसलाच आपला आर्थिक सल्लागार बनवून राज्यकारभार करू लागला. व्यवहारी क्र ॉसेसने या संधीचा पुरेपूर फायदा करून घेत लिडियन लोकांनी बनवलेल्या या नाण्यांना भूमध्य आणि आशियाई बाजारपेठांमध्ये महत्त्वाची जागा मिळवून दिली. सर्डीसमध्ये डिझाइन केल्या गेलेल्या या एका छोट्याशा नाण्यांनी पुढे आधुनिक व्यवहार आणि राजकारण यांना ऐतिहासिक कलाटणी दिली. प्रांतांपरत्वे नाण्यांच्या आकारात, धातूत आणि मुद्रांकनात बदल होत गेले; पण समाजात या काल्पनिक संकल्पनेचं महत्त्व आजही अढळ आहे यात शंका नाही. डिझाइनच्या या गमती-जमती अशाच पुढे चालू राहतील; पण आता कधी तुमच्या हाताला नाणं लागेल तेव्हा या गोष्टीची आठवण होईल इतकं नक्की.(लेखक वास्तुरचनाकार आहेत.)

hrishikhedkar@gmail.com