शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अवकाश गारुड!

By admin | Published: July 01, 2016 6:22 PM

जेव्हा एखादा देश स्वनिर्मित अग्निबाणाने आपला उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडतो, त्यावेळी पृथ्वीवरच्या कुठल्याही ठिकाणावर अण्वस्त्र टाकू शकण्याची क्षमताही त्यानं सिद्ध केलेली असते

निरंजन घाटे
(लेखक विज्ञान अभ्यासक आणि लेखक आहेत.)
 
जेव्हा एखादा देश स्वनिर्मित अग्निबाणाने आपला उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडतो, त्यावेळी पृथ्वीवरच्या कुठल्याही ठिकाणावर अण्वस्त्र टाकू शकण्याची क्षमताही त्यानं सिद्ध केलेली असते.
जर तो एकाच वेळी अनेक उपग्रह  अवकाशात अचूक सोडू शकत असेल, तर त्या क्षमतेचा उपयोगही वेळप्रसंगी तो करू शकतो. इस्त्रोचं वैशिष्टय़ म्हणजे सामान्यांच्या जीवनात क्रांती घडवू शकण्याच्या 
शक्यताही त्यानं वास्तवात आणल्या.
 
 
इस्त्रोने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करताना अंतराळ क्षेत्रत भारताचे नाव मोठे केले. भारताने पीएसएलव्ही-सी 34 या उपग्रह प्रक्षेपण अग्निबाणाद्वारे छोटेमोठे वीस उपग्रह अवकाशात सोडले. 
पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल म्हणजे धृवीय कक्षेत फिरणारे उपग्रह अवकाशात सोडणारे वाहन. हे उपग्रह पृथ्वीभोवती उत्तर दक्षिण असे फिरतात. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी फिरत असते. त्यामुळे पृथ्वीचा सर्व गोळा या उपग्रहांखाली हळूहळू येत राहतो. या मोहिमेचं वैशिष्टय़ म्हणजे इस्रोनं एकाचवेळी इतक्या मानवनिर्मित वस्तू अवकाशात याआधी कधीच प्रक्षेपित केलेल्या नव्हत्या.
भारताचं हे यश महत्त्वाचं मानलं जातं, याचं कारण एखाद्या विकसनशील देशानं एकाच वेळी अनेक उपग्रह अवकाशगामी करणं, हे प्रथमच घडतंय असंही नाही कारण याआधीही भारताने एकाचवेळी एकाहून अधिक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. या घटनेचं महत्त्व एका वेगळ्याच कारणानं आहे. आज जरी अमेरिका (म्हणजे संयुक्त संस्थाने) भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा (निदान देखावा) प्रयत्न करताना दिसत असली तरी भारतीय अवकाश संशोधन प्रकल्पात अमेरिकेने सर्वाधिक अडथळे आणले आहेत, हे विसरून चालणार नाही.
अमेरिकेनं वेळोवेळी भारतीय अवकाश प्रगतीत अडथळे आणण्याची दोन प्रमुख कारणे होती. त्या काळात म्हणजे सोव्हिएट रशियाचं विघटन होण्यापूर्वीच्या काळात रशियावर वचक आणि नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध ठेवणं अगत्याचं वाटत होतं. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष हा आतार्पयत कायमच भारतविरोधाबाबत ठाम होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आर्थिक होता. जर भारत यशस्वीरीत्या इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडू लागला तर या क्षेत्रतील अमेरिकी मक्तेदारीला चाप बसणार होता. याचं कारण अमेरिका उपग्रह सोडण्यासाठी जेवढे पैसे घेत होती त्या मानाने खूप स्वस्तात भारत उपग्रह प्रक्षेपण करू शकत होता. अमेरिकेनं केलेल्या विरोधाचा एक परिणाम म्हणजे भारत अवकाश संशोधनाच्या बाबतीतही स्वयंपूर्ण बनला.
भारतात अगिAबाण प्रक्षेपण सुरूझालं याचं कारण अगदी वेगळंच आहे. पृथ्वीचं चुंबकीय विषुववृत्त त्रिवेंद्रमजवळ आहे. त्यामुळे वातावरणाच्या संशोधनासाठी अग्निबाण सोडण्यासाठी त्रिवेंद्रमजवळील थुंबा या स्थानाची निवड करण्यात आली. तिथून अमेरिकेचे ‘नाइक-अॅपॅरो’ हे अग्निबाण सोडायला सुरुवात झाली. याच सुमारास पंडित नेहरूंच्या आवाहनास दाद देऊन विक्रम साराभाई, वसंत गोवारीकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ भारतीय अवकाश संशोधनाचा पाया घालण्यासाठी भारतात परतले.
सुरुवातीच्या काळात भारतीय अवकाश संशोधनाला साम्यवादी रशियाची खूप मदत झाली होती आणि अजूनही होते, हेही आपण विसरून चालणार नाही. भारतानं एसएलव्ही-3 या अग्निबाणाचं प्रक्षेपण केलं तसंच आर्यभट, रोहिणी, भास्कर हे उपग्रह रशियाच्या मदतीने अवकाशगामी केले त्या सुमारास अमेरिकेचा अवकाश संशोधन क्षेत्रतील भारत विरोध बळावला. अधिक शक्तिशाली अग्निबाणांसाठी भारताला जेव्हा क्रायोजेनिक यंत्रणोची गरज भासू लागली त्यावेळी अमेरिकेनं या प्रकारची यंत्रणा भारताला मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले आणि आंतरराष्ट्रीय दडपणंही आणली होती. जेव्हा एखादा देश स्वनिर्मित अग्निबाणाने आपला उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडतो, त्यावेळी आणखी एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, तो देश पृथ्वीवरच्या कुठल्याही ठिकाणावर अण्वस्त्रही टाकू शकेल अशी यंत्रणासुद्धा बनवू शकतो. जर तो एकाच वेळी अनेक उपग्रह व्यवस्थितपणो अवकाशात सोडू शकत असेल, त्यासाठी लागणारी वेळेची अचुकता त्या देशाकडे असू शकेल तर त्या क्षमतेचाही तो असाच उपयोग वेळप्रसंगी करू शकतो.
अमेरिकेने भारतीय अवकाश कार्यक्रमात वेळोवेळी अडथळे आणले याचं आणखी एक उदाहरण म्हणजे भारतानं फोर्ड एरोस्पेस या कंपनीकडून एक उपग्रह तयार करून घेतला होता. त्याच्या प्रक्षेपणपूर्व चाचणीत कोणताही दोष आढळलेला नव्हता तरीसुद्धा केप कॅनेव्हेराल येथून या उपग्रहाचं प्रक्षेपण अयशस्वी ठरलं. या उलट रशियातून आणि फ्रेंच गयानातून युरोपी अवकाश संस्थेमार्फत भारताचे अनेक उपग्रह विनासायास अवकाशात गेले आहेत आणि कार्यरत झालेले आहेत.
हे उपग्रह अनेक प्रकारचे असतात. त्यांची करयसुद्धा वेगवेगळी असतात. यातला सर्वपरिचित उपग्रह म्हणजे दळणवळणासाठी सोडलेला उपग्रह कम्युनिकेशन सॅटेलाईट. हा भूस्थिर असतो म्हणजे याची अवकाशातून फिरण्याची गती आणि पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची गती यात ताळमेळ घातलेला असतो. त्यामुळे अवकाशात तो पृथ्वीवरील एका ठिकाणी सापेक्ष स्थिर असल्यासारखा भासतो. तो ज्या जागेवर स्थिर असावा असं वाटतं ते स्थान त्याच्या कार्यकक्षेवर ठरतं. त्या उपग्रहाकडे पृथ्वीवरून पाठवले जाणारे संदेश तिथून विशिष्ट परिसरापुरते विशिष्ट वारंवारतेने पुन:प्रक्षेपित केले जातात. या वारंवारता ठरवलेल्या असतात आणि त्यानुसार प्रक्षेपणकत्र्यानी त्या वापरायच्या असतात. दूरचित्रवाणी प्रक्षेपण आणि इतर प्रकारच्या संदेशवहनासाठी हे उपग्रह वापरले जातात. आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे भू-आरेखन अर्थात काटरेग्राफिक-काटरेसॅट उपग्रह. हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर लक्ष ठेवतात. यांच्या साहायानं पिकांचा अंदाज येतो, पूर कुठर्पयत पसरेल ते कळू शकतं. टोळधाडीवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं. पर्वतांमध्ये कोसळलेल्या दरडी आणि त्यांनी अडवलेले जलप्रवाह कळू शकतात. हे फार महत्त्वाचं असतं. याचं कारण या कोसळलेल्या दरडींमागे पाण्याचा साठा वाढत जातो. या पाण्याच्या दाबानं हे नैसर्गिक बांध जेव्हा फुटतात तेव्हा मग खालच्या भागात अचानक पूर येऊन हाहाकार माजतो.
तिसरा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे सी-सॅट. आपल्या दृष्टीनं हा महत्त्वाचा. याचं कारण एल निनोसह अनेक प्रकारच्या सागरी प्रवाहांवर तो लक्ष ठेवतो. उत्तर धृवीय आणि दक्षिण धृवीय प्रदेशातलं बर्फ किती प्रमाणात वितळून सागरात पाणीवाढ होते, याचा अंदाजही हे उपग्रह काटरेसॅटच्या साथीनं घेत राहतात. हिमालयीन आल्प्समधील हिमनद्यांचं वितळणं काटरेसॅटमुळे कळतं, तर सी-सॅटमुळे मच्छिमारांना माशांचे थवे कुठल्या सागरात कुठे आहेत हे कळू शकतं.
याशिवाय इतरही अनेक प्रकारचे उपग्रह अवकाशात फिरत असतात. त्यात हवामानाच्या अंदाजासाठी सोडलेले उपग्रह, अवरक्त ऊर्जेचा (इन्फ्रारेड) वापर करून पिकांची पाहणी करणारे आणि त्याचबरोबर लष्करी उपयोगासाठी वापरले जाणारे उपग्रहही असतात. या अवरक्त किरणांचा वापर करणा:या उपग्रहांचा वापर कसा केला जातो याचं एक जुनं उदाहरण. 
अमेरिकी उपग्रह रशियावर नजर ठेवून असतात. ब्रेझनेव्ह राष्ट्राध्यक्ष असताना रशियाची ब्रेड बास्केट समजल्या जाणा:या युक्रेनमध्ये गव्हाच्या शेतीवर कीड पसरली. सर्वसाधारपणो निरोगी पीक किती ऊर्जा बाहेर फेकते याचा अंदाज अनेक वर्षाच्या पाहणीनंतर आलेला असतो. जेव्हा एखाद्या पिकावर कीड पडते तेव्हा हा ऊर्जाप्रक्षेप वाढतो. तो अमेरिकी उपग्रहांनी टिपला. यानंतर लगेचच अमेरिकेने कॅनडा, ऑस्ट्रेलियासह जिथून गहू खरेदी करता येईल तो खरेदी करून ठेवला. गव्हावरील किडीमुळे रशियात दुर्भिक्ष्य निर्माण झालं तेव्हा सॉल्ट टू (स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन ट्रीटी-2) वर सह्या केल्यास स्वस्त दरात गव्हाचा पुरवठा केला जाईल, असं अमेरिकेनं रशियाला सांगितलं तेव्हा तो करार झाला.
उपग्रह प्रक्षेपणाचं तंत्रज्ञान भारतानं नुसतं आत्मसातच केलेलं नाही, तर त्यात प्रावीण्य मिळवलं आहे. भारतीय उपग्रहांनी टिपलेले बारकावे इतके सुस्पष्ट असतात की अशा उपग्रही प्रतिमा अमेरिकेसह अनेक प्रगत देश भारताकडून विकत घेतात. या प्रगतीत परवाच्या प्रक्षेपणामुळं भारतानं आपलं ह्या क्षेत्रतलं प्रावीण्य आणि महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.