शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

जात जाता जाता परत कशी आली?

By admin | Published: January 09, 2016 2:38 PM

रामजन्मभूमीच्या वादानंतर हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला. नंतरच्या दहाएक वर्षात मात्र धर्मापेक्षाही अधिक ध्रुवीकरण जातींच्या मुद्दय़ावर होऊ लागलं. हल्ली तर ग्रामीण भागात प्रत्येक जातीची निदान एखादी संघटना नक्कीच असते. काय हवं असतं या संघटनांना? काय प्रेरणा असतात यांच्या? समतेचा विचार यात कुठे असतो का? - या प्रश्नांची उत्तरं ‘माणूस हीच जात’ मानणा:यांना हताश करणारी आहेत.

- बालाजी सुतार
 
गर्व आहे अमुकढमुक असल्याचा!’ किंवा ‘भगवं, पिवळं, निळं वादळ!’ यापैकी काहीतरी लिहिलेलं असतं. नसेल तर कुणा महापुरु षाचा, नेत्याचा फोटो असतो. रस्त्यावरून गेलेल्या दहा गाडय़ांपैकी निदान पाचांवर हे असतं. पायी चालणा:या कुणाकुणाच्या गळ्यात भडक रंगीत गमजे दिसतात. कपाळावर नाम दिसतो. मनगटांवर बांधलेल्या धाग्यांचे रंगसुद्धा काही निश्चित निर्देश करणारे.  चोळणो, टोप्या घातलेली, दाढय़ा कोरलेली माणसं दिसतात. रस्त्यांवर जातनिहाय संघटनांच्या पाटय़ा, जातवार महापुरुषांच्या नावांचे चौक दिसतात.
जागतिकीकरण आणि बाजारीकरणाची अवाढव्य चाकं निर्दयपणो फिरत असताना, अवघ्या जगाचे व्यवहार रोकडय़ा अर्थकारणाशी निगडित असताना, समकालीन प्रश्न टाळून विपरीत दिशेने जगाचा प्रवास घडवणा:या मध्ययुगीन विचारधाराही जोमाने सशक्त होताना दिसत आहेत.     
ग्रामीण जातवास्तवाचा शोध घेताना भोवताल हा असा चिरफाळलेला दिसतो. 
अवघ्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी हा जातीय विखार एवढा तीव्र नव्हता. खरंतर दलित-सवर्णांमधला झगडा तेव्हाही उघडपणो होता. दलित अस्मिता जोरकसपणो गावकुसाला धडका मारत होत्या. पण हजारो वर्षांपासून कोंडलेल्या अभिसरणाच्या प्रक्रियेतला अपरिहार्य संघर्षाचा सुरु वातीचा काळ म्हणून या झगडय़ाकडे समजुतीने पाहता येणं शक्य होतं. गावात जात-धर्मनिहाय गल्ल्या असत. जातभावनाही मनात पक्क्या असत; पण जातीवरून उघड संघर्ष झालेला कधी पाहण्यात नव्हता. आज गावांमध्ये हे चित्र नाही.
खोलात गेलो तर लक्षात येतं की रामजन्मभूमीच्या वादानंतर हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला. नंतरच्या दहाएक वर्षांत मात्र धर्मापेक्षाही अधिक ध्रुवीकरण जातींच्या मुद्दय़ावर होऊ लागल्याचं दिसत गेलं आणि आता जाती-जातींतले तणाव अधिक स्पष्टपणो समोर येताना दिसत आहेत. 
हे असं का झालं? कारणं मुख्यत: राजकीय आणि आर्थिक आहेत. मागच्या पंधरावीस वर्षांमध्ये जातीवर बेतलेल्या गलिच्छ राजकारणाने प्रचंड वेग घेतलेला आहे. संख्याबळाने अगदीच छोटय़ा असलेल्या जातींचेही सोशिओ-पोलिटिकल अभिनिवेश उग्र झालेले दिसत आहेत. राजकीय सत्ताकांक्षी जातवार पुढा:यांनी जातीय अस्मितांचे धोकादायक वणवे पेटवून ते कायम धुमसते ठेवले आहेत. आपापल्या जातींचे ऐतिहासिक महापुरु ष शोधून, त्यांना वर्तमानात अधिष्ठित करून, त्या छत्रखाली द्वेषाचं रान उठवलं जात आहे. ‘जातींच्या पारंपरिक उतरंडीत आपल्या ‘वर’ असलेल्या जातींनी आपल्या जातीवर अन्याय केलेला आहे’ किंवा ‘या उतरंडीत ‘वर’ राहणं हा आपला हक्कच आहे’ हे युवाशक्ती नामक आक्रमक ताकदीच्या मनावर ठसवून, त्या उपद्रवशक्तीच्या बळावर सत्तेतलं एखादं कुरण आपल्यासाठी राखीव करून घेण्याची स्वप्नं पाहिली जातात. या कुरणातलं एखादं झुडूप आपल्याही वाटय़ाला येईल अशा आशेने तरुणांच्या झुंडी यात सामील होतात.
आर्थिक कारणांत पहिलं कारण उद्ध्वस्त झालेली कृषिव्यवस्था. शेतीचं अर्थकारण दिवसेंदिवस बिकट होत आहे. ‘व्यवसाय’ म्हणावं असं शेतीत काहीही उरलेलं नाही. पारंपरिक शेतीव्यवस्था जातिव्यवस्थेशी निगडित होती. अठरापगड जातींच्या मदतीशिवाय शेती करता येणं अशक्य होतं. जातींमध्ये शोषण होतं पण स्वार्थापोटी का होईना, जातीय सौहार्द टिकवून ठेवणंही गरजेचंच होतं. आता शेतीच उद्ध्वस्त झाल्यामुळे आणि शेतीशी पूरक व्यवसायही छोटय़ा लोकांच्या हातून निसटल्यामुळे ‘जात’ म्हणून एकमेकांना एकमेकांची गरज उरलेली नाही. शेतीची दुरवस्था आणि आर्थिक उत्पन्नाच्या पर्यायी व्यवस्थेच्या अभावामुळे वैफल्यग्रस्त तरु णांना वैयक्तिक, सामाजिक, राजकीय लाभाच्या आशेने जात जवळ करावी लागते. 
 ग्रामीण भागात मुळातच पांढरपेशा रोजगाराच्या संधी फार कमी असतात. मटक्याचा आकडा लागावा तशा पद्धतीने क्वचित एखाद्याला बरी सरकारी नोकरी मिळून जाते. इतरांना साखर कारखाने, खासगी शिक्षण संस्था किंवा असल्याच कशात ‘चिकटवून घेतील’ अशा आशेने या-त्या पुढा:याच्या मागे हिंडावं लागतं. उमेद खच्ची करणा:या या काळोख्या वातावरणातही ङिांग चढवू शकेलशी सहज उपलब्ध गोष्ट असते ती जात. जातींचे अभिमान. स्वतंत्र ओळख निर्माण करणं शक्य नसतं तेव्हा ‘जात’ हीच एक ओळख होऊन बसते. आपली जात, आपले पूर्वज कुणीतरी ‘लै भारी’, मग आपणही तसेच भारी. किंवा, आपल्या जातीला या या जातीच्या लोकांनी त्रस दिला, आपली जात खालची मानली याचे गंड, त्यातून उफाळणारा त्वेष, वर्चस्वाची किंवा सुडाची भावना यांनी आपल्या सामाजिकतेचा मोठाच अवकाश व्यापलेला आहे. परिणामी जातींच्या अनेक संघटना जोमाने परस्परविरोधात आक्र मक होताना दिसत आहेत. 
जातींचे, ‘पूर्व दिव्याचे’ अभिमान तीव्र झाले की, ‘आज’च्या समस्यांना बगल देता येते. कालबाह्य प्रश्नांची भुतं जागवली, भगव्या, निळ्या, हिरव्या रक्ताची नशा चढली की लौकिक प्रश्न किरकोळ वाटायला लागतात. आपण ‘अमुकचे वारस’ आहोत, इतरांहून श्रेष्ठ आहोत असल्या गोष्टींची भूल पडते. जातीय दंडशक्तीने इतरांना धाकात ठेवता येतं. अहं सुखावला जातो. धूसर सीमारेषा ओलांडून अस्मितांचं रूपांतर माजात केव्हा होतं तेही उमगत नाही. जातींच्या संघटना किंवा राजकीय पक्ष याला हवा देत राहतात. 
चौफेर कोंडी झालेल्या तरु णाईला इकडे खेचणं सोपं असतं. 
‘एकमय समाजाची निर्मिती’ हे महात्मा फुल्यांचं स्वप्न सव्वाशे वर्षांनंतरही अपूर्ण आहे आणि आपण उठता बसता फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव उच्चारत असतो. आपल्या ढोंगीपणाचीही कमाल आहे. जातीधर्माचा उल्लेख न करताही मोकळेपणाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण झाल्याखेरीज काही बदल होईल अशी आशा नाही. तोपर्यंत जाती-धर्माचे हे टोकदार भाले या अवकाशाला असेच भोसकत राहणार, हे आजचं दुर्दैवी वास्तव आहे.
 
ग्रामीण भागात जातीच्या
भाल्यांना धार का आली?
1 खेडय़ापाडय़ातली अर्धीअधिक तरु ण लोकसंख्या कायमच ‘बेकार’ हे विशेषण धारण करून जगते आहे. निरु पयोगी शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडलेल्या ग्रामीण तरुणांना अर्थकेंद्री जगाचा वेग पेलवत नाही, किंबहुना त्यासाठी आवश्यक कौशल्यंच त्यांच्याकडे नसतात.
2  सुखवस्तू जगण्याची आस असते, पैसाही हवा असतो. नोकरीधंदा नसताना पैसा मिळवणं ही गोष्ट राजकारणात शक्य होईल असं अनेकांना वाटतं. जातींच्या संघटनेत प्रवेश करणं हे राजकारणाचं एक प्रवेशद्वार मानलं जातं. पण राजकारणात पाय रोवणं सगळ्यांनाच शक्य नसतं. मग छोटे स्वार्थ वर येतात. संघटनेच्या रेटय़ाने काही आरक्षणासारखे लाभ मिळाले तर दैनंदिन जगणं सोपं होईल अशी आशा जागृत होते. 
3 आरक्षणाच्या मुद्दय़ावर बेकारांच्या फौजा झटकन एकत्र येतात. 
त्यामुळे जवळजवळ सगळ्याच जातींचे लोक आता आरक्षणाच्या मागण्या करू लागल्याचं दिसतं आहे.
 
(लेखक बदलत्या ग्रामीण जीवनाचे 
अभ्यासक आहेत.)
 
majhegaane@gmail.com