बुलडाण्याच्या खेडय़ापाडय़ांत स्वयंस्फूर्तीनं रुजणा:या एका जनचळवळीचा मागोवा.
मुलगा, मुलगी वयात आली, आता त्यांचं लग्न करायचं, दोनाचे चार हात करून आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात करून द्यायची, तर सर्वप्रथम काय काय पाहिलं जातं?..
जात? पैसाअडका? इभ्रत? शिक्षण? सामाजिक पत? मानपान? हुंडा? मुलामुलीची पसंती, वडीलधा:यांची परवानगी?..
इतर ठिकाणी यातल्या काही गोष्टी होतही असतील किंबहुना त्याशिवाय लग्नाच्या वेदीवरचं एक पाऊलही पुढे सरकत नसेल, पण बुलडाणा जिल्ह्यातल्या ब:याच गावांत यातली एकही गोष्ट ‘पहिल्यांदा’ होत नाही! या गोष्टींना त्यांची प्राथमिकता नाहीच!
- मग?. काय पाहिलं जातं तिथे?
लगA मुलाचं करायचं असो किंवा मुलीचं, या सा:या गावांत तिथे पहिल्यांदा केली जाते, ती मुलामुलींची एचआयव्ही चाचणी!
लगAाळू मुलाची किंवा मुलीची एचआयव्ही चाचणी केल्याचं प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला सादर केल्यानंतरच मग पुढचे सोपस्कार!
बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास 125 पेक्षाही जास्त गावांनी थेट ग्रामपंचायतीतच यासंदर्भात ठराव केले आहेत!
‘अशिक्षित’, ‘अर्धशिक्षित’ समजल्या जाणा:या आणि अगदी गावपाडय़ातल्या या ग्रामीण भागातील लोकांनी इतका ‘क्रांतिकारी निर्णय कसा काय घेतला? नुसता निर्णयच घेतला नाही, तर त्याची अंमलबजावणीही केली. काही गावांमध्ये तर अगोदर ग्रामपंचायतीच्या सा:या सदस्यांनीच आपापली एचआयव्ही चाचणी केली आणि त्यानंतरच मग तसा ठराव केला!
असा ऐतिहासिक ठराव करणारी लाखनवाडा ही राज्यातली पहिली ग्रामपंचायत. बघता बघता अनेक गावांनी हा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच जिल्ह्यातल्या सव्वाशेपेक्षा जास्त गावांनी एचआयव्ही चाचणीचा ठराव केला. गावोगावी असे ठराव अजूनही होतच आहेत आणि हा लेख प्रसिद्ध होईर्पयत आणखी काही गावांची त्यात निश्चितच भर पडलेली असेल.
का?
एकामागोमाग एक अनेक गावं आपल्या मुलामुलींच्या विवाहाअगोदर त्यांची एचआयव्ही चाचणी का करून घेताहेत?
म्हटलं तर कुठलीही सक्ती न करता आणि कायद्याचा दंडुका न उगारताही लोकांनी स्वत:हून कसे काय असे पुरोगामी निर्णय घेतले आणि तेही इतक्या झटपट? त्याचाच शोध घेण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक गावांत भटकंती केली, तेव्हा हाती आलेलं चित्र आशादायी, एचआयव्हीला हद्दपार करण्यात मोलाची मदत करणारं तर होतंच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सुखी संसाराच्या वाटेत अचानक येणारे काटे त्यांनी दूर केले होते. अनेक संसारातला संभाव्य बिब्बा या निर्णयानं टळला होता.
बुलडाण्याच्या एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन देशमुख यांना यासंदर्भात भेटलो. चर्चा केली. त्यांनी आपला अनुभव सांगायला सुरुवात केली.
‘मलकापूर तालुक्यातील एक वयस्क गृहस्थ एकदा एका तरुणीसह माङया कार्यालयात आले. दोघांच्या चेह:यावर प्रचंड तणाव होता. ती तरुणीही दिसायला सुस्वरूप, गळयात काळी पोत, पण चेहरा निस्तेज.. त्या गृहस्थांनी स्वत:चा परिचय करून दिला अन् भित भित सांगितले, साहेब! ही माझी मुलगी तिला एड्स झाला. लगAानंतर!
लग्नाला सहाच महिने झालेले. संसारही सुखाने सुरू होता. मुलगी पदवीधर म्हणून सासरी तिचे कौतुकही होत होते. पण लगAाला दोन-तीन महिने झाले नाही तोच ती सारखी आजारी पडू लागली. नवराही खंगू लागला. लगA लाभी झाले नाही म्हणून गावांत, नातेवाइकांत चर्चा सुरू झाली. हिच्या नव:याचा खोकला बसता बसेना, तापही येई.. तपासण्या सुरू झाल्या अन् जावयाला एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले..
मुलीची पण तपासणी केली तर तिलाही या रोगाने घेरले होते.. सासरच्यांनी तिलाच दोषी ठरविले.. संबध संपला.. टाकून दिली.. आता तुमीच सांगा साहेब, हिचा काय दोष?.. माझी पोरगी गुणी आहे.. गावात राहून शहरात शिकायले जात होती, पण कधी कोणी तिच्याबद्दल एक शब्द वाकडा सांगितला नाही अन् एवढं मोठं बालंट.. साहेब, कोणाला सांगायची सोय रायली नाही. तुम्हीच सांगा, कसं जगावं? तो माणूस धाय मोकलून आपल्या मुलीची कथा सांगत होता..
अशा अनेक कथा.
मुला-मुलीचं लगA होतं. सुरुवातीचे काही दिवस बरे जातात आणि मग लक्षात येतं, दोघांनाही एचआयव्हीची लागण झालेली आहे!
मग दोषी कोण? लागण नेमकी कोणाकडून? मुलाकडून की मुलीकडून? - यातून दोन्ही कुटुंबात भांडणतंटे आणि हातघाईची वेळ तर अनेकदा यायचीच, पण संसार उद्ध्वस्त व्हायचा तो व्हायचाच.
मग काय करायचं यावर?
केवळ हा प्रसंग ऐकून गजानन देशमुख थांबले नाहीत. लगAापूर्वी किमान एचआयव्ही चाचणी झाली तरी असे अनेक संसार वाचतील हे कळायलाही त्यांना वेळ लागला नाही. पण हे समाजाला कसे समजावून सांगणार? लगAात कुंडली, रंग, पैसा, हुद्दा, नातेगोते, शहाण्णव किंवा बावन्न कुळी, शुद्ध रक्ताचे, वरचे खालचे हे सारे पाहतात पण मुला- मुलीच्या आरोग्याच्या तपासणीबाबत कोणीच बोलत नाही.
देशमुखांनी स्वत:च्या पातळीवर यासाठी प्रयत्न करून पाहण्याचं ठरवलं. देशमुख हे बुलडाण्याच्या एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा समन्वयक. त्यांनी आपल्या अखत्यारित असलेल्या तालुकास्तरीय समुपदेशकांना आणि परिसरातील अनेक गावांतील सामाजिक कार्यकत्र्याना याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी विनंती केली. गावोगावी चर्चा सुरू झाल्या.. लोकांची मानसिकता तयार करण्याचे काम सुरू झाले अन् 28 ऑक्टोबर 2क्15 रोजी बुलडाण्यातील लाखनवाडा या खामगाव तालुक्याच्या गावाने पुढाकार घेत ‘आधी एचआयव्ही चाचणी, नंतर लगA’ असा ठराव घेतला! ‘आपल्या गावात लगA होऊन येणारी मुलगी असो की आपल्या गावातील नवरदेव, दोघांनीही आधी एचआयव्ही चाचणी करावी, तसे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला सादर करावे आणि त्यानंतरच लगA करावे’ असा ऐतिहासिक ठराव घेणारी लाखनवाडा ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली.
खामगाव तालुक्यातील हे आडवळणाचे गाव, तालुकास्तरापासून तब्बल 4क् किमी अंतर. त्यामुळे लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून कायम आहे. गावात नेहमी चळवळी होतात. सिंचन घोटाळा काढणारे अभियंता विजय पांढरे याच गावचे. माजी सरपंच संताराम तायडे यांनी आपल्या कार्यकाळात गावातील निराधार पाच विद्याथ्र्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना मिळणा:या मानधनातून त्यांनी हा खर्च भागविला होता. परिवर्तनाचा विचार उचलून धरणारे हे गाव आहे.
एचआयव्ही चाचणीच्या प्रयोगाची कथा त्याची साक्ष आहे.
बुलडाणा येथील मातृभूमी फाउंडेशनच्या पुढाकाराने लाखनवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक शेषराव कस्तुरे यांनी एचआयव्ही तपासणीबाबतचे पत्र सभेत वाचून दाखविले. ग्रामपंचायत सदस्यांना एचआयव्ही, त्याचे स्वरूप, लागण होण्याची कारणो, लक्षणो अन् सामाजिक परिणाम याची माहिती दिली. गजानन देशमुख यांनी सर्व सदस्यांसोबत चर्चा केली आणि महिला सरपंच निर्मलाबाई समाधान देशमुख यांनी पुढाकार घेत ठराव मांडला..
विशेष म्हणजे, 17 सदस्य असलेल्या लाखनवाडा ग्रामपंचायतमधील एकाही सदस्याने या प्रस्तावाला विरोध केला नाही आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच निर्मलाताई म्हणाल्या, ‘एचआयव्ही चाचण्यांना घाबरायचं कशाला? त्यामुळे भावी संसार जर सुखाचा होणार असेल तर ही चाचणी करायलाच हवी. त्यामुळे गावातील युवक-युवतींची लग्नाआधी एचआयव्ही तपासणी करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. गावात नव्याने येणा:या सुना व जावयांचीही लगAाआधी एचआयव्ही तपासणी केली जाईल. गावातील तरुण-तरुणींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे..’
निर्मलाताई आणि लाखनवाडा ग्रामस्थांनी घेतलेल्या या अभिनव निर्णयाची जिल्हाभर चर्चा सुरू झाली. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या कर्मचा:यांनीही याकामी पुढाकार घेत जनजागृती केली. याचाच परिणाम म्हणून मग मोताळा तालुक्यातील इब्राहीमपूर या गावानेही पुढे येत अशाच स्वरूपाचा ठराव केला. विशेष म्हणजे, नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये आठ सदस्य महिला आहेत.
मोताळा हा सदैव अवर्षणप्रणव तसेच विदर्भ व खान्देशाच्या सीमारेषेवरील तालुका. त्यामुळे येथील लगAसंबंध थेट खान्देशार्पयत होतात. अशा परिसरातील इब्राहीमपूर ही ग्रामपंचायत..
इब्राहीमपूर ग्रामंपचायतीच्या ग्रामसभेत उमेश खोंदले यांनी मांडलेल्या या ठरावाला योगेश चव्हाण यांनी अनुमोदन दिले व हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यासंदर्भात इब्राहीमपूर या गावानं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
सरपंच गोदावरीताई म्हणाल्या, लगAापूर्वी केलेल्या एचआयव्ही चाचणीमध्ये नियोजित वधू-वर दोन्ही एचआयव्ही पॉङिाटिव्ह आढळून आल्यास या दोघांना विवाह करता येईल असाही उल्लेख आम्ही या ठरावात घेतला असल्याने इब्राहीमपूर ग्रामपंचायतीने प्रबोधनाचे पुढचे पाऊल टाकले आहे.’ त्यामुळे या ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाला विशेष महत्त्व आहे.
चिखली तालुक्यात तर महिला सरपंचानीच एचआयव्ही चाचणीबाबत पुढाकार घेतला. या तालुक्यातील पाच गावांनी 1 डिसेंबर या ‘जागतिक एड्स निर्मूलन दिना’पासून लगAापूर्वी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा ठराव घेतला. ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक भावनाताई कॅम्बेल यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील मुंगसरी, पेठ, दिवठाणा, अंचरवाडी व कोलारा या पाच गावांमध्ये 27 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात येऊन लगAापूर्वी एचआयव्ही चाचणी करण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आले.
एक साधी चाचणी, पण तिचे महत्त्व कळल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे आता या पायवाटेने जाऊ लागली आहेत.
दिवठाणा येथे सरपंच कल्पनाताई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, पेठ येथे सरपंच सुलोचनाताई शेळके, कोलारा येथे सरंपच मंदाताई खंडारे, मुंगसरी येथे सरपंच कल्पनाताई गाडेकर, तर अंचरवाडी येथे सरपंच राधाबाई हनवते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत असे ठराव घेण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे एचआयव्ही चाचणीबाबत आग्रही असणा:या या ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती असून, महिलांनी विनाविलंब यासाठी पुढाकार घेतल्याने या ठरावांचे महत्त्व वाढले आहे.
एचआयव्ही चाचणीची ही चळवळ आता गावोगावी पोहचली आहे. रायपूर, नांद्राकोळी, शिरपूर, वाकोळी, कदमापूर, दिवठाणा, पेठ, आंगथनवाडी, कोलारा, इब्राहीमपूर, बोराखेडी, खरबडी, पान्हेरा, शेलापूर, देऊळगाव माळी, पाडवा फॉरेस्ट, मांडवा डोंगरगाव, आरेगाव, हिवरखेड, ब्रrापुरी, टाकरखेड भागीले, नारायणखेड, अंढेरा, मासरूळ, ढालसावंगी, चांडोळ, कुंबेफळ, डोमरूळ, सावळी, जांब, पांगरी, लाखनवाडा, चांडोळ, रूम्हणा, वडगाव गड, दादुलगव्हाण, पळशी सुपो, तिवळी, असलगाव, पुरनगाड, निंभोरा बु., मडाखेड बु, पिंपरी खोतरी, टाकळी पासरवट, मानेगाव, खांडवी, वरवट बकाल, बावनबीर, शिरला, निमगाव, आरेगाव, अंजनी, आंध्रुड, उसरण, उबरखेड, गोहोगाव, गोमेधर, घाटबोरी, चिंचोली बोरे, दे.माळी, नागापूर, परतापूर, पारडा, बोथा, माळेगाव, मुंदेफळ, मांडवा फॉरेस्ट, मांडवा, सावणा, लोणी काळे, शेतलगाव देशमुख, शेंदला, सोनारगव्हाण, हिवरखेड अशी किती गावं सांगावीत?.
मुंगसरी या गावातील पहिले लगAही एचआयव्ही चाचणी करूनच ठरले. सुरुवात तर चांगली झाली. आता गावांचीही जबाबदारी वाढली आहे..
एचआयव्ही चाचणी म्हणजे केवळ आपल्या आरोग्याची सुरक्षा नव्हे, तर आपलं कुटुंब आणि देश सक्षमीकरणाची ही छोटीशी पाऊलवाट आहे, पण ही पाऊलवाट लवकरच हमरस्त्याला लागेल आणि एक नवा वैचारिक प्रवाह रूढ होईल. असा आशावाद या चाचणीनं दृढ केला आहे..
ठरावाआधी सदस्यांनीच
केली एचआयव्ही चाचणी!
बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ ग्रामपंचायत ‘एचआयव्ही चाचणी’ चळवळीत मोठी भरारी घेणारी ग्रामपंचायत ठरली आहे. एचआयव्ही चाचणीचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय गावातील कुठलेही लगA ठरणार नाही, असा ठराव तर या गावाने घेतलाच; परंतु ठराव घेण्यापूर्वी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: एचआयव्ही चाचणी केली. आता ग्रामपंचायतीत विवाह नोंदणी करण्यासाठी एचआयव्ही चाचणीचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला आहे.
सरपंच रामदास शेळके, उपसरपंच राजेंद्र चांदा यांच्यासह सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांनी विवाह नोंदणीसंदर्भात एचआयव्ही चाचणी प्रमाणपत्र देणो बंधनकारक करण्याची संकल्पना मांडली. धाड ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक सतीश पाटील यांनी या ठरावासाठी सदस्यांना मार्गदर्शन केले.
गावक:यांची अपेक्षा
का करायची एचआयव्ही चाचणी?
खेडय़ापाडय़ांतल्या जुन्या-जाणत्या आणि नव्या पिढीचाही अनुभव सांगतो, यामुळे आमचे संसार वाचणार असतील, सामाजिक, कौटुंबिक तेढ कमी होणार असतील तर अशा चाचण्या आवश्यकच आहेत. शिवाय प्रत्येक जण ही चाचणी करीत असल्याने अप्रतिष्ठेचा प्रश्नही त्यामुळे आपोआपच निकाली निघतो.
एचआयव्ही चाचणीसंदर्भातल्या या सा:याच चाचण्यांची एकच अपेक्षा आहे.
गावातील विवाहयोग्य तरुण-तरुणींनी विवाहापूर्वी एचआयव्ही चाचणी करावी व तसे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला सादर करावे. मुलगी गावातील व मुलगा बाहेरगावचा असेल तर भावी वराने एचआयव्ही चाचणी झाल्याचे प्रमाणपत्र नियोजित वधूच्या ग्रामपंचायतीला सादर करावे.
मोताळा तालुक्यातील इब्राहीमपूर या गावाने तर याहीपुढे जाऊन, जर भावी वधू-वर दोघेही एचआयव्ही बाधीत असतील तर त्यांचे लग्न लावून देण्यासाठी ग्रामपंचायत स्वत: पुढाकार घेईल, असाही ठराव घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे 125 ग्रामपंचायतींनी विवाहपूर्व एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्याचा ठराव पुरोगामित्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.
(लेखक ‘लोकमत’च्या अकोला आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)
rajesh.shegokar@lokmat.com- राजेश शेगोकार