- दिलीप वि. चित्रे
वाढत्या वयानुसार माणसाच्या सगळ्याच गरजा बदलतात. मुख्यत्वे खाण्याच्या-आहाराच्या बदलतात, झोपेच्या बदलतात तशाच त्या कपडय़ांच्या, पादत्रणांच्या सगळ्याच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा आणि सवयीसुद्धा बदलतातच.
एकत्र कुटुंबपद्धतीत राहणा:या ज्येष्ठांच्या बाबतीत अन्य कुटुंबीयांनी अधिक सजग असायला हवं. आपल्या शारीरिक व्यथा, दुखणी इतरांसमोर मांडून त्यांना त्रस होईल म्हणून ती दडवण्याची कृती बळावते व त्यामुळे ब:याचदा त्यांचा स्वभाव चिडचिडा व एककल्लीही बनत जातो.
लहान मुलांच्या औषधोपचारासाठी जसे बालरोगतज्ज्ञ असतात तसे खास वृद्धांच्या आजारांवर, दुखण्या-खुपण्यांवर इलाज करणारे
स्पेशालिस्ट - ¬ी1्रं31्र्रूंल्ल2 - वृद्धरोगतज्ज्ञ असतात.
अमेरिकेत ¬ी1्रं31्रू2’ या विषयावर खूप संशोधने झालेली असून, त्या विषयावरची अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत. पण पुस्तके उपलब्ध असली तरी प्रत्यक्षात मात्र अशा वृद्धरोगतज्ज्ञांची कमतरताच आहे. याची कारणो अनेक. आपल्याकडे मामुली दुखण्या-खुपण्यावर प्रथम घरगुती उपचार केले जातात; आणि खूपदा ते लागूही पडतात व साध्या दुखण्यांवर नियंत्रण ठेवण्यात येते. पण विभक्त कुटुंबव्यवस्थेत स्वतंत्र राहणा:या वृद्धांच्या अडचणी अनेक.
वृद्धरोगतज्ज्ञ या विषयाचा अभ्यासक असल्यामुळे वृद्धांच्या मानसिक अवस्थेचं, शारीरिक व्यथा आणि दुर्बलतेचं, विलक्षण सवयींचं आणि त्यांना आवश्यक असणा:या वैद्यकीय उपचारांचं अचूक मूल्यमापन करू शकतो.
मला आठवतंय, मी लहान असताना आजूबाजूला पाहिलेल्या काही ज्येष्ठांच्या बाबतीत त्यांना ‘भ्रमिष्ट’ मानलं जायचं. त्यांना भ्रम झालाय असा त्यांच्या स्वभावावर शिक्का मारला जायचा. अन्य लहान मुलं त्यांच्या खोडय़ा काढून त्यांना सतवायची आणि मग ते अधिकच विचित्रपणानं वागायचे. पण ते असं का करतात हे जाणून घेण्याचं ते वय नसल्यानं कळायचं नाही.
वैद्यकीय क्षेत्रत झालेल्या प्रगतीमुळे आज यावर अनेक औषधं व उपचार उपलब्ध आहेत. लोकांच्या जाणिवा बदलल्या आहेत. वयोमानाप्रमाणो घडणा:या या बदलांकडे अधिक समजूतदारपणो पाहण्याचं व सहानुभूतीचा हात पुढे करण्याचं सामाजिक बळ अंगी आलेलं आहे.
5क्-55 किंवा त्याहून अधिक काळ आपली जोडीदार, जीवनात सहभागी असलेली प्रिय व्यक्ती जेव्हा दुरावते, जवळचा मित्र अचानक दुरावतो तेव्हा तो आघात सहन न होऊन आपल्या आयुष्याची दिशाच बदलल्यासारख्या वागणा:या व्यक्ती आपण सर्वानीच पाहिलेल्या असतात. त्यांचा स्वभावच आमूलाग्र बदलला जातो. त्या तापट, तामसी स्वभावाच्या बनतात, तर कित्येकदा त्या एकदम अबोल, जगण्याचे आकर्षणच न उरल्यासारख्या होतात. आणि हेही स्वाभाविकच असते. हा बदल मानसिक आघाताचाच असतो व यावर मानसोपचारतज्ज्ञ उपचार करू शकतात.
प्रिय व्यक्तीच्या दुरावण्यामुळे येणारा एकटेपणा आणि अटळ असणारं वृद्धत्व या दोन गोष्टीच आयुष्य व्यापून उरणा:या नैराश्याला कारणीभूत ठरतात. मग ती व्यक्तीच एकलकोंडी बनू लागते. समाज, नातेवाईक, मित्रमंडळी यापासून नकळतपणो, तर कधी जाणीवपूर्वक अलिप्त होऊ लागते. आणि ते नैराश्य अधिकाधिक पसरू लागते व त्या व्यक्तीच्या जीवनालाही धोकादायक बनण्याची शक्यता वाढू लागते.
अशा नैराश्यग्रस्त असलेल्या व्यक्तींची जवळच्यांनी दखल घेणो हे फारच जरुरीचे असते. त्यांना एकटं राहू न देणो, सगळ्या प्रवृत्तींमध्ये त्यांना सहभागी करून घेणो, त्यांना बोलतं ठेवणो हे महत्त्वाचे. अशा प्रकारचे नैराश्य हे वाढत्या वयामुळेच येते असा त्याचा अर्थ नाही. तरुण वयातील व्यक्तींवरही ते कोसळण्याची शक्यता असते. मात्र वृद्धत्वात नैराश्याचे बळी ठरणा:या व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक अवस्था त्यांनाच न पेलणा:या ठरतात. त्या दिवसेंदिवस अधिकच कठीण होऊ लागतात.
वृद्धत्वामध्ये अनेक प्रकारची दुखणी आमंत्रण दिल्यासारखी समोर येऊन हजर असतातच. एकाच व्यक्तीला अनेक आजार असतात व त्या प्रत्येक आजाराला विविध औषधोपचार आणि मग त्या विविध औषधोपचारांची आपापसातच लढाई झाल्यामुळे रुग्णावर होणारे त्याचे दुष्परिणाम हे सगळं ओघानंच येतं. म्हणून अशा व्यक्तींना कुटुंबीयांनी, मित्र-मंडळींनी आधार देणं, त्यांना आनंदात ठेवणं हीे एक सामाजिक गरजच असते.
ब:याचदा वृद्धत्वामुळे येणा:या शारीरिक शिथिलतेमुळे हालचाली मंदावतात. काम करण्याची क्षमता नष्ट होते. बसून राहणो, टीव्ही पाहणो वाढते व त्यामुळे वजन वाढते, अन्य बैठे आजार उद्भवतात. थोडक्यात म्हणजे, समाजाचं वय वाढतं तसं त्याच्या गरजाही बदलतात.
मग मला ‘म्हाताùùरा हो! म्हणून आशीर्वाद देणा:या आजीचीच आठवण येते; आणि मला मोठय़ाने ओरडून म्हणावंसं वाटतं, ‘‘लहानपण देगा देवाùù!’’
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह, ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगितिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम/संस्थांचे संपादक,
संयोजक, संघटक)
dilip_chitre@hotmail.com