शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

विचारांची दृश्य मांडणी

By admin | Published: May 09, 2015 6:32 PM

कला व सुयोजन यांचा संबंध जेव्हापासून जीवन अस्तित्वात आले आणि माणसाला माणूस म्हणून जगणो भाग पडले, तेव्हापासूनचा! आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करून आपले अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत माणसाला सुयोजनाने मोठा हात दिला आहे.

नितीन अरुण कुलकर्णी
 
आपल्यापैकी कोणाला डिझाइनच्या कॉलेजात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यासाठी असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या प्रवेश परीक्षेत मुळात आपला डिझाइनकडे असलेला कल (डिझाइन अॅप्टिटय़ूड) तपासला जातो. मार्गदर्शनासाठी कोणाला विचारल्यास हमखास सांगितले जाईल, की या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ड्रॉइंग आले पाहिजे आणि यासाठी चित्रकलेचे धडे गिरवले पाहिजेत. आजकाल प्रवेश परीक्षांकरिता तयारी करवून घेणारे अनेक व्यावसायिक वर्ग उपलब्ध आहेत. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याव्यतिरिक्त हे वर्ग चित्रकलेचा अनावश्यक सराव करून घेतात; याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या मनात डिझाइन व कला या विषयांचा असलेला अन्योन्य संबंध हे होय. 
या संबंधाची फोड केली असता असे दिसून येईल की आपल्याला डिझाइन म्हणजे दृश्यात्मक सौंदर्ययुक्त कला वाटते, जी वस्तूंना सुशोभित करण्यासाठी वापरली जाते, आणि कला म्हणजे रेखांकन (ड्रॉइंग) व रंगकाम (पेंटिंग) जे वास्तवाची हुबेहूब नक्कल करते. नेमका हाच अर्थ हेरून व आपल्याला पूर्ण ग्राहक समजून हे व्यावसायिक आपल्याला खूश करू इच्छितात. अर्थात अशा सरावातून मुलांवर नकळतरीत्या संस्कार होत असतात, व अप्रत्यक्षरीत्या समज तयार होताना दिसते. परंतु यश मिळालेल्या विद्याथ्र्याची अशीही उदाहरणो आहेत, की जे प्रशिक्षण वर्गात ड्रॉइंगचे कसब जेमतेम असूनही गेले नाहीत, ही समज त्यांना उपजतच होती.  कलेतले काही भाग डिझाइनच्या प्रक्रियेमध्ये उपयोगी येतात. जसे रेखांकन, कल्पकता, अभिव्यक्ती प्रवणता व निर्मितीक्षमता! परंतु या सर्व क्षमतांचा योग्य क्र म व भर यातूनच डिझाइनमधली प्रक्रिया यशस्वी होऊ शकते.
कुठलीही वस्तू अथवा प्रणालीचे डिझाइन करण्याच्या विचारांची दृश्यरूपात मांडणी करता येणो हे महत्त्वाचे असते. त्यातील विषयाचे चित्रीकरण हुबेहूब नसले तरी चालते. इथे चित्रंचा वापर केवळ आपली संकल्पना मांडणो यासाठीच केला जात असतो. सोबतच्या उदाहरणावरून ते समजू शकेल, माइंड मॅप हे एक विचारांच्या मांडणीचे साधन म्हणून डिझाइनच्या शिक्षणात वापरले जाते.सोबतची आकृती पहा. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या पूर्ण प्रणालीचा अभ्यास (सिनेरीओ बिल्ंिडग) करण्यासाठी बनवलेला  हा माइंड मॅप!  याचा उपयोग नंतर योग्य त्रुटी शोधण्यासाठी व नंतर डिझाइनद्वारे उपाययोजना करण्यासाठी झाला.
कला व सुयोजन (डिझाइन) यांचा संबंध जेव्हापासून जीवन अस्तित्वात आले व माणसाला माणूस म्हणून जगणो भाग पडले तेव्हापासूनचा, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करून आपले अस्तित्व साध्य करणो! त्यामध्ये प्राण्याची शिकार व ती करण्यास त्याची सामग्री जमवणो, आयुधे तयार करणो आणि त्याचा शिताफीने वापर करणो यामध्ये सुयोजन  आले. अग्नीचा शोध लागल्यानंतर त्याला मशालीचे रूप देऊन गुहेतल्या गडद अंधाराला प्रकाशमान करणो ही कलेच्या चालनेस कारणीभूत ठरलेली एक महत्त्वाची घटना ठरली. अल्तामीरा (स्पेन) व लास्को ( फ्रान्स) येथे सापडलेल्या पहिल्या-वहिल्या प्राण्यांच्या शिकार भित्तीचित्रंचा जन्म या सुरुवातीच्या काळातलाच!  आदिमानव जेव्हा गुहेतल्या ओबडधोबड भिंतींवरील प्रकाशसावल्यांचा खेळ बघायला लागला,  त्यातून त्याला बिकट अशा शिकारीच्या प्रसंगी पाहिलेल्या प्राण्यांच्या आकृत्या मनातून प्रत्यक्षात दिसू लागल्या असाव्यात. त्यातून ही चित्रे जन्माला आली. 
अर्थात काडी मातीत फिरवल्यावर उमटणा:या  रेषांची जाणीव, त्यांमधून मनात दिसणा:या दृश्य प्रतिमा बंदिस्त करण्याची आस आदिमानवाला चित्रंपर्यंत घेऊन गेली. माती, खनिजे व इतर नैसर्गिक साधने वापरून चित्रंना जिवंत रूप देता येऊ शकते हे तंत्रज्ञान- देखील तेवढेच महत्त्वाचे होते. कला म्हणजे मनातले रूप, दगडांच्या भिंतींवर चितारण्याची आस व त्यासाठी सुयोजन म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर असा कला व डिझाइनचा मिलाप दिसून येतो. 
काळाच्या ओघात जीवनाशी एकसंध असलेल्या सगळ्या क्रिया हळूहळू विभागल्या गेल्या. शरीरासाठी म्हणजे ऐहिकतेसाठी वस्तूंची निर्मिती व मनाच्या आनंदासाठी कलाकृती अशी विभागणी झालेली दिसते. प्रागैतिहासिक काळात मात्र जीवनाच्या अनेक भागांमध्ये एकसंधता दिसते. पृथ्वीवरचा पहिला उद्योग म्हणजे आयुधांची निर्मिती. आधी दगडांच्या चिपा काढून त्यांना धारधार बनवण्यातून व नंतर प्राण्यांची हाडे, शिंगांचा वापर करून ही आयुधे बनवली गेली. आश्चर्याची बाब म्हणजे या आयुधांच्या मुठींवरती सुंदरशी प्राण्यांची चित्रे कोरली आहेत, त्यात पराकोटीचे कौशल्य दिसते.
 
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी  या संस्थेत  डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत)