शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

लॉँग वीकेण्डची संधी साधायची असेल तर..

By admin | Published: February 15, 2015 2:51 AM

विकेण्डला जोडून सुट्टय़ा आल्या की, सहसा कोणाचेच पाय घरात थांबत नाहीत. पूर्वी सलग एकामागोमाग एक सुट्टय़ा आल्या की, फिरण्यासाठी जवळपासची ठिकाणं शोधली जायची.

विकेण्डला जोडून सुट्टय़ा आल्या की, सहसा कोणाचेच पाय घरात थांबत नाहीत. पूर्वी सलग एकामागोमाग एक सुट्टय़ा आल्या की, फिरण्यासाठी जवळपासची ठिकाणं शोधली जायची.  बसने वा ट्रेनने केलेली ती छोटी सहलही वर्षभरासाठी पुरेशी व्हायची, मात्र गेल्या काही वर्षांत रविवारला  ‘वीकेण्ड’ची आधुनिक झळाळी चढली आणि या ‘वीकेण्ड’ला जोडून सुट्टय़ा आल्या की, देशांतर्गत पर्यटनाची क्रेझ वाढली. विमानाने दीड ते दोन तासांच्या अंतरावर वा बस, गाडीने सहा ते सात तासांवर असलेल्या ठिकाणांची सैर केली जाऊ लागली. आता तर अशा सुट्टय़ांमध्ये देशांतर्गत नाही तर शेजारील देशांची सैर करण्याचा ट्रेण्ड वाढू लागलाय. विमानाने केवळ तीन ते सहा तासांवर असलेली ठिकाणं या पर्यटनासाठी निवडली जातात. त्यामध्ये अबुधाबी, ओमान, दुबई, थायलंड यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत हा ट्रेण्ड चांगलाच रूळण्याची चिन्हं आहेत. वाढता उत्पन्न स्त्रोत, बदलती लाइफ स्टाइल, परदेशी पर्यटनाविषयीची वाढती क्रेझ आणि ट्रॅव्हलिंग कंपन्यांमार्फत दिली जाणारी मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातली बजेट टूर पॅकेज्ेस ही यामागची चार कारणं आहेत.
यंदाचे लॉन्ग विकेण्ड 
मोठय़ा विकेण्डची संधी साधून परदेशांत फिरायला जायचं म्हणजे त्याचं पूर्व नियोजन हवंच; पण प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. परदेशातील दौ:याचा खर्च करून अवघ्या तीन-चार दिवसांत घरी येणं म्हणजे जेवायच्या पंक्तीला जाऊन केवळ ताक पिऊन आल्यासारखं. असं झटपट पर्यटन परवडणारंही नसतं. पण तरीही या वर्षातल्या मोठय़ा वीकेण्डला संस्मरणीय बनवायची तुमची इच्छा असेल, तर काही देशांतर्गत ठिकाणं आहेतच. शिवाय या सुट्टय़ांच्या काळात परदेशात जायचंच झालं तर काही ठिकाणी त्या काळात विशेष काय असेल, याची ही नोंद.
 
  6 ते 8 मार्च 
(होळी-शनिवार-रविवार)
कुठे जाऊ शकाल : 
1) शांतिनिकेतनमधला बसंत उत्सव, 
2) कुर्गला कॉफीची पांढरी फुलं उमलताना पाहण्यासाठी. 
3) मसुरीचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवण्यासाठी.
  2 ते 5 एप्रिल 
(महावीर जयंती, गुड फ्रायडे, शनिवार-रविवार)  
कुठे जाऊ शकाल : 
1) व्याघ्र दर्शन घडण्याचा अतिशय योग्य काळ. त्यामुळे जिम कॉर्बेट, रणथंबोर किंवा बांदिपूरच्या राष्ट्रीय उद्यानांना भेट देता येईल.
  11 ते 14 एप्रिल
(शनिवार-रविवार-आंबेडकर जयंती)
कुठे जाऊ शकाल : 
1) इस्तंबूलमधील आल्हाददायक वातावरण पाहण्याची योग्य संधी. कारण या काळात तिथे पर्यटकांची संख्या मर्यादित असते. 
2) नाहीतर उन्हाची लाही थांबवणारी दार्जीलिंगची देशांतर्गत सफर आहेच. 
  1 ते 4 मे
(महाराष्ट्र दिन-शनिवार-रविवार-बुद्ध पौर्णिमा)
कुठे जाऊ शकाल : 
1) उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना घेऊन क्वालालम्पूरला (मलेशिया) जगातील सर्वात मोठा बर्ड पार्क पाहता येईल. इथे 21 एकरच्या पार्कमध्ये तीन हजारहून अधिक पक्षी आढळतात. शिवाय इथे जवळच एक मोठ्ठे मत्स्यालयही आहे.
2) देशाबाहेर जाणं जमणार नसेल, तर सिक्कीममधील गंगटोक शहराला भेट द्या. ईशान्य भारताची सैर होईलच; पण या काळात तेथे होणारा आंतरराष्ट्रीय फ्लॉवर फेस्टिवल देखील पाहता येईल. 
  15 ते 18 ऑगस्ट 
(शनिवार- रविवार-स्वातंत्र्य दिन-पतेती)
कुठे जाऊ शकाल : 
1) सेशेल्समध्ये (हिंदी महासागारातील बेटसमूह) जाऊन पाण्याखालचं जग पाहण्याची सुवर्णसंधी. विशेष म्हणजे आता तर मुंबईहून सेशेल्स अशी थेट विमान सेवाच सुरू झाली आहे. येथील व्हीसाबाबतचे नियमही शिथिल आहेत. 
2) केरळच्या कोवलम बीचवर आयुर्वेद थेरपी घेण्यासाठी जाण्याचा हा योग्य काळ आहे.
  17 ते 2क् सप्टेंबर
(गणोश चतुर्थी-शनिवार-रविवार)
कुठे जाऊ शकाल : 
1) कासवांची वसतिस्थाने पाहण्यासाठी ओमान, भूतानला ट्रेकिंगसाठी किंवा लंडनमधल्या‘ओपन हाऊस लंडन’मध्ये सहभागी होण्यासाठी. या उत्सवानिमित्त 19-2क् सप्टेंबरला लंडनमधील 7क्क् ऐतिहासिक वारसा असलेली स्थळं विनाशुल्क पाहण्यासाठी खुली केली जातात.
  24 ते 27 सप्टेंबर
(बकरी ईद-शनिवार-रविवार)
कुठे जाऊ शकाल :  
1) म्युनिक (जर्मनी) मधील आक्टोबर फेस्ट. 
(19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर)
  2 ते 4 ऑक्टोबर 
(गांधी जयंती-शनिवार-रविवार)
कुठे जाऊ शकाल : 
1) फेसाळलेल्या पाण्यात राफ्टींग करण्यासाठी हृषीकेशमध्ये किंवा पॅराग्लायिडंगसाठी कामशेतला.
  22 ते 25 ऑक्टोबर
(दसरा-शनिवार -रविवार)
कुठे जाऊ शकाल : 
1) म्हैसूरचा दसरा महोत्सव, 
2) तारकर्लीचं स्कुबा डायिव्हंग आणि डॉल्फिन दर्शन
  24 ते 27 डिसेंबर
(रमजान ईद-नाताळ-शनिवार-रविवार)
कुठे जाऊ शकाल : 
1) ािसमस सेलिब्रेशन पाहण्यासाठी हॉन्गकॉन्ग जबरदस्त ठिकाण आहे.