शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘इझाबेला’

By admin | Published: June 24, 2016 5:09 PM

नवरा-बायकोमध्ये 30 वर्षाचे अंतर ब्राझीलमध्ये नवीन नाही. इथे जिममध्येही साठीच्या आसपासचे अनेक ‘तरुण’ वजन उचलताना दिसतात. त्यांच्या कमवलेल्या शरीराचा कुणालाही हेवा वाटू शकतो. पुरु ष सहसा लग्नाची कमिटमेंट करीत नाहीत. केली तर त्यांना मोठ्ठी डील हवी असते. लहानसे स्वप्न असते बायकांचे. स्वत:चे घर, नवरा, मूल, हक्काची जागा, हक्काची माणसे. जीव तोडून प्रेम करतात या बायका. कुठे कमी पडत नाहीत. तरीही मेळ बसत नाहीच.

- सुलक्षणा व:हाडकर
 
 
पलकों से ख्वाब क्यों गिरे?.
हा प्रश्न विचारायचा तरी कुणाला?
देश बदलला, संस्कृती बदलली, तरी बाईचे नशीब बदलत नाही.
इझाबेला, वय 33. 
वयाच्या 17 व्या वर्षी आकंठ प्रेमात बुडून वयाने दहा वर्ष मोठय़ा मुलाशी लग्न केले. अठराव्या वर्षी मुलगी झाली. विसाव्या वर्षी फारकत. अत्यंत गरीब कुटुंबातील. दहा भावंडांपैकी एक. सगळ्यात वेगळी. उत्तम इंग्लिश आणि स्पॅनिश बोलणारी. 
ब्राझीलमध्ये हे क्वालिफिकेशन ठरते. आईची गरिबी तिला आवडत नव्हती. रिओ शहराजवळील एका गरीब बकाल उपनगरात राहत असणारी ती लाज वाटते म्हणून काही तरुण मुलींबरोबर शहरात राहत होती. त्या सगळ्या जणी रात्रीचे काम करणा:या. रिओमध्ये बारमध्ये काम करणा:या स्त्रियांना वाईट समजले जात नाही. हिच्या इंग्लिशच्या मदतीने त्यांना काही मित्र मिळत होते. इथे या व्यवसायाला उगीच नैतिकतेच्या तोरणात बसवायचे नसते. त्यांच्याबरोबर राहूनसुद्धा ही स्वत:ला सांभाळून होती. त्यांच्यामुळे तिची रोजची बिअर सुटायची. कधी कधी रात्रीचे जेवण.
मला ती नेहमी लंचच्या वेळेस फोन करायची. म्हणायची, मी नेमकी तुङया विभागात येतेय. चल सोबत लंच करूयात.
एरवी तोळामासा मोजून खाणारी (ब्राझीलमध्ये उपाहारगृहांमध्ये वजनावर जेवण मिळते. म्हणजे तुम्हाला जितके हवे तेवढे वाढून घ्यायचे आणि त्याचे वजन करायचे. वजनानुसार पैसे आकारले जातात.) इझाबेला व मी लंचला गेलो की सूप, सलाड, ज्यूस (बिअर) मेन कोर्स आणि डेझर्ट मागवायची. बिल अर्थात मीच देत होते. ती नोकरी करत होती. ब्राझीलमधील कामगार कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला कार्यालयात नियमानुसार एक लंच कार्ड दिले जाते. यात भारतीय रु पयानुसार दिवसाचे 5क्क् रु पयांचे ताट ती घेऊ शकत होती. महिन्याचे पैसे त्यात कंपनी भरत असते. 
इझाबेला हे लंचकार्डसुद्धा पेद्रोच्या मित्रंसाठी आणि पेद्रोसाठी विकेंडला खर्च करायची. तिचे सर्व पैसे पेद्रोसाठी खर्च होत होते. पेद्रो तिचा खास मित्र होता. तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान. त्यांचा अनुवादाचा व्यवसाय होता. हिनेच सुरू केला होता. नोकरी सांभाळून ती त्यालाही सांभाळत होती. तिला आर्थिक अडचण होती. म्हणून तिने तिच्या माजी नव:याकडे मुलीला ठेवले होते. पण पेद्रोसाठी ती जिवाचे रान करायची. तिच्या ऑफिसमधील कामे त्याला मिळवून देत होती. त्या दोघांचे बरे चालले होते. आणि अचानक चार दिवस ती कामावर गेली नाही. ऑफिसच्या लोकांनी शोधाशोध केल्यावर समजले ती रु ग्णालयात होती. झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली रिचवली होती तिने.
- कारण होते पेद्रो तिला सोडून एका दुस:या मुलीबरोबर राहू लागला होता. ऑफिशिअली त्यांचे ब्रेकअप झाले. पण तिला हे स्वीकारता आले नाही. निदान असे करून तरी तो तिला भेटायला येईल या आशेत होती ती. मला म्हणाली, मला त्याच्या बरोबर एकदा आठवडाभर फिरायला जायचेय, मग पाहा तो कसा माङयाकडेच राहील.
मला इतके वाईट वाटले तिच्या आशेकडे पाहून. तो काही आला नाही. हिची नोकरी गेली. ती मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेत होती.
इथल्या कामगार कायद्यानुसार ती जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत तिचा पूर्ण पगार देणो भाग असते. सरकार तिच्या खात्यात ते पैसे जमा करते आणि कंपनी सरकारला. यात सहा महिने गेले. दरम्यान, पेद्रोने नव्या मैत्रिणीबरोबर घरोबा केला. इझाबेला सैरभैर झाली. घराचे थकलेले भाडे, काम नाही, मुलगी नाही, मित्र नाही. शेवटी गरीब आईच्या घरी निम्न स्तरातील वस्तीत जाऊन राहणो नशिबात आले. तिला तिच्या नशिबाकडून खूप काही हवे होते.
मध्यंतरी फोन आला. म्हणाली, मी पन्नास वर्षाच्या कुणाशीही लग्न करणार आहे. मी अभिनंदन केले तर म्हणाली, ‘शोधतेय. विकेंडला समुद्रकिना:यावर येऊन बसेन. कुणी न कुणी मिळेलच. अजून पंचविशीची दिसतेय. पेद्रोला चांगला धडा मिळेल. 
दुस:या एका मैत्रिणीबरोबर असाच किस्सा घडला. तो तिच्या घरी येऊन राहिला. आणि एके दिवशी तिचे सर्व दागिने, रोख पैसे घेऊन दुस:या शहरात पळाला. ती सध्या डिप्रेशनमध्ये आहे.
नवरा-बायकोमध्ये 3क् वर्षांचे अंतर ब्राझीलमध्ये नवीन नाही. म्हणजे पहिले लग्न सतराव्या अठराव्या वर्षी झालेले असते. मग रीतसर मुले होतात. मुलांची काळजी नियमाने दोघे पालक घेतात. घटस्फोट झाल्यावरही दोघांचे हक्क कायम राहतात. दोघे मोकळे झाले की पुन्हा लग्न करतात.
पुरु ष खूपदा वयाने मोठय़ा आणि यशस्वी स्त्रीच्या घरी जाऊन राहतात. आणि स्त्रिया वयाने खूप मोठय़ा पुरुषाबरोबर राहतात. मात्र तो श्रीमंत हवा.
आणखी एका उदाहरणात एक भारतीय पुरु ष होता. मुलगी लग्नाची असताना तो त्याच वयाच्या मुलीशी घरोबा करत होता. भारतातील बायको, मुलगी, मुलगा यांना काहीच माहिती नव्हते. एकाच वेळेस त्याचे दोन संसार सुरळीत चालू होते. त्या मुलीला हे माहीत होते, पण तिला मिळणा:या आर्थिक मदतीमुळे आणि तिच्या वयामुळे तो तिला सोडून देणार नाही असा विश्वास होता.
माझी एक पंचेचाळिशीची शेजारी आहे. तिचा मोठा मुलगा 27 वर्षांचा आहे आणि लहान मुलगी एक वर्षाची. इथे जिममध्येही 6क् च्या आसपासचे अनेक ‘तरुण’ वजन उचलताना दिसतात. त्यांची कमवलेली शरीरे पाहिली की कुणालाही हेवा वाटू शकतो. तर असे हे बरेच पुरु ष पंचवीस वर्षे लहान बायकोबरोबर संसार करीत असतात. त्यांची मुले 2-3 वर्षांची असतात.
इथे पुरु ष सहसा लग्नाची कमिटमेंट करीत नाहीत. आणि केली तर त्यांना मोठ्ठी डील हवी असते. स्त्रियांना तर नेहमीप्रमाणो पांढ:या घोडय़ावरील राजकुमार नाही तर पन्नाशीचा श्रीमंत कुणी हवा असतो. बरोबर राहताना इथे कायद्यानुसार एक करारही करतात. यानुसार त्या स्त्रियांना कोणते अधिकार आहेत आणि कोणते नाहीत हे ठरवले जाते. कळत नाही सिंड्रेलाला सुरु वातीपासून राजकुमार हवा होता की तिला फक्त काचेचे बूट हवे होते? की तिला बाहेर पडायचे होते, स्वातंत्र्य हवे होते? कित्ती लहानसे स्वप्न असते बायकांचे. स्वत:चे घर, नवरा, मूल, हक्काची जागा, हक्काची माणसे. काय चुकते? खूप जास्त मागणी आहे का ही? शिक्षण जास्त होते की पगार जास्त होतो? अपेक्षा की बायका हळव्या होत चालल्यात?
 लग्न हवे, साथ हवी, सोबत हवी हे अपेक्षांचे ओङो ठरतेय. यशस्वी स्त्रिया बाहेर मुलूखमैदान गाजवत आहेत आणि एक कमिटमेण्ट करणारा जोडीदार मिळणो दुर्मीळ होतेय.
जीव तोडून प्रेम करतात या बायका. कुठे कमी पडत नाहीत. तरीही मेळ बसत नाही. खंबीरपणाचे मुखवटे घातलेल्या पण आतून तुटलेल्या बायकांना समजून घेणारा एकही जण नसावा.?
प्रियकराला इथे नामुरादो म्हणतात आणि प्रेयसीला नामुरादा म्हणतात. खरे म्हणजे हा पोर्तुगीज शब्द मला उर्दू अर्थाचाच वाटतो. 
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
 

sulakshana.varhadkar@gmail.com