शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

चीनमधला भारत !

By admin | Published: March 10, 2017 3:54 PM

चीनलासुद्धा आपल्यासारखाच मोठा इतिहास आणि परंपरा आहे. सणांमध्येही बरचसं साधर्म्य. त्यांचं नवीन वर्ष म्हणजे जणू आपल्याकडची दिवाळीच! अख्ख्या घराची साफसफाई, दारांवर शुभचिन्हं, आकाशकंदील, नवे कपडे, फटाके, ‘फराळ’... सणांना मोठ्यांचा आशीर्वाद घेणं, सासुरवाशिणींनी माहेरी येणं. असं बरंच काही..

अपर्णा वाईकर
 
जगाच्या पाठीवर पसरलेल्या मराठी माणसांनी कमावलेल्या अनुभवांची,  त्यांनी चालवलेल्या धडपडीची कहाणी...
 
इथे चीनमध्ये राहायला लागल्यावर हळूहळू खूप गोष्टींची माहिती व्हायला लागली. भाषा यायला लागल्यामुळे बऱ्याच गोष्टी जरा सोप्या वाटायला लागल्या. भाजीबाजारात, इतर खरेदीच्या जागांवर कुठली वस्तू हवी आहे, त्याचे किती पैसे झाले या सगळ्या गोष्टी सुरुवातीला मी खुणांनी विचारत होते. त्या आता व्यवस्थित सांगता यायला लागल्या होत्या. भाजीबाजारात तर सगळ्या भाजीवाल्यांना आपण त्यांची भाषा बोलतोय हे बघून फारच आनंद होतो. अगदी सुरुवातीला ज्या बाजारात मला माझी ‘आया’ घेऊन गेली तो बाजार बघून मी जरा घाबरलेच. कारण एकाच बाजारात मांस, मासे, अंडी, भाज्या, फळं, धान्य हे सगळं मिळतं. आपण भाजी किंवा फळं घेत असताना बाजूच्या काउंटरवर कुणीतरी कसलं तरी मांस वजन करून, कापून घेतंय ही कल्पनाच मला विचित्र वाटली. हल्ली मात्र त्यांनी एकाच एरियात पण जरा वेगळ्या बाजूला ही व्यवस्थित दुकानं केली आहेत. फळं, भाज्या आणि अंडी विकणारे वेगळ्या बाजूला असतात. 
इथे सगळीच माणसं खूपच चौकस असतात. आपल्याला भाषा येतेय हे कळल्यावर खूप प्रश्न विचारतात. मला अर्थातच याचाही फायदा झाला. कारण त्यामुळे ही भाषा बोलण्याची जास्तीत जास्त सवय झाली. इथे ८० टक्के लोक चिनी भाषाचबोलतात. टॅक्सीवाल्यांना तर अजिबात इंग्रजी बोलता येत नाही. अगदी शंभरात एखाद्याला ‘व्हेरी गुड, थॅँक यू, व्हेअर यू वॉण्ट टू गो’ एवढं बोलता येतं, पण आपण भारतीय आहोत हे कळल्यावर खूप टॅक्सीवाले हिंदी गाणी मात्र म्हणून दाखवतात. त्यात राज कपूरचे ‘आवारा हूॅँ’ बहुतेकांचं आवडतं गाणं आहे हे कळलं.
शांघायमधल्या टॅक्सीवाल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही कुणाला फसवत नाहीत. उगाच वेगवेगळ्या रस्त्यांनी फिरवून मीटरचे पैसे वाढलेत असं कधीच होत नाही. अर्थात, याला एखादा अपवाद असलेही; पण आम्हाला तो भेटलेला नाही. 
इथल्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक खूप मेहनती आणि वेळेचे पक्के आहेत. अगदी माझ्या घरातली आया आणि आमचा वाहनचालक यांच्या कामावर येण्याच्या वेळेवरून आपण घड्याळ लावू शकतो! सारे मन लावून काम करतात. कामचुकारपणा त्यांना माहिती नाही. दिलेलं काम व्यवस्थित पूर्ण करायचं, त्यात हयगय करायची नाही ही गोष्ट त्यांच्या रक्तातच आहे. सतत हसतमुख असतात हे लोक. आमच्या आयाला मी गेल्या सात-साडेसात वर्षांत कधी वैतागलेलं, कंटाळलेलं पाहिलेलं नाही. उलट कधी कधी मीच तिला सांगते, आता जरा वेळ बस. हे काम आजच्या आज नाही झालं तरी चालेल. 
चीनलासुद्धा आपल्यासारखाच मोठा इतिहास आहे. संस्कृतीही बरीचशी आपल्याशी मिळती-जुळती आहे. त्यांचा पेहराव जरी पूर्णपणे पाश्चिमात्य असला तरी त्यांचे सणवार आपल्यासारखेच उत्साहानं साजरे होतात. गंमत म्हणजे आपल्यासारखंच त्यांचं कॅलेंडरसुद्धा चंद्राच्या कलांवर अवलंबून असतं. आपण जसं मराठी तिथींप्रमाणे आपले सण साजरे करतो तसंच तेदेखील त्यांच्या तिथींप्रमाणे सण साजरे करतात. आपली दिवाळी, गुढीपाडवा हे दरवर्षी त्याच तारखेला त्याच महिन्यात येत नाही तसाच त्यांचा स्प्रिंग फेस्टिव्हल, मिड आॅटम फेस्टिव्हल ह्यांचे महिने आणि तारखा मागे-पुढे होत असतात.
आपल्यासारखेच यांच्याकडेही खूप सण असतात. ‘चुनजिथे’ म्हणजे स्प्रिंग फेस्टिव्हल किंवा ज्याला आपण चायनिज न्यू इयर म्हणतो, हा सण सगळ्यात मोठा असतो. आपल्या दिवाळीसारखाच. प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्वं आणि मोठ्या धूमधडाक्यात तो साजरा होतो. त्यांच्या कॅलेंडरप्रमाणे पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण सुरू होतो तो १५ व्या दिवसापर्यंत चालतो. यासाठी लोक भरपूर तयारी करतात. सगळ्या घराची स्वच्छता, साफसफाई करून दारांवर शुभचिन्हं लावली जातात. यामुळे गेल्या वर्षातल्या वाईट गोष्टी (बॅड लक)हे सगळं झाडलं जातं आणि घर नवीन वर्षाच्या चांगल्या गोष्टींसाठी तयार होतं. दारांत शुभचिन्हांबरोबर लाल कागदावर त्यांच्या भाषेत लिहिलेले दोहेसुद्धा लावले जातात. लाल रंगाला अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे मोठमोठे लाल आकाशकंदील दारोदारी लावलेले दिसतात.
नवे कपडे, खेळणी, सुकामेवा, सुकवलेलं विशिष्ट प्रकारचं मांस, सुकवलेली वेगवेगळी फुलं, फळं, केक्स आणि फटाके यांची खरेदी केली जाते. नव्या वर्षाच्या एक दिवस आधी बायका आपले केस धुऊन वेगवेगळ्या केशरचना करतात. कारण नवीन वर्षकाळात डोक्यावरून अंघोळ केली तर कुटुंबावर आर्थिक मंदी येते असा एक समज आहे. या काळात हे लोक विशेष करून लाल रंगाचे कपडे घालतात. यामागची भावना अशी की सगळी भुतंखेतं या लाल रंगाला घाबरून पळून जातील. कुठल्याही वस्तू फुटणार नाहीत याची काळजी घेतली जाते. चाकू, सुऱ्या, कातरी यांसारख्या वस्तू कमीत कमी वापरल्या जातात. कारण यामुळे कुणाला काही इजा झाली तर ते येणाऱ्या वर्षासाठी वाईट मानलं जातं.
जसं आपल्याकडे आपण संध्याकाळी केर काढत नाही तसंच इथे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी केर काढत नाहीत. कारण त्यामुळे घरातल्या चांगल्या गोष्टी (गुड लक) झाडलं जातं असा समज आहे. म्हणून एक दिवस आधीच स्वच्छता करून ठेवतात. या १५ दिवसांत कुणीही एकमेकांशी भांडत नाहीत. ही भांडणं वर्षभर चालत राहतील ही भीती असते. पहिल्या दिवशी सगळेजण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नातेवाइकांना भेटायला जातात. मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा देणं हे या दिवशी फार महत्त्वाचं असतं. दुसऱ्या दिवशी सगळ्या सासुरवाशिणींनी आपल्या माहेरी जाण्याची पद्धत आहे. मोठ्या माणसांनी लहान मुलांना लाल रंगाच्या पाकिटात पैसे घालून देण्याची पद्धत आहे. या लाल पाकिटाला ‘होंग बाओ’ असं म्हणतात. या होंग बाओमधले पैसे ‘सम’ संख्येतच असायला हवेत. कारण विषम संख्येचे पैसे फक्त कुणी मृत्यू पावलं तर त्या घरातल्या लोकांना दिले जातात. तसंच ‘चार’ आकड्यांशी संबंधित म्हणजे ४०-४००-४००० असेदेखील चालत नाहीत. कारण ‘चार’ या आकड्याचा चिनी भाषेतला उच्चार हा मृत्यूच्या चिनी भाषेतील उच्चाराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे पैशांची बेरीजसुद्धा ४ यायला नको. आठ हा आकडा मात्र अत्यंत शुभ मानला जातो. कारण त्याचा उच्चार हा ‘लक्ष्मी’ किंवा ‘संपत्ती’च्या चिनी उच्चाराशी मिळताजुळता असतो. त्यामुळे हा होंग बाओ देताना फार विचार करून द्यावा लागतो. 
नव्या वर्षाची संध्याकाळ फार महत्त्वाची असते. या रात्री कुटुंबातली सगळी माणसं एकत्र जमतात. नोकरीसाठी, शिक्षणासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपापल्या घरी (आई-वडील, सासू-सासऱ्यांकडे) जमतात. या रात्रीचा जेवणाचा खास बेत असतो. सगळे मिळून १२ पदार्थ (कमीत कमी) बनवले जातात. यांच्या भाषेत १२ हा आकडा मोठी युती दर्शवतो. हे १२ पदार्थ सगळेजण गप्पा करत, हसत, एकमेकांना चिडवत आनंदाने फस्त करतात. या रात्री खूप फटाके वाजवण्याची पद्धत आहे. हे सगळे फटाकेसुद्धा लाल रंगाच्या कागदांमध्ये गुंडाळलेले असतात. कारण पुन्हा तेच भुताखेतांना पळवून लावणे! शांघायमध्ये सुरुवातीला मोठमोठे फटाका शो असायचे. त्यामुळे रात्री खूप फटाके वाजत असत. यावर्षी मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून यावर बंदी घातली गेली होती. त्यामुळे फटाके वाजले नाहीत. फार क्वचित काही ठिकाणी हे शो झाले.
सगळ्या चिनी शाळांना एक महिना सुटी असते. आमच्या मुलांच्या शाळांना १० दिवस आणि आॅफिसलादेखील ८ दिवस सुटी असते. घरची आया आणि वाहनचालकसुद्धा ८-१० दिवस सुटी घेऊन गावी जातात. हे नवं वर्ष १५ व्या दिवशी संपतं. हा पंधरावा दिवस ‘लँटर्न फेस्टिव्हल’ म्हणून साजरा होतो. या दिवशी पौर्णिमा असते. असं समजलं जातं की चंद्राच्या शुद्ध आणि शुभ्र प्रकाशात सगळे चांगले आत्मे, देव हे वर स्वर्गाकडे जाताना दिसतात. त्यांना दिशा दाखवण्यासाठी काही ठिकाणी दिवे लावलेले पतंगांसारखे आकाशकंदील आकाशात सोडलेले दिसतात. शांघायच्या ‘यू गार्डन’ नावाच्या जुन्या भागात प्रत्येक वर्षाच्या चिन्हाप्रमाणे सजावट केलेली असते. यावर्षी इअर आॅफ रुस्टर’ आहे. ही सजावट बघायला खूप गर्दी असते. आजूबाजूच्या गावांतूनही लोक येतात. अख्खं शहरच दिव्यांच्या रोषणाईने सुशोभित केलेलं असतं. सगळे लोक एकमेकांना शीन निया क्वाई अर्थात ‘हॅप्पी न्यू इअर’ म्हणून शुभेच्छा देताना दिसतात. हे झालं नवीन वर्ष. पण वर्षभर असे अनेक सण साजरे होत असतात. चिंग मिंग (टुंब स्वीपिंग डे), चाँग चू जिये ‘मिड आॅटम डे’ इत्यादि अनेक सण आहेत. त्यांची माहिती पुढच्या भागात.
 
 
(लेखिका शांघायमध्ये वास्तव्याला आहेत.)